ICAI CA Exam 2024: ICAI म्हणजेच इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड तर्फे सप्टेंबर २०२४ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीए इंटर या परीक्षेच्या संदर्भात माहिती जाहीर केली आहे. यानुसार सीए इंटर ही परीक्षा दिनांक १२ सप्टेंबर २०२४ ते २३ सप्टेंबर २०२४ यादरम्यान घेतली जाईल. ही परीक्षा देण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी असलेला फॉर्म काळजीपूर्वक भरणे आवश्यक आहे. हा फॉर्म ७ जुलै २०२४ पासून सर्वांसाठी खुला झाला आहे. तो भरण्यासाठी २० जुलै २०२४ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. जर विद्यार्थी सीए इंटरमिजिएट परीक्षेसाठी चा फॉर्म २० जुलै २०२४ नंतर भरत असतील तर मात्र त्यांच्याकडून तो फॉर्म भरताना अधिक शुल्क आकारले जाईल.
CA Inter Form, Important Dates: हा फॉर्म भरण्यासाठीच्या महत्त्वाच्या तारखा पुढीलप्रमाणे:
७ जुलै २०२४ | फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरुवात |
२० जुलै २०२४ | दंडात्मक शुल्क शिवाय फॉर्म भरण्याची शेवटची तारीख |
२३ जुलै २०२४ | दंडात्मक शुल्क भरून फॉर्म भरण्याची शेवटची तारीख |
२४ जुलै २०२४ | फॉर्म मध्ये काही सुधारणा असल्यास त्यासाठी बदल करता येतील |
२६ जुलै २०२४ | फॉर्ममध्ये बदल करण्यासाठीची शेवटची तारीख |
Steps to fill the CA Inter Form: जर तुम्ही सीए इंटरमिजिएट परीक्षा यावर्षी देत असाल तर तुम्ही या पॉईंट्स च्या मदतीने त्यासाठीचा फॉर्म भरू शकता.
CA Inter Exam Fee: सीए इंटरमिजिएट 2024 देण्यासाठी उमेदवारांना इतके परीक्षा शुल्क भरावे लागेलयुनिट १ मधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क - १५००/-
विलंब शुल्क - ६००/-
युनिट २ मधील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क - २७००/-
विलंब शुल्क - ६००/-
नेपाळ, भूतान येथील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क वेगळे असतील परंतु विलंब शुल्क म्हणून ६००/- च आकारले जातील. अबुधाबी, दोहा, दुबई इत्यादी देशांमधील विद्यार्थ्यांसाठी डॉलर्स मध्ये परीक्षा शुल्क आणि विलंब शुल्क भरावे लागेल. या संदर्भातील अधिक माहितीसाठी www.icai.org या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-07-10T04:03:18Z