Marathi News LIVE Updates : भाजपा आमदार सुरेश धस आणि पंकजा मुंडे यांच्यात राजकीय कलगीतुरा रंगला आहे. हे दोघेही एकमेकांविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार आहेत. दुसरीकडे सुरेश धस यांचे कार्यकर्ते खोक्या भोसलेला काल (१२ मार्च) बीड पोलिसांनी उत्तर प्रदेशातून अटक केली. त्याला आज बीडमध्ये आणण्यात येणार आहे. त्याच्या चौकशीतून बऱ्याच गोष्टी उघड होण्याची शक्यता आहे. तसंच, विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून विविध मुद्द्यांवर दोन्ही सभागृहात जोरदार खडाजंगी पाहायला मिळतेय. अर्थसंकल्पावर टीका करण्यापासून विविध योजना बंद केल्यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. तर वरळीत होळी साजरी करण्यावर पोलिसांनी मर्यादा आणणल्याने वरळीकरांनी नाराजी व्यक्त केली आहे. या सर्व प्रकरणांवर आज प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. यासह राज्यातील विविध घडामोडी जाणून घेऊयात.
2025-03-13T04:50:50Z