MUMBAI LOCAL TRAIN MEGA BLOCK: मध्य रेल्वे, हार्बरवर उद्या ‘मेगा ब्लॉक’

मुंबई : मध्य आणि हार्बर रेल्वेवरील रूळ, सिग्नल यंत्रणा आणि पायाभूत कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावरील पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे :

कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धिम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत

परिणाम : या ब्लॉक कालावधीत सीएसएमटी येथून सुटणाऱ्या धिम्या लोकल सीएसएमटी आणि विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबून पुढे डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सुटणाऱ्या अप धिम्या लोकल विद्याविहार ते सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकावर थांबतील.

हार्बर रेल्वे :

कुठे : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.०५  ते दुपारी ४.०५ वाजेपर्यंत परिणाम : ब्लॉक कालावधीत पनवेल आणि बेलापूर येथून सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल सेवा आणि सीएसएमटी येथून पनवेल आणि बेलापूरकडे जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. त्याचबरोबर अप ट्रान्सहार्बर मार्गावरील पनवेल येथून ठाण्याला जाणारी लोकल सेवा आणि ठाणे येथून पनवेलकडे सुटणारी डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल सेवा उपलब्ध असेल.

2023-06-09T22:30:27Z dg43tfdfdgfd