मॉस्को : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवार (8 जुलै) पासून दोन दिवसीय रशिया दौऱ्यावर आहेत. अशातच आज (9 जुलै) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रशियाच्या‘ऑर्डर ऑफ सेंट एंड्रयू द एपोस्टल’या सर्वोच्च नागरीक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारत आणि रशियाचे मैत्रीपूर्ण संबंध आणि दोन्ही देशांच्या विकासामध्ये योगदान दिल्यामुळे हा पुरस्कार देण्यात आल्याची माहिती आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारत आणि रशिया यांच्यातील 22 व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण पाठवले होते. याच निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिलाच रशिया दौरा आहे.
रशिया युक्रेन युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, '' आपल्या भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शांतता राखणे गरजेचे आहे. शांतता कायम राखण्यास भारत मदत करण्यास तयार आहे. भारत हा नेहमीच शांततेच्या बाजूने आहे. भारत गेल्या 50 वर्षांपासून दहशतवादाचा सामना करत आहे. जेव्हा मॉस्कोमध्ये दहशतवादी घटना घडल्या तेव्हा काय वेदना झाल्या असतील या मी नक्कीच समजू शकतो.''
झेलेन्स्की यांनी जोरदार टीका केली आहे.
अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या. 2024-07-09T15:35:44Z