चंद्रपुरात शिवरायांच्या पुतळा अवमानाच्या विरोधात शिवप्रेमी उतरले रस्त्यावर

चंद्रपूर : मालवण राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून झालेल्या शिवरायांच्या अवमानना विरोधात चंद्रपुरात निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी 'आम्ही शिवप्रेमी चंद्रपूरकर' या बॅनरखाली शिवप्रेमींनी बुधवारी (दि.4) रस्त्यावर उतरले. सरकारच्या विरोधात घोषणा देत या घटनेचा निषेध करण्यात आला. या मोर्चामध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक संस्था, विविध कार्यकर्ते सहभागी झाले होते.

छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणाची संयुक्त तांत्रिक समिती चौकशी करणार

घोषणांनी दणाणले चंद्रपूर शहर

चंद्रपूर शहरातून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिव शिल्पाला अभिवादन करून बुधवारी (दि.4) बारा वाजता निषेध मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाच्या अग्रस्थानी महिला शिवप्रेमींनी हातात निषेध व्यक्त करणारा बॅनर घेऊन मोर्चाचे नेतृत्व केले. शिवप्रेमींनी "निषेध असो, निषेध असो, शिवद्रोही सरकारचा निषेध असो" , "छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सरकारचा निषेध असो" "मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बांधकाम मंत्री राजीनामा दो, राजीनामा दो" "छत्रपती शिवरायांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही", "छत्रपतींच्या सन्मानात, शिवप्रेमी मैदानात" "जय जिजाऊ जय शिवराय" "जय भवानी जय शिवाजी" "छत्रपती शिवाजी महाराज की जय" "शिवस्मारक जमिनीवर झालेच पाहिजे " शिवद्रोही सरकार होश में आव" अशा गगनभेदी घोषणांनी चंद्रपूर दणाणून गेले होते.

Rahul Gandhi letter : राहुल  गांधी यांचे महाराष्ट्राला पत्र : “छत्रपती शिवाजी महाराज यांची पवित्र…”

याप्रसंगी प्रा. दिलीप चौधरी, बंडू धोत्रे, संदीप गिऱ्हे, बेबीताई उईके, प्रा. माधव गुरूनुले, बाळू खोब्रागडे यांनीही मनोगत व्यक्त्‍ करून राज्य सरकारवर दोषारोप केले. यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान खपवून घेतल्या जाणार नाही, असा अशा आशयाची शपथ शिवप्रेमी नागरिकांनी सामूहिकरीत्या घेतली. सभेचे संचालन विनोद थेरे तर आभार मोहम्मद शरीफ यांनी मानले. निवासी उपजिल्हाधिकारी पवार यांनी मोर्चास्थळी येऊन शिवप्रेमींचे निवेदन स्वीकारले.

2024-09-04T13:16:09Z dg43tfdfdgfd