बातम्या

Trending:


Supreme Court Order: अधिकारांची लक्ष्मणरेषा

Supreme Court Order: ​​बिहार सरकारने सन २०१५ मध्ये तांती/तंतवा समाजाला अतिमागास (ईबीसी) यादीतून बाहेर काढून पान/सावासी यांच्या जोडीने अनुसूचित जातींच्या यादीत अधिसूचना काढून समाविष्ट केले होते.


Jayant Patil On Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावरून जयंत पाटलांचा महायुतीला टोला; म्हणाले, “काही असंतुष्ट आत्मे…”

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे.


Ajit Pawar Meeting : अजित गव्हाणे पवारांच्या राष्ट्रवादीत, अजित पवारांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Ajit Gavhane NCP : अजित गव्हाणे पवारांच्या राष्ट्रवादीत, अजित पवारांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा माजी आमदार विलास लांडेंनी त्यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवलं, पण चोवीस तास उलटायच्या आतच विलास लांडे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीसाठी हजर झालेत. आम्ही विलास लांडेंच्या मार्गदर्शनानेचं अजित पवारांची साथ सोडतोय, असं म्हणणारे अजित गव्हाणे अन त्यांचे समर्थक आता बुचकळ्यात पडलेले आहेत. अजित गव्हाणेंनी समर्थकांसह तुतारी फुंकल्यानंतर अजित पवारांनी आज पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलेली आहे. त्याच बैठकीला विलास लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. विलास लांडेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय तर अजित गव्हाणे आणि समर्थकांची यानिमित्ताने कोंडी होणार हे ही उघड आहे.


लाडकी बहीणनंतर आता राज्य सरकारी लाडक्या भावांसाठीही योजना

ladaki bahin yojna followed by state government's ladaka bhau scheme


Corruption in NEERI : ‘नीरी’वर काळा डाग

Nagpur Corruption News: ‘नीरी’मधून काही बनावट कंपन्यांना कामे दिली जाऊ लागली. याद्वारे कोट्यवधीचा निधी खिशात घातला जाऊ लागला. संस्थेचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या काळात हा सर्व प्रकार घडला.


Budget 2024 Expectations : अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा, २३ जुलै रोजी कोणत्या घोषणा होणार?

Union Budget 2024 Expectations : मोदी ३.० सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून संपूर्ण देशाला मोठ्या अपेक्षा आहेत.


Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका

Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे. आईचा थयथयाट, पोलिसांवरच अरेरावी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असं त्यात म्हटलं आहे.


MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, गट-ब अन् गट-क च्या पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्रातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणणार, यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून...


Donald Trump Attack : चुकलेला नेम, पलटलेले फासे

Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचे सारे चित्रच पालटून गेले आहे. त्याविषयी...


Sanjay Raut on Sharad Pawar : “शरद पवार मोठे नटसम्राट, तर भुजबळ…”, संजय राऊत यांचा खोचक टोला कुणाला?

Sanjay Raut on Sharad Pawar : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटले आहेत. यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.


Vidhan Parishad Election: आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, 11 जागांसाठी हे 12 उमेदवार रिंगणार

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Candidate: राज्यात आज विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...


Ajay Maharaj Baraskar: जरांगेंना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्करांची कार पंढरीत जळाली, आषाढी एकादशीलाच घटना

Solapur News: मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची कार पंढरपूरमध्ये जळाली. दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने कार जळाली की जाळली? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.


Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे

Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर पुण्याहून वाशिममध्ये रुजू, तर पूजाच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कठोर कारवाई करणार समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा भरण्यास सुरुवात, एबीपी माझानं सकाळपासून बातमी दाखवल्यानंतर यंत्रणेला जाग. शाहपूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदड, कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी टळली, पुढील सुनावणी १८ जुलैला होणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अजून दमदार पाऊस नाही, आज घडीला सात धरणांचा मिळून २२ टक्केच पाणीसाठा राहुल गांधी,उद्धव ठाकरेंवर अवमाननेचा खटला चालवा, मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी, मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणीसंबंधी दिशाभूल केल्याचा आरोप... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार, दोन्ही पालख्यांसोबत चालणार की एकच हे अजून अस्पष्ट, १७ तारखेला आहे आषाढी एकादशी..


Zero Hour Maharashtra Assembly Election : MVA vs Mahayuti ? जागावाटपावरुन कुणामध्ये जास्त मतभेद?

नमस्कार मी, विशाल पाटील... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण पूर्ण होण्याआधीच.. राज्यात विधानसभांना वेग आलाय.. कारण, अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आलीय.. आणि त्यामुळेच राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपआपल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केलीय... भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस पक्षासह जवळपास प्रत्येक राजकीय पक्षानं चाचपणी सुरु केलीय.. आणि राजकीय बैठकांनी जोर धरलाय.. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे.. आणि उद्या महाराष्ट्र प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक असेल...तिकडे आजच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडलीये.. तर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षांच्या बैठकांचा धडाकाच लावलाय.. ज्याची सुरुवात पिंपरीमधून झालीये... महायुतीच्या बैठकांचं विश्लेषण करणार आहोतच.. त्याचसोबत आपण महाविकास आघाडीमधील बैठकांचं सत्रही सांगतो.. जिथं शरद पवारांनी कालपासूनच अजित पवारांसोबतच्यांना पुन्हा पक्षात घ्यायला सुरुवात केलीये.. तिथं काँग्रेसनं लोकसभेच्या यशाची विधानसभेत पुनरावृत्ती करण्यासाठी दिल्लीत विषेश बैठकांचं आयोजन केलंय.. तर उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यापासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु केल्यात.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी.. दोन्ही आघाड्यांमधील प्रत्येक पक्षाच्या बैठकीत... विधानसभेच्या जागांवरुन दावेदारी सुरु झाल्याचंही समोर येतंय.. प्रत्येक पक्ष आमूक एक आकडा सांगतोय.. त्यावरुनही संघर्ष होवू शकतो का? की आकड्यांच्या चर्चा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापुरत्याच आहेत.. या सगळ्याची चर्चा करणार आहोतच.. मात्र, सुरुवातीला आजचा पहिला प्रश्न... त्यासाठी जावूयात पोल सेंटरला... बैठकाच्या चर्चेची सुरुवात करुयात भाजपच्या बैठकीनं... महाराष्ट्रात लोकसभेला सर्वाधिक फटका भाजपला बसलाय.. तोच फटका विधानसभेत बसू नये म्हणून पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपनं हालचाली वाढवल्यात.. उद्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्वाची बैठक पार पडणार आहे.. त्याआधीच आज राज्यातील नेत्यांची बैठक पार पडली.. सलग दोन दिवस चालवणाऱ्या याच मॅरोथॉन बैठकांमध्ये महाराष्ट्र भाजपचे साठ पेक्षा जास्त पदाधिकारी असणार आहेत.. त्यात मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशांचा समावेश असेल.. आणि याच बैठकांमधून विधानसभेचं विचारमंथन केलं जाईल...भाजपच्या मित्रपक्षांकडून विधानसभांच्या जागांवर दावेदारी सुरु झालीये.. त्यामुळे भाजपच्या याच बैठकांकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.... विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपची बैठक होत असताना, शिवसेनेचीही वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.. या बैठकीला मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते उपस्थित होते.. या बैठकीत शिवसेनेकडून विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी सुरू झालीय.. त्यासाठी १०० निरीक्षक आणि तेवढेच प्रभारीसुद्धा नेमण्यात आलेत.. प्रत्येक निरीक्षक आणि प्रभारी त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या एकाच मतदारसंघासाठी काम करणार आहेत.. त्याचबरोबर आज घडीला भाजप आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर लक्ष द्यायचंही नाही.. याशिवाय बाकी जागांचा विचार करावा...तिथेच लक्ष केंद्रीत करून निवडणुकीची तयारी करणार आहेत.. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत.. इतकंच नाही तर शिंदेकडून मुंबईत सतरा जागा लढवण्याचा विचार आहे.. सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा... सदस्य नोंदणीवर भर द्या... शिवसेना युवासेना महिला आघाडी पदावर नेमणूक करा.. असे आदेश आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले... तसंच पक्षांतर्गत वाद, नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबतही माहिती घेण्यात आली... विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप-शिवसेनेच्या आढावा बैठका, सभा, विशेष मोहीम घेणे सुरू असताना.. महायुतीतला आणखी एक पक्ष राष्ट्रवादीनेही कंबर कसलीय.. लोकसभेत अवघ्या ६ जागा लढलेल्या अजितदादाच्या गटाने, पुन्हा एकदा विधानसभेच्या ८० जागा लढणार असल्याचं जाहीर केलंय.. केवळ एवढंच नव्हे तर कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी, राष्ट्रवादी विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचंही सांगितलंय.. राष्ट्रवादीने ८० जागांची घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही.. याआधीही अनिल पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनीही.. राष्ट्रवादी ८० ते ९० जागा लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं... अजित पवारांनीदेखील पक्षाच्या बैठकीत बोलताना हीच री ओढली होती.. त्यामुळे लोकसभेत महायुतीकडून सर्वात कमी जागा लढणाऱ्या राष्ट्रवादीला, विधानसभेत तरी मागणी केलेल्या जागा वाट्याला येतात का?... लोकसभेच्या निकालांनंतर संघाकडून वारंवार, राष्ट्रवादीशी युतीवरून भाजपला मिळालेल्या कानपिचक्यांनंतर... महायुतीत राष्ट्रवादीचा जागावाटपात योग्य सन्मान राखला जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणारय.. दरम्यान धर्मराव बाबा अत्राम यांनी जागावाटपाबाबत नेमका काय दावा केला ते पाहूया...


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


Abu Azmi Full PC : मशीद तोडली...आमचं रक्त खवळतंय; विशाळगड प्रकरणावर आझमी आक्रमक

धानसभा स्वबळावर लढण्याचा हा संकेत आहे आमचा आम्ही प्रयत्न करू आघाडीत राहण्याचा On विशाळगड कुठे अधिकृत बांधकाम होत आहेत तर ते सरकारची लक्ष ठेवण्याची जबाबदारी जेव्हा बनलं तेव्हा सरकार प्रशासन कुठे होतं कट्टर पंथी जाऊन तिकडे तोडण्याचा प्रयत्न करतात प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाऊन तिकडे तोडक कारवाई करावी मशिदी तोडल्या जात आहेत तर महाराष्ट्राची लाज देशात जात आहे आमचं रक्त खवळत आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेला आमचा सपोर्ट आहे मात्र आमचे तीर्थक्षेत्र तोडले जात आहेत त्यांना तुरुंगात टाका सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून ही तीर्थक्षेत्र योजना लागू करावी फक्त एका धर्मासाठी नको मुसलमान या देशात राहत नाही का ते टॅक्स भरत नाहीत का? एका समाजाला उपेक्षित केलं जात आहे सर्वांसोबत सर्वांचा विकास व्हायला हवा आमची मागणी आहे


करीअर मंत्र

आपल्या मुलीचे आयसीएससीचे मार्क पाहता हा अभ्यासक्रम ती उत्तम पद्धतीत पार पाडेल याची खात्री बाळगावी. मात्र कॉलेज नसल्यामुळे दैनंदिन अभ्यासात ठरावीक वाचनाची शिस्त व लेखनाचा सराव गरजेचा राहतो.


Central Railway Timetable : ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

Mumbai Local New Timetable : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील गाड्यांचे नवीन वेळापत्रक ऑगस्टपासून लागू होणार असून, मात्र नवीन वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.


२६ वर्षीय इन्फ्लूएन्सरचा धबधब्याजवळ मृत्यु |धबधब्या ठिकाणी कशी घ्याल काळजी ?

ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर अन्वी कामदार रायगडमधील कुंभे धबधब्याजवळ ३५० फूट उंचावरुन खोल दरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या मृत्यूने सर्वांनाच दु:ख झालं. तर अशा दुर्घटना घडू नये आणि धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जाताना पर्यटकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.Image & video Courtesy - Pexels & Pixabay Image & video Courtesy - instagram


पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

Big update on Porsche car accident case in Pune


Maharashtra News Live : लाडक्या बहीण योजनेत १५०० ऐवजी १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

Mumbai Raigad Ratnagiri Rain Live Updates : मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या...


Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 18 July 2024 : ABP Majha

दिड हजारात काय होतंय?, लाडक्या बहिणींनाही १० हजार रूपये द्या, खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला सरकारने १५०० रुपयांत महिलांची बोळवण केली, मतदानासाठी 1500 रुपये देत आहात का? यशोमती ठाकूूर यांचा सवाल उपस्थित करत टीका. वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं, सरकारनं भाड्याने वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत. वाघनखांवरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया, वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा, वाघनखांबाबात जाणकरांचं मत लक्षात घेणं गरजेचं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान. विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाही, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक, वडेट्टिवारांनी केलेल्या टिकेवरुन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात धडक, आतापर्यंत प्रशासनाने काय केलं माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अधिकाऱ्य़ांना सवाल. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा, २० जुलैपासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा. डेंग्यूच्या प्रश्नावर काँगेस आणि ठाकरे गट आक्रमक, नाशिकमध्ये मनपा आयुक्तना काँगेस पदाधिकाऱ्यांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट. नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं, एबीपी माझाच्या बातमीनंतर महापालिकेला जाग, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून साथ रोगांवर नियंत्रण आणण्याचे निवेदन.


Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं? महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार? या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ 288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच येणारच आहे. शिंदे-दादांचं समाधान होणार का? जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र 70 आणि अजितदादांना 60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.


IAS मॅडमची आई मनोरमा खेडकर अडचणीत, पोलिसांनी रायगडमधून घेतलं ताब्यात

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केलीय. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावलं होतं. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा शोध घेतला जात होते. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर पोलिसांनाही त्यांनी दमदाटी केली होती. शेवटी पौंड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे.मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात...


Nashik Mumbai Highway Accident: कसारा घाटाजवळ भीषण अपघात, 7 वाहनांना धडक देत कंटेनर नाल्यात पलटी

Nashik Mumbai Highway Accident: मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात धबधबा पॉईंटनजीक सहा ते सात वाहनं थांबली होती. यावेळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरचा अचानक ब्रेक फेल झाला आणि चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटले. त्यातचं घाटात धुकं असल्यामुळे कंटेनर चालकाला वाहनाचा अंदाज आला नाही आणि त्याने तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली.


Dibrugarh Express Train Derail:उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात,10-12 डब्बे रुळावरुन घसरले

Dibrugarh Express Train Derail: उत्तर प्रदेशमध्ये दिब्रूगड एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे. गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत. चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ (Gonda-Mankapur ) डब्बे रुळावरुन घसरल्याचं समोर आले आहे. डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई तसेच उपनगरांत बुधवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला असून गुरुवारीही पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.