नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. भुजबळ हे सोमवारी (दि.27) येवला दौर्यावर गेले होते. यावेळी त्यांना ताप आल्याने ते दौरा आटपून सायंकाळी ४ सुमारास परत आले. यानंतर त्यांनी नाशिक येथे खासगी रुग्णालयात जाऊन तपासणी केली असता अहवालातून ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
The post छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण appeared first on पुढारी.
2023-03-28T07:11:35Z dg43tfdfdgfd