बातम्या

Trending:


Central Railway Timetable : ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

Mumbai Local New Timetable : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील गाड्यांचे नवीन वेळापत्रक ऑगस्टपासून लागू होणार असून, मात्र नवीन वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, ५० लाखांचं बक्षीस अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता ठाकरे गटाची नाराजी, भोसरी मतदारसंघातून गव्हाणेंना उमेदवारी मिळाली तर प्रचार न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द, अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक


A B की C सांगा पाहू कुत्र्याचा खरा मालक कोण आहे? ९९ टक्के लोकांनी दिलेय चुकीचं उत्तर

Detective Riddles: तुमच्यासमोर ३ लोक बसले आहेत आणि दरवाज्यात एक कुत्रा बसलेला आहे. तर मग सांगा पाहू या तीघांपैकी त्या कुत्र्याचा खरा मालक कोण आहे?


Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानी गळती

Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीयनिवासस्थानी गळती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च केले होते


BMW hit and run case : बेदरकारपणे BMW कार चालवून महिलेला चिरडणाऱ्या मिहिर शहाला आता सतावतेय करिअरची चिंता, म्हणाला..

Mumbai BMW hit and run case : मिहीर शाह आणि त्याच्या दोन मित्रांनी जुहू येथील एका बारमध्ये व्हिस्कीचे १२ मोठे पेग रिचवले होते. त्यानंतर भरधाव कार चालवून एका महिलेला उडवले होते.


Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली.


एअरपोर्ट फनेलवासीयांच्या पुनर्विकासासाठी अखेर टीडीआर!

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाभोवती असलेल्या विलेपार्ले, सांताक्रूझ आणि कुर्ला या परिसरांतील ‘एअरपोर्ट फनेल’वासीयांच्या पुनर्विकासासाठी अखेर विकास हक्क हस्तांतराचा (टीडीआर) पर्याय देण्याचे शासनाने निश्चित केले आहे.


Weather update : महाराष्ट्रात पुढील 2 दिवस मोठं असमानी संकट, IMD चा हायअलर्ट

आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मुंबईचं कमाल तापमान 25 अंश ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, घाट भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे, मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. विदर्भाबाबत बोलायचे झाल्यास विदर्भात देखील आज पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील 24 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अतिमुसळधार तर इतर भागांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.


Corruption in NEERI : ‘नीरी’वर काळा डाग

Nagpur Corruption News: ‘नीरी’मधून काही बनावट कंपन्यांना कामे दिली जाऊ लागली. याद्वारे कोट्यवधीचा निधी खिशात घातला जाऊ लागला. संस्थेचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या काळात हा सर्व प्रकार घडला.


Assembly By Elections Result : सात राज्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला मोठं यश, भाजपला मोठा झटका

Assembly Elections Result :2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएने बहुमत मिळवत मिळवत तिसऱ्यांदा देशात सरकार स्थापन केलं. परंतु 400 पार चे लक्षं पूर्ण करू शकले नाही. भाजपला रोखण्यात इंडिया आघाडी यशस्वी ठरली. अशातच आज पुन्हा एकदा सात राज्यातील 13 विधानसभा पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीने चांगले यश मिळवत भाजपला मोठा धक्का दिला आहे.


Malala Yousafzai: अवघ्या 17 वर्षी 'नोबेल पुरस्कार' मिळवणारी मलाला यूसुफजई आहे तरी कोण ?

Malala Yousafzai Birthday : शाळेतून घरी परतताना दहशतवाद्यांनी तिच्यावर हल्ला केला.मात्र सुदैवाने ती त्यातून वाचली. तिच्या समाज कार्याची दखल घेत तिला 'नोबेल पुरस्कार' पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.


NHM Wardha Recruitment 2024: योग शिक्षकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता निकष, 'असा' करा अर्ज

NHM Wardha Vacancy 2024: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग शिक्षक किंवा योग शिक्षिका या पदाच्या चार जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ जुलै २०२४ सुरू झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.


Donald Trump Attack : चुकलेला नेम, पलटलेले फासे

Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचे सारे चित्रच पालटून गेले आहे. त्याविषयी...


Guru Purnima: गुरु पौर्णिमेला बनतोय दुर्मिळ संयोग; या राशींना मिळणार चांगलं फळ

Guru Purnima 2024: हिंदू पंचांगानुसार, गुरुपौर्णिमेच्या दिवशी पहाटे 5.57 पासून सर्वार्थ सिद्धी योग तयार होणार आहे. हा योग दिवसभर चालणार आहे. याशिवाय उत्तराषाद नक्षत्र पहाटे ते मध्यरात्री 12.14 पर्यंत राहणार आहे.


SpiceJet च्या कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली कानशिलात, VIDEO VIRAL

एका महिला जवानाने कंगना रणौतला कानशिलात लगावल्यापासून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) सातत्याने चर्चेत आहे. आताही अशाच एका प्रकरणामुळे सीआयएसएफ चर्चेत आहे. मात्र, यावेळी एका सीआयएसएफ जवानाला कानशिलात खावी लागली आहे. जयपूर विमानतळावर गुरुवारी स्पाईस जेटच्या एका महिला कर्मचाऱ्याने सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यावर हात उचलला. सुरक्षा तपासणीवरून झालेल्या वादादरम्यान हा प्रकार घडला. संबंधित महिला कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. तिच्यावर भारत न्याय...


Thane Borivali Tunnel: ठाण्याहून बोरिवली गाठता येईल फक्त 12 मिनिटांतच, बनतोय 'हा' भुयारी मार्ग

Thane Borivali Tunnel: ठाणे ते मुंबई (ठाणे ते बोरिवली) प्रवास सुसाट होणार आहे. राष्ट्रीय वन्यजीव मंडळाने (NBWL) ठाणे-बोरिवली ट्विन टनलला मान्यता दिली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकल्पाच्या कामाला मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या 11.8 किमी प्रकल्पाचे भूमीपूजन केले आहे.


Manorama Khedkar Arrested : मनोरमाबाई तोऱ्यात, बंदुक भोवली, पोलीस कोठडी सुनावली Special Report

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे जसे उघड होत गेले, तसेच त्यांच्या मातोश्री मनोर खेडकर यांच्या दादागिरीचेही किस्से अगदी व्हिडीओसकट समोर आले... हातात पिस्तुल घेऊन कधी शेतकऱ्यांना केलेली दमदाटी असो, की पोलिसांना गेटवर ताटकळत ठेवून केलेली अरेरावी असो... अशाच मनगटशाहीमुळे त्यांना आता जेलची वारी घडलीय... पाहूयात... याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट... Manorama Khedkar Arrest: ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस तिला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोरमा खेडकरचे (Manorama Khedkar) काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Dombivli news : मित्रांसोबत चेष्टा-मस्करी करताना विपरीत घडलं! महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून पडून मृत्यू, डोंबिवलीतील घटना

Dombivli news : मुंबईत डोंबवली येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रांसोबत चेष्टा मस्करी करत असतांना एका महिलेचा तिसऱ्या मजल्यावरून कोसळून मृत्यू झाला.


Dibrugarh Express : उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात, डिब्रुगड एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरले!

Dibrugarh Express Derail Near Gonda : डिब्रुगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला असून यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 18 June 2024 मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कमांडोना ५१ लाखांचं बक्षीस अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता ठाकरे गटाची नाराजी, भोसरी मतदारसंघातून गव्हाणेंना उमेदवारी मिळाली तर प्रचार न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द, अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक


Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून 2 दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्गावर आज आणि उद्या असा दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.


JNPT Traffic : जेएनपीटीच्या बाहेर एक हजार कंटेनर्सची रांग ; यंत्रणा संथ, लाखोंचं नुकसान

जेएनपीटी बंदरामधून विदेशात मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात केली जाते. मात्र चार पाच दिवस झाले येथील यंत्रणेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने विदेशात जाणारे कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे कंटेनर्सची पाच ते सहा किलोमीटरची रांग लागली आहे. यामध्ये १ हजारहून अधिक कंटेनर खोळंबले आहेत. सर्वात चिंतेंची बाब म्हणजे यातील काही कंटेनर्समध्ये कांदा, अन्य भाज्या, फळं, मासे असा नाशिवंत माल आहे. हे सर्व पदार्थ थंड ठेवावे लागतात. त्यामुळे दररोज कंटेनरच्या कूलिंगवर व्यापाऱ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतायेत. तर दुसरीकडे कंटेनरचे भाडेही वाढत असल्याने निर्यातदारांना लाखोचे नुकसान सोसावे लागत आहे. जेएनपीटी बंदरामधून विदेशात मोठ्या प्रमाणात शेतमालाची निर्यात केली जाते. मात्र चार पाच दिवस झाले येथील यंत्रणेचे काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने विदेशात जाणारे कंटेनर अडकून पडले आहेत. त्यामुळे कंटेनर्सची पाच ते सहा किलोमीटरची रांग लागली आहे. यामध्ये १ हजारहून अधिक कंटेनर खोळंबले आहेत. सर्वात चिंतेंची बाब म्हणजे यातील काही कंटेनर्समध्ये कांदा, अन्य भाज्या, फळं, मासे असा नाशिवंत माल आहे. हे सर्व पदार्थ थंड ठेवावे लागतात. त्यामुळे दररोज कंटेनरच्या कूलिंगवर व्यापाऱ्यांना हजारो रुपये खर्च करावे लागतायेत. तर दुसरीकडे कंटेनरचे भाडेही वाढत असल्याने निर्यातदारांना लाखोचे नुकसान सोसावे लागत आहे.


Navi Mumbai मधील ड्रग्ज तस्करीचं जाळं उद्ध्वस्त, टोळीच्या म्होरक्याला NCB कडून अटक

Navi Mumbai Vashi NCB Action Against Drugs syndicate : एनसीबीने सुफियान खान या अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला अटक केली आहे.


Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं? महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार? या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ 288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच येणारच आहे. शिंदे-दादांचं समाधान होणार का? जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र 70 आणि अजितदादांना 60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.


Water Level In Dams: मुंबईकरांना जलदिलासा! ८ दिवसांत धरणांत दुप्पट पाणीसाठा, कोणत्या धरणात किती पाणी?

Mumbai Dams Water Level: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत १५ जुलैपर्यंत ३५.११ टक्के पाणीसाठ्याची नोंद झाली. हा साठा पाच लाख ८ हजार १०८ दशलक्ष लिटर इतका आहे.


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

Big update on Porsche car accident case in Pune


Sanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha

Sanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार निशाणा साधलाय. लोकसभेतील (Lok Sabha Election) पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान बहिण घर सांभाळते तीचं दीड हजारात काय होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधलाय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी. बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत. परवा सगळे लाडके भाऊ भरतीकराता जमा झालेले पाहायला मिळाले. भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी .


Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे

Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर पुण्याहून वाशिममध्ये रुजू, तर पूजाच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कठोर कारवाई करणार समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा भरण्यास सुरुवात, एबीपी माझानं सकाळपासून बातमी दाखवल्यानंतर यंत्रणेला जाग. शाहपूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदड, कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी टळली, पुढील सुनावणी १८ जुलैला होणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अजून दमदार पाऊस नाही, आज घडीला सात धरणांचा मिळून २२ टक्केच पाणीसाठा राहुल गांधी,उद्धव ठाकरेंवर अवमाननेचा खटला चालवा, मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी, मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणीसंबंधी दिशाभूल केल्याचा आरोप... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार, दोन्ही पालख्यांसोबत चालणार की एकच हे अजून अस्पष्ट, १७ तारखेला आहे आषाढी एकादशी..


EPFO Interest Rate: अर्थसंकल्पापूर्वी सरकारने दिली गुड न्यूज; सात कोटी PF खातेधारकांना होणार फायदा

EPF Interest Rate 2023-24: मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अर्थसंकल्पापूर्वी सुमारे सात कोटी EPF सदस्यांसाठी आनंदवार्ता मिळाली आहे. अर्थमंत्रालयाने गुरुवारी ईपीएफओच्या वाढीव व्याजदरांना मंजुरी दिली असून यासोबत अर्थमंत्रालयाने म्हटले की ईपीएफओने आधीच वार्षिक ८.२५% दराने दावे निकाली काढण्यास सुरुवात केली आहे.


Nashik Kasara Ghat Accident : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक, 13 ते 14 प्रवासी जखमी

Nashik Kasara Ghat Accident : कसारा घाटात कंटेनरची सहा ते सात वाहनांना धडक, 13 ते 14 प्रवासी जखमी नाशिकच्या कसारा घाटात ब्रेक फेल झाल्यानं एका कंटेनरनं दिली सहा ते सात वाहनांना धडक. अपघातात 13 ते 14 प्रवासी जखमी. अपघातामुळे काही काळ निर्माण झाली होती वाहतूक कोंडी.