बातम्या

Trending:


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, गट-ब अन् गट-क च्या पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्रातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणणार, यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून...


Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली.


Weather update : महाराष्ट्रात पुढील 2 दिवस मोठं असमानी संकट, IMD चा हायअलर्ट

आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मुंबईचं कमाल तापमान 25 अंश ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, घाट भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे, मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. विदर्भाबाबत बोलायचे झाल्यास विदर्भात देखील आज पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील 24 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अतिमुसळधार तर इतर भागांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.


अजित पवारच का लक्ष्य ?

महाराष्ट्रातील भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पराभवाबद्दल ‘ऑर्गनायझर’ पाठोपाठ ‘विवेक’ या रा. स्व. संघाच्या विचारसरणीच्या नियतकालीकांमधून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आल्याने संघ परिवाराला अजित पवारांना बरोबर घेणे बहुधा पसंत पडलेले दिसत नाही.


NHM Wardha Recruitment 2024: योग शिक्षकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता निकष, 'असा' करा अर्ज

NHM Wardha Vacancy 2024: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग शिक्षक किंवा योग शिक्षिका या पदाच्या चार जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ जुलै २०२४ सुरू झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.


Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं? महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार? या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ 288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच येणारच आहे. शिंदे-दादांचं समाधान होणार का? जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र 70 आणि अजितदादांना 60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.


Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून 2 दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्गावर आज आणि उद्या असा दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.


TOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 5.30 PM : 18 July 2024 : ABP Majha

वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक संपन्न, विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांची नियुक्तीचे आदेश. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती, भांडी-कुंडी वापरुन गोळा केलं जातंय छतावरुन टपटपणारं पाणी, काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च केले होते . शरद पवार नटसम्राट, छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे मोठे कलाकार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. विशाळगड हिंसाचाराची 'सीआयडी' चौकशी करा, तसंच पीडितांना १५ दिवसांत नुकसानभरपाई द्यावी, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे मागणी. अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पूजा खेडकरांची माहिती विभागीय आयुक्तांकडे पाठवली, २०२२मध्ये नगरमधून खेडकरांनी मिळवलं होतं नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सरकारकडून योजना लागू, योजनातून जनतेची फसवणूक होऊ नये ही अपेक्षा, लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर आमदार विश्वजीत कदम यांची टीका .


Corruption in NEERI : ‘नीरी’वर काळा डाग

Nagpur Corruption News: ‘नीरी’मधून काही बनावट कंपन्यांना कामे दिली जाऊ लागली. याद्वारे कोट्यवधीचा निधी खिशात घातला जाऊ लागला. संस्थेचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या काळात हा सर्व प्रकार घडला.


Explainer: शरिरामध्ये गोळी लागल्यावर काय होतं, माणसाचा मृत्यू किती सेकंदात होतो?

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची पेनसिल्व्हानियामध्ये निवडणूक प्रचार रॅली सुरू असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. हल्लेखोराने त्यांच्यावर झाडलेली गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली. सुदैवाने ट्रम्प या हल्ल्यातून थोडक्यात बचावले. ही गोळी त्यांच्या डोक्यात थोडीशीही घुसली असती तर त्यांची प्रकृती गंभीर स्थितीत असती. मानवी शरीराचे असे काही भाग असे आहेत, जिथे गोळी लागल्यावर लगेच मृत्यू होतो, तर काही भाग असेल आहेत जिथे गोळी लागल्यानंतर माणूस...


Donald Trump Attack : चुकलेला नेम, पलटलेले फासे

Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचे सारे चित्रच पालटून गेले आहे. त्याविषयी...


Abu Azmi Full PC : मशीद तोडली...आमचं रक्त खवळतंय; विशाळगड प्रकरणावर आझमी आक्रमक

धानसभा स्वबळावर लढण्याचा हा संकेत आहे आमचा आम्ही प्रयत्न करू आघाडीत राहण्याचा On विशाळगड कुठे अधिकृत बांधकाम होत आहेत तर ते सरकारची लक्ष ठेवण्याची जबाबदारी जेव्हा बनलं तेव्हा सरकार प्रशासन कुठे होतं कट्टर पंथी जाऊन तिकडे तोडण्याचा प्रयत्न करतात प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाऊन तिकडे तोडक कारवाई करावी मशिदी तोडल्या जात आहेत तर महाराष्ट्राची लाज देशात जात आहे आमचं रक्त खवळत आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेला आमचा सपोर्ट आहे मात्र आमचे तीर्थक्षेत्र तोडले जात आहेत त्यांना तुरुंगात टाका सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून ही तीर्थक्षेत्र योजना लागू करावी फक्त एका धर्मासाठी नको मुसलमान या देशात राहत नाही का ते टॅक्स भरत नाहीत का? एका समाजाला उपेक्षित केलं जात आहे सर्वांसोबत सर्वांचा विकास व्हायला हवा आमची मागणी आहे


Budget 2024 Expectations : पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार? बजेटमध्ये घोषणेची शक्यता

Union Budget 2024 Expectations : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पूर्ण अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत सादर केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेत काही वाढ होते का, याकडं शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे.


Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...


Ajay Maharaj Baraskar: जरांगेंना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्करांची कार पंढरीत जळाली, आषाढी एकादशीलाच घटना

Solapur News: मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची कार पंढरपूरमध्ये जळाली. दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने कार जळाली की जाळली? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.


करीअर मंत्र

आपल्या मुलीचे आयसीएससीचे मार्क पाहता हा अभ्यासक्रम ती उत्तम पद्धतीत पार पाडेल याची खात्री बाळगावी. मात्र कॉलेज नसल्यामुळे दैनंदिन अभ्यासात ठरावीक वाचनाची शिस्त व लेखनाचा सराव गरजेचा राहतो.


Sanjay Raut on Sharad Pawar : “शरद पवार मोठे नटसम्राट, तर भुजबळ…”, संजय राऊत यांचा खोचक टोला कुणाला?

Sanjay Raut on Sharad Pawar : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणावर उमटले आहेत. यावर शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.


Vidhan Parishad Election: आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, 11 जागांसाठी हे 12 उमेदवार रिंगणार

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Candidate: राज्यात आज विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...


TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP Majha केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक. भाजप कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा साठ जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची घेणार बैठक. शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार.


Olympic 2024: पॅरिसचे ६५वर्षीय महापौर ऑलिम्पिक पूर्वी का उतरले नदीत? पाहा VIDEO

Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरूवात होण्यापूर्वी पॅरिसच्या महापौर सेन नदीत उतरल्या, पण यामागचं नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या.


IAS मॅडमच्या आईचेही कारनामे, पिस्तुल दाखवत धमकावलं; VIDEO VIRAL

गणेश दुडम, मावळ : वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकर यांचा मुळशी तालुक्यातील धडवली गावातला पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकवतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. पूजा खेडकर यांच्या चमकोगिरीमुळे त्यांची पुण्यातून वाशिमला बदली केली गेली. यानंतर पूजा खेडकर यांच्या गाडीवर कारवाईसाठी पोलीस पुण्यातील घरीही पोहोचले होते. मात्र, पोलिसांना पूजा खेडकर यांच्या आईने तुम्हाला सगळ्यांना आत टाकेन अशी धमकी दिली होती. आता मनोरमा खेडकर यांचा आणखी एक...


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 18 June 2024 मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कमांडोना ५१ लाखांचं बक्षीस अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता ठाकरे गटाची नाराजी, भोसरी मतदारसंघातून गव्हाणेंना उमेदवारी मिळाली तर प्रचार न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द, अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक


Dibrugarh Express Train Derail:उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात,10-12 डब्बे रुळावरुन घसरले

Dibrugarh Express Train Derail: उत्तर प्रदेशमध्ये दिब्रूगड एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे. गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत. चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ (Gonda-Mankapur ) डब्बे रुळावरुन घसरल्याचं समोर आले आहे. डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


लाडकी बहीणनंतर आता राज्य सरकारी लाडक्या भावांसाठीही योजना

ladaki bahin yojna followed by state government's ladaka bhau scheme


Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका

Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे. आईचा थयथयाट, पोलिसांवरच अरेरावी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असं त्यात म्हटलं आहे.


जयंत पाटलांच्या पराभवामुळे उरणचा पेच

जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शेकाप आणि मविआ यांच्यातील बिघडलेल्या समीकरणांचा महायुतीला फायदा होऊ शकतो


Pandharpur Wari Superfast News : पंढरपुरात भाविकांचा महासागर : वारीच्या सुपरफास्ट बातम्या :ABP Majha

Pandharpur Wari Superfast News : पंढरपुरात भाविकांचा महासागर : वारीच्या सुपरफास्ट बातम्या :ABP Majha


Central Railway Timetable : ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

Mumbai Local New Timetable : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील गाड्यांचे नवीन वेळापत्रक ऑगस्टपासून लागू होणार असून, मात्र नवीन वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.


Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानी गळती

Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीयनिवासस्थानी गळती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च केले होते


२६ वर्षीय इन्फ्लूएन्सरचा धबधब्याजवळ मृत्यु |धबधब्या ठिकाणी कशी घ्याल काळजी ?

ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर अन्वी कामदार रायगडमधील कुंभे धबधब्याजवळ ३५० फूट उंचावरुन खोल दरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या मृत्यूने सर्वांनाच दु:ख झालं. तर अशा दुर्घटना घडू नये आणि धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जाताना पर्यटकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.Image & video Courtesy - Pexels & Pixabay Image & video Courtesy - instagram