बातम्या

Trending:


मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता

मुंबई तसेच उपनगरांत बुधवारी सायंकाळपासून पावसाने जोर धरला असून गुरुवारीही पावसाची संततधार सुरूच आहे. दरम्यान, मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून 2 दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्गावर आज आणि उद्या असा दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.


Sanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha

Sanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार निशाणा साधलाय. लोकसभेतील (Lok Sabha Election) पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान बहिण घर सांभाळते तीचं दीड हजारात काय होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधलाय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी. बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत. परवा सगळे लाडके भाऊ भरतीकराता जमा झालेले पाहायला मिळाले. भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी .


Dibrugarh Express Train Derail:उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात,10-12 डब्बे रुळावरुन घसरले

Dibrugarh Express Train Derail: उत्तर प्रदेशमध्ये दिब्रूगड एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे. गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत. चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ (Gonda-Mankapur ) डब्बे रुळावरुन घसरल्याचं समोर आले आहे. डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Maharashtra News Live : लाडक्या बहीण योजनेत १५०० ऐवजी १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

Mumbai Raigad Ratnagiri Rain Live Updates : मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या...


Prasad Lad on Manoj Jarange : मनोज जरांगेंना 'देवेंद्र द्वेष' नावाचा आजार झालाय

मनोज जरांगेंना देवेंद्र द्वेष नावाचा आजार झालाय, आमदार प्रसाद लाड यांची जरांगेंवर टीका, जरांगेंनी चर्चेला यावं, मराठा समाजासाठी कोणी काय केलं यावर चर्चा करू, आमदार प्रसाद लाड यांचं आवाहन. जालना: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांना डीडी म्हणजे देवेंद्र द्वेषाचा रोग झाल्याची टीका करणाऱ्या भाजप आमदार प्रसाद (Prasad Lad) लाड यांच्यावर जरांगे यांनी शेलक्या शब्दात टीका केली. माझ्या नादी लागू नका, तू किती पैसेवाला आणि करप्ट आहेस हे सांगायलं लाऊ नको, तू जात विकून घर मोठं करणारी औलाद आहेत असं मनोज जरांगे यांनी प्रसाद लाड यांना सुनावलं आहे. देवेंद्र फडणवीस हे मराठ्यांच्या जीवावर मोठे झालेत, आता मराठे आमदार आणि मंत्री मराठ्यांच्याच अंगावर घालत मजा पाहत असल्याचा आरोपही जरांगे यांनी केला.


Manorama Khedkar Arrested : मनोरमाबाई तोऱ्यात, बंदुक भोवली, पोलीस कोठडी सुनावली Special Report

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे जसे उघड होत गेले, तसेच त्यांच्या मातोश्री मनोर खेडकर यांच्या दादागिरीचेही किस्से अगदी व्हिडीओसकट समोर आले... हातात पिस्तुल घेऊन कधी शेतकऱ्यांना केलेली दमदाटी असो, की पोलिसांना गेटवर ताटकळत ठेवून केलेली अरेरावी असो... अशाच मनगटशाहीमुळे त्यांना आता जेलची वारी घडलीय... पाहूयात... याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट... Manorama Khedkar Arrest: ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस तिला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोरमा खेडकरचे (Manorama Khedkar) काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे

Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर पुण्याहून वाशिममध्ये रुजू, तर पूजाच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कठोर कारवाई करणार समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा भरण्यास सुरुवात, एबीपी माझानं सकाळपासून बातमी दाखवल्यानंतर यंत्रणेला जाग. शाहपूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदड, कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी टळली, पुढील सुनावणी १८ जुलैला होणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अजून दमदार पाऊस नाही, आज घडीला सात धरणांचा मिळून २२ टक्केच पाणीसाठा राहुल गांधी,उद्धव ठाकरेंवर अवमाननेचा खटला चालवा, मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी, मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणीसंबंधी दिशाभूल केल्याचा आरोप... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार, दोन्ही पालख्यांसोबत चालणार की एकच हे अजून अस्पष्ट, १७ तारखेला आहे आषाढी एकादशी..


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा

Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 18 June 2024 मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून कमांडोना ५१ लाखांचं बक्षीस अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता ठाकरे गटाची नाराजी, भोसरी मतदारसंघातून गव्हाणेंना उमेदवारी मिळाली तर प्रचार न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द, अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक


पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट

Big update on Porsche car accident case in Pune


ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, ५० लाखांचं बक्षीस अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता ठाकरे गटाची नाराजी, भोसरी मतदारसंघातून गव्हाणेंना उमेदवारी मिळाली तर प्रचार न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द, अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक


NHM Wardha Recruitment 2024: योग शिक्षकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता निकष, 'असा' करा अर्ज

NHM Wardha Vacancy 2024: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग शिक्षक किंवा योग शिक्षिका या पदाच्या चार जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ जुलै २०२४ सुरू झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


Guru Purnima 2024: गुरुपौर्णिमेला जुळून येताय 'हे' दुर्मिळ संयोग, गुरु पूजनाने मिळेल अक्षय पुण्य

Guru Purnima 2024: गुरुंना आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथी समर्पित असते. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा किंवा वेद पौर्णिमा असेही म्हणतात. पंचांगानुसार यंदा 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा साजरी होत आहे. गुरुपौर्णिमा गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी, शिष्य त्यांच्या गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात.


Donald Trump Firing : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

दिल्ली, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. अमेरिकेच्या पेंसिल्वेनियामध्ये या निवडणूक रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे बोलत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर तिथे असलेल्या सीक्रेट सर्विस एजंट्सनी ट्रम्प यांना स्टेजवरून सुरक्षितरित्या बाहेर काढले. गोळीबार थांबला तेव्हा ट्रम्प यांच्या गालावर रक्त आल्याचं दिसत होतं. या...


Eknath Shinde ShivSena Maharashtra Assembly Election :शिंदेंच्या शिवसेनेकडून 100 जागा लढण्याची तयारी

विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय.. शिंदेंच्या शिवसेनेनंही आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेतली.. विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं केलीय.. त्यासाठी १०० विधानसभा निरीक्षक आणि प्रभारीही नेमण्यात आले आहेत.. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत सीएम यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनाच्या बैठकीला सुरुवात, विधानसभेसाठी किती जागा मागायच्या यावर देखील चर्चा होणार शिवसेनेच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यानी घेतलेले निर्णय विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले, त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले गेले, हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करणार, एकच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आणि निवडणुकीची तयारी करणार, मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश सरकारी योजना सर्व मतदारसंघात प्रसारित करा. सदस्यनोंदणीवर भर द्या. शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा.


TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP Majha केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक. भाजप कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा साठ जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची घेणार बैठक. शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार.


Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 18 July 2024 : 8 PM

वर्षा बंगल्यावर शिवसेनेची बैठक संपन्न, विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षकांची नियुक्तीचे आदेश. ठाकरे गट मुंबईतील ३६ पैकी किमान २५ जागा लढवण्याच्या तयारीत, मुंबईतील बहुतांश मतदारसंघावर ठाकरे गट आग्रही, वांद्रे पूर्वमधून वरून सरदेसाई तर दहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता शरद पवार नटसम्राट, छगन भुजबळ फिरत्या रंगमंचावरचे मोठे कलाकार, संजय राऊतांची प्रतिक्रिया. सरकारने १५०० रुपयांत महिलांची बोळवण केली, मतदानासाठी 1500 रुपये देत आहात का? यशोमती ठाकूूर यांचा सवाल उपस्थित करत टीका. वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं, सरकारनं भाड्याने वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत. वाघनखांवरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया, वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा, वाघनखांबाबात जाणकरांचं मत लक्षात घेणं गरजेचं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान. भिवंडीमध्ये मेट्रो हॉटेल ते माडा कॉलनी काँक्रेट रस्त्याचे भूमिपूजन, १८ कोटी काँक्रीटीकरणाचा खर्च, वाहतूक सुरळीत होऊन अपघाताच्या प्रमाणात घट होईल, आमदार महेश चौघूलेंची माहिती. बार्टी संशोधक विद्यार्थ्यांचा पुणे ते मुंबई भर पावसात लाँग मार्च. सात दिवस होऊनही सरकारने दखल घेतली नाही, मार्च नवी मुंबईतील बेलापूर शहरात दाखल. भिवंडीत ठाकरे गटाकडून काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निदर्शने. भिवंडी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात केली निदर्शने.


सीएसएमटी ते भायखळा, वडाळा रोड लोकल सेवा बंद; मध्य रेल्वेवर शनिवारी विशेष मेगाब्लॉक

गेल्या दोन वर्षांपासून कर्नाक बंदर उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आता या पुलाच्या तुळया उभारण्याचे काम हाती घेतले आहे.


Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली.


Extramarital Affair: डोंगरावरील घरात पत्नी एका पुरुषासोबत गेली; जगात कोणत्याही पतीने केले नसेल अशा प्रकारे लावला छडा!

Husband Uses Drone How Wife Cheats: पती-पत्नीच्या नात्यात अनेकदा तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश झाली की नाते बिघडण्यास सुरुवात होते. अशाच एका प्रकरणात पतीने ड्रोन कॅमेऱ्याच्या मदतीने पत्नीचे ऑफिसमधील बॉस सोबत अफेअर असल्याचे शोधले.


Zero Hour Gadchiroli Naxal : 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच उत्तर गडचिरोली नक्षलवादमुक्त!

ब्रेकनंतर झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. आता बातमी पराक्रमाची.. नक्षल्यांच्या खात्म्याची.. कालची रात्र गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात सर्वात महत्वाची ठरणारे... कारण, संततधार पाऊस... नदी नाल्यांना पूर... आणि सी - ६० जवानांच्या तुकडीचा भीम पराक्रम... काल, रात्री गडचिरोली जिल्ह्यात सी-६० कमांडोंनी बारा नक्षलवाद्यांचा खात्मा केला... जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता.. त्यामुळे कारवाई मोठी आव्हानात्मक होती.. याबद्दल आज गडचिरोली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती दिली... कालच्या कारवाईनंतर उत्तर गडचिरोलीत तब्बल 35 वर्षांनंतर सशस्र नक्षलवाद मुक्त झालाय... तिथं आता एकही सशस्त्र नक्षलवादी उरलेला नाही, अशी अतिशय महत्त्वाची माहिती पोलिसांनी दिलीये. नक्षली शहीद सप्ताहच्या अनुषंगाने नक्षलवादी मोठा घातपात करण्याच्या तयारीत होते अशी माहिती पोलिसांना मिळाली होती... नक्षल्यांच्या खात्म्यानंतर जेव्हा सी सिक्स्टी पथक गडचिरोली पोलीस मुख्यालयात सुखरूप पोहोचले.. तेव्हा त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं... या ऑपरेशनमध्ये सहभागी सर्व २०० जवानांना, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ दिला... 1980 पासून नक्षलवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 605 नागरिकांचा बळी गेलाय.. तर 242 पोलिसांना वीरमरण आलं... तसंच आतापर्यंत कमांडोंच्या धडक कारवाईत 344 नक्षलवादी ठार झाले असून, 500 पेक्षा जास्त नक्षल्यांनी सरेंडर केलंय... आणि घटनांचा आकडा पाहिला तर तो आहे.. 3 हजार 192 .. यावरुनच लक्षात येतं की कालची मोहीम किती महत्वाची.. कालची नक्षलवाद्यांविरोधातली मोहीम कशी पार पडली... मोहिमेत किती जवान होते.. किती आव्हानात्मक होती ही मोहीम... हे सगळं आपण जाणून घेणार आहोत.. पण आता पाहुयात कालच्या धडक कारवाईचा एक मोंटाज...