बातम्या

Trending:


School Syllabus : राज्यात पहिली, दुसरीच्या पाठ्यपुस्तकांचे २०२३-२४ शेवटचं वर्ष, पुढच्या शैक्षणिक वर्षीपासून..

School Syllabus : महाराष्ट्र राज्य शिक्षण बोर्डाच्या इयत्ता पहिली आणि दुसरीची पुस्तके बदलली जाणार आहेत. २०२५-२६ म्हणजे पुढील शैक्षणिक वर्षापासून पहिली आणि दुसरीसाठी नवीन अभ्यासक्रम लागू होणार आहे.


Rahul Gandhi Priyanka Gandhi : राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार?

गांधी बंधूभगिनी निवडणूक लढवण्याची शक्यता, राहुल गांधी अमेठीतून तर प्रियांका गांधी रायबरेलीतून उभ्या राहणार अशी चर्चा


Maharashtra Weather: राज्यात आज गारपीटीची शक्यता, या जिल्ह्यांना अलर्ट जारी

Maharashtra Latest Weather Update: सतत बदलणाऱ्या हवामानामुळे राज्यातील जनता त्रस्त झाली आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्याच्या काही भागात अवकाळी पावसाची आणि गारपीटीची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईसह राज्यातील काही भागाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.


Nashik Crime | महिलेस घरात कोंडून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महिलेस घरात कोंडून घराला बाहेरून आग लावत जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या संशयितास गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने पुणे येथून ताब्यात घेतले आहे. निखील उर्फ स्वप्निल बोराडे (२३, रा. पिंपळपट्टी रोड, जेल रोड) असे पकडलेल्या संशयिताचे नाव आहे. जेल रोड येथील पिंपळपट्टी परिसरातील रहिवासी कल्याणी मोरे यांच्या फिर्यादीनुसार, संशयित निखील याने शुक्रवारी …


Nana Patole Vishwajeet Kadam : घणाघाती भाषणानंतर पटोलेंनी विश्वजीत कदमांची पाठ थोपटली

Nana Patole Vishwajeet Kadam : घणाघाती भाषणानंतर पटोलेंनी विश्वजीत कदमांची पाठ थोपटली


Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांच्या टिकेला शरद पवारांचं प्रत्युत्तर

Amit Shah vs Sharad Pawar : अमित शाहांनी कालच्या सभेत पुन्हा शरद पवारांवर निशाणा साधलाय. तर शरद पवारांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी अशी टीका शाह यांनी केली. तर यावर शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलंय. मोदी, शाहांना राज्यात एवढ्या सभा घ्याव्या लागता याचच अर्थ परिस्थिती काय आहे पाहुयात..


Shiv Sena UBT Manifesto: शिवसेना ठाकरे गटाचा वचननामा जाहीर, या प्रमुख मुद्द्यांवर उद्धव ठाकरेंनी दिला भर

Shiv Sena UBT Manifesto: देशात इंडिया आघाडीचे सरकार येणार असून हे सरकार आल्यानंतर आम्ही या मुद्यांवर काम करून असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. आज पत्रकार परिषदेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. इंडिया आघाडीचं सरकार देशात येणार आहे. महाराष्ट्रासाठी ज्या गोष्टी व्हायला हव्या त्या आम्ही वचननाम्यातून प्रकाशित करत आहोत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


Eknath Khadse : राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक?

राज्यातील तीन प्रमुख नेत्यांमुळे एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला ब्रेक लागल्याची माहिती मिळतेय. राज्यात कार्यक्रम घेऊन एकनाथ खडसेंना सोबत घ्या असे केंद्राकडून सांगण्यात आलं. मात्र राज्यातील तीन वरिष्ठ नेते याबाबत उदासीन असल्याची माहिती आहे. याचं कारण म्हणजे खडसेंना आताच भाजपमध्ये घेतलं तर निवडणुका सुरू असताना गटातटाचं राजकारण सुरू होईल, त्यामुळे निवडणुकीनंतर प्रवेश सोहळा करू अशी राज्य भाजपची भूमिका असल्याचं कळतंय.


Mumbai-Pune Expressway: मुंबई- पुणे एक्सप्रेसवेवरुन आज प्रवास करणार असाल तर 'ही' बातमी तुमच्यासाठी, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai-Pune Expressway: पुणे - मुंबई महामार्गावर 25 एप्रिल गुरुवारी दोन तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे. या मेगाब्लॉकमुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान वाहनांची वाहतूक पूर्णपणे बंद राहील. मेगाब्लॉक दरम्यान महामार्गाच्या पुणे - मुंबई मार्गावर उपकरणे बसवण्याचे काम केले जाणार असल्याचे एमएसआरडीसीकडून सांगण्यात आले. पुणे - मुंबई महामार्गावरुन...


EVM वर मोदींचा फोटो नव्हता, महिलेचा मतदानास नकार, पंतप्रधान भावूक होत म्हणाले…

राजस्थानच्या एका खेड्यात राहणाऱ्या महिलेला ईव्हीएम मशीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो दिसला नाही, त्यामुळे तिने मतदानास नकार दिला.


Chhatrapati Sambhajinagar Rally : छत्रपती संभाजीनगरमध्ये भुमरेची रॅली, राज ठाकरेंचे फोटो झळकले

छत्रपती संभाजी नगर लोकसभा मतदारसंघातून आज महायुतीचे उमेदवार संदिपान भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील सहभागी होणार आहे. विशेष म्हणजे शहरातील ज्या क्रांती चौकातून मिरवणूक निघणार आहे त्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी, बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि राज ठाकरे यांचे भले मोठे फ्लेक्स लावण्यात आले आहे. तर संभाजीनगर शहरात पहिल्यांदाच महायुतीसोबत राज ठाकरे यांचे फ्लेक्स पाहायला मिळाले....


Murlidhar Mohol Rally Pune : मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ पुण्यात रॅली, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती

Murlidhar Mohol Rally Pune : मुरलीधर मोहोळांच्या प्रचारार्थ पुण्यात रॅली, देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती


MahaRERA Suspended 212 Projects: महारेराने सस्पेंड केले राज्यभरातील 212 गृहप्रकल्प, घर खरेदीदारांना दिला इशारा

MahaRERA Lists 212 Suspended Projects: विकासकांनी त्यांच्या प्रकल्पांची नोंदणी केल्यानंतर महारेरा वेबसाइटवर त्रैमासिक प्रगती अहवाल सादर करणे आवश्यक आहे. महारेरानुसार विकासकांनी या अटींचे पालन न केल्यास घर खरेदी करणाऱ्यांना धोका असेल. त्यामुळे गृहखरेदीदारांना त्यांची बचत या प्रकल्पांमध्ये न करण्याबाबत सावध करण्यासाठी नियामक संस्थेने त्यांच्या वेबसाइटवर अशा प्रकल्पांची जिल्हावार यादी प्रसिद्ध केली आहे.


UPSC Recruitment 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ ५०६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस

UPSC Recruitment 2024: या भरती प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ मे असणार आहे...


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंची राज्य आणि केंद्र सरकारवर टीका मी माझ्या भाषणाची सुरुवात माझ्या जमलेल्या देश बांधवानो भगिनींनो केली मी काही चुकीचं बोलतोय आपण देश बांधव नाहीत मात्र काही जणांच्या पोटात दुखतय मी हिंदू बांधवांची सुरुवात सोडली म्हणे तुम्हाला मशाल कुठे लावायची ते कळलं असेल मला शब्द जपून वापरावे लागतात गद्दाराचा सुफडा साफ करावा लागणार शेकतकऱ्यांनो हिंगोलीतील गुंडागर्दीवर तुम्हला नांगर फिरवावा लागेल आम्ही बोलतो नुसतं बोलत नाही करून दाखवतो कर्जमुक्ती मी करून दाखवली होती या हरामखोरांनी गद्दारांनी आपला सरकार पाडलं शेतकऱ्यांच्या मनामध्ये भीती आहे मोदी म्हणतात ही नकली शिवसेना आहे पण मोदीला माहित नाही त्यांचा भाजप भेकडं जनता पक्ष आहे


Vare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024

Vare Nivadnukiche Superfast News: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे 5 PM : 25 April 2024


Yugendra Pawar Baramati Lok Sabha : दादांच्या टीकेला प्रत्युत्तर, युगेंद्र पवार काय म्हणाले?

बारामतीत महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ त्यांच्या कन्या रेवती सुळे यादेखील आता प्रचारात उतरल्या आहेत. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे सुपुत्र युगेंद्र पवार हे आहेत. दोघेही बारामती शहरात पदयात्रा काढत सुप्रिया सुळे यांचा प्रचार करीत आहेत.पदयात्रा सुरू असताना युगेंद्र पवार यांच्याशी बातचीत


Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले

Special Report Sam Pitroda : वारसा संपत्तीवरून पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला घेरले तुमच्या संपत्तीचं काय होणार ? सध्या हा प्रश्न देशपातळीवरच्या प्रचारात चांगलाच गाजतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या मुद्यावरुन काँग्रेसला अलगद आपल्या जाळ्यात पकडलंय. काँग्रेसही सॅम पित्रोदांसारख्या नेत्यांमुळं या वादात आपोआप ओढली गेली..पाहू या स्पेशल रिपोर्ट...


Top Five Medical Universities In UAE : भारतीय विद्यार्थ्यांसाठी UAE मधील पाच टॉप वैद्यकीय विद्यापीठे.....

Top Five Medical Universities In UAE : UAE माध्ये अशी काही टॉप वैद्यकीय विद्यापीठे आहेत जी भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक आकांक्षांचा पाठपुरावा करण्यासाठी, त्यांना त्यांच्या निवडलेल्या करिअरमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्ये आणि अनुभवाने सुसज्ज करण्यासाठी अनुकूल वातावरण देतात. याचाच आढावा आपण आज या लेखातून घेऊया.


पहिली, दुसरीची पुस्तके पुढील वर्षी बदलणार

मुंबई ः पुढारी वृत्तसेवा : इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या पाठपुस्तकांमध्ये यंदा कोणताही बदल केला जाणार नाही. तर शैक्षणिक वर्ष 2025-2026 साठी म्हणजेच पुढील वर्षी बालवाटीका, बालवाडी, अंगणवाडीची नवीन पुस्तके नव्या राज्य अभ्यासक्रमावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे पहिली आणि दुसरीच्या पुस्तकांचे यंदा शेवटचे वर्ष असणार आहे. आता झालेल्या शैक्षणिक वर्षापासून पथदर्शी …


Loksabha Election | महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लावली जाईल; कोण म्हणतंय असं?

Loksabha Election 2024 vinayak raut on mahayuti


Yogi Aadityanath Sabha Sindhudurg : राणेंसाठी अमित शाह, योगी सिंधुदुर्गात; 1 मे रोजी सभा

रत्नागिरी - सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात योगी आदित्यनाथ आणि अमित शाह यांच्या जाहीर सभा 1 मे रोजी योगी आदित्यनाथ यांची सिंधुदुर्गमध्ये सभा तर 3 मे रोजी अमित शाह रत्नागिरी


नितीन गडकरी यांना सभेत बोलताना भोवळ

नागपूर ः पुढारी वृत्तसेवा : भाजपचे राष्ट्रीय नेते, केंद्रीय महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना विदर्भातील कडक उन्हाचा तडाखा सहन न झाल्याने प्रचार सभेतच बोलताना भोवळ आल्याची घटना बुधवारी (दि. 24) दुपारी यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे घडली. पदाधिकारी, कार्यकर्ते व सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्यांना सावरले. डॉक्टरांनी उपचार केले. यानंतर काही वेळातच त्यांनी पुन्हा उपस्थितांना मार्गदर्शन केले. 26 …


IRCTC Economy Food : मध्य रेल्वेचा प्रवाशांना दिलासा! फक्त 20 रुपयांत मिळणार चविष्ट जेवण

IRCTC Economy Food : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मध्य रेल्वेने भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (आईआरसीटीसी) च्या मदतीने एक चांगली सुविधा सुरु केली आहे. त्यानुसार, आता प्रवाशांना, विशेषत: अनारक्षित डब्यांमध्ये (जनरल क्लास कोच) स्वस्त दरात चविष्ट जेवण मिळणार आहे. फक्त 20 रुपयात या जेवणाची चव प्रवाशांना घेता येणार असल्याने प्रवाशांना मोठा दिलास मिळणार आहे.