Trending:


अग्रलेख: अनर्थामागील अर्थ!

किमान गरजा भागवण्याची हमी देण्यात हॅरिस कमी पडल्याने, त्यांचे पुरोगामित्व हेच सर्व समस्यांचे मूळ, हे ट्रम्प यांचे कथानक अमेरिकी जनतेने स्वीकारले...


Raj Thackeray : कितीही मोठे नेते असूदेत, पण राज ठाकरे एकमेव आहेत, जे... संजय मोनेंकडून तारीफ, जुना व्हिडिओ व्हायरल

Sanjay Mone on Raj Thackeray : एकीकडे राजकारणातील मित्र राज ठाकरे यांच्या लेकासाठी फील्डिंग लावत असतानाच राज ठाकरेंच्या मैत्रीचे दाखले देणारे त्यांचे कलाकार मित्रही पुढे सरसावताना दिसत आहे


Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?

Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापुस्तकात असं लिहण्यात आलं आहे, जे नेते भाजपसोबत गेले त्यांनी शरद पवारांना अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवार यांनी भाजप पक्षासोबत जाण्यासाठी नकार दिला. हे सांगत राहिले ईडी, आयकर विभागाचा त्रास होतो आहे. तुम्ही बीजेपी बरोबर चला त्यावर पवार म्हणाले, मी भाजपसोबत जाणार नाही हे या पुस्तकात लिहिलेलं आहे, असं आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं. फडणवीसांच्या फेक नॅरेटिव्हच्या टिकेवर उत्तर फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक आहेत, तर व्यवस्थापिका सुप्रिया सुळे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहलं यातलं काहीही खोटं असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं,' असं खुलं आव्हान सुप्रिया सुळेंनी यावेळी फडणवीसांना दिलं आहे. फडणवीस यांनी त्या फाईलवर सही केली... अजित पवारांवर पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवाराच्या त्या फाईलवर त्यांनी सही केली. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आरोप केले, त्यानंतर फाईलवर सही केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांना फाईल दाखवली, ते मुख्यमंत्री असताना कारवाई केली, त्यांनी फाईल दाखवली देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर खटला दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी केली आहे. एका पुस्तकातील दावा अतिशय गंभीर विषय आहे, मी अनेकदा बोलले आहे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे मी गेले अनेक दिवस बोलत आहे, काश्मीर टू कन्याकुमारी मध्ये ईडी सीबीआय, आयकर विभाग यांचा 95 टक्के वापर केला आहे. याचा दावा केला आहे, वॉशिंग मशीन मध्ये टाकून भाजप सरकार स्थापन करत आहे. यामध्ये महिलाचा उल्लेख आहे, या अदृश्य शक्तीने माझ्या बहिणीच्या घरी रेड केली, पाच दिवस धाड टाकली, ईडीने त्रास दिला, भुजबळ, मलिक, राऊत यांचे कुटुंब कशातून गेले असतील.


Baba Siddique Case Update : बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड

Baba Siddique Case Update : बाबा सिद्दीकी प्रकरणी आरोपीकडून कटाची माहिती उघड राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) नवीन माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने गौरव विलास आपणे याला पुण्यातून अटक केली होती. गौरवने चौकशीदरम्यान सांगितले मोठी माहिती सांगितली आहे, जर प्लॅन ए अयशस्वी झाला तर बॅकअपसाठी प्लॅन बी तयार केला होता असं त्यानी चौकशीदरम्यान सांगितलं आहे. तपासात मोठी माहिती समोर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बिष्णोई टोळीने तयार केलेल्या प्लॅन बीमध्ये नेमबाज म्हणून सहभागी असलेला गौरव विलास हा त्याच्या गोळीबाराचा सराव करण्यासाठी आला होता. साठी झारखंडला गेले होते. त्याच्यासोबत या गुन्ह्यात आधीच अटक केलेला आरोपी रूपेश मोहोळ हाही झारखंडला गेला होता आणि तिथे दोघांनीही अनेक राऊंड फायरिंगचा सराव केला. मास्टरमाईंड शुभम लोणकर याने या दोन आरोपींना झारखंडमध्ये सरावासाठी पाठवले होते आणि सरावासाठी त्याने शस्त्रेही पुरवली होती. झारखंडमध्ये ज्या ठिकाणी ही राऊंड फायरिंगचा सराव करण्यात आला, ती जागा शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी प्रयत्न करत असले तरी, 5 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या अपुणे याने चौकशीदरम्यान ही धक्कादायक माहिती उघड केली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, शूटरने झारखंडमध्ये सराव केला आहे, जेणेकरून प्लॅन ए अयशस्वी झाल्यास, बॅकअप प्लॅन बनवला गेला. मुंबई क्राईम ब्रँचच्या माहितीनुसार, गौरव अपुणे आणि रूपेश मोहोळ हे 28 जुलै 2024 रोजी झारखंडला गेले होते, जिथे त्यांनी एक दिवस गोळीबाराचा सराव केला, 29 जुलै रोजी पुण्यात परतले आणि शुभम लोणकरच्या संपर्कात आले. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, झारखंडला जाण्यापूर्वी, अपुनेने आपल्या कुटुंबीयांना सांगितले की, तो मित्रांसोबत पिकनिकसाठी उज्जैनला जात आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याचा खुनाच्या कटात सहभागाची जाणीव झाली आणि शूटिंगच्या सरावाची योजना आखली गेली. गुन्हे शाखेच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बिष्णोई टोळीच्या सांगण्यावरून शुभम लोणकर याने रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहर आणि गौरव अपुणे या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चार अटक संशयितांना चार मोठ्या बक्षिसांचे आश्वासन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.


जालन्यात 52 लाख रुपये जप्त

Fifty Two Lakh Cash Seized In Jalna


Ajit Pawar Full PC : शरद पवारांवर टीका, अजितदादांचा संताप, Sadabhau khot यांना म्हणाले...

Ajit Pawar On Sadabhau khot : विनाशकाली विपरीत बुद्धी, शरद पवारांवर टीका,अजितदादांचा संताप खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर आमदार तथा माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्यावर राज्यभरातून टीका करण्यात आली. राष्ट्रवादी (शरद पवार गट) पक्षाने तर खोत यांनी माफी मागावी अशी मागणी केली. दरम्यान, सध्याची राजकीय परिस्थित पाहून तसेच केलेले विधान निवडणुकीत अडचणीचे ठरण्याची शक्यता लक्षात घेऊन सदाभाऊ खोत यांची भाषा नरमली आहे. त्यांनी केलेल्या विधानाबाबत दिलगिरी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून शरद पवार यांच्यावर केलेल्या विधानावर दिलगिरी व्यक्त केली आहे. सदाभाऊ खोत माफी मागताना काय म्हणाले? सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या वक्तव्याबाबत दिलगीरी व्यक्त केली आहे. ही दिलगिरी व्यक्त करत असताना त्यांनी ग्रामीण भाषेचा दाखला दिला आहे. मी बोललेली भाषा ही गावगाड्याची भाषा आहे, असे ते म्हणाले. "कुणाच्या व्यंगाला उद्देशून बोलण्याचा माझा हेतू नव्हता. ही गावगाड्याची भाषा आहे. परंतु काही लोकांनी त्या शब्दांचा विपर्यास केला. त्यातून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर ते शब्द मी मागे घेतो. मी दिलगिरी व्यक्त करतो," असे खोत म्हणाले.


Jammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून धक्काबुक्की

Jammu Kashmir Assembly Conflict : कलम 370 पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरून धक्काबुक्की जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज (7 नोव्हेंबर) आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले. लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. बॅनरवर लिहिले होते, 'आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. आणि विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथेच थांबली नाही. त्यांनी हाऊसमधील वेलमध्ये खुर्शीद अहमद शेख यांच्याकडे पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. यावेळी बॅनर फाडण्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले.


VIDEO | ATM व्हॅनमध्ये आढळले संशयास्पद साडेतीन कोटी रोकड, रोकडसह दोन जणाना घेतल ताब्यात

Cash Seized of Three And Half Crore Rupees Found In Van At Nalasopara


EPF missed call service: UAN नंबरशिवाय तपासू शकता PF बॅलेन्स, जाणून घ्या सोपी पद्धत

नियोक्त्याकडून(employer) वार्षिक ईपीएफ स्टेटमेंट मिळण्याची वाट पाहण्याची आवश्यकता नाही


Chhagan Bhujbal Clarification : निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्ब

Chhagan Bhujbal Clarification : निवडणुकीच्या धामधुमीत पुस्तक बॉम्ब राजदीप सरदेसाई यांच्या ‘२०२४ : द इलेक्शन दॅट सरप्राइज्ड इंडिया’ या पुस्तकातील छगन भुजबळ यांच्या एका मुलाखतीवरुन राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ माजली आहे. या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आपण केवळ ईडीच्या कारवाईपासून वाचण्यासाठी भाजपसोबत (BJP) गेल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि महायुतीची कोंडी होण्याची शक्यता आहे. 'दैनिक लोकसत्ता'मध्ये छापून आलेल्या वृत्तानुसार, या पुस्तकातील मुलाखतीत छगन भुजबळ यांनी म्हटले आहे की, अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपबरोबर महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्याचा आनंद पक्षाच्या सर्वच नेत्यांना झाला होता. कारण अर्थातच ईडीपासून सुटका… ती झाल्याने सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला… माझ्यासाठी तर ईडीपासून सुटका म्हणजे एक प्रकारे पुनर्जन्मच होता…’ अशा नि:संदिग्धपणे राष्ट्रवादीचे (अजित पवार) नेते व राज्याचे अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ हे सूचित करतात. मी उच्च जातीचा असतो तर केंद्रीय यंत्रणांनी मला असे वागवले नसते: छगन भुजबळ ‘मी ओबीसी असल्याने केंद्रीय यंत्रणा माझ्या मागे लागल्या. उच्च जातीचा असतो तर मला असे वागवले नसते’, असे छगन भुजबळ यांनी मुलाखतीत म्हटल्याचे पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. दोन वर्षांपूर्वी २ जुलै २०२३ या दिवशी अजितदादांनी शरद पवार यांचा हात सोडला आणि प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, सुनील तटकरे आदी प्रमुख नेत्यांसह ते भाजपच्या आश्रयास गेले. एकनाथ शिंदे यांनी जे शिवसेनेबाबत केले तेच अजितदादांनी राष्ट्रवादीशी केले. दोन्हींतही समान धागा भाजप हाच. तसेच यात आणखी एक साम्य आहे. एकनाथ शिंदे यांच्या अनेक साथीदारांप्रमाणे अजितदादांच्या अनेक साथीदारांवर विविध आरोप होते आणि काहींवर केंद्रीय यंत्रणांच्या कारवाया सुरू होत्या. खुद्द अजितदादा हेच ईडीच्या कचाट्यात होते. त्याच भीतीने या सर्वांनी पक्षत्याग करून भाजपशी घरोबा केला असे तेव्हाही बोलले जात होते. भुजबळ यांच्या या कबुलीने या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे.


Pune News : संभाजीराजे छत्रपती यांचे सुपुत्र निवडणुकीच्या रिंगणात, तिसऱ्या आघाडीसाठी करणार प्रचार

Shahaji Raje Chhatrapati : संभाजीराजे छत्रपती यांचे सुपुत्र शाहजीराजे छत्रपती हे निवडणुकीच्या रिंगणात उतरुन प्रचार करणार आहेत. ते तिसऱ्या आघाडीसाठी स्टार प्रचारक असणार आहेत.


MPSC मंत्र: राज्यसेवा मुख्य परीक्षा; विज्ञान व तंत्रज्ञान

मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर चारमधील विज्ञान व तंत्रज्ञान घटकातील उर्वरित घटकांच्या तयारीबाबत या लेखामध्ये चर्चा करण्यात येत आहे.


नोकरीची संधी: टेरिटोरियल आर्मी युनिट्समध्ये भरती

टेरिटोरियल आर्मी ( TA), ग्रुप मुख्यालय सदर्न कमांड युनिट्समध्ये ‘इन्फ्रन्ट्री बटालियन (टेरिटोरियल आर्मी)’ भरतीसाठी एम्प्लॉयमेंट न्यूजच्या दि. १२-१८ ऑक्टोबर २०२४ च्या अंकात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे.


ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 November 2024

देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं ही महाराष्ट्राची इच्छा, पहिल्याच प्रचारसभेत अमित शाह यांचं सूचक वक्तव्य...मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिल्याची चर्चा... आमचं सरकार आल्यावर कायद्याच्या चौकटीत राहून ३२ शिराळ्यात नागपंचमी पुन्हा सुरु करणार, सांगलीतल्या सभेत अमित शाहांची ग्वाही एक है तो सेफ है, महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा नारा... तर बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र सहन करणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती... महायुती म्हणजेच महाराष्ट्राची गती, धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदींची घोषणा, तर मविआमध्ये ड्रायव्हरच्या सीटसाठी चढाओढ, विरोधकांना टोला काँग्रेस नेत्यांनी रोज १५ मिनिटं सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी, नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचं काँग्रेस नेत्यांना आव्हान तर बाळासाहेबांचंही कौतुक करण्याचं चॅलेंज प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले असले तरी त्याच्यामागं अनेकांची डोकी होती, पूनम महाजनांचा माझा कट्टामध्ये गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून सत्य समोर आणण्याची मागणी करणार... टक्केवारीमुळे पैसे उरले नसतील म्हणून मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांपासून रखडला, गुहागरच्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल महायुतीत सामील होण्यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चिट, ईडीच्या भीतीमुळे महायुतीत गेल्याच्या आरोपांवर भुजबळांचं स्पष्टीकरण, कुणालाही कसलीही मुलाखत दिली नसल्याचा दावा पुस्तकात दावा केल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीच बोलले नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण...निवडणुका आल्या की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा भुजबळांच्या गौप्यस्फोटाने ईडीच्या गैरवापरावर शिक्कामोर्तब, सुप्रिया सुळेंचा दावा, अदृश्य शक्ती फक्त पुरुषांना नाही तर महिलांनाही छळते, बहिणींच्या चौकशीवर बोट ठेवत आरोप नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी ३० ते ४० जणांवर गुन्हा, १० जण कंधार पोलिसांच्या ताब्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, अल्पसंख्याक असल्याचा विद्यापीठ दावा करु शकत नाही हा १९६७ चा आपलाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द जम्मू काश्मीर विधानसभेत आजही अभूतपूर्व गोंधळ, कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांची धक्काबुक्की


Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी- संदीप देशपांडे

Sandeep Deshpande on Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी माहीम विधानसभेत सभा घ्यावी, असं थेट आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलं आहे. हे देखील वाचा मुंबईत ठाकरेंची मोठी खेळी, मनसेचा बडा मोहरा फोडला, अखिल चित्रे ठाकरे गटात प्रवेश करणार मुंबई : ऐन विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2024) तोंडावर शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) शिंदे गटाला धक्का दिला. वरळीमधील शिवसेना शिंदे गटाचे (Shiv Sena Shinde Group) पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. या पाठोपाठ शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (MNS) मोठा धक्का दिला आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे सरचिटणीस आणि वांद्रे उपविभाग प्रमुख अखिल चित्रे (Akhil Chitre) यांचा थोड्याच वेळात मातोश्रीवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अखिल चित्रे हे वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात (Vandra East Assembly Constituency) मनसेकडून माजी आमदार तृप्ती सावंत (Trupti Sawant) यांना तिकीट दिल्यामुळे नाराज होते.


Deolali Constituency | देवळालीत अहिरे की अहिरराव गुंता कायम

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेच्या उमेदवारावरून निर्माण झालेला गुंता अद्यापही कायम आहे. या वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शुक्रवारपर्यंत (दि.८) निर्णय होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अवघ्या मतदारसंघाच्या नजरा मुंबईकडे लागल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात प्रचाराचे वारे वाहायला सुरवात झाली आहे. महायुतीत अजित पवार गटाच्या स...


वरळीतील शिवसेनेला मोठा धक्का

worli supporters in shivsena ubt


9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA

9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) नवीन माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने गौरव विलास आपणे याला पुण्यातून अटक केली होती. गौरवने चौकशीदरम्यान सांगितले मोठी माहिती सांगितली आहे, जर प्लॅन ए अयशस्वी झाला तर बॅकअपसाठी प्लॅन बी तयार केला होता असं त्यानी चौकशीदरम्यान सांगितलं आहे. तपासात मोठी माहिती समोर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बिष्णोई टोळीने तयार केलेल्या प्लॅन बीमध्ये नेमबाज म्हणून सहभागी असलेला गौरव विलास हा त्याच्या गोळीबाराचा सराव करण्यासाठी आला होता. साठी झारखंडला गेले होते. त्याच्यासोबत या गुन्ह्यात आधीच अटक केलेला आरोपी रूपेश मोहोळ हाही झारखंडला गेला होता आणि तिथे दोघांनीही अनेक राऊंड फायरिंगचा सराव केला. मास्टरमाईंड शुभम लोणकर याने या दोन आरोपींना झारखंडमध्ये सरावासाठी पाठवले होते आणि सरावासाठी त्याने शस्त्रेही पुरवली होती. झारखंडमध्ये ज्या ठिकाणी ही राऊंड फायरिंगचा सराव करण्यात आला, ती जागा शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी प्रयत्न करत असले तरी, 5 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या अपुणे याने चौकशीदरम्यान ही धक्कादायक माहिती उघड केली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, शूटरने झारखंडमध्ये सराव केला आहे, जेणेकरून प्लॅन ए अयशस्वी झाल्यास, बॅकअप प्लॅन बनवला गेला. मुंबई क्राईम ब्रँचच्या माहितीनुसार, गौरव अपुणे आणि रूपेश मोहोळ हे 28 जुलै 2024 रोजी झारखंडला गेले होते, जिथे त्यांनी एक दिवस गोळीबाराचा सराव केला, 29 जुलै रोजी पुण्यात परतले आणि शुभम लोणकरच्या संपर्कात आले. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, झारखंडला जाण्यापूर्वी, अपुनेने आपल्या कुटुंबीयांना सांगितले की, तो मित्रांसोबत पिकनिकसाठी उज्जैनला जात आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याचा खुनाच्या कटात सहभागाची जाणीव झाली आणि शूटिंगच्या सरावाची योजना आखली गेली. गुन्हे शाखेच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बिष्णोई टोळीच्या सांगण्यावरून शुभम लोणकर याने रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहर आणि गौरव अपुणे या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चार अटक संशयितांना चार मोठ्या बक्षिसांचे आश्वासन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.


Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

Top 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा : 10 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP Majha जम्मू-काश्मीर विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज (7 नोव्हेंबर) आमदारांमध्ये जोरदार हाणामारी झाली. सत्ताधारी आणि विरोधी भाजपच्या आमदारांनी एकमेकांची कॉलर पकडून एकमेकांना धक्काबुक्की केली. सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी विधानसभेचे कामकाज 20 मिनिटांसाठी तहकूब केले. लंगेटचे आमदार खुर्शीद अहमद शेख यांनी कलम 370 मागे घेण्याचा बॅनर सभागृहात फडकावला. बॅनरवर लिहिले होते, 'आम्हाला कलम 370 आणि 35A पुनर्स्थापित करायचे आहे आणि सर्व राजकीय कैद्यांची सुटका हवी आहे. याला भाजप आमदार आणि विरोधी पक्षनेते सुनील शर्मा यांनी विरोध केला. आणि विरोधात घोषणाबाजी सुरू केली. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची भाजप आमदारांच्या निषेधाची मालिका इथेच थांबली नाही. त्यांनी हाऊसमधील वेलमध्ये खुर्शीद अहमद शेख यांच्याकडे पोहोचून त्यांच्या हातातील बॅनर हिसकावून घेतला. यावेळी शेख यांच्या समर्थनार्थ सज्जाद लोन आणि वाहिद पारा आणि नॅशनल कॉन्फरन्सचे काही आमदार भाजप आमदारांशी भिडले. यावेळी बॅनर फाडण्यावरून सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि विरोधकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांची कॉलर पकडून बॅनर हिसकावून घेण्यास सुरुवात केली. गोंधळ वाढत असल्याचे पाहून मध्यस्थी करणाऱ्या मार्शलनी भाजप आमदारांना सभागृहाबाहेर काढले.


Mumbai News | मुंबईकरांचे आरोग्य बिघडले

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात आरोग्य सेवेसाठी भरघोस तरतूद करून प्रचंड खर्च झाल्यानंतरही मुंबईकरांचे आरोग्य मात्र भयंकर बिघडले आहे. प्रजा फाऊंडेशनने गुरुवारी जाहीर केलेल्या ताज्या अहवालानुसार, मुंबईत मधुमेह, अतिसार आणि उच्च रक्तदाबाचे रुग्ण वाढले आहेत. २०१४ ते २०२३ या १० वर्षांच्या कालावधीत मुंबईमध्ये अतिसाराचे सर्वाधिक ९ लाख ३६ हजार ६१ र...


QS World University Rankings: आशियातील अव्वल १०० मध्ये भारतातील सात शिक्षणसंस्था; IIT मुंबई पहिल्या ५० मध्ये

दक्षिण आशियाई देशांचा विचार केल्यास पहिल्या सहा क्रमांकावर भारतातील संस्था असून त्यात आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबई अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यात पाकिस्तानची नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आयआयटी कानपूरसह संयुक्तरित्या सहाव्या क्रमांकावर आहे. भारतातील आयआयटी दिल्लीने आशियातील संस्थांच्या यादीत ४४ वे स्थान मिळवले आहे. आयआयटी मुंबई ४८ व्या क्रमांकावर असून त्या खालोखाल आयआयटी मद्रासने ५६ वा क्रमांक पटकावला


Byculla Assembly constituency: यामिनी जाधव सावरणार का भायखळ्याचा गड?

मुंबई: दक्षिण मुंबईतील लक्षवेधी मतदारसंघ म्हणजे भायखळा. भायखळा या विधानसभा मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव या विद्यमान आमदार आहेत. त्यांना नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून महायुतीने तिकिट दिलं होतं. पण उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी त्यांचापराभव केला.आता पुन्हा एकदा भायखळ्यातून विधानसभा त्या लढवत आहेत. त्या शिवसेनेचा गड शिंदेंसाठी राखणार का की महाविकास आघाडीचे उबाठा शिवसेना पक्षाचे नेते...


करिअर मंत्र

मी सातारा येथे राहते. २०२४ ला माझे ग्रॅज्युएशन पूर्ण झाले आहे. मी बीएससी फॉरेन्सिक सायन्स केले आहे. आत्ता मी एमपीएससी कंबाइनची तयारी सुरू केली आहे.


Nostradamus prediction On Donald Trump : नॉस्ट्राडेमसची भविष्यवाणी ठरली खरी! अमेरिकेत पुन्हा डोनाल्ड ट्रम्पचे वर्चस्व, जाणून घ्या भारताबद्दल नॉस्ट्राडेमसचे ४ अंदाज

nostradamus 4 major predictions about india : डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या सत्तेत आले आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार आणि उपाध्यक्ष कमला हॅरिस यांचा पराभव करुन ट्रम्प पुन्हा विजयी झाले. डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाने सर्व राजकीय चर्चेदरम्यान, नॉस्ट्राडेमसच्या भविष्यवाण्यांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. नॉस्ट्राडेमसचे कोणते भाकित ट्रम्प यांच्याशी जोडले जात आहेत. नॉस्ट्राडेमसने भारतासाठी कोणते मोठे भाकीत केले आहेत ते पाहूया.


Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं ही महाराष्ट्राची इच्छा, पहिल्याच प्रचारसभेत अमित शाह यांचं सूचक वक्तव्य...मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिल्याची चर्चा... आमचं सरकार आल्यावर कायद्याच्या चौकटीत राहून ३२ शिराळ्यात नागपंचमी पुन्हा सुरु करणार, सांगलीतल्या सभेत अमित शाहांची ग्वाही एक है तो सेफ है, महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा नारा... तर बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र सहन करणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती... महायुती म्हणजेच महाराष्ट्राची गती, धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदींची घोषणा, तर मविआमध्ये ड्रायव्हरच्या सीटसाठी चढाओढ, विरोधकांना टोला काँग्रेस नेत्यांनी रोज १५ मिनिटं सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी, नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचं काँग्रेस नेत्यांना आव्हान तर बाळासाहेबांचंही कौतुक करण्याचं चॅलेंज प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले असले तरी त्याच्यामागं अनेकांची डोकी होती, पूनम महाजनांचा माझा कट्टामध्ये गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून सत्य समोर आणण्याची मागणी करणार... टक्केवारीमुळे पैसे उरले नसतील म्हणून मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांपासून रखडला, गुहागरच्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल महायुतीत सामील होण्यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चिट, ईडीच्या भीतीमुळे महायुतीत गेल्याच्या आरोपांवर भुजबळांचं स्पष्टीकरण, कुणालाही कसलीही मुलाखत दिली नसल्याचा दावा पुस्तकात दावा केल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीच बोलले नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण...निवडणुका आल्या की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा भुजबळांच्या गौप्यस्फोटाने ईडीच्या गैरवापरावर शिक्कामोर्तब, सुप्रिया सुळेंचा दावा, अदृश्य शक्ती फक्त पुरुषांना नाही तर महिलांनाही छळते, बहिणींच्या चौकशीवर बोट ठेवत आरोप नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी ३० ते ४० जणांवर गुन्हा, १० जण कंधार पोलिसांच्या ताब्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, अल्पसंख्याक असल्याचा विद्यापीठ दावा करु शकत नाही हा १९६७ चा आपलाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द जम्मू काश्मीर विधानसभेत आजही अभूतपूर्व गोंधळ, कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांची धक्काबुक्की