पणजी: पुढारी वृत्तसेवा : पणजी - म्हापसा - अस्नोडामार्गे दोडामार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या मार्गावर नानोडा येथे मुसळधार पावसामुळे पूर आल्याने अनेक वाहने अडकून पडली. नोकरी, व्यवसायानिमित्त पणजीकडे जाणाऱ्या युवक, युवती आणि म्हापसा, करासवाडा येथे कामावर जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली.
गोवा : जंगलात बांधून ठेवलेल्या अमेरिकन महिलेची नवी माहिती समोररस्त्यात कंबरेएवढे पाणी साचले होते. त्यात एक बसही अडकून पडली होती. याच मार्गावार मागच्या वेळेला पुरातून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करताना जीप वाहून गेली होती. दुदैवाने चालक आणि सोबतची महिला बचावली होती. हा मार्ग बंद झाल्याने काहींनी मागे येत गोवा दोडामार्गावरून डिचोली, रायबंदरमार्गे पणजीला जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिचोली बाजारपेठेतील सगळे रस्ते पाण्याखाली गेले होते. ठिकठिकाणी बॅरिकेड्स उभारून पोलिसांनी ते मार्ग बंद केले होते. तरीही अनेकजण आपली वाहने पाण्यातून नेत होते.
2024-08-01T12:27:26Z