Lalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळी
Lalbaugacha Raja Visarjan : लालबागच्या राजाचं मंडपातून प्रस्थान, लाखो भक्तांची मांदीयाळी अनंत चतुर्दशीला शहरातील कायदा आणि सूव्यवस्था राखण्यासाठी २० हजारांहून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणार आहेत. याशिवाय वाहतूक विभागाचे अडीच हजार अधिकारी आणि कर्मचारी वाहतुकीचे नियोजन करणार आहेत. लालबाग गणेश मंडळाच्या सुरक्षेसाठी पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. गणपती विसर्जन व ईद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, यासाठी सुमारे २० हजार पोलीस तैनात करण्यात येणार असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त(कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. १७ सप्टेंबर व १८ सप्टेंबर या दोन दिवशी शहरात ९ अतिरिक्त पोलीस आयुक्त, ४० उपायुक्त, ५६ सहाय्यक पोलीस आयुक्त, ४ हजार पोलीस निरीक्षकांसह २०,५१० पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात येणारआहेत. याशिवाय मेटल डिटेक्टर, श्वान पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांच्या माध्यमातूनही संवेदशिल ठिकाणांची नियमित तपासणी करण्यात येत आहे. याशिवाय छेडछाड रोखण्यासाठी गर्दीच्या ठिकाणीध्या वेशातील पोलिस असणार आहेत. त्याच बरोबर शहरात बसवण्यात आलेल्या सीसीटिव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवले जाणार याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या १० कंपनी, १५ अतिरिक्त प्लाटून, एक हजार गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. गणपती विसर्जनासाठी लालबागचा राजाच्या मार्गिकेवर पाच हजार पोलीस तैनात करण्यात येणार आहेत
2024-09-17T07:43:45Z
CM Eknath Shinde in Sambhajinagar GHATI : मुख्यमंत्री शिंदे घाटी रुग्णालयात, डॉक्टरांशी संवाद
घाटी हॉस्पिटल मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉक्टर सोबत संवाद साधला त्यांच्या अडचणी समजून घेतल्या आणि योग्य प्रमाणात निधी देण्यात येईल असा आश्वासनही दिले डॉक्टर्स सर्वसामान्यांसाठी विघनहर्ता आहे...लोकांना जीवदान देणारे ही मंडळी आहे... दुर्दैवाने काही गोष्टी घडतात मात्र रुग्णाच्या आयुष्यात आनंद निर्माण करण्याचे काम डॉक्टर्सचे आहे, डॉक्टर सर्जरी करतात, मी डॉक्टर नसताना सुद्धा सर्जरी केली त्यातून अनेकांना आराम मिळाला अनेक जण रिलॅक्स झाले कोलकत्ता मध्ये जे घडले त्यानंतर आम्ही सुरक्षेबाबत बैठक घेतली... मेडिकल कॉलेज मधून लोकांना खुप अपेक्षा असतात, काही चूकही होते मात्र पोलीस कायदा सुववस्था राखतील.. पोलिसांनी नियमित इथं भेट द्यावी, संवाद राखावा, पाणी नाही, मूलभूत सुविधा नाही याची नोंद घ्या सुधारणा करा.. घाटी हॉस्पिटल ला जी मदत लागेल ते आम्ही तुम्हाला देणार आहोत,मात्र थोडं दमाने घ्या ही विनंती मोदी जी ना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा, सगळ्यांसाठी काम करणारे ते आहेत, देशाचे नाव त्यांच्यामुळे आता आदराने घेतात सगळे सोंग करता येतें पैशांचे सोंग घेता येत नाही, सगळ्या मागण्या मान्य करू,
2024-09-17T08:43:45Z
Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 16 September 2024
महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अहमदाबाद आणि भरूचदरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण विधानसभेसाठी केंद्रीय भाजपचं नो-रिस्क धोरण, राज्याबाहेरचे ६० नेते महाराष्ट्रातून येऊन मतदारसंघांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं... बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी... मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणेंविरोधात काँग्रेसच्या लीगल सेलची तक्रार, कर्नाटकातील गणेशमूर्ती प्रकरणावरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ
2024-09-16T13:58:32Z
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स मराठी बातम्या : 1 PM : 16 Sep 2024
ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स मराठी बातम्या : 1 PM : 16 Sep 2024 शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं... शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर, गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका, स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण एबीपी माझाच्या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही म्हणाले दोन टप्प्यांत होऊ शकते विधानसभा निवडणूक... महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, लोकसभा निवडणुकीतला स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, हिम्मत असेल तर पालिकेच्या निवडणुका घ्या . संजय राऊतांचं सरकारला आव्हान. तर हरण्याची भितीमुळेच निवडणुका टळत असल्याचा राऊतांचा हल्लाबोल,
2024-09-16T08:13:26Z
सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024
सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024 गणेशोत्सवाची आज सांगता... १० दिवसांचे गणराय निघणार गावाला... मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं विसर्जन, घरगुती गणपतींनाही निरोप पुण्यातल्या मानाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात, दगडशेठच्या गणपती ४ वाजता निघणार आणि ८ वाजता विसर्जित होणार... मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, विसर्जनासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल गाड्या, मध्यरात्री गणेश विसर्जनाहून परतणाऱ्या मुंबईकरांची सोय
2024-09-17T02:58:40Z