बातम्या

Trending:


शहरबात : उशिरा सुचलेले…

पावसाळ्यातील खड्ड्यांवर उपाययोजना म्हणून सुमारे ५५० कोटी रुपयांचा काँक्रीटीकरण (व्हाइट टॉपिंग) प्रकल्प राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण राबवीत आहे.


Uddhav Thackeray : विधानसभेला रसद मिळणार, उद्धव ठाकरे गटात आनंदी आनंद, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अगदी तीन महिन्यांवर आली आहे. विधानसभेच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळालेला असून पक्षनिधी स्वीकारण्यास त्यांना निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे.


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


Mumbai Congress Protest : मुंबईतील BKC पोलीस स्टेनशनवर काँग्रेसचा मोर्चा, Smart Meter ला विरोध

Mumbai Congress Protest : मुंबईतील BKC पोलीस स्टेनशनवर काँग्रेसचा मोर्चा, Smart Meter ला विरोध स्मार्ट मीटर (Mumbai Smart Meter) रद्द केली पाहिजेत अशी मागणी करत काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांच्या (Varsha Gaikwad)नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला आहे. या मोर्चासंबंधी काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी परवानगी मागितली होती. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर खासदार वर्षा गायकवाडांनी मुंबईतील बीकेसी पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. स्मार्ट मीटरविरोधात काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला असून काँग्रेसकडून दोन दिवसांपूर्वी या आंदोलनाचं पोलिसांना पत्र देण्यात आलं होतं. मात्र सुरक्षेचा कारणास्तव पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली. या मोर्चानंतर पोलिसांनी आंदोलकांच्या गाड्या ताब्यात घेतल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मुंबईतील स्मार्ट मीटर विरोधात आज काँग्रेसचे मुंबईत वांद्रे बीकेसी परिसरामध्ये आंदोलन होणार होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली.यानंतर काँग्रेस नेते बीकेसी पोलीस ठाण्यात परवानगीसाठी दाखल झालेले आहेत. तर दुसरीकडे कार्यकर्ते हे पोलीस ठाण्याबाहेर करत घोषणाबाजी करताना पाहायला मिळत आहेत. स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत, वर्षा गायकवाडांचा आरोप यावेळी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकड म्हणाल्या की, मुंबईतील स्मार्ट मीटरमुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात वीज बिल येत आहे. सर्वसामान्यांना ते परडवत नाही. या वाढलेल्या विजेच्या बिलाविरोधात आम्ही मोर्चा काढणार होतो. पण उद्योगपतींना पाठिंबा देणारे या सरकारने आणि पोलिस यंत्रणेने आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली. विजेचे बिल कमी झाले पाहिजे, स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत. राज्य सरकारला मध्यमवर्गीयांचा आवाज ऐकू येत नाही. आमच्या मोर्चाला परवानगी नाकारली नसून त्यांच्यामागे असलेल्या अदृश्य शक्तीचं हे काम आहे असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. यासंबंधी आम्ही एक निवदेन देणार असून त्वरीत स्मार्ट मीटर रद्द झाली पाहिजेत अशी आमची मागणी असल्याचं त्या म्हणाल्या. आंदोलनासाठी आलेले काँग्रेस कार्यकर्ते आणि नागरिकांच्या गाड्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोप वर्षा गायकवाडांनी यावेळी केला. मोदींच्या बॅनरवर चिखलबाजी स्मार्ट मीटर विरोधात काँग्रेसने केलेल्या आंदोलनादरम्यान वांद्रे बीकेसी परिसरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवर काँग्रेस कार्यकर्त्यांनी चिखल फासला. या आंदोलनाच्या दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं दिसून आलं. त्यानंतर चिखल फासण्यात आलेले नरेंद्र मोदींचे बॅनर पोलिसांनी काढून टाकले.


Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे

Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर पुण्याहून वाशिममध्ये रुजू, तर पूजाच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कठोर कारवाई करणार समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा भरण्यास सुरुवात, एबीपी माझानं सकाळपासून बातमी दाखवल्यानंतर यंत्रणेला जाग. शाहपूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदड, कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी टळली, पुढील सुनावणी १८ जुलैला होणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अजून दमदार पाऊस नाही, आज घडीला सात धरणांचा मिळून २२ टक्केच पाणीसाठा राहुल गांधी,उद्धव ठाकरेंवर अवमाननेचा खटला चालवा, मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी, मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणीसंबंधी दिशाभूल केल्याचा आरोप... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार, दोन्ही पालख्यांसोबत चालणार की एकच हे अजून अस्पष्ट, १७ तारखेला आहे आषाढी एकादशी..


अजित पवारच का लक्ष्य ?

महाराष्ट्रातील भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या पराभवाबद्दल ‘ऑर्गनायझर’ पाठोपाठ ‘विवेक’ या रा. स्व. संघाच्या विचारसरणीच्या नियतकालीकांमधून राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष्य करण्यात आल्याने संघ परिवाराला अजित पवारांना बरोबर घेणे बहुधा पसंत पडलेले दिसत नाही.


BMW hit and run case : बेदरकारपणे BMW कार चालवून महिलेला चिरडणाऱ्या मिहिर शहाला आता सतावतेय करिअरची चिंता, म्हणाला..

Mumbai BMW hit and run case : मिहीर शाह आणि त्याच्या दोन मित्रांनी जुहू येथील एका बारमध्ये व्हिस्कीचे १२ मोठे पेग रिचवले होते. त्यानंतर भरधाव कार चालवून एका महिलेला उडवले होते.


Manorama Khedkar Arrested : मनोरमाबाई तोऱ्यात, बंदुक भोवली, पोलीस कोठडी सुनावली Special Report

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे जसे उघड होत गेले, तसेच त्यांच्या मातोश्री मनोर खेडकर यांच्या दादागिरीचेही किस्से अगदी व्हिडीओसकट समोर आले... हातात पिस्तुल घेऊन कधी शेतकऱ्यांना केलेली दमदाटी असो, की पोलिसांना गेटवर ताटकळत ठेवून केलेली अरेरावी असो... अशाच मनगटशाहीमुळे त्यांना आता जेलची वारी घडलीय... पाहूयात... याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट... Manorama Khedkar Arrest: ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस तिला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोरमा खेडकरचे (Manorama Khedkar) काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं? महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार? या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ 288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच येणारच आहे. शिंदे-दादांचं समाधान होणार का? जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र 70 आणि अजितदादांना 60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.


Sanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha

Sanjay Raut Full PC : लाडक्या बहिणींनाही दहा हजार रुपये द्या : संजय राऊत : ABP Majha राज्य सरकारच्या योजनेवरून लाडकी बहिण योजनेवरून शिवसेना उद्धव ठाकरेंचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) जोरदार निशाणा साधलाय. लोकसभेतील (Lok Sabha Election) पराभवानंतर राज्य सरकारला लाडका भाऊ आठवला का असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान बहिण घर सांभाळते तीचं दीड हजारात काय होणार असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलाय. दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊतांनी छगन भुजबळांवरही निशाणा साधलाय. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होते. लाडकी बहिण योजनेवर संजय राऊतांनी टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले,लोकसभेतील पराभवानंतर यांना लाडका छोटा भाऊ आठवू लागला आहे. त्यांना मिळणाऱ्या मदतीबद्दल आमचा विरोध नाही. खर तरं बहिणीला जास्त मदत मिळायला हवी. बहिण घर चालवत असते, स्त्री पुरूष समानता असायला हवी. दिड हजारात काय होतंय?, किमान 10 हजार तिलाही द्यायला हवेत. परवा सगळे लाडके भाऊ भरतीकराता जमा झालेले पाहायला मिळाले. भावांची बेरोजगारी आधी दूर करायला हवी .


Maharashtra News Live : लाडक्या बहीण योजनेत १५०० ऐवजी १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

Mumbai Raigad Ratnagiri Rain Live Updates : मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या...


यूपीएससी निकालानंतर जंगी स्वागत, IFS पोस्टिंग मिळाल्याचं लेटर दाखवलं, पण तरीही कार्यक्रम फसला

ज्योती मिश्रा.... २०२१ ला UPSC ची परीक्षा दिलेली उत्तर प्रदेशातील रायबरेली येथील मुलगी... जिच्या पास होण्याबद्दल आमदार आणि युपी पोलिसांनीही तिचे सत्कार सोहळे केले... या सत्कार सोहळ्यादरम्यानची अनेक भाषणंही दिसली... गेल्या दोन वर्षांपासून ही मुलगी IFS म्हणून सगळीकडे वावरतेय... स्पेनच्या दुतावासात ती कार्यरत असल्याचंही सांगितलं गेलं. पण पुजा खेडकर प्रकरणानंतर या मुलीबद्दल एक नवा खुलासा टाइम्स ऑफ इंडियाने समोर आणलाय ज्याने खुद्द या मुलीचे आई-वडीलही धक्क्यात गेलेत.. पूजा प्रकरणानंतर IAS अभिषेक सिंह याची चर्चा सुरु झाली आणि आता ते होत नाही तोच ज्योती मिश्रा या नावाची एन्ट्री झालीये... ज्योती मिश्रा प्रकरण काय आणि नेमकं कसं समोर आलंय? त्याचीच स्टोरी या व्हिडिओत पाहू....


Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका

Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे. आईचा थयथयाट, पोलिसांवरच अरेरावी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असं त्यात म्हटलं आहे.


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


Corruption in NEERI : ‘नीरी’वर काळा डाग

Nagpur Corruption News: ‘नीरी’मधून काही बनावट कंपन्यांना कामे दिली जाऊ लागली. याद्वारे कोट्यवधीचा निधी खिशात घातला जाऊ लागला. संस्थेचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या काळात हा सर्व प्रकार घडला.


Ajay Maharaj Baraskar: जरांगेंना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्करांची कार पंढरीत जळाली, आषाढी एकादशीलाच घटना

Solapur News: मनोज जरांगे यांना विरोध करणाऱ्या अजय महाराज बारस्कर यांची कार पंढरपूरमध्ये जळाली. दोन दिवसांपासून धमक्या येत असल्याने कार जळाली की जाळली? याचा शोध आता पोलीस घेत आहेत.


Dibrugarh Express : उत्तर प्रदेशात मोठा रेल्वे अपघात, डिब्रुगड एक्सप्रेसचे १० डबे रुळावरून घसरले!

Dibrugarh Express Derail Near Gonda : डिब्रुगड एक्सप्रेसचा मोठा अपघात झाला असून यामध्ये एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे.


Donald Trump Firing : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

दिल्ली, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. अमेरिकेच्या पेंसिल्वेनियामध्ये या निवडणूक रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे बोलत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर तिथे असलेल्या सीक्रेट सर्विस एजंट्सनी ट्रम्प यांना स्टेजवरून सुरक्षितरित्या बाहेर काढले. गोळीबार थांबला तेव्हा ट्रम्प यांच्या गालावर रक्त आल्याचं दिसत होतं. या...


IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रावर धडकणार मोठं संकट; मान्सूनबाबत मोठी अपडेट

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे, हवामान विभागाकडून (IMD)पावसाबाबत हायअलर्ट देण्यात आला असून, येत्या 18 जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचं म्हटलं आहे. येत्या 18 जुलैपर्यंत कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर हवामान विभागानं पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे विदर्भाला देखील हवामान विभागाकडून ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात 18 जुलैपर्यंत पावसाचा जोर कायम राहील असं हवामान विभागानं म्हटलं आहे. मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला असून, दमदार पावसाची शक्यता आहे, त्यामुळे घाट पर्यटनाला जाताना काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान आज पुणे, सिंधुदूर्ग, रायगड, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, इथे अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.दुसरीकडे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, तिथे मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.


ABP Majha Headlines 12PM एबीपी माझा हेडलाईन्स 12 PM 18 July 2024 Marathi News

शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक, महाडमधल्या हॉटेलमध्ये लपलेल्या मनोरमांना पुणे ग्रामीण पोलिसांकडून बेड्या पूजा खेडकरांनी वाशिम पोलिसांकडे सोपवला लेखी जबाब, जिल्हाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल होणार का, आता चेंडू पुणे पोलिसांच्या कोर्टात ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार... ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार... महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस ८० जागा लढवेल, कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची एबीपी माझाला एक्स्लुजीव माहिती, विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार.. विधानसभा निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत बैठक, दिल्लीतून दोन्ही निवडणूक प्रभारी येणार.. विधानसभेसाठी मुख्यमंत्र्यांच्या मोर्चेबांधणीला सुरुवात, आजपासून बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा ६० जणांची बैठक


Budget 2024 Expectations : पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार? बजेटमध्ये घोषणेची शक्यता

Union Budget 2024 Expectations : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पूर्ण अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत सादर केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेत काही वाढ होते का, याकडं शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे.


लाडकी बहीणनंतर आता राज्य सरकारी लाडक्या भावांसाठीही योजना

ladaki bahin yojna followed by state government's ladaka bhau scheme


Satara Shivaji Maharaj Tiger Crawl: लंडनहून आलेली वाघनखं साताऱ्यात;वाहनांसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा

Satara Shivaji Maharaj Tiger Crawl: लंडनहून आलेली वाघनखं साताऱ्यात;वाहनांसोबत पोलिसांचा मोठा फौजफाटा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाघनख्या सातारा जिल्हा हद्दीत दाखल. नियोजित वेळे आगोदरच वाघनख्या साताऱ्यात आयशर गाडीतून वाघनख्या साताऱ्यात वाघनख्याच्या गाडीला पोलिसांचा फौज फाटा 19 तारखेलि ढोल ताशांच्या गजरात साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रालयात सर्व सातारकरांना पहाता येणार,