Trending:


Chhatrapati Sambhajinagar | संभाजीनगरला शासनाकडून ठेंगा!

गणेश खेडकर छत्रपती संभाजीनगर: संभाजीनगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दवाढीसह नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्मितीचा प्रस्ताव ९ वर्षांपूर्वी पाठविलेला आहे. तेव्हापासून हा प्रस्ताव धूळखात पडून असताना काही महिन्यांपूर्वी पाठविलेला प्रस्ताव मंजूर करीत पुणे आणि पिंपरी चिंचवडसाठी शासनाने नवीन ११ पोलिस ठाणे मंजूर केले. यातून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अतिसंवेद...


Pudhari News Vikas SUMMIT 2024 | मान्यवरांनी मांडला विकासाचा रोडमॅप


Baba Siddiqui Murder: सामान्य कार्यकर्ता ते मंत्री, बॉलीवूडमध्येही चलती; बाबा सिद्दीकींचा राजकीय प्रवास कसा होता?

तब्बल ४८ वर्ष काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या बाबा सिद्दीकींनी यावर्षी काँग्रेसचा हात सोडून राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे घड्याळ हाती घेतले होते. स्वतःसह त्यांनी आपल्या मुलाचे राजकीय भवितव्य सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला.


Navratri 2024 : रावण दहनाने झाली नवरात्रोत्सवाची सांगता

बन्सीलाल अगरवाल चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री महालक्ष्मी मंदिर, सारसबाग येथे नवरात्रोत्सव उत्साहात संपन्न झाला. विजयादशमी म्हणजेच दसऱ्यादिवशी श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. ट्रस्टतर्फे यावर्षी प्रथमच रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अबालवृद्ध पुणेकर नागरिक अपूर्व उत्साहात उपस्थ...


Black Panther : ब्लॅक पँथरमुळे समृद्ध जंगलाची प्रचिती

ठाणे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील भैरवगड ते रांगणागड या जवळपास 15 ते 20 किमी सह्याद्री पट्टयात हे ब्लॅक पँथर सापडले आहेत. यामुळे या जंगलाच्या समृद्धतेचा आणखी एक पुरावा मिळाला आहे. पश्चिम घाटात पट्टेरी वाघांचे अस्तित्वही आढळले आहे. सिंधुदुर्गातील आंबोली हिरण्यकेशी येथे यापूर्वी पट्टेरी वाघ कॅमेर्‍यात कैद झाला आहे. कुडाळ तालुक्यातील भैरवग...


Raj Thackeray Full Speech : शिंदे, ठाकरे ते शरद पवार; एकाच भाषणात सगळ्यांना डिवचलं! ABP MAJHA

Raj Thackeray Full Speech : शिंदे, ठाकरे ते शरद पवार; एकाच भाषणात सगळ्यांना डिवचलं! ABP MAJHA राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेची सर्वदुर चर्चा आहे, या योजनेवरून अनेकदा विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल केला आहे, अशातच आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे पुढच्या दोन महिन्यात बंद होतील, असं म्हणत महायुती सरकारचे वाभाडे काढले आहेत. मेळाव्यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज ते लाडकी बहीण योजनेचे पैसे देत आहेत, कोणी मागितले होते ते, मला आपल्या इतकच्या राजकारण्यांचा उद्देशच कळत नाही. हेतूच कळत नाही, तुमच्याकडे कोणी मागितले होते पैसे असं म्हणत संताप व्यक्त केला आहे. काय म्हणालेत राज ठाकरे? पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले, आज मी तुम्हाला लिहून देतो, लाडकी बहीण योजना आहे ना त्याचे, गेल्या काही महिन्यांचे पैसे येतील कारण निवडणुका तोंडावर आहेत. या देखील महिन्याचे पैसे येतील. पुढच्या महिन्याचे येतील नंतर येणार नाहीत. यावरती जाऊ नका तुम्ही. हे जे पैसे वाटणं सुरू आहे. त्यावरून जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अशी परिस्थिती निर्माण होईल, या महाराष्ट्र सरकारकडे पगार द्यायला पैसे नसतील. कोण मागतंय त्यांच्याकडे फुकटं, महिलांच्या हाताला काम द्या, त्या कमवतील पैसे, त्या बळकट आहेत, त्यांच्या हाताला काम द्या, कोणी मागितले आहेत फुकटं पैसे, गरीबाला पैसे, मजुराला पैसे, शेतकऱ्यांना वीज फुकट द्या, शेतकरी कुठे मागतोय फुकटं वीज ते फक्त विजेत सातत्य मागत आहे, राज्यात कोणीच फुकट काही मागत नाही, यांना त्या सवयी लावायच्या आहेत. एकदा का फुकट घेण्याची सवय लागली की, मग सगळे राजकीय पक्ष त्या पध्दतीने वागायला लागतात. त्यानंतर सर्वजण त्या प्रकारच्या गोष्टी तुमच्यासमोर ठेवत जातात. नागडा होणार आहे महाराष्ट्र. आपण राज् म्हणून काही विचार करणार आहोत की नाही, या सर्वातून हाताला काही लागणार नाही, असंही राज ठाकरेंनी यांनी यावेळी म्हटलं आहे.


Thane Politics : पंतप्रधान दौर्‍याचा फायदा कुणाला?

ठाणे : राजकीय केंद्र बनलेल्या ठाण्यात पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सरकारी जाहीर कार्यक्रम झाला आणि त्याचा प्रभाव ठाणे जिल्ह्यात राजकीय घडामोडींवर पडला आहे. भाजपांतर्गत नाराजीतून होणारे पक्षांतर रोखण्यास नेतृत्वाला यश आले नवी मुंबईतील दोन्ही जागांचा तिढा सुटला. दुसरीकडे ट्रिपल इंजिनच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा...


बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपीला 11 वर्षांपूर्वीच कुटुंबाने घरातून केलं होत बेदखल, आजीने सांगितली हकीकत

Baba Siddique Shot Dead: महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणाचे धागेदोरे हरियाणातील कैथलशी जोडले जात आहेत. या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांच्या दाव्यानुसार ते लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आहेत. या दोन संशयितांपैकी एक हरियाणाचा गुरमेल बलजीत सिंह आहे.आरोपी गुरमेल बलजीत सिंहच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांनी अनेक वर्षांपूर्वी गुरमेल बलजीत सिंहला घरातून हाकलून दिले होते....


Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM :13 ऑक्टोबर 2024 : ABP Majha

Top 25 : टॉप 25 न्यूज : 11 PM :13 ऑक्टोबर 2024 : ABP Majha माजी राज्यमंत्री आणि अजित पवार यांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दिकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या हत्येनंतर महाराष्ट्रासह संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. ऐन दसऱ्याच्या दिवशीच म्हणजेच 12 ऑक्टोबर रोजी भर रस्त्यावर ही हत्या झाली. या घटनेतील दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलीस तिसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील एक आरोपी तर अवघ्या 19 वर्षांचा आहे. नुकतेच मिसुरडं फुटलेल्या या 19 वर्षांच्या आरोपीने बाा सिद्दिकी यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडणारे आरोपी नेमके कोण? बाबा सिद्दीकी यांच्यावर एकूण तीन जणांनी गोळीबार केला. यातील एक आरोपी सध्या फरार आहे. तर दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी नुकतेच त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर या आरोपींची नावे समोर आली आहेत. यातील पहिल्या आरोपीचे नाव हे गुरमेल बलजीत सिंह असे आहे. हा आरोपी 23 वर्षांचा आहे. तो मुळचा हरियाणा राज्याचा रहिवासी आहे. तर दुसऱ्या आरोपीचे नाव धर्मराज कश्यप असे आहे. हा आरोपी अवघा 19 वर्षांचा आहे. ज्या वयात शिक्षण घ्यायचं त्या वयात धर्मराज नावाच्या या आरोपीने हातात पिस्तुल घेऊन गोळीबार केला आहे. पोलीस या दोन्ही आरोपींची कसून चौकशी करत आहेत.


MPSC Recruitment 2024 : महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट ‘अ’ संवर्गांतील ‘सहयोगी प्राध्यापक’ पदासाठी होणार भरती, जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

महाराष्ट्र कला शिक्षण सेवा गट अ संवर्गातील सहयोगी प्राध्यापक पदासाठी भरती होणार आहे


China 1949 to 2024 : साम्यवादी चीनची पंच्याहत्तरी

China Marks 75 Yrs Of Communist Party Rule: चीनने अधिकृतरीत्या साम्यवाद स्वीकारला त्यास ७५ वर्षे झाली. माओ यांच्यापासून ते जिनपिंग यांच्यापर्यंतचा हा प्रवास आहे. आजचा चीन भांडवलवादाकडे झुकलेला आहे. त्या देशाला आर्थिक महासत्ता व्हायचे आहे... अमेरिकेची जागा घ्यायची आहे. ते साध्य करण्यासाठी अनेक गोष्टी चीनला कराव्या लागतील.


ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 13 October 2024

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 13 October 2024 बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपी गुरनैल सिंगला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसरा आरोपी धर्मराजकडून अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद. वय तपासण्यासाठी आरोपी धर्मराजची ऑसिफिकेशन टेस्ट करणार बाबा सिद्दीकींना मारणारा तिसरा आऱोपी हल्ल्यानंतर शेवटी पनवेल स्टेशनवरील सीसीटीव्हीत ... आरोपी पनवेलवरून एक्स्प्रेसनं राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांचा संशय बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाचं पुणे कनेक्शन... बिश्नोई गँगच्या कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा असल्याची माहिती... क्राईम ब्रांचची टीम पुण्याला रवाना.... बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी, सोशल मीडियावर कथित पोस्ट करत बिश्नोई गँगने स्वीकारली.. सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा दावा... ना युती, ना आघाडी… निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाणार, राज ठाकरेंचं ठरलं... तर विजय मनसेचाच होणार, राज ठाकरेंनी फोडला प्रचाराचा नारळ


Maharashtra Weather News : महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रीय, पुढचे 2 दिवस मुसळधार पाऊस

Maharashtra Weather Update: सध्या मान्सून माघार घेत असून राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. पुढील चार दिवसही मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.


Haryana And J&K Election Result 2024: निवडणूक निकालांतील मिथके आणि वास्तव

Haryana And J&K Election Result 2024: हरियाणात भाजपला बहुमत मिळाल्याने मे-जून २०२४च्या लोकसभा निवडणुकीनंतरची भारतीय राजकारणाची दिशा पूर्णपणे बदलली, अशा निष्कर्षाप्रत अनेक राजकीय पंडित पोहोचले आहेत. प्रत्यक्षात, भारतीय राजकारणात मागील काही काळापासून घडत असलेल्या प्रक्रियाच हरियाणा आणि जम्मू व काश्मीरमध्ये कायम राहिल्या आहेत.


Indian Railway History: रुळांवरचा प्रवास

Indian Railway History: इतर कुठल्याही वाहतुकीच्या पर्यायापेक्षा रेल्वे हा कमी ऊर्जा वापरणारा वाहतूक पर्याय आहे, कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण देखील अतिशय कमी आहे. रेल्वेचं विद्युतीकरण, अनेक स्थानकांवर सौर ऊर्जेचा वापर आणि हायड्रोजन पॉवरवर चालणाऱ्या ट्रेन्समुळे पर्यावरणपूरक वाहतुकीचा चालना मिळाली आहे.


Maitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध : 13 Oct 2024 : ABP Majha

Maitreya Dadashree : दादाश्री मैत्रीबोध : 13 Oct 2024 : ABP Majha हेही वाचा : अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर बुधवारी रात्री वांद्रे परिसरातील खेरवाडी जंक्शनजवळ गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. बाबा सिद्दिकी हे त्यांचा मुलगा झिशान सिद्दिकी यांच्या कार्यालयातून निघत असताना त्यांच्यावर हल्ला झाला. प्राथमिक माहितीनुसार, बाबा सिद्दिकी यांच्यावर ज्या खेरवाडी जंक्शनच्या परिसरात हल्ला झाला तेथील पथदिवे बंद होते. तसेच या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे नव्हेत. बाबा सिद्दिकी यांच्यावर तिघांनी हल्ला केला. त्यांच्यावर दोन बंदुकीतून एकूण सहा राऊंड फायर करण्यात आले. त्यापैकी तीन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या छातीत लागल्या. तर एक गोळी बाबा सिद्दिकी यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीच्या पायात लागली. दोन गोळ्या बाबा सिद्दिकी यांच्या कारवर लागल्या. बाबा सिद्दिकी यांची कार बुलेटप्रुफ असूनही गोळी काचेत घुसली होती. त्यामुळे हल्लेखोरांकडे अत्याधुनिक बनावटीचे पिस्तूल असावे, असा अंदाज आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडण्यात आल्या. त्यानंतर तिन्ही हल्लेखोर पळून जात असताना जमावाने त्यापैकी दोघांना पकडून पोलिसांच्या हवाली केले. सध्या पोलिसांचे फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांना घटनास्थळी एक पिस्तुल आणि गोळीच्या पुंगळ्या मिळाल्या आहेत. घटनास्थळी मिळालेली पिस्तूल 9.9 एमएम डिटेचेबल मॅगझिन 13 राऊंडची होती. ही पिस्तुल अत्याधुनिक बनावटीची असल्याचे सांगितले जाते.


Enron Power Project: वायूमधून विद्युतनिर्मिती

Enron Power Project: एन्रॉन प्रकल्प सुरू होण्यापूर्वी महाराष्ट्राला विजेची गरजच नाही, राज्यात मुबलक प्रमाणात वीज आहे, असे भाष्य या प्रकल्पाचे विरोधक करत होते. या आरोपांना उत्तर देण्यासाठी तीन दिवसरात्र सलग बसून आम्ही संगणकावर विद्युत पुरवठ्याची गरज कशी आहे, ह्याचे प्रोजेक्शन तयार केले. ही आकडेवारी आतापर्यंत खरी ठरलेली आहे. आमचा हा अभ्यास पाहून विरोधकांचा आवाज बंद झाला.


Baba Siddique Shot Dead Superfast : बाबा सिद्दीकी सुपरफास्ट : 13 ऑक्टोबर 2024 : abp majha

Baba Siddique Shot Dead Superfast : बाबा सिद्दीकी सुपरफास्ट : 13 ऑक्टोबर 2024 : abp majha अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते बाब सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं असून या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे.. ताब्यात घेतलेल्या दोन आरोपींपैकी करनैल सिंह हरियाणाचा तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. हे तिन्ही हल्लेखोर रिक्षानं घटनास्थळी आल्याची माहिती असून या प्रकरणात चौथा व्यक्ती या तिघांना मार्गदर्शन करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान बाबा सिद्दीकींच्या हत्येचा तपास बिश्नोई गँगप्रमाणेच एसआरए वादाच्याही अँगलने होणार असल्याची माहिती आहे.. एबीपी माझाच्या सूत्रांनी यासंदर्भात माहिती दिलीय. बाबा सिद्दीकी गोळीबार प्रकरणात तिसऱ्या आरोपीची ओळख पोलिसांना पटल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोपीनी बाबा सिद्धीकी यांचा हत्येपुर्वी बाबा सिद्धीकीवर पाळत ठेऊन हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. रात्री उशिरपर्यंत आरोपींची वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. आरोपींची आजच वैद्यकीय चाचणी करून न्यायालयात हजर केले जाणार आहे. गुन्हे शाखेची पथकं फरार आरोपींचा शोध घेत आहेत.


Indiana State Library: पुस्तकांच्या देशा...

Indiana State Library: मी गिरगाव सोडून इंडियाना राज्यातील एका लायब्ररीत पाऊल टाकलं, अख्ख्या गिरगावाला पुरून उरतील इतकी पुस्तकं पाहिली, ‘एका वेळी २० पुस्तकं न्यायची परवानगी आहे’ हे वाक्य ऐकलं आणि वेडी झाले. जे वेड मजला लागले ते तुम्हालाही लागेलच.


रवी बिश्नोईने रचला इतिहास

​रवी बिश्नोईने रचला इतिहास​


परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर

कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा उद्योगांना वेगवेगळ्या सुविधा दिल्या जात असल्याने महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओढा वाढला आहे. उद्योगांच्या विस्तारामधूनच 96 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्रातील एकही प्रकल्प गुजरातला गेला नाही, त्यामुळे कोणी कितीही टीका केली, तरी टीकाकारांना उद्योग आणून उत्तर दिल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ‘...


Aaditya Thackeray Dasara Melava Speech : आजोबांची आठवण, शिंदेंची मिमिक्री; आदित्य ठाकरेंचं भाषण

मुंबई: गेल्या दोन वर्षांमध्ये मुंबईत एकतरी नवा रस्ता झाला नाही. मध्यंतरी कोणीतरी म्हणत होतं, गेल्या दोन वर्षांत आणि म्हणोन... आणि म्हणोन... शर्ट खाली खेचत कोणीतरी भाषण करत होतं, अशा शब्दांत आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मिमिक्री करत त्यांची खिल्ली उडवली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडले. ते शनिवारी मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava 2024) व्यासपीठावरुन बोलत होते. एकनाथ शिंदे यांनी, '...आणि म्हणोन, आणि म्हणोन...' बोलत राज्यात धार्मिक आणि जातीय दंगली करत लोकांना व्यग्र ठेवले. हे सरकार रोज खोके खात आहे, भ्रष्टाचार करत आहे. मुंबईत 6000 कोटी रुपयांचा रस्ते घोटाळा झाला. मी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांना सांगतो की, या प्रकल्पाच्या फाईलवर सही करु नका. अन्यथा एका महिन्यात आमचं सरकार येत आहे. तुम्हाला आत राहायचं आहे की बाहेर राहायचं आहे, हे तुम्हीच ठरवा, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. शिंदे सरकारने आनंदाचा शिधा, शालेय विद्यार्थ्यांचे गणवेश या सगळ्यात भ्रष्टाचार केला. शिंदे सरकार जेव्हा दावोसला गेले तेव्हा चार दिवसांत 45 कोटी रुपये उडवून आले. आम्ही दाव्होस आर्थिक परिषदेला गेलो होतो तेव्हा महाराष्ट्रात 80 हजार कोटींची गुंतवणूक आणली होती, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.


कॉर्पोरेट राजकारणाचे ताणेबाणे

सर्वसाधारणपणे आपल्या सार्वजनिक जीवनात सर्वात बदनाम झालेला शब्द कुठला असेल तर तो म्हणजे ‘राजकारण’.


मरणानेही सुटका नाही!

पुण्यासारख्या तथाकथित प्रगत शहरात साधी मृत्यू दाखला त्वरित मिळण्याची व्यवस्था निर्माण करता येऊ नये, ही बाब कुणाच्याही लक्षातच कशी येत नाही? पालिकेकडे केलेल्या तक्रारींचे निवारण किती प्रमाणात होते, हा संशोधनाचा विषय.


Lawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा

Lawrence Bishnoi Post : कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी आणि सलमान खान यांची घट्ट मैत्री होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा संबंध लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. शनिवारी रात्री तीन जणांनी बाबा यांच्यावर गोळीबार केला. ज्यामध्ये ते जखमी झाले. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. पण, रुग्णालयात त्यांना मृत घोषित करण्यात आलं. आतापर्यंत पोलिस तपासात काय समोर आलं? बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन जणांनी वांद्रे येथे गोळीबार केला. हे आरोपी 2 सप्टेंबरपासून मुंबईतील कुर्ल्यामध्ये भाड्याने खोली घेऊन रहात होते. त्यांनी राहत्या खोलीसाठी महिन्याला 14 हजार रुपये घरभाडं देत होते.चार जणांनी मिळून बाबा सिद्धीकी याच्या हत्येची सुपारी घेतली होती. यामध्ये चार आरोपी प्रत्येकी 50 हजार रुपये वाटून घेणार होते. या हत्येचा संबंध बिश्नोई गँगसोबत असल्याचं समोर आलं आहे. पंजाबमध्ये हे तिघं जणं एका जेलमध्ये असताना एकमेकांच्या संपर्कात आले. जेलमध्ये आधीपासून बिष्णोई गँगचा एक सदस्य होता. तिन्ही आरोपी बिश्नोई गँगमधील सदस्याच्या संपर्कात आले. यानंतर त्यांनी बाबा सिद्दीकी यांना मारण्याची सुपारी घेतली.


आता घरबसल्या मिळवा ई-शिधापत्रिका !

सेनगाव : केंद्र व राज्य शासनाच्या असलेल्या लोककल्याणकारी योजनेसाठी आवश्यक कागदपत्र म्हणून शिधापत्रिकेकडे बघितल्या जाते. त्या अनुषंगाने राज्य सरकारकडून अतिशय कमी वेळात व विना शुल्क आता घरबसल्या ही शिधापत्रिका उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. राज्य सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या लोककल्याणकारी व अनुदान तत्त्वावरील योजन "साठ...


Trichy Airport Video: 36000 फुट उंचीवर अडीच तास सुरू होता मृत्यूचा थरार, महाराष्ट्राच्या लेकीने वाचवला 140 प्रवाशांचा जीव, कोण होती 'ती'?

टेकऑफनंतर 36000 फुट उंचीवर अडीच तास मृत्यूचा थरार सुरु होता. विमानात असलेले 140 प्रवाशी जीव मुठीत घेऊन बसले होते. तेव्हा पुण्याच्या या लेकीने त्यांचे जीव वाचवले.


आरोग्यविषयक सुविधा विस्तारणार

कोल्हापूर : आरोग्य, शिक्षण आणि पाणी याकडे जर लक्ष दिले, त्यात आवश्यक आणि अत्याधुनिक सुविधा दिल्या, तर महाराष्ट्रात जीडीपी वाढल्याखेरीज राहणार नाही, असा विश्वास वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला. निधीची मर्यादा असतानाही शासकीय रुग्णालये अत्याधुनिक करण्याचे आव्हान पेलण्याचा प्रयत्न करत असल्याचे आणि राज्याची गरज लक्षात घेता आरोग्यविष...