Trending:


Abu Azmi Full PC : मशीद तोडली...आमचं रक्त खवळतंय; विशाळगड प्रकरणावर आझमी आक्रमक

धानसभा स्वबळावर लढण्याचा हा संकेत आहे आमचा आम्ही प्रयत्न करू आघाडीत राहण्याचा On विशाळगड कुठे अधिकृत बांधकाम होत आहेत तर ते सरकारची लक्ष ठेवण्याची जबाबदारी जेव्हा बनलं तेव्हा सरकार प्रशासन कुठे होतं कट्टर पंथी जाऊन तिकडे तोडण्याचा प्रयत्न करतात प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाऊन तिकडे तोडक कारवाई करावी मशिदी तोडल्या जात आहेत तर महाराष्ट्राची लाज देशात जात आहे आमचं रक्त खवळत आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेला आमचा सपोर्ट आहे मात्र आमचे तीर्थक्षेत्र तोडले जात आहेत त्यांना तुरुंगात टाका सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून ही तीर्थक्षेत्र योजना लागू करावी फक्त एका धर्मासाठी नको मुसलमान या देशात राहत नाही का ते टॅक्स भरत नाहीत का? एका समाजाला उपेक्षित केलं जात आहे सर्वांसोबत सर्वांचा विकास व्हायला हवा आमची मागणी आहे


जयंत पाटलांच्या पराभवामुळे उरणचा पेच

जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शेकाप आणि मविआ यांच्यातील बिघडलेल्या समीकरणांचा महायुतीला फायदा होऊ शकतो


TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP Majha केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक. भाजप कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा साठ जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची घेणार बैठक. शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार.


Shiv Sena Meeting on Assembly Election : विधानसभेसाठी शिवसेनेने कंबर कसली, 'वर्षा'वर बैठक

विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय.. शिंदेंच्या शिवसेनेनंही आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेतली.. विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं केलीय.. त्यासाठी १०० विधानसभा निरीक्षक आणि प्रभारीही नेमण्यात आले आहेत.. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत सीएम यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनाच्या बैठकीला सुरुवात, विधानसभेसाठी किती जागा मागायच्या यावर देखील चर्चा होणार शिवसेनेच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यानी घेतलेले निर्णय विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले, त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले गेले, हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करणार, एकच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आणि निवडणुकीची तयारी करणार, मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश सरकारी योजना सर्व मतदारसंघात प्रसारित करा. सदस्यनोंदणीवर भर द्या. शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा.


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


Supreme Court Order: अधिकारांची लक्ष्मणरेषा

Supreme Court Order: ​​बिहार सरकारने सन २०१५ मध्ये तांती/तंतवा समाजाला अतिमागास (ईबीसी) यादीतून बाहेर काढून पान/सावासी यांच्या जोडीने अनुसूचित जातींच्या यादीत अधिसूचना काढून समाविष्ट केले होते.


Dibrugarh Express Train Derail:उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात,10-12 डब्बे रुळावरुन घसरले

Dibrugarh Express Train Derail: उत्तर प्रदेशमध्ये दिब्रूगड एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे. गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत. चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ (Gonda-Mankapur ) डब्बे रुळावरुन घसरल्याचं समोर आले आहे. डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


Neral Gram Panchayat: नेरळ ग्रामपंचायतीत भूकंप! सरपंचांवर आरोप करत सदस्यांनी दिले राजीनामे, जिल्ह्यात खळबळ

Neral gram panchayat sarpanch accused of corruption: नेरळ ग्रापपंचायतीतील उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या सर्वांनी सरपंच उषा पारधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.


Budget 2024 Expectations : पीएम किसान योजनेतून मिळणाऱ्या रकमेत वाढ होणार? बजेटमध्ये घोषणेची शक्यता

Union Budget 2024 Expectations : मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळाचा पूर्ण अर्थसंकल्प येत्या काही दिवसांत सादर केला जाणार आहे. पीएम किसान सन्मान निधीच्या रकमेत काही वाढ होते का, याकडं शेतकऱ्यांचं लक्ष असणार आहे.


करीअर मंत्र

आपल्या मुलीचे आयसीएससीचे मार्क पाहता हा अभ्यासक्रम ती उत्तम पद्धतीत पार पाडेल याची खात्री बाळगावी. मात्र कॉलेज नसल्यामुळे दैनंदिन अभ्यासात ठरावीक वाचनाची शिस्त व लेखनाचा सराव गरजेचा राहतो.


Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 18 July 2024 : ABP Majha

दिड हजारात काय होतंय?, लाडक्या बहिणींनाही १० हजार रूपये द्या, खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला सरकारने १५०० रुपयांत महिलांची बोळवण केली, मतदानासाठी 1500 रुपये देत आहात का? यशोमती ठाकूूर यांचा सवाल उपस्थित करत टीका. वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं, सरकारनं भाड्याने वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत. वाघनखांवरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया, वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा, वाघनखांबाबात जाणकरांचं मत लक्षात घेणं गरजेचं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान. विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाही, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक, वडेट्टिवारांनी केलेल्या टिकेवरुन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात धडक, आतापर्यंत प्रशासनाने काय केलं माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अधिकाऱ्य़ांना सवाल. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा, २० जुलैपासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा. डेंग्यूच्या प्रश्नावर काँगेस आणि ठाकरे गट आक्रमक, नाशिकमध्ये मनपा आयुक्तना काँगेस पदाधिकाऱ्यांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट. नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं, एबीपी माझाच्या बातमीनंतर महापालिकेला जाग, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून साथ रोगांवर नियंत्रण आणण्याचे निवेदन.


Manorama Khedkar Arrested : मनोरमाबाई तोऱ्यात, बंदुक भोवली, पोलीस कोठडी सुनावली Special Report

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे कारनामे जसे उघड होत गेले, तसेच त्यांच्या मातोश्री मनोर खेडकर यांच्या दादागिरीचेही किस्से अगदी व्हिडीओसकट समोर आले... हातात पिस्तुल घेऊन कधी शेतकऱ्यांना केलेली दमदाटी असो, की पोलिसांना गेटवर ताटकळत ठेवून केलेली अरेरावी असो... अशाच मनगटशाहीमुळे त्यांना आता जेलची वारी घडलीय... पाहूयात... याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट... Manorama Khedkar Arrest: ट्रेनी आयएएस पूजा खेडकरची (IAS Pooja Khedkar) आई मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) आज सकाळी पुणे ग्रामीण पोलिसांनी महाडमधून ताब्यात घेतलं. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस तिला पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी कोर्टात मनोरमा खेडकरला 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली आहे. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवस पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे मनोरमा खेडकरचे (Manorama Khedkar) काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. पुणे पोलिसांशी देखील तिने हुज्जत घातली होती. गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलिस करत होते. आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) महाड मधील हॉटेल मधून अटक केली आहे. स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करुन पोलिस त्यांना पुण्याला घेऊन आले. त्यानंतर सर्व प्रक्रिया पुर्ण करून तिची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर कोर्टात पोलिसांनी मनोरमा खेडकरला (Manorama Khedkar) 7 दिवसांची पोलिस कोठडी द्यावी अशी मागणी केलेली होती. मात्र, कोर्टाने मनोरमा खेडकरला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.


Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे

Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर पुण्याहून वाशिममध्ये रुजू, तर पूजाच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कठोर कारवाई करणार समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा भरण्यास सुरुवात, एबीपी माझानं सकाळपासून बातमी दाखवल्यानंतर यंत्रणेला जाग. शाहपूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदड, कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी टळली, पुढील सुनावणी १८ जुलैला होणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अजून दमदार पाऊस नाही, आज घडीला सात धरणांचा मिळून २२ टक्केच पाणीसाठा राहुल गांधी,उद्धव ठाकरेंवर अवमाननेचा खटला चालवा, मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी, मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणीसंबंधी दिशाभूल केल्याचा आरोप... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार, दोन्ही पालख्यांसोबत चालणार की एकच हे अजून अस्पष्ट, १७ तारखेला आहे आषाढी एकादशी..


Jayant Patil on Cabinet Expansion: 'मंत्रीपदाचे स्वप्न किमान दोन महिने...', मंत्रीमंडळ विस्तारावर जयंत पाटलांचं मोठं वक्तव्य

Jayant Patil on Cabinet Expansion: राज्याच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांपासून मंत्रिमंडळ विस्तारावरून (Cabinet Expansion) अनेक चर्चा सुरू आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर सर्वच राजकीय पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन देखील पार पडलं मात्र, अद्याप मंत्रीमंडळ विस्तारावर कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीयेत. अधिवेशनानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडेल, अशी चर्चा रंगली होती. मंत्रिमंडळ विस्तार केला...


NHM Wardha Recruitment 2024: योग शिक्षकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता निकष, 'असा' करा अर्ज

NHM Wardha Vacancy 2024: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग शिक्षक किंवा योग शिक्षिका या पदाच्या चार जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ जुलै २०२४ सुरू झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.


Nashik Majha Impact : नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं

नाशिक : नाशिकमधील (Nashik News) डेंग्यूच्या (Dengue ) प्रादुर्भावावरुन काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महापालिका इमारतीच्या गच्चीवर डासाची उत्पत्ती स्थळे असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर आज काँगेस पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्ताना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट दिली. तर काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. ताबडतोब डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. नाशिक शहरात जागोजागी डेंग्यूचे डास, अळ्या दिसत असून घराघरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा उद्रेक रोखण्यात अपयशी ठरलेल्या नाशिक महापालिकाने नागरिकां जबाबदार धरत दंडाची रक्कम दुपटीने वाढवली आहे. नागरिकांना दंड आकारणी करणाऱ्या मनपा प्रशासनाची परिस्थिती लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे.महापालिका मुख्यालयाच्या इमारतीबरच पाण्याचे डबके आणि त्यात डासांच्या अळी एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाल्या आहेत. यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मनपाचा धावा करत आयुक्तांना धारेवर धरले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डेंग्यू डासांची प्रतिकृतीच मनपा आयुक्तना भेट दिली. तर ठाकरे गटाचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा प्रशासनाला अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिलाय.


Marathwada Drought : मराठवाड्यातली धरणं कोरडी ! पावसाळ्यातही टँकरवर तहान

जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील धरणं तळालाच जायकवाडीसह,येलदरी आणि लोअर दुधनाच्या पाणी साठ्यात वाढ नाही पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत जायकवाडी सह लोअर दुधना,येलदरी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक पाणी साठा झालेला नाही त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते.आता यंदाच्या पावसाळयाचे 73 दिवस शिल्लक आहेत याच दिवसांत पाऊस चांगला पडून हे प्रकल्प भरणार का असा प्रश्न निर्माण झालाय जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही केवळ 5.60% एवढाच पाणी साठा असलेल्या परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मराठवाड्यातील पाणी साठ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षिरसागर यांनी...


Nomophobia: नोमोफोबिया म्हणजे नेमकं काय? व्यक्तीला 'या' गोष्टीची वाटू लागते भीती

Nomophobia: मोबाईल फोनचा जास्त वापर करणे हा देखील एक आजार मानला जातो. आज आम्ही तुम्हाला नोबोफोबियाबद्दल सांगणार आहोत.


Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली.


Uddhav Thackeray : विधानसभेला रसद मिळणार, उद्धव ठाकरे गटात आनंदी आनंद, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अगदी तीन महिन्यांवर आली आहे. विधानसभेच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळालेला असून पक्षनिधी स्वीकारण्यास त्यांना निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे.


Maharashtra News Live : लाडक्या बहीण योजनेत १५०० ऐवजी १० हजार द्या, संजय राऊतांची मागणी

Mumbai Raigad Ratnagiri Rain Live Updates : मुंबईसह महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या...


Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून 2 दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्गावर आज आणि उद्या असा दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


बॉर्डरवर पहारा देत होते BSF चे जवान, अचानक झाल्या मोठ्या हालचाली; तेवढ्यात...

मुंबई : सीमा सुरक्षा दलाने भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर एक यशस्वी मोहीम राबवली. गुप्तचर खात्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली. त्यात एका संशयिताला अटक करून सहा कोटी रुपयांचं सोनं बीएसएफनं जप्त केलं आहे. भारत-बांगलादेश सीमेवर एक मोठी घडामोड घडणार असल्याची माहिती दक्षिण बंगालच्या सीमेअंतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या 32 व्या बटालियनला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली. ही माहिती मिळताच हलदरपारा सीमा चौकीवर असलेले जवान...