NAGPUR NEWS : 'नीरी'त घोटाळ्याचे प्रदुषण? सीबीआयच्या पथकाकडून झाडाझडती; नेमकं प्रकरण काय?

Nagpur News नागपूर NEERI : उपराजधानी नागपुरातील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (National Environmental Engineering Research Institute) म्हणजेच निरीमध्ये (NEERI) सीबीआयच्या (CBI) पथकाने कारवाई केली आहे. आज, बुधवारी सकाळी 11 वाजताच्या सुमारास सीबीआयचे एक विशेष पथक निरीमध्ये दाखल झाले आणि यावेळी येथील कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे.

बनावट कंपनीच्या माध्यमातून सरकारच्या निधीचा अपहार झाल्याच्या अनुषंगाने काही तक्रार सीबीआयकडे पोहोचली होती. तसेच खाजगी कंपन्यांना अनुकूल अहवाल दिले जात असल्याची तक्रार ही सीबीआयकडे पोहोचली होती. त्याच प्रकरणी माहिती घेण्यासाठी सीबीआयचे पथक पोहोचल्याची माहिती आहे. यावेळी सीबीआयच्या पथकाकडून संबंधित विभागाची झाडाझडती घेत पाहणी करण्यात आलीय. 

'नीरी'त घोटाळ्याचे "प्रदुषण"?

नीरी केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक अनुसंधान परिषद म्हणजेच CSIR अंतर्गत काम करणारी नामांकित संशोधन संस्था आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणाऱ्या या नामांकित संशोधन संस्थेत सीबीआयचे पथक चौकशीसाठी आल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नीरीत ठराविक आणि ओळखीच्या व्यक्तींकडूनच महागड्या संशोधन उपकरणांच्या खरेदीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर ही छापेमारी करण्यात आल्याची प्रथमिक माहिती आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) मिळालेल्या तक्रारीवरुन  संशयास्पद शास्त्रज्ञ कार्यालयाची झडतीसह कागदपत्रांची तपासणी सुरू आहे. मात्र अचानक करण्यात आलेल्या या  कारवाईने नीरी केंद्रात एकच खळबळ उडाली आहे. परिणामी, आता या प्रकरणी पुढे नेमकी काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

धक्कादायक! एकाच घरात आढळले अनेक वन्य प्राण्याचे अवयव

दुसरीकडे नागपूर जिल्ह्यातील काटोल वनपरिक्षेत्र परिसरात वन अधिकार्‍यांच्या पथकाच्या कारवाई मोठे यश प्राप्त झाले आहे. यात एकाच घरातून अनेक वन्य प्राण्याचे अवयव वन अधिकार्‍यांच्या पथकाने जप्त केले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यात बिबट्याची कवटी, 15 नख, बिबट्याचा मिश्या, चिंकाऱ्याचे पाच शिंग इत्यादि अवयव जप्त करण्यात आले आहे. तर या प्रकरणी  एका आरोपीलाही अटक करण्यात आली आहे.

श्रीकांत किसन दुपारे असे या संशयित आरोपीचे नाव असून त्याच्या घरातून अवयवासह शिकारीसाठी वापरण्यात येणारे साहित्य देखील जप्त करण्यात  आले आहे. या कारवाई नंतर संशयित आरोपीला पुढील पाच दिवस वन कोठडीत पाठवले असून वन विभाग या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या  

Nagpur Accident : हातात मोबाइल, कानात हेडफोन; क्षणात होत्याचं नव्हतं झालं; रेल्वे रुळ ओलांडने 15 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतलं

2024-07-10T11:53:15Z dg43tfdfdgfd