बातम्या

Trending:


Central Railway Timetable : ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

Mumbai Local New Timetable : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील गाड्यांचे नवीन वेळापत्रक ऑगस्टपासून लागू होणार असून, मात्र नवीन वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.


Samruddhi Expressway : विधानसभेआधी समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला होणार , सप्टेंबर अखेरीस काम पूर्ण होणार

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) शेवटचा टप्पा विधानसभा निवडणुकीआधी सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात समृद्धीचं काम पूर्ण होणार आहे. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा 98 टक्के पूर्ण झाल्याची माहिती MSRDCचे एमडी अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. सध्या नागपूरहून मुंबईला येताना इगतपुरीला एक्स्प्रेसवे संपतो, आणि तिथून मुंबई-नाशिक महामार्ग...


Dibrugarh Express Train Derail:उत्तर प्रदेशमध्ये एक्स्प्रेसचा भीषण अपघात,10-12 डब्बे रुळावरुन घसरले

Dibrugarh Express Train Derail: उत्तर प्रदेशमध्ये दिब्रूगड एक्स्प्रेस रेल्वेचा भीषण अपघात झाल्याचं समोर येत आहे. गोंडा येथे चंदीगड येथून निघालेल्या दिब्रूगड एक्स्प्रेसच्या 10 ते 12 बोगी पटरीवरुन घसरल्या आहेत. चंदीगढवरुन निघालेल्या एक्स्प्रेस ट्रेनचे गोंडा मनकापूर स्टेशनजवळ (Gonda-Mankapur ) डब्बे रुळावरुन घसरल्याचं समोर आले आहे. डबे रुळावरून घसरल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण झालं. या घटनेची माहिती मिळताच अपघातग्रस्त मदत वाहन घटनास्थळी रवाना झालेय. रेल्वेचे सर्व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या अपघातात अद्याप मृतांची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. पण गेल्या महिन्यात पश्चिम बंगालमध्ये चनजंगा एक्स्प्रेस आणि मालगाडीचा अपघात झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा रेल्वेच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गोंडा जिल्ह्यातील रेल्वे अपघाताची दखल घेतली आहे. योगी आदित्यनाथ यांनी अधिकाऱ्यांना तात्काळ घटनास्थळी पोहोचून मदतकार्य वेगानं करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याशिवाय अपघातातील जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


२६ वर्षीय इन्फ्लूएन्सरचा धबधब्याजवळ मृत्यु |धबधब्या ठिकाणी कशी घ्याल काळजी ?

ट्रॅव्हल इन्फ्लूएन्सर अन्वी कामदार रायगडमधील कुंभे धबधब्याजवळ ३५० फूट उंचावरुन खोल दरीत पडल्यामुळे तिचा मृत्यू झाला. या मृत्यूने सर्वांनाच दु:ख झालं. तर अशा दुर्घटना घडू नये आणि धबधब्याच्या ठिकाणी फिरायला जाताना पर्यटकांनी कोणती काळजी घेतली पाहिजे हे जाणून घ्या.Image & video Courtesy - Pexels & Pixabay Image & video Courtesy - instagram


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


Uddhav Thackeray Group Vidhansabha ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत

Uddhav Thackeray Group Vidhansabha ठाकरे गट मुंबईतील 36 पैकी किमान 25 जागा लढण्याच्या तयारीत ठाकरे गटाकडून मुंबईतल्या ३६ पैकी २५ जागा लढवण्याची तयारी, वरुण सरदेसाई, तेजस्वी घोसाळकर अशा युवा नेत्यांना उतरवणार... मुंबईत ठाकरे गटाकडून २५ जागांची तयारी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट मुंबईती 36 पैकी किमान 25 जागा लढवण्याची तयारी लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईतील बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यास ठाकरे गट आग्रही राहणार महाराष्ट्रात ठाकरेंची ताकद असलेल्या मुंबईत 36 पैकी अधिकाधिक जागा शिवसेना ठाकरे गटाकडे रहाव्यात यासाठी ठाकरेंची शिवसेना विशेष प्रयत्न करेल वांद्रे पूर्व मधून वरून सरदेसाई तर दहिसर मधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता, शिवाय अनेक नव्या चेहऱ्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून संधी मिळणार महाविकास आघाडीमध्ये निवडणूक लढवताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस सोबत काही जागांमध्ये अदलाबदल केली जाणार, महाविकास आघाडीच्या बैठकांमध्ये या संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय घेतला जाणार 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 14 जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या त्यातील आठ आमदार ठाकरेंच्या शिवसेनेसोबत आहेत ...तर सहा आमदार शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहेत त्यामुळे मुंबईतील जिंकलेल्या जागा आणि ज्या ठिकाणी एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक आहेत आणि जिथे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत विधानसभा क्षेत्रात ठाकरेंचा उमेदवार असताना अधिक लीड प्राप्त आहे अशा जागांचा ठाकरेंकडून निवडणूक लढवताना आग्रह केला जाऊ शकतो तर मुंबईतील काही जागा जिथे ठाकरेंची ताकद आहे तिथे शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणुकांचा विचार करून जागा लढवण्याचा नियोजन करत असल्याची माहिती 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे केवळ चार आमदार निवडून आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका जागेवर विजय मिळवू शकला, 2024 च्या लोकसभा निवडणूक सुद्धा ठाकरेंनी आपल्या चार पैकी तीन जागा निवडून आणल्या त्यामुळे एक प्रकारे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईकडे आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक यश मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे विशेष लक्ष असेल महाविकास आघाडीत मुंबईतील शिवसेना ठाकरे गट या जागा लढवण्याची शक्यता


Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं?

Eknath Shinde Shiv Sena Meeting : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या बैठकीत काय झालं? महायुतीत जागांचा पेच कसा सुटणार? या तिघांच्या अपेक्षांची बेरीज केली तर महाराष्ट्रातील विधानसभेचे मतदारसंघ आणखी शंभराने वाढवावे लागतील. याचाच अर्थ 288 जागांचे वाटप सोपं असणार नाही हाच आहे. 2019 च्या संख्याबळानुसार जागांचं वाटप करावं असं सूत्र मान्य झालं तरी, 2014 ला निवडून आलेल्या एकसंघ पक्षाच्या जागा गृहीत धरायच्या की आता शिंदे आणि अजित दादांबरोबर असणाऱ्या आमदार यांची संख्या गृहीत धरायची हा पेच येणारच आहे. शिंदे-दादांचं समाधान होणार का? जर सध्याचे संख्याबळ लक्षात घेतलं तर भाजपाचे स्वतःचे आणि सहयोगी पक्षाचे 114 आमदार आहेत. शिंदेंबरोबर आलेले 50 आणि दादांसोबत असलेले 40, असं 200 जागाच वाटप तर सहजपणे होऊ शकेल. पण उरलेल्या 85 जागा कशा वाटायच्या हा प्रश्न येईलच. त्या जागा संख्याबळानुसार वाटायच्या ठरल्या तर भाजपाला 40-42 आणि शिंदे आणि अजित पवारांना मिळून 40 अशा जागा दिल्या जातील. यामुळे भाजपाची बेरीज 150 पर्यंत जाईल. पण शिंदेंना मात्र 70 आणि अजितदादांना 60 जागा मिळू शकतील तेवढ्या जागांवर समाधान होईल का? हा प्रश्न आहे. सध्या तरी त्यांची तशी मनस्थिती असल्याचं दिसत नाही.


ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News

ABP Majha Headlines 8AM एबीपी माझा हेडलाईन्स 08 AM 18 July 2024 Marathi News मुंबईसह उपनगरात पावसाची संततधार, सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात, रेल्वे आणि रस्ते वाहतूक मंदावली, पुढील काही तास पावसाचा इशारा छत्तीसगड महाराष्ट्रच्या सीमेवर नक्षलवादी आणि सुरक्षा दलात चकमक... १२ माओवाद्यांना कंठस्नान... मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, ५० लाखांचं बक्षीस अजित गव्हाणेंनी हाती तुतारी घेतल्यावर अजित पवार खडबडून जागे, उर्वरित पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक, नवा शहराध्यक्ष निवडण्याची शक्यता अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता ठाकरे गटाची नाराजी, भोसरी मतदारसंघातून गव्हाणेंना उमेदवारी मिळाली तर प्रचार न करण्याचा कार्यकर्त्यांचा इशारा ठाकरे गटाच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा भोसरी विधानसभेतील जनता दरबार रद्द, अजित गव्हाणेंच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील प्रवेशानंतर ठाकरे गट आक्रमक


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


Zero Hour Maharashtra Assembly Election : MVA vs Mahayuti ? जागावाटपावरुन कुणामध्ये जास्त मतभेद?

नमस्कार मी, विशाल पाटील... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण पूर्ण होण्याआधीच.. राज्यात विधानसभांना वेग आलाय.. कारण, अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आलीय.. आणि त्यामुळेच राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपआपल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केलीय... भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस पक्षासह जवळपास प्रत्येक राजकीय पक्षानं चाचपणी सुरु केलीय.. आणि राजकीय बैठकांनी जोर धरलाय.. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे.. आणि उद्या महाराष्ट्र प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक असेल...तिकडे आजच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडलीये.. तर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षांच्या बैठकांचा धडाकाच लावलाय.. ज्याची सुरुवात पिंपरीमधून झालीये... महायुतीच्या बैठकांचं विश्लेषण करणार आहोतच.. त्याचसोबत आपण महाविकास आघाडीमधील बैठकांचं सत्रही सांगतो.. जिथं शरद पवारांनी कालपासूनच अजित पवारांसोबतच्यांना पुन्हा पक्षात घ्यायला सुरुवात केलीये.. तिथं काँग्रेसनं लोकसभेच्या यशाची विधानसभेत पुनरावृत्ती करण्यासाठी दिल्लीत विषेश बैठकांचं आयोजन केलंय.. तर उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यापासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु केल्यात.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी.. दोन्ही आघाड्यांमधील प्रत्येक पक्षाच्या बैठकीत... विधानसभेच्या जागांवरुन दावेदारी सुरु झाल्याचंही समोर येतंय.. प्रत्येक पक्ष आमूक एक आकडा सांगतोय.. त्यावरुनही संघर्ष होवू शकतो का? की आकड्यांच्या चर्चा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापुरत्याच आहेत.. या सगळ्याची चर्चा करणार आहोतच.. मात्र, सुरुवातीला आजचा पहिला प्रश्न... त्यासाठी जावूयात पोल सेंटरला... बैठकाच्या चर्चेची सुरुवात करुयात भाजपच्या बैठकीनं... महाराष्ट्रात लोकसभेला सर्वाधिक फटका भाजपला बसलाय.. तोच फटका विधानसभेत बसू नये म्हणून पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपनं हालचाली वाढवल्यात.. उद्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्वाची बैठक पार पडणार आहे.. त्याआधीच आज राज्यातील नेत्यांची बैठक पार पडली.. सलग दोन दिवस चालवणाऱ्या याच मॅरोथॉन बैठकांमध्ये महाराष्ट्र भाजपचे साठ पेक्षा जास्त पदाधिकारी असणार आहेत.. त्यात मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशांचा समावेश असेल.. आणि याच बैठकांमधून विधानसभेचं विचारमंथन केलं जाईल...भाजपच्या मित्रपक्षांकडून विधानसभांच्या जागांवर दावेदारी सुरु झालीये.. त्यामुळे भाजपच्या याच बैठकांकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.... विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपची बैठक होत असताना, शिवसेनेचीही वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.. या बैठकीला मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते उपस्थित होते.. या बैठकीत शिवसेनेकडून विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी सुरू झालीय.. त्यासाठी १०० निरीक्षक आणि तेवढेच प्रभारीसुद्धा नेमण्यात आलेत.. प्रत्येक निरीक्षक आणि प्रभारी त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या एकाच मतदारसंघासाठी काम करणार आहेत.. त्याचबरोबर आज घडीला भाजप आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर लक्ष द्यायचंही नाही.. याशिवाय बाकी जागांचा विचार करावा...तिथेच लक्ष केंद्रीत करून निवडणुकीची तयारी करणार आहेत.. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत.. इतकंच नाही तर शिंदेकडून मुंबईत सतरा जागा लढवण्याचा विचार आहे.. सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा... सदस्य नोंदणीवर भर द्या... शिवसेना युवासेना महिला आघाडी पदावर नेमणूक करा.. असे आदेश आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले... तसंच पक्षांतर्गत वाद, नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबतही माहिती घेण्यात आली... विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप-शिवसेनेच्या आढावा बैठका, सभा, विशेष मोहीम घेणे सुरू असताना.. महायुतीतला आणखी एक पक्ष राष्ट्रवादीनेही कंबर कसलीय.. लोकसभेत अवघ्या ६ जागा लढलेल्या अजितदादाच्या गटाने, पुन्हा एकदा विधानसभेच्या ८० जागा लढणार असल्याचं जाहीर केलंय.. केवळ एवढंच नव्हे तर कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी, राष्ट्रवादी विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचंही सांगितलंय.. राष्ट्रवादीने ८० जागांची घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही.. याआधीही अनिल पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनीही.. राष्ट्रवादी ८० ते ९० जागा लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं... अजित पवारांनीदेखील पक्षाच्या बैठकीत बोलताना हीच री ओढली होती.. त्यामुळे लोकसभेत महायुतीकडून सर्वात कमी जागा लढणाऱ्या राष्ट्रवादीला, विधानसभेत तरी मागणी केलेल्या जागा वाट्याला येतात का?... लोकसभेच्या निकालांनंतर संघाकडून वारंवार, राष्ट्रवादीशी युतीवरून भाजपला मिळालेल्या कानपिचक्यांनंतर... महायुतीत राष्ट्रवादीचा जागावाटपात योग्य सन्मान राखला जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणारय.. दरम्यान धर्मराव बाबा अत्राम यांनी जागावाटपाबाबत नेमका काय दावा केला ते पाहूया...


NHM Wardha Recruitment 2024: योग शिक्षकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता निकष, 'असा' करा अर्ज

NHM Wardha Vacancy 2024: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग शिक्षक किंवा योग शिक्षिका या पदाच्या चार जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ जुलै २०२४ सुरू झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.


Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे

Sudhir Mungantiwar vs Indrajeet Sawant : छत्रपती शिवरायांच्या वाघनखांवरून दावे-प्रतिदावे हेही वाचा : विधानसभा निवडणुकीत २८८ पैकी २२५ पेक्षा जास्त जागा जिंकणार, शरद पवारांचा निर्धार वादग्रस्त सहाय्यक जिल्हाधिकारी पूजा खेडकर पुण्याहून वाशिममध्ये रुजू, तर पूजाच्या ऑडी कारवर पुणे पोलीस कठोर कारवाई करणार समृद्धी महामार्गाला पडलेल्या भेगा भरण्यास सुरुवात, एबीपी माझानं सकाळपासून बातमी दाखवल्यानंतर यंत्रणेला जाग. शाहपूरमध्ये समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या उड्डाणपुलावर भगदड, कंत्राटदार काय दर्जाचं काम करतात हे पुन्हा उघड, कारवाईची प्रतीक्षा नीट परीक्षेसंदर्भात सुप्रीम कोर्टातली आजची सुनावणी टळली, पुढील सुनावणी १८ जुलैला होणार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात अजून दमदार पाऊस नाही, आज घडीला सात धरणांचा मिळून २२ टक्केच पाणीसाठा राहुल गांधी,उद्धव ठाकरेंवर अवमाननेचा खटला चालवा, मुंबई हायकोर्टात याचिकेद्वारे मागणी, मुंबई उत्तर-पश्चिमच्या मतमोजणीसंबंधी दिशाभूल केल्याचा आरोप... लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी रविवारी आषाढी वारीमध्ये सहभागी होणार, दोन्ही पालख्यांसोबत चालणार की एकच हे अजून अस्पष्ट, १७ तारखेला आहे आषाढी एकादशी..


Marathwada Drought : मराठवाड्यातली धरणं कोरडी ! पावसाळ्यातही टँकरवर तहान

जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील धरणं तळालाच जायकवाडीसह,येलदरी आणि लोअर दुधनाच्या पाणी साठ्यात वाढ नाही पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत जायकवाडी सह लोअर दुधना,येलदरी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक पाणी साठा झालेला नाही त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते.आता यंदाच्या पावसाळयाचे 73 दिवस शिल्लक आहेत याच दिवसांत पाऊस चांगला पडून हे प्रकल्प भरणार का असा प्रश्न निर्माण झालाय जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही केवळ 5.60% एवढाच पाणी साठा असलेल्या परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मराठवाड्यातील पाणी साठ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षिरसागर यांनी...


Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानी गळती

Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीयनिवासस्थानी गळती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च केले होते


TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP Majha केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक. भाजप कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा साठ जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची घेणार बैठक. शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार.


Budget 2024 Expectations : अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा, २३ जुलै रोजी कोणत्या घोषणा होणार?

Union Budget 2024 Expectations : मोदी ३.० सरकारच्या या अर्थसंकल्पाकडून संपूर्ण देशाला मोठ्या अपेक्षा आहेत.


Weather update : महाराष्ट्रात पुढील 2 दिवस मोठं असमानी संकट, IMD चा हायअलर्ट

आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून महाराष्ट्राला मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई आणि कोकणातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील 24 तासांमध्ये मुंबईच्या काही भागांमध्ये मुसळधार तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या काळात मुंबईचं कमाल तापमान 25 अंश ते 29 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. कोकणात देखील हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. हवामान विभागाकडून मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, घाट भागामध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे, मराठवाड्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या काळात मराठवाड्यात वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका राहण्याचा अंदाज आहे. विदर्भाबाबत बोलायचे झाल्यास विदर्भात देखील आज पावसाची शक्यता आहे. विदर्भात पुढील 24 तासांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाकडून आज पालघर, ठाणे, रायगड, सिंधुदूर्ग, पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला आहे. पुणे, कोल्हापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये घाट परिसरात अतिमुसळधार तर इतर भागांत मध्यम पावसाचा अंदाज आहे.


लाडकी बहीणनंतर आता राज्य सरकारी लाडक्या भावांसाठीही योजना

ladaki bahin yojna followed by state government's ladaka bhau scheme


Olympic 2024: पॅरिसचे ६५वर्षीय महापौर ऑलिम्पिक पूर्वी का उतरले नदीत? पाहा VIDEO

Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरूवात होण्यापूर्वी पॅरिसच्या महापौर सेन नदीत उतरल्या, पण यामागचं नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या.


Vikram Misri: अनुभवी मुत्सदी

Vikram Misri: ​​साठ वर्षांचे विक्रम मिस्री १९८९चे आयएफएस बॅचचे अधिकारी. त्यांचा जन्म श्रीनगरचा. ग्वाल्हेरमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले, पुढे दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि जमशेदपूरमधून एमबीए पूर्ण केले.


Andhra rape-murder : आठ वर्षीय मुलीवर बलात्कार करण्याआधी त्यांनी मोबाइलवर पॉर्न पाहिलं; अल्पवयीन आरोपींची धक्कादायक कबुली

Andhra rape-murder : तीनही आरोपींना घेऊन पोलिसांनी गुन्ह्या घडला तो प्रसंग घटनास्थळी जाऊन पुन्हा उलगडण्याचा प्रयत्न केला असताना आरोपींनी पॉर्न व्हिडीओ पाहिल्याची कबुली दिली.


MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, गट-ब अन् गट-क च्या पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्रातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणणार, यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून...


IAS मॅडमची आई मनोरमा खेडकर अडचणीत, पोलिसांनी रायगडमधून घेतलं ताब्यात

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पोलिसांनी अटक केलीय. मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात पिस्तूल घेऊन नागरिकांना धमकावलं होतं. त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून मनोरमा खेडकर यांचा शोध घेतला जात होते. पुण्यात त्यांच्या निवासस्थानी पोहचल्यानंतर पोलिसांनाही त्यांनी दमदाटी केली होती. शेवटी पौंड पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना अटक केली आहे.मनोरमा खेडकर यांना पुणे पोलिसांनी ताब्यात...


Corruption in NEERI : ‘नीरी’वर काळा डाग

Nagpur Corruption News: ‘नीरी’मधून काही बनावट कंपन्यांना कामे दिली जाऊ लागली. याद्वारे कोट्यवधीचा निधी खिशात घातला जाऊ लागला. संस्थेचे माजी संचालक डॉ. राकेश कुमार यांच्या काळात हा सर्व प्रकार घडला.


करीअर मंत्र

आपल्या मुलीचे आयसीएससीचे मार्क पाहता हा अभ्यासक्रम ती उत्तम पद्धतीत पार पाडेल याची खात्री बाळगावी. मात्र कॉलेज नसल्यामुळे दैनंदिन अभ्यासात ठरावीक वाचनाची शिस्त व लेखनाचा सराव गरजेचा राहतो.


Vidhan Parishad Election: आज विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान, 11 जागांसाठी हे 12 उमेदवार रिंगणार

Maharashtra Vidhan Parishad Election 2024 Candidate: राज्यात आज विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडत आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात...


Donald Trump Firing : मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार

दिल्ली, प्रतिनिधी : मोठी बातमी समोर येत आहे, अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर एका रॅलीमध्ये गोळीबार करण्यात आला आहे. अमेरिकेच्या पेंसिल्वेनियामध्ये या निवडणूक रॅलीच आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये डोनाल्ड ट्रम्प हे बोलत असताना अचानक गोळीबाराचा आवाज आला. त्यानंतर तिथे असलेल्या सीक्रेट सर्विस एजंट्सनी ट्रम्प यांना स्टेजवरून सुरक्षितरित्या बाहेर काढले. गोळीबार थांबला तेव्हा ट्रम्प यांच्या गालावर रक्त आल्याचं दिसत होतं. या...


Ajit Pawar : पुण्यातील कार्यक्रम रद्द करत अजितदादा विशाळगडाच्या पायथ्याला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) किल्ले विशाळगडवर 14 जुलै रोजी झालेल्या हिंसाचारानंतर चार दिवसांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द करून विशाळगडच्या पायथ्याशी पोहोचले. अजित पवार यांनी हिंसाचारग्रस्त भागाची पाहणी करत पीडितांशी संवाद साधला. पीडितांनी झालेल्या नुकसानाची माहिती देताना कोणत्या पद्धतीने हल्ला करण्यात आला याचा भयावह अनुभव सांगितला. यावेळी विशाळगडावरील महिला सुद्धा अजित पवार यांच्या भेटीसाठी गजापुरात पोहोचल्या. यावेळी महिलांनी सुद्धा आपल्या वेदनांना अजित पवार यांना कथन केल्या. कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही दरम्यान, यावेळी बोलताना अजित पवार यांनी विशाळगडावरील अतिक्रमणावर भाष्य केले. अजित पवार यांनी पडितांच्या वेदनात जाणून घेत असतानाच त्यांना मध्येच थांबून अतिक्रमण संदर्भातील भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, मी आत्ताच कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतली आहे. विशाळगडावरील ज्या व्यवसायिक आस्थापना आहेत, जे अतिक्रमण झालं आहे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. कोणत्याही घराला हात लावला जाणार नाही असे अजित पवार यांनी यावेळी पीडितांना सांगितले. यावेळी एका पीडिताने सिलेंडर फोडल्याचं सांगितलं. या हल्ल्यामध्ये एक जण जखमी झाला असून तर त्याचा हात-पाय फ्रॅक्चर झाला असून तो मिरजेत उपचार घेत असल्याचे सांगितले.


Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका

Pooja Khedkar Case : मॅडमचा कारनामा; विरोधकांची टीका पूजा खेडकर या 2022 सालच्या परीक्षेतून आयएएस अधिकारी झाल्या आहेत. त्यानी 2019 सालची परीक्षा ही सर्वसामान्य प्रवर्गातून दिली होती. त्यानंतर 2022 सालची परीक्षा ही व्हिज्युअली इम्पेअर्ड म्हणजे दृष्टीदोषाचे सर्टिफिकेट जमा करून अपंगांच्या प्रवर्गातून दिल्याचं समोर आलं. पूजा खेडकरांनी या परीक्षेसाठी ओबीसी सर्टिफिकेटही काढल्याचं समोर आलं आहे. त्यांचे वडील दिलीप खेडकर हे निवृत्त आयएएस अधिकारी असून त्यांनी अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळी खेडकरांनी त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 49 लाख रुपये इतकं दाखवलं होतं. त्यामुळे पूजा खेडकरांना क्रिमी लेअरमधून सर्टिफिकेट कसं मिळालं असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पूजा खेडकरांनी खोट्या अपंगत्वाचा दाखला काढला आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर यूपीएससीने तब्बल सहा वेळा वैद्यकीय चाचणीसाठी बोलावल्यानंतरही गैरहजर राहिल्या. नंतर कुठल्यातरी खासगी रुग्णालयातून एमआरआय अहवाल सादर केला. त्यामुळे खेडकरांच्या नियुक्तीला यूपीएससी आणि कॅट दोघांनीही विरोध केला. तरीही त्यांना नियुक्ती कशी मिळाली याचा तपास आता केंद्र सरकारची समिती करणार आहे. आईचा थयथयाट, पोलिसांवरच अरेरावी वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या नवनव्या कारनाम्यानं सर्वांनाच धक्का बसला. खासगी ऑडीवर लाल दिवा वापरल्यानं त्या अडचणीत आल्या. हे प्रकरण बरंच तापल्यानं अखेर पुणे पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. पूजा खेडकर यांच्या ऑडी कारवर कारवाई करण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस पोहोचले. पण बंगल्याचं गेट उघडायला खेडकर कुटुंबीयांनी नकार दिला. एवढंच नाही तर पूजाची आई मनोरमा यांनी पोलिसांनाच दमदाटी केली आणि चित्रिकरण बंद करा असं म्हणत थयथयाट केला. वारंवार विनंती करूनही बंगल्याचं गेट उघडण्यास नकार दिल्यानंतर पुणे पोलिसांनी खेडकर यांना व्हॉट्स अॅपवर नोटीस पाठवली. या गाडीचा उपयोग नियमबाह्य पद्धतीने करण्यात आल्याने तपास करायचा आहे असं सांगत ही गाडी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याच्या वाहतूक विभागात जमा करा असं त्यात म्हटलं आहे.