Shivsena Uddhav Thackeray Leader Meet CM Fadnavis Breaking: ठाकरेंचा निरोप घेऊन फडणवीसांकडे?
Chief Minister Devendra Fadnavis met MNS President Raj Thackeray on Monday morning. After that, the leaders of the Shiv Sena Thackeray group have reached Sagar Bungalow to meet Chief Minister Fadnavis. Due to this, contradictory discussions have started in the political circles. Senior Shiv Sena leader Subhash Desai, Shiv Sena Secretary MLA Milind Narvekar, and Shiv Sena MLA Ambadas Danve have reached Sagar Bungalow to meet Fadnavis. All three leaders went to Sagar Bungalow to meet Fadnavis around 3:30 in the afternoon.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भेटीकरिता सागर बंगल्यावर पोहोचले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.शिवसेनेचे जेष्ठ नेते सुभाष देसाई, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, तसेच शिवसेना आमदार अंबादास दानवे हे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीकरिता पोहोचले आहेत. दुपारी साडे तीनच्या सुमारास फडणवीस यांना भेटण्याकरिता तिन्ही नेते सागर बंगल्यावर गेले.#devendrafadnavis #uddhavthackeray #shivsena #bjp #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-02-10T11:50:14Z
Marathi News Headlines | 10 PM News | News18 Lokmat | Marathi News | 10 Feb 2025 | Manoj Jarange
Marathi News Headlines | 10 PM News | News18 Lokmat | Marathi News | 10 Feb 2025 | Manoj Jarange#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahayuti #shku #beedsarpanchcaseNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube
2025-02-10T16:50:14Z
Ranveer Allahbadia Statment | रणबीर अलाहबादियाचा आधी विकृत कारनामा, मग माफीनामा Special Report
ज्यांना इन्फ्लुएन्सर म्हणून लोक डोक्यावर घेतात, त्यापैकी काहींच्या डोक्यात किती चिखल भरलेला असू शकतो, याची प्रचिती आज सर्वांना आली. आपल्या पॉडकास्टमुळे लोकप्रिय झालेला यूट्यूबर रणबीर अलाहबादिया एका कार्यक्रमात इतकं अश्लिल बरळला की देशभरात संतापाची लाट उसळली. विनोदाच्या नावाखाली सुरु असलेल्या विकृतीचा मुद्दा यानिमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पाहूया, याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. परस्त्रीला मातेसमान मानण्याचा शिवछत्रपतींचा वारसा सांगणारा महाराष्ट्र… जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत मातृत्वाच्या थोरवीचा इतिहास जपणारा महाराष्ट्र.. हा महाराष्ट्र एका यूट्यूबरच्या वाह्यात आणि बाष्कळ वक्तव्यानं चांगलाच संतापलाय. रणबीर अलाहबादिया नावाचा तथाकथित प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला यूट्यूबर त्याच्या एका वक्तव्यानं टीका, संताप आणि निषेधाच्या गाळात रुतला गेलाय. निमित्त ठरलं इंडियाज गॉट लेटेंट नावाच्या एका कार्यक्रमाचं… या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला रणबीरनं एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा तपशील इतका आक्षेपार्ह की त्याचा उल्लेख करणंही लज्जास्पद वाटावं.. रणबीरनं विचारलेला हा प्रश्न बघताबघता व्हायरल झाला आणि सर्व स्तरातून याचा निषेध व्हायला सुरुवात झाली. कॉमेडीच्या नावाखाली सुरु असणारे हे विकृत कार्यक्रम खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. विकृत वक्तव्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यातला फरकही त्यांनी समजावून सांगितला. ((प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्या अभिव्यक्तीलाही मर्यादा आहेत. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होत असेल, तर ते योग्य नाही. अश्लिलतेबाबतही काही नियम आहेत, मर्यादा आहेत. त्याचं उल्लंघन झालं असेल तर कारवाई होईल.)) महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना हा प्रकार संतापजनक वाटलाच.. मात्र याच रणबीरचे फॉलोअर्स असणाऱ्या लाखो प्रेक्षकांच्याही हा प्रकार डोक्यात गेला. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलेब्रिटींच्या पॉडकास्टमधून मिळवलेली लोकप्रियता एका विकृत वक्तव्यामुळे कशी मातीमोल ठरू शकते, हे यानिमित्तानं दिसून आलं. रणबीरच्या तब्बल २० लाख फॉलोअर्सनी त्याला काही मिनिटांत अनफॉलो करून टाकलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरवण्यात आलेला रणवीर हा कोट्यवधी भारतीयांच्या शिव्याशापांचा धनी ठरला. त्यानंतर रणबीरनंही आपल्याला उपरती झाल्याचा दावा करत बिनशर्थ माफीनामा सादर केला. महाराष्ट्राला विनोदाचं वावडं कधीच नव्हतं. शेकडो वर्षांच्या विनोदी साहित्याची, नाटकांची, सिनेमांची आणि पुस्तकांची पारायणं करत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. मात्र विनोदाच्या नावाखाली चालणारी विकृती ठेचण्याचं कामही महाराष्ट्रानं वेळोवेळी केलंय.या वक्तव्यावर रणबीरनं तर माफी मागितलीय.. मात्र केवळ माफीवर हे प्रकरण संपणार की या विकृत चुकीची शिक्षा त्याला मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.
2025-02-10T17:59:20Z