SARASWAT BANK RECRUITMENT : सारस्वत बँकेत तब्बल १५० जागांची भरती, पात्र असाल तर लगेच करा अर्ज!

Saraswat Bank Recruitment 2023 : गेल्या काही दिवसांपासून सरकारी विभागांसह खाजगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पदभरती केली जात आहे. त्यामुळं बेरोजगार असलेल्या तरुणांना नोकरी मिळवण्याची मोठी संधी उपलब्ध झालेली असतानाच आता सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत तब्बल १५० जागांसाठी अर्ज मागवण्यात येत आहे. लिपिक संवर्गातील कनिष्ठ अधिकारी या पदांसाठी पदभरती निघाली असून त्यासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळं बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाली आहे. येत्या आठ एप्रिलपर्यंत उमेदवारांना नोकरीसाठी अर्ज करता येणार आहे. त्यामुळं तुम्ही पात्र असाल तर लगेचच नोकरीसाठी अर्ज करू शकता.

काय आहे प्रोसेस?

सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँकेत कनिष्ठ अधिकारी (मार्केटिंग आणि ऑपरेशन्स) लिपिक संवर्गाच्या १५० पदांसाठी भरतीप्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेला उमेदवार अर्ज करू शकतो. शिक्षणाची इतर कोणतीही अटक त्यात घालण्यात आलेली नाही. उमेदवाराचं वय २८ वर्षांपेक्षा जास्त असता कामा नये. त्यामुळं पात्र असलेल्या उमेदवारांनी बँकेच्या http://www.saraswatbank.com या वेबसाईटवर जाऊन अर्ज भरू भरणं आवश्यक आहे.

EMC Jobs : केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशात निर्माण होणार १८ हजार नव्या नोकऱ्या

अर्ज कसा भराल?

सारस्वत बँकेची वेबसाईट ओपन झाल्यानंतर तेथील करियर या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर भरतीसाठीचं पेज ओपन होईल. त्यानंतर व्यवस्थित माहिती भरून रजिस्ट्रेशन करा. प्रोफाईल तयार झाल्यानंतर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करा. त्यानंतर संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रं अपलोड करा. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची प्रिंटआउट काढून घ्या. त्यानंतर बँकेची वेबसाईट वेळोवेळी चेक करत रहा, जेणेकरून या भरतीसंदर्भातील पुढील अपडेट्स नेहमी मिळतील.

BMC Recruitment 2023: मुंबई महापालिकेत नोकरीची सुवर्णसंधी; 'या' पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

2023-03-28T12:34:16Z dg43tfdfdgfd