SUKANYA SAMRIDDHI YOJANA: मुलीचे भविष्य सुरक्षित करायचंय ? सुकन्या समृद्धी योजनेत अशी करा गुंतवणूक

Sukanya Samriddhi Yojana: तुम्हाला आपल्या मुलीचे भविष्य सुरक्षित करायचे आहे ? मग आता काळजी करण्याची गरज नाही. बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानांतर्गत मुलींचे भवितव्य उज्वल करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव सुकन्या समृद्धी योजना असे आहे. या योजनेत गुंतवणूक कशी करायची ? कुठे करायची ? कागदपत्रे काय लागतील ? या सर्व गोष्टींची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

कोण करू शकते गुंतवणूक

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करायची असल्यास मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असले पाहिजे. ही योजना फक्त मुलींसाठीच आहे. यात गुंतवणूक करून मुलीचा भविष्यातील खर्च भागवता येतो. यामुळे मुलीचे शिक्षण आणि लग्न यासाठी पैसे जमा करता येतात. मुलीचे पालक मुलीच्या नावाने खाते उघडून गुंतवणूक करू शकतात.

Related News |

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर या चुका करू नका

योजनेची माहिती

सुकन्या समृद्धी योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 21 वर्षे आहे. तुम्हाला या योजनेत 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागेल. याचा अर्थ असा की, गुंतवणूक बंद केल्यानंतर 6 वर्षांनी खाते मॅच्युअर होईल, व तुम्हाला 6 वर्षे व्याज मिळत राहील. जर तुम्ही नवजात मुलीसाठी सुकन्या समृद्धी योजनेत खाते उघडले तर ती 21 वर्षांची झाल्यावर खाते मॅच्युअर होईल. तसेच जर तुम्ही तुमच्या 4 वर्षांच्या मुलीचे खाते उघडले असेल, तर ती 25 वर्षांची झाल्यानंतर तुम्हाला मॅच्युरिटी रक्कम मिळेल.

Related News |

SBI Scheme: SBI च्या या योजनेत पैसे होतात दुप्पट, जाणून घ्या काय आहे योजना

किती पैसे जमा करता येतात

या योजनेत वार्षिक 10,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. 15 वर्षे ही रक्कम जमा केल्यास तुम्हाला वार्षिक 8% दराने व्याज मिळेल व योजनेच्या मॅच्युरिटीवेळी तुम्हाला 4.48 लाख रुपये मिळतील. या योजनेत तुम्हाला केवळ जास्त व्याज मिळणार नाही तर सरकारचा पाठिंबा असल्याने ही योजना 100% सुरक्षितदेखील आहे. या योजनेअंतर्गत एका वर्षात किमान 250 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये गुंतवणूक करता येते.

Related News |

Aadhar and Pan Card: मृत्यूनंतर व्यक्तीच्या पॅन आणि आधार कार्डचे काय होते?

गुंतवणूक कुठे कराल

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा कोणत्याही बँकेच्या शाखेत खाते उघडू शकता. या योजनेत रोख रक्कम, चेक, डीडी, किंवा ऑनलाइन पद्धतीने पैसे जमा करता येतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिला तिच्या शिक्षणासाठी 50% रक्कम काढण्याचा पर्याय दिला जातो. तसेच या योजनेत दत्तक मुलीसाठीही गुंतवणूक करता येते.

Related News |

Business Idea : हे 5 बिझनेस लगेच सुरू करा, अल्पावधीत व्हाल मालामाल

आवश्यक कागदपत्रे

सुकन्या समृद्धी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी मुलीचे जन्म प्रमाणपत्र, पत्त्याचा पुरावा, पालकांचे पॅन कार्ड, आधार कार्ड आणि मोबाईल नंबर आवश्यक आहे. ही कागदपत्रे जवळच्या पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या कोणत्याही शाखेत जा, तिथे सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत गुंतवणुकीसाठीचा अर्ज मिळेल. हा अर्ज भरा व आवश्यक कागदपत्रे जोडून प्रीमियमच्या रकमेसह जमा करा.

2023-11-20T08:38:48Z dg43tfdfdgfd