Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर
देवेंद्र फडणवीसांना विजयी करणं ही महाराष्ट्राची इच्छा, पहिल्याच प्रचारसभेत अमित शाह यांचं सूचक वक्तव्य...मुख्यमंत्रिपदाचे संकेत दिल्याची चर्चा... आमचं सरकार आल्यावर कायद्याच्या चौकटीत राहून ३२ शिराळ्यात नागपंचमी पुन्हा सुरु करणार, सांगलीतल्या सभेत अमित शाहांची ग्वाही एक है तो सेफ है, महाराष्ट्रातील पहिल्याच प्रचारसभेत पंतप्रधान मोदींचा नारा... तर बटेंगे तो कटेंगे महाराष्ट्र सहन करणार नाही, अजित पवारांची स्पष्टोक्ती... महायुती म्हणजेच महाराष्ट्राची गती, धुळ्यातील सभेत पंतप्रधान मोदींची घोषणा, तर मविआमध्ये ड्रायव्हरच्या सीटसाठी चढाओढ, विरोधकांना टोला काँग्रेस नेत्यांनी रोज १५ मिनिटं सावरकरांची प्रशंसा करुन दाखवावी, नाशिकच्या सभेतून पंतप्रधान मोदींचं काँग्रेस नेत्यांना आव्हान तर बाळासाहेबांचंही कौतुक करण्याचं चॅलेंज प्रवीण महाजनांनी ट्रिगर दाबले असले तरी त्याच्यामागं अनेकांची डोकी होती, पूनम महाजनांचा माझा कट्टामध्ये गंभीर आरोप, गृहमंत्र्यांनाही पत्र लिहून सत्य समोर आणण्याची मागणी करणार... टक्केवारीमुळे पैसे उरले नसतील म्हणून मुंबई-गोवा महामार्ग १७ वर्षांपासून रखडला, गुहागरच्या सभेत राज ठाकरेंचा हल्लाबोल महायुतीत सामील होण्यापूर्वीच महाराष्ट्र सदन घोटाळ्यात क्लीन चिट, ईडीच्या भीतीमुळे महायुतीत गेल्याच्या आरोपांवर भुजबळांचं स्पष्टीकरण, कुणालाही कसलीही मुलाखत दिली नसल्याचा दावा पुस्तकात दावा केल्याप्रमाणे छगन भुजबळ काहीच बोलले नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण...निवडणुका आल्या की नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा भुजबळांच्या गौप्यस्फोटाने ईडीच्या गैरवापरावर शिक्कामोर्तब, सुप्रिया सुळेंचा दावा, अदृश्य शक्ती फक्त पुरुषांना नाही तर महिलांनाही छळते, बहिणींच्या चौकशीवर बोट ठेवत आरोप नांदेडमध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी ३० ते ४० जणांवर गुन्हा, १० जण कंधार पोलिसांच्या ताब्यात अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा दर्जा ठरवण्यासाठी सुप्रीम कोर्टाकडून तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाची स्थापना, अल्पसंख्याक असल्याचा विद्यापीठ दावा करु शकत नाही हा १९६७ चा आपलाच निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द जम्मू काश्मीर विधानसभेत आजही अभूतपूर्व गोंधळ, कलम ३७० पुन्हा लागू करण्याच्या प्रस्तावावरुन भाजप आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदारांची धक्काबुक्की
2024-11-08T12:49:27Z
ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 08 November 2024

2024-11-08T11:49:25Z
Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या?
Supriya Sule Full PC : सुप्रिया सुळेंचं देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान, नेमकं काय म्हणाल्या? राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी एका पुस्तकात केलेल्या दाव्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीआधी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापुस्तकात असं लिहण्यात आलं आहे, जे नेते भाजपसोबत गेले त्यांनी शरद पवारांना अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, शरद पवार यांनी भाजप पक्षासोबत जाण्यासाठी नकार दिला. हे सांगत राहिले ईडी, आयकर विभागाचा त्रास होतो आहे. तुम्ही बीजेपी बरोबर चला त्यावर पवार म्हणाले, मी भाजपसोबत जाणार नाही हे या पुस्तकात लिहिलेलं आहे, असं आज माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी सांगितलं. फडणवीसांच्या फेक नॅरेटिव्हच्या टिकेवर उत्तर फेक नॅरेटिव्ह फॅक्टरीचे शरद पवार मालक आहेत, तर व्यवस्थापिका सुप्रिया सुळे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, 'माझं देवेंद्र फडणवीस यांना आव्हान आहे, तुम्ही म्हणाल ती वेळ तुम्ही म्हणाल ती जागा आणि तुम्ही पाहिजे तेवढे कॅमेरे घेऊन या. मी देवेंद्र फडणवीसांना अतिशय विनम्रपणे सांगते. ते म्हणतील तिथे चर्चा करायला मी तयार आहे. त्याचबरोबर छगन भुजबळांनी जे लिहलं यातलं काहीही खोटं असेल तर त्यांनी त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं,' असं खुलं आव्हान सुप्रिया सुळेंनी यावेळी फडणवीसांना दिलं आहे. फडणवीस यांनी त्या फाईलवर सही केली... अजित पवारांवर पहिला आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवाराच्या त्या फाईलवर त्यांनी सही केली. देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदा आरोप केले, त्यानंतर फाईलवर सही केली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर अजित पवार यांना फाईल दाखवली, ते मुख्यमंत्री असताना कारवाई केली, त्यांनी फाईल दाखवली देवेंद्र फडणवीस यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, त्याच्यावर खटला दाखल झाला पाहिजे अशी मागणी देखील यावेळी सुप्रिया सुळेंनी केली आहे. एका पुस्तकातील दावा अतिशय गंभीर विषय आहे, मी अनेकदा बोलले आहे, घर फोडणे, पक्ष फोडणे हे मी गेले अनेक दिवस बोलत आहे, काश्मीर टू कन्याकुमारी मध्ये ईडी सीबीआय, आयकर विभाग यांचा 95 टक्के वापर केला आहे. याचा दावा केला आहे, वॉशिंग मशीन मध्ये टाकून भाजप सरकार स्थापन करत आहे. यामध्ये महिलाचा उल्लेख आहे, या अदृश्य शक्तीने माझ्या बहिणीच्या घरी रेड केली, पाच दिवस धाड टाकली, ईडीने त्रास दिला, भुजबळ, मलिक, राऊत यांचे कुटुंब कशातून गेले असतील.
2024-11-08T06:49:20Z
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA
9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM : 8 नोव्हेंबर 2024 : ABP MAJHA राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणात (Baba Siddique Murder Case) नवीन माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने गौरव विलास आपणे याला पुण्यातून अटक केली होती. गौरवने चौकशीदरम्यान सांगितले मोठी माहिती सांगितली आहे, जर प्लॅन ए अयशस्वी झाला तर बॅकअपसाठी प्लॅन बी तयार केला होता असं त्यानी चौकशीदरम्यान सांगितलं आहे. तपासात मोठी माहिती समोर बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या मुंबई गुन्हे शाखेच्या तपासात अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येसाठी बिष्णोई टोळीने तयार केलेल्या प्लॅन बीमध्ये नेमबाज म्हणून सहभागी असलेला गौरव विलास हा त्याच्या गोळीबाराचा सराव करण्यासाठी आला होता. साठी झारखंडला गेले होते. त्याच्यासोबत या गुन्ह्यात आधीच अटक केलेला आरोपी रूपेश मोहोळ हाही झारखंडला गेला होता आणि तिथे दोघांनीही अनेक राऊंड फायरिंगचा सराव केला. मास्टरमाईंड शुभम लोणकर याने या दोन आरोपींना झारखंडमध्ये सरावासाठी पाठवले होते आणि सरावासाठी त्याने शस्त्रेही पुरवली होती. झारखंडमध्ये ज्या ठिकाणी ही राऊंड फायरिंगचा सराव करण्यात आला, ती जागा शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे अधिकारी प्रयत्न करत असले तरी, 5 नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या अपुणे याने चौकशीदरम्यान ही धक्कादायक माहिती उघड केली आहे. मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, शूटरने झारखंडमध्ये सराव केला आहे, जेणेकरून प्लॅन ए अयशस्वी झाल्यास, बॅकअप प्लॅन बनवला गेला. मुंबई क्राईम ब्रँचच्या माहितीनुसार, गौरव अपुणे आणि रूपेश मोहोळ हे 28 जुलै 2024 रोजी झारखंडला गेले होते, जिथे त्यांनी एक दिवस गोळीबाराचा सराव केला, 29 जुलै रोजी पुण्यात परतले आणि शुभम लोणकरच्या संपर्कात आले. क्राइम ब्रँचच्या अधिकाऱ्याने सांगितले की, झारखंडला जाण्यापूर्वी, अपुनेने आपल्या कुटुंबीयांना सांगितले की, तो मित्रांसोबत पिकनिकसाठी उज्जैनला जात आहे, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना त्याचा खुनाच्या कटात सहभागाची जाणीव झाली आणि शूटिंगच्या सरावाची योजना आखली गेली. गुन्हे शाखेच्या तपासात आणखी एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. बिष्णोई टोळीच्या सांगण्यावरून शुभम लोणकर याने रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम कोहर आणि गौरव अपुणे या हत्येच्या कटात सहभागी असलेल्या चार अटक संशयितांना चार मोठ्या बक्षिसांचे आश्वासन दिल्याचे तपासात निष्पन्न झाले.
2024-11-08T05:04:18Z