THANE NEWS : दिनार चलनाऐवजी रद्दी देऊन फसवणूक

डोंबिवली : दुबईतील दिनार चलन स्वस्तात मिळते म्हणून डोंबिवली एमआयडीसी भागातील एका औषध विक्रेत्याला तिघा भामट्यांनी 4 लाखांचा चुना लावल्याचे पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीतून उघडकीस आले आहे.

मित्रांच्या ओळखीने 4 लाख रुपयांच्या भारतीय चलनात अदलाबदलीने ताब्यात घेतलेल्या या चलनाऐवजी त्यात पेपर रद्दीची कागदी पुडकी आढळून आली. गंडा घालून पसार झालेल्या तिन्ही भामट्यांचा मानपाडा पोलीस शोध घेत आहेत. भूपेंद्रनारायण बबन सिंग (51) असे फसगत झालेल्या औषध विक्रेत्याचे नाव आहे. यांचा मित्र रमेश जैस्वाल (38, रा. दावडी) यांनी आपला मित्र रामअभिलाख पटेल (55, कल्याण) याच्या ओळखीच्या तिघांकडे दुबईचे 700 दिनार चलन स्वस्तात देणार असल्याचे सांगितले. मात्र दिनार ऐवजी रद्दीचे तुकडे देऊन तिघांनी आपली फसवणूक केल्याची तक्रार सिंग यांनी पोलिसात दिली आहे.

2024-09-04T10:31:07Z dg43tfdfdgfd