Trending:


Crime News | टाकळीभानच्या ट्रकचालकाचा बंगालमध्ये मारहाणीत मृत्यू

टाकळीभान : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील ट्रकचालकाचा पश्चिम बंगालच्या खडकपूर येथे अपघाताच्या कारणावरून जमावाकडून झालेल्या जबर मारहाणीत मृत्यू झाला आहे. तीन दिवसांनंतर मृतदेह टाकळीभान येथे आणल्यानंतर अंत्यसंस्कार पार पडले. येथील श्याम शंकर गणकवार (वय २९) टाकळीभान येथून ट्रक (एमएच १७-बीझेड ४५८२) मध्ये कांदा भरून पश्चिम बंगाल ...


राज्यात हत्तीरोगाचे रुग्ण वाढले

मुंबई : राज्यात हत्तीरोगाची रुग्णसंख्या वाढली असून चंद्रपूर आणि नागपूरसह सात जिल्ह्यांमध्ये या आजाराचा धोका सर्वाधिक आहे. हत्तीरोगमुक्त अभियान करण्याचे उद्दिष्ट केवळ स्वप्नच ठरत असल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्रातून दोन वर्षात हत्तीरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी १३ जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम राबविण्याचा आराखडा तयार करण्यात आला होता. मात्र, त्याच व...


Kolhapur Truck Accident : पुणे बंगळुरू हायवेवर भीषण अपघात, तिघे जागीच दगावले

मुंबई/रायगड/कोल्हापूर: रस्ते वाहतुकीत मोठी वाढ झाल्याने वाहनांची संख्यादेखील वाढली आहे. त्यामुळे, सातत्याने अपघाताच्या (Accident) घटना घडताना दिसून येतात. वाहनाचा स्पीड आणि खराब व अरुंद रस्त्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याचे पाहायला मिळते. आजचा रविवार हा अपघातवार ठरला असून दिवसभरात अपघाताच्या तीन मोठ्या घटना घडल्या आहेत. धुळे जिल्ह्यात आज सकाळीच भीषण अपघाताची घटना घडली असून त्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला. तर, सायंकाळी कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्याजवळील निपाणी येथे कंटेनवर, चारचाकी आणि दुचाकीचा भीषण अपघात होऊन तीन जणांचा मृ्त्यू झाल्याची घटना घडली. तसेच, रायगड (Raigad) जिल्ह्यातील कोंझर घाटात बस दरीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील (Bus) सर्वच प्रवासी सुखरुप आहेत. या बसमधून 40 पेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत होते. पुणे-बेंगलोर महामार्गावर निपाणी जवळील तवंदी घाटात भीषण अपघाताची घटना सांयकाळी घडली. कंटेनर, फोर व्हीलर आणि टू व्हीलर ची एकमेकांना धडक बसून विचित्र आणि तितकाच भीषण अपघात घडला. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना तात्काळ उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातानंतर स्थानिकांनी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. तर, रायगड जिल्ह्यातही बस 20 ते 25 फूट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे.


Nagar : कोल्हार खुर्द सोसायटीत सत्तांतर..!

कोल्हार खुर्द विकास सोसायटीच्या झालेल्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीवेळी नाट्यमय घडामोडीनंतर अखेर सत्तांतर झाले. यावेळी विखेंच्या दोन गटात दुफळी होऊन महेश पाटील यांच्या नेतृत्वात अध्यक्ष पदी बाबासाहेब लोंढे व तर उपाध्यक्ष म्हणून संजय भोसले हे विजयी झाले. कोल्हार खुर्द सोसायटी निवडणूक अडीच वर्षांपूर्वी होऊन त्या ठिकाणी तनपुरे समर्थक अनिल शिरसाठ यांची ...


Sharad Pawar | शरद पवारांनी का मागितली मुख्यमंत्र्यांची वेळ?

sharad pawar cm Eknath Shinde


Sindhudurg Fort| किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ

किल्ले सिंधुदुर्ग दर्शनासाठी होडी वाहतुकीस प्रारंभ


Ratnagiri news | कोकणात बाप्पांच्या निरोपाला आज पावसाची साथ

कोकणात बाप्पांच्या निरोपाला आज पावसाची साथ


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव, माझा जिल्हा; बातम्यांचा वेगवान आढावा : 16 Sep 2024 कोल्हापुरातील राधानगरीमधील नरतवडे गावच्या खासगी निवासी क्लासेसमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार, क्लास चालकाच्या वडिलांनी केले कृत्य, आरोपी पोलीसांच्या अटकेत. रायगडच्या माणगाव कचेरी रोडवर भीषण अपघात, कारची दुचाकीला धडक, अपघातात दोघे जखमी, संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद. आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांची आजपासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाची हाक, मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून या जरांगेंचं उपोषण. गपणती विसर्जन झाल्यानंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरु, कोकणातील सर्वच रेल्वेस्थानकांवर प्रवाशांची गर्दी, कोकण रेल्वेवर धावणाऱ्या हॉलिडे एक्स्प्रेसलाही चांगला प्रतिसाद. बीडच्या परळीमध्ये बिलाल प्राथमिक शाळेत शिक्षकाकडून १२ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग, शिक्षक साजिद सलीम शेखविरोधात पोक्सो अंतर्गत परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गणेश विसर्जनासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज, मूर्तींच्या विसर्जनासाठी दोनशे चार कृत्रिम तलावांची निर्मिती, तर भाविकांच्या सेवेसाठी १२ हजार अधिकारी आणि कर्मचारी तैनात पुण्यात विसर्जनासाठी पीएमपीएलकडून बसचं नियोजन; रस्ते बंद असल्याने गैरसोय होऊ नये म्हणून पीएमपीएलकडून बसची व्यवस्था.


Sassoon Hospital Pune: ससूनचे 'कसून' लेखापरीक्षण; आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी रुग्णालय प्रशासनाचा निर्णय

Sassoon Hospital Pune: गैरव्यहार उघडकीस आल्याने प्रशासकीय खात्यातून यापूर्वी झालेल्या सर्व व्यवहारांचे लेखापरीक्षण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. लेखापरीक्षणातून गेल्या काही वर्षांतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येण्याची शक्यता असल्याने ससूनमधील अनेक अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.


Lumpy Skin Disease | खाडीपट्ट्यात लंपीला आळा घालण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ

खाडीपट्टा : खाडीपट्टयातील जनावरांना लागण झालेल्या लंपी रोगाला आळा घालण्यासाठी तालुका पशुधन विकास अधिकारी पुढे सरसावले आहेत. यासाठी पशुधन दवाखान्यातील कर्मचार्‍यांना मुख्यालयाच्या ठिकाणीच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.याबाबतचे वृत्त दै.पुढारीने प्रसिद्ध केले होते. त्याची दखल पशूधन विभागाने घेतली आहे. तेलंगे येथे महाराष्ट्र शासनाचा पशुवैद्यकीय...


BSNL जोमात इतर कंपन्या कोमात! ऑफिसमध्ये राहुनही फोनमध्ये चालेल घरातील WiFi

मुंबई : BSNL एक नवीन टेक्नॉलॉजी लॉन्च करणार आहे. ज्याद्वारे तुम्ही घरापासून दूर असलात तरीही फायबर कनेक्शनद्वारे हाय-स्पीड इंटरनेटचा आनंद घेऊ शकता. 'सर्वत्र' असे या प्रोजेक्टचं नाव असून या प्रोजेक्टने टेलीकॉम इंडस्ट्रीमध्ये क्रांती होईल, अशी अपेक्षा आहे. या प्रोजेक्टची ट्रायल फेज पहिलेच पूर्ण झाली आहे. लवकरच ही सर्व्हिस केरळ सारख्या परिसरांमध्ये सुरु केली जाईल.लोक करताय नोंदणी BSNL जास्तीत जास्त लोकांना या सेवेसाठी नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित...


Raj Thackeray Special Report : Aaditya Thackeray यांच्या मतदारसंघात राज ठाकरे सक्रिय?

Sandeep Deshpande and Thackeray Group, मुंबई : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी मनसे नेते संदीप देशपांडे यांची भेट घेत असतानाच मोठा निर्णय घेतला. ठाकरेंच्या गट प्रमुखाने संदीप देशपांडे यांच्यासमोर शिवबंधन हातातून काढले आणि ऑन द स्पॉट राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्मान सेनेत प्रवेश केला. निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीतून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. संदीप देशपांडे विरुद्ध ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे अशी लढत वरळीमध्ये पाहायला मिळणार आहे. संदीप देशपांडे यांनी वरळीमध्ये गाठी भेटींना सुरुवात केली आहे. देशपांडे यांच्याकडून वरळीकरांच्या समस्या जाणून घेतल्या जात आहेत. या सगळ्या गाठी भेटीच्या दरम्यान शिवसेना ठाकरे गटाच्या गटप्रमुख निलेश ठोंबरे यांनी संदीप देशपांडे यांच्या समोरच हातातून शिवबंधन काढले आणि मनसेत प्रवेश केला. गेल्या काही दिवसापासून वरळीमधले राजकीय वातावरण तापले आहे. जांभोरी मैदान येथे ठाकरे गटाचे शिवसैनिकांनी मनसे कार्यकर्ते आमने-सामने आले होते . त्यामुळे आगामी काळामध्ये वरळीमध्ये मनसे विरुद्ध ठाकरेंचे शिवसेना ही विधानसभेची लढत चांगलीच चर्चेत राहणार आहे. मनसैनिक आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष पेटला गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरेंच्या सैनिकांमध्ये मोठा वाद पाहायला मिळालाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या ताफ्यासमोर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. त्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ते शिवसैनिक होते, पण आम्ही या हल्ल्याचं समर्थन करत नाही असं म्हटलं होतं. मात्र, यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं. उद्धव ठाकरे ठाण्यातील मेळाव्यासाठी जात असताना त्यांच्या कारवर शेण आणि बांगड्या फेकण्यात आल्या. शिवाय ठाकरे ज्या कार्यलयात मेळावा घेणार होते, त्या कार्यालयातही मनसैनिक घुसले आणि त्यांनी राडा केला होता. मात्र, त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांकडून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नाही.


CM Eknath Shinde Speech : Marathwada Mukti Sangram दिनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं भाषण

मराठवाडा दुष्काळ मुक्त करण्यासाठी सरकार मागे पडणार नाही आज आम्ही मराठवाडा विकासासाठी निर्णय घेतले समृद्धी महामार्ग तयार झाला अनेक उदयोग आणले आहेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक मराठवाड्यात होत आहे लाडकी बहीण योजना केली आपल्या बहिणीला फायदा होईल शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफ केले आहे शेतकऱ्यांना 16 हजार कोटी रुपये मदत केली मराठवाड्यातील साखर कारखाने सोबत imo साईन आपण करत आहे मुलींच्या शिक्षणासाठी निर्णय घेतले लाडकी बहीण योजना यशस्वी झाली आहे... अडीच कोटीचे आमचे टार्गेट आहे लाडकी बहणी पासून लाडक्या भावा, लाडक्या शेतकरी योजना आणली आहे पंतप्रधान यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो, 10 वर्षात त्यांनी देशाचे नाव जगभरात उंचीवर नेण्याचे काम त्यांनी केले केंद्र आणि राज्य मिळून आपण राज्याचा विकास करत आहे कापूस आणि सोयाबीन बाबत आपण निर्णय घेतला आहे यावर्षी चांगला पाऊस पडला, सर्वत समृद्धी अली आहे *संगे सोयरे बाबत काम सुरू आहे, आम्ही जे बोलतो ते करतो,,, आमची डबल भूमिका नाही.... दुप्पटी भूमिका सरकारने कधीच घेतली नाही, शिंदे समिती नेमली आणि कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे..एक मोठं यश आहे.... ओबीसीला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचं म्हटले होते,,,,, यासाठी विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण आम्ही दिले... त्याविरुद्ध कोर्टात कोण गेले हे तुम्हाला माहित आहे..... त्यामुळे सगे सोयर, गझट जा विषय आहे, यासाठी शिंदे समिती आणि शिंदे समिती काम करत आहे.... कुणाचीआम्ही दिशाभूल करणार नाही आणि फसवणूक करणार नाही,,,, दिलेला शब्द आम्ही पाळणार, जे देऊ कायद्याच्या चौकटीत बसणारे आहे... मी मुख्यमंत्री झाल्यापासून 5 हजार मराठा तरुणांना आम्ही नोकरी दिली.... सारथी व्ययप्ती वाढवली....1 लाख लोकांना बिन व्याजी कर्ज दिले ऑन जरांगे आंदोलन माझं आवाहन आणि विनंती आहे की सरकारने एवढं केल्यानंतर, सहकार्यची भूमिका घेतल्यानंतर मराठा समाजाने देखील सहकार्यची भूमिका घेतली पाहिजे... ज्यांनी काहीच दिले नाही त्यांना संधी होती,1994 च्या काळात.... पण त्यांनी फक्त मराठा समाजाला वापर करून घेतला त्यांना काही जाब विचारणार की नाही, त्यांची देखीक भूमिका स्पष्ट झाली पाहिजे..... पीक विम्यात एजंट यांनी गोंधळ केल्यास जेलमध्ये टाकण्याची घोषणा केली आहे शेतकऱ्यांच्या जीवाशी खेल त्याला सरकार सोडणार नाही... सर्वाना महामंडळ आपल्या आपल्या प्रमाणे, महायुतीमध्ये कोणताही संघर्ष नाही, समन्वयाने आम्ही निर्णय घेत आहे, काळजी करू नका, योजनामध्ये खोडा घालणाऱ्याना माझे लाडके भाऊ आणि बहीण नक्की जोडा दाखवतील.. योजना बंद व्हावी म्हणून तुम्ही कोर्टात जातात... महिलांना लाच देतात ,,,बदनाम करण्याचा प्रयत्न करतात,थोडी जनाची नाही तर मनाची राखली पाहिजे, जागावाटप काम सुरू आहे, बोलणं सुरू आहे, समनव्यातुन बोलणी सुरू आहे काळजी करू नका,, जे काम आम्ही केले आहे त्याच्या पोचपावतीवर आणि अडीच वर्षात विरोधकांनी केलेलं कामआणि दोन वर्षातील महायुतीचे काम याची तुलना करून .…एवढी निर्णय कधीही घेतली नव्हते, जनता याचा निर्णय घेणार आणि महायुती पुन्हा येईल....


Kadambari Jethwani Case: कादंबरी जेठवानी प्रकरणात मोठी अपडेट, तीन आयपीएस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

Kadambari Jethwani Case: कादंबरी जेठवानी प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आंध्र प्रदेश सरकारने या प्रकरणात तीन आयपीएस अधिकाऱ्यांचं निलंबन केलं आहे. कादंबरीला चुकीच्या पद्धतीने अटक करुन तिचा छळ केल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे.


Nashik-Mumbai Highway: महामार्गावर 'आपटी'; मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतरही मुंबई मार्गावर खड्डे 'जैसे थे'

Nashik-Mumbai Highway: नाशिक-मुंबई महामार्गावर सुरू असलेली रस्त्याची कामे आणि जागोजागी पडलेले प्रचंड खड्डे यामुळे जुलै महिन्यापासून या महामार्गावरील प्रवास खडतर बनला आहे.


Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय?

Dhangar Dhangad Reservation : धनगर-धनगड आरक्षणाचा वाद, मुद्दा काय? अपडेट पंढरपूर - मुख्यमंत्र्यांचा निरोप घेऊन आलेले विभागीय आयुक्त यांची आंदोलकांशी चर्चा सुरू. धनगर नेते आमदार गोपीचंद पडळकर आणि प्रकाश शेंडगे हे धनगर बांधवांना भूमिका समजावून सांगत आहेत धनगर आमरण उपोषणाचा आज आठवा दिवस , मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार विभागीय आयुक्त पत्र घेऊन आंदोलकांच्या भेटीला दाखल, आंदोलकांशी चर्चा सुरू.. सोबत आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे आणि धनगर समाजाचे प्रतिनिधी उपस्थित


Shingnapur Gram Panchayat | 'मतदार यादीत मुस्लिमांची नोंदणी नको' कुठे मांडला हा अजब ठराव?

Shingnapur Gram Panchayat Apology For Muslims In New Voters List


Ajit Pawar At Pune Ganpati : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रश्न, दादा म्हणाले माझं मत एकदम स्पष्ट

Ajit Pawar At Pune Ganpati : मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रश्न, दादा म्हणाले माझं मत एकदम स्पष्ट


ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स मराठी बातम्या : 1 PM : 16 Sep 2024

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स मराठी बातम्या : 1 PM : 16 Sep 2024 शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं... शरद पवारांमुळे राज्याच्या पुरोगामी चेहऱ्याला जातीयवादी कॅन्सर, गोपीचंद पडळकरांची पातळी सोडून टीका, स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण एबीपी माझाच्या बातमीवर जवळपास शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही म्हणाले दोन टप्प्यांत होऊ शकते विधानसभा निवडणूक... महायुतीचा उमेदवार निवडीचा फॉर्म्युला ठरला, लोकसभा निवडणुकीतला स्ट्राइक रेट आणि जिंकण्याची क्षमता हाच निकष, मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, हिम्मत असेल तर पालिकेच्या निवडणुका घ्या . संजय राऊतांचं सरकारला आव्हान. तर हरण्याची भितीमुळेच निवडणुका टळत असल्याचा राऊतांचा हल्लाबोल,


ब्रिटिशकालीन कुणबी- मराठा जातीचे पुरावे घेऊन मोहोळचे डॉ. पाटील दाम्पत्य जरांगेंच्या भेटीला

रमेश दास मोहोळ : कुणबी - मराठा आरक्षण आंदोलनाचे धडाडीचे नेते मनोज जरांगे - पाटील हे आरक्षणासाठी स्वतःच्या जीवाची बाजी लावत आहेत. आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईसाठी लेखी पुराव्याची आवश्यकता आहे. न्यायालयीन प्रक्रियेसाठी आणि शासनाच्या पुराव्यासाठी जनगणनेची आणि ब्रिटिश काळातील महत्त्वाचे पुरावे देण्यासाठी मोहोळ येथील डॉक्टर दांपत्य जरांगे -पाटलांना प्रत्...


Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोप

Solapur Ganpati Visarjan : सोलापुरात बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत बाप्पाला निरोप सोलापूर शहर पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांच्याकडून प्रखर लेझर बीम लाईट वापरण्यास प्रतिबंध आदेश मिरवणुकीत साउंड सिस्टीम सोबत प्रखर बीम लाईट, लेजर लाईट, प्लाज्मा इत्यादीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो मात्र लाईट्स मुळे मिरवणुकीत सहभागी नागरिकांसह पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांच्या डोळ्यांना इजा होऊन कायमचे निकामी होण्याची शक्यता आहे या शिवाय लाईट्समुळे डोळे दिपून वाहनचालकांचे देखील अपघात होण्याची शक्यता आहे, त्यामुळे निर्बंध असणे आवश्यक असल्याचे आयुक्ताचे मत त्यामुळे 15 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर पर्यंत सोलापूर शहरात गणेशोत्सव, ईद ए मिलाद च्या कोणत्याही सर्वजनिक कार्यक्रमात, मिरवणूकीत लेजर बीम लाईट वापरू नये अन्यथा भारतीय न्याय संहिता कलम 233 प्रमाणे कारवाई करणार, पोलीस आयुक्तांचे आदेश


Lalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Lalbaugcha Raja Visarjan 2024 :लालबागमध्ये विसर्जन मिरवणुकीसाठी तुफान गर्दी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त लालबागच्या राजाची राजेशाही विसर्जन मिरवणुक आज सकाळी ११ वाजता लालबाग मार्केटमधुन निघणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त आज सकाळी ९:३० वाजता लालबागच्या राजाची विधिवत पूजा आरती करण्यात येणार आहे. अनंत चतुर्दशीनिमित्त आज पहाटे पासूनच लालबाग मार्केट मधील सर्व प्रवेश द्वार बंद करण्यात आले आहेत. मुख्य प्रवेशद्वार किंवा त्याच्या शेजारील लहान गेटमधून मीडिया प्रतिनिधींना सोडण्यासाठी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून मुंबई पोलिसांना सांगण्यात आले आहे.


पुढारी अग्रलेख : केजरीवाल यांचा स्टंट

नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आश्चर्यकारक निर्णय घेण्याबद्दल प्रसिद्ध आहेत! काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात ‘इंडिया अगेन्स्ट करप्शन’च्या बॅनरखाली केजरीवाल यांनी नवी दिल्लीत ऐतिहासिक आंदोलन केले. त्याचे नेतृत्व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे सोपवले. नंतर अण्णांनाच त्यांनी अडगळीत टाकले. राजकारणात जाऊ ...


गँगस्टर बिश्नोई टोळीतील 6 गुंडांना कळंगुटमध्ये अटक

पणजी : पंजाबमध्ये दोघा महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर खुनी हल्ला करून गोव्यात लपून बसलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याच्या टोळीतील सहाजणांच्या मुसक्या आवळण्यात पंजाब पोलिसांना यश आले. स्थानिक पोलिसांच्या मदतीने अवघ्या चार दिवसांत त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. पंजाब पोलिस त्या सहाही जणांना घेऊन सोमवारी सकाळी गोव्यातून पंजाबला रवाना झाले आहेत. गायक ए...


MLA Nitesh Rane | आमदार नितेश राणेंवर गुन्हा दाखल

पनवेल : एआयएमआयएमचे कोकण विभाग प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी वेळोवेळी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे भाजपचे आमदार नितेश राणे हे मुस्लिम समाजाला अपमानित करीत तक्रारी दाखल करीत असतानाच गृहमंत्री कार्यालयाकडून तत्काळ हालचाली करण्यात आल्या. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय हद्दीतील एनआरआय पोलीस ठाण्यात जातीय तेढ निर्माण करण्याच्या दोषावर ...


Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादन

Pune Ramanbaug Dhol Pathak : कसबा गणपतीसमोर रमणबाग ढोल पथकाचं वादन पुण्यातील मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीला सुरुवात कसबा गणपती समोर बेलबाग चौकातील रमणबाग पथकाचे वादन सुरु


Traffic Problem | विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक मार्गात बदल

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा गणेश विसर्जन मिरवणुकानिमित्त सोमवारी (दि. १६) भोसरी आणि वाकड परिसरातील तसेच मंगळवारी (दि. १७) चिंचवड, पिंपरी येथील बाहतुक मार्गात बदल करण्यात आले आहेत. वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त बापू बांगर यांनी याबाबत माहिती दिली. वाकड भागातील बहुतांशी गणेश मंडळांच्या मुर्तीचे अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन करण्याची परंपरा आहे....


Crime Superfast News : राज्यभरातील क्राईम बातम्यांचा सुपरफास्ट बातम्या : 16 September 2024

महाराष्ट्रात तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेसचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन, पुणे-हुबळी, पुणे कोल्हापूर आणि नागपूर-सिकंदराबाद वंदे भारतमुळे प्रवाशांची मोठी सोय अहमदाबाद आणि भरूचदरम्यान देशातील पहिल्या वंदे मेट्रोचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण, नमो भारत रॅपिड रेल असं रेल्वेकडून नामकरण विधानसभेसाठी केंद्रीय भाजपचं नो-रिस्क धोरण, राज्याबाहेरचे ६० नेते महाराष्ट्रातून येऊन मतदारसंघांचा अहवाल केंद्रीय नेतृत्वाला देणार कोकणात विधानसभा निवडणुकीतही महायुतीत वादंग होण्याची शक्यता, नव्या MIDCच्या घोषणेवरून भाजपचे माजी आमदार बाळ माने यांचे उदय सामंतांवर गंभीर आरोप सरकारला अखेरची संधी, आम्हाला आता दोष देऊ नका, जरांगेंचा सरकारला इशारा, आज मध्यरात्रीपासून उपोषण धनगर, धनगड एकच असल्याचा जीआर काढणार, पण राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवाळांचा विरोध, सर्व आदिवासी नेत्यांच्या बैठकीनंतर पुढील भूमिका करणार स्पष्ट शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांची जीभ सुटली, राहुल गांधींची जीभ छाटणाऱ्याला ११ लाखांचं बक्षीस देऊ अशी मुक्ताफळं... बेताल संजय गायकवाडांवर काँग्रेस तुटून पडली, यशोमती ठाकूर म्हणाल्या, गुंड आणि फालतू माणूस, बळवंत वानखेडेंनी ठरवले अडाणी... मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस, नितेश राणेंविरोधात काँग्रेसच्या लीगल सेलची तक्रार, कर्नाटकातील गणेशमूर्ती प्रकरणावरून चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा लवकरात लवकर घ्या, विद्यार्थी असंतोषावर मार्ग काढा, शरद पवारांचं मुखमंत्र्यांना पत्र, भेटीची मागितली वेळ


Ganesh Immersion 2024 Arrangements : पूर्व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल

चेंबूर, मानखुर्द, मुलुंड येथेही अनेक भागांत गणेश विसजर्न मिरवणुकींसाठी रस्ते बंद आहेत तर अनेक भागांत वाहतूक वळवण्यात आली आहे.


Onion Export: बंदरांवर अडकले कंटेनर; कांदा निर्यातीचे नवीन नियम, अंमलबजावणीस होतेय दिरंगाई

Onion Export: प्रत्यक्षात जोपर्यंत जास्तीत जास्त कांदा निर्यात होत नाही तोपर्यंत या नवीन निर्णयाचा कांदा दरवाढीला फायदा होणार नाही, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.


Balasaheb Thorat On Sanjay Gaikwad : Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाही

Balasaheb Thorat On Sanjay Gaikwad : Rahul Gandhi यांच्या केसालाही धक्का लावण्याची ताकद नाही संजय गायकवाड जे बोलले ते निषेधार्थ आहे... जे विचार मांडतो ते विचार मारण्याची वृत्ती नथुराम गोडसे ची वृत्ती आहे ..ती आपल्याला दिसते राहुल गांधी यांच्या केसाला धक्का लावण्याची हिम्मत नाही ...जनता त्याच्या पाठिशी आहे... भाजप घाबरलेला आहे, राहूल गांधी काय बोलले समजून घेतले पाहिजे भाजप ला लोकशाही नको, आरक्षणाच्या विरोधात आहेत खोटे वातावरण तयार केले जात आहे, म्हणून भाजप आंदोलन करत आहेत किती आंदोलन केले तरी त्याचा फरक नाहीं ऑन जळगाव राऊत प्रकरण- जळगावची घटना दुर्दैवी आहे वरीष्ठ अधिकारी दबाव टाकतात त्याचा परिपाक आहे ऑन सुजय विखे लोकशाही आहे,कोणाला कुठून ही लढण्याचा अधिकार आहे ...दिल्लीतुन दम देऊन सांगितले जातें कोणी किती जागा लढविण्याचा... बाळासाहेब थोरातांचं वक्तव्य...


Chandra X-ray Observatory: रौप्यमहोत्सवी ‘चंद्रा’

Chandra X-ray Observatory: पृथ्वीभोवती प्रचंड वेगाने २४ तास फिरत असलेल्या चंद्रा वेधशाळेला तिच्या त्यावेळच्या लक्ष्याकडे रोखून ठेवणे हे फारच गुंतागुंतीचे काम असते. पण ते काम वैज्ञानिक गेली २५ वर्षे अचूकपणे करत आहेत. या अकल्पनीय वेधशाळेचा रौप्यमहोत्सव साजरा करणे म्हणूनच खूप आनंदाचे आणि महत्त्वाचे आहे.


Aaj Che Havaman (आजचे हवामान): राज्यात आज 'या' भागात पावसाची हजेरी, हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra weather Update: राज्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता भारतीय हवामान विभागातर्फे वर्तवण्यात आली आहे. त्यानुसार, आज म्हणजेच 17 सप्टेंबर 2024 रोजी मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा व विदर्भात काही तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हा हलक्या स्वरुपाचा पाऊस असणार असल्याने हवामान विभागाने आज कोणत्याही जिल्ह्यांना पावसाचा कुठलाच अलर्ट जारी केलेला नाही.


Parliamentary Standing Committee : काँग्रेसला मिळाल्या संसदेच्या चार स्थायी समित्या, सत्ताधाऱ्यांबरोबरच्या वाटाघाटीत मोठं यश

Parliamentary Standing committee : काँग्रेसने लोकसभेतील चार व राज्यसभेतील एका स्थायी समितीची मागणी केली होती.


Arvind Kejriwal : मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, २०१३ च्या पॅटर्ननुसार अरविंद केजरीवाल पुन्हा यशस्वी होणार?

Arvind Kejriwal Resign : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा मास्टर स्ट्रोक मारला आहे का? असा प्रश्न आता अनेकांच्या मनात निर्माण होऊ लागला आहे.अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली आहे.


सोलापूर : बाप्पाला आज निरोप

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा लाडक्या गणरायाचे आगमन झाल्यानंतर 11 दिवसांनी मंगळवारी सोलापूर शहरातील 1350 विविध मध्यवर्ती मंडळांकडून लाडक्या बाप्पाला वाजत गाजत, पारंपरिक लेझीम, झांज, ढोल वाजवून व डॉल्बीच्या तालावर थिरकून निरोप देण्यासाठी गणेशभक्त सज्ज झाले आहेत. शहरातील विविध नऊ मध्यवर्ती मंडळांकडून तयारी झाली आहे. गणेश विसर्जनासाठी महापालिकेच्या वतीने...


सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024

सकाळी ८ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 8AM 17 September 2024 गणेशोत्सवाची आज सांगता... १० दिवसांचे गणराय निघणार गावाला... मुंबईत लालबागचा राजा, गणेशगल्लीचा राजा, चिंतामणीसह सार्वजनिक गणरायांचं विसर्जन, घरगुती गणपतींनाही निरोप पुण्यातल्या मानाच्या बाप्पांची विसर्जन मिरवणूक थोड्याच वेळात, दगडशेठच्या गणपती ४ वाजता निघणार आणि ८ वाजता विसर्जित होणार... मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप मानाच्या नागपूरच्या राजाची मिरवणूक सकाळी १० वाजता सुरू होणार, घरगुती गणपती बाप्पांनाही देणार निरोप गणपती विसर्जनासाठी मुंबईतल्या चौपाट्यांवर यंत्रणा सज्ज, पुणे, नाशिकसह प्रमुख शहरात कृत्रिम तलावांची सोय, विसर्जनासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या विशेष लोकल गाड्या, मध्यरात्री गणेश विसर्जनाहून परतणाऱ्या मुंबईकरांची सोय


दहशतवादाला आम्ही गाडून टाकू

श्रीनगर : वृत्तसंस्था काश्मीर खोर्‍यात जेव्हा-जेव्हा नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) आणि काँग्रेसचे सरकार सत्तेत आले, तेव्हा-तेव्हा दहशतवादाला खतपाणी मिळाले. या दोन्ही पक्षांना कलम 370 पुन्हा हवे आहे. भाजप आहे तोवर 370 कलम तर येणारच नाहीच, पण दहशतवादालाही आम्ही खोल जमिनीत गाडून टाकू, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नागसैनी येथील जाहीर सभेत क...