VIDHAN PARISHAD ELECTION : इंडिया आघाडीला भारत जोडो अभियानाचे समर्थन; महाराष्ट्रासह चार राज्यात भाजपला रोखण्यासाठी कंबर कसली

Vidhan Parishad Election 2024 वर्धा : लोकसभा निवडणुकीत भारत जोडो अभियानाने इंडिया अलायन्सच्या बाजूने भूमिका वठविली. परिणामी, 156 जागावर काम करून 78 जागांवर यश आले. आता आगामी विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election 2024) भारत जोडो अभियान ( Bharat Jodo Abhiyan) इंडिया अलायन्सच्या बाजूने ताकद म्हणून उभी राहणार आहे. त्यासाठी महाराष्ट्रात उल्का महाजन यांच्याकडे याबाबतची संपूर्ण जबाबदारी देण्यात आलीय. वर्ध्याच्या सेवाग्राम येथे झालेल्या भारत जोडो अभियानाच्या राष्ट्रीय संमेलनात विधानसभा निवडणुकात नेमके काय करायचे? यावर मंथन करण्यात आले. लोकसभेत मिळालेल्या यशामागे भारत जोडोने केलेल्या  कार्याचा या यशात मोठा वाटा आल्याचा दावाही यावेळी केला गेलाय.

इंडिया आघाडीला भारत जोडो अभियानाचे समर्थन

आगामी काळात राज्यासह देशातील झारखंड, हरियाणा, महाराष्ट्र आणि जम्मू काश्मीर या राज्यातील विधानसभा निवडणुकामध्ये भारत जोडो अभियानाने इंडिया अलायन्सला समर्थन दिले आहे. इंडिया अलायन्ससाठी काम करायला वेगवेगळे सेल या अभियानासाठी तयार करण्यात आले आहे. सोशल मीडिया, राजकीय समन्वय, जनजागृती यासारख्या विशेष विंग तयार करण्यात आल्या आहे. त्यासाठी प्रत्येक राज्यात एक राज्य समन्वयक नेमण्यात आल्याची माहिती भारत जोडो अभियानचे राष्ट्रीय समन्वयक योगेंद्र यादव यांनी यावेळी बोलताना दिलीय.

जो धडा लोकसभा निवडणुकीत शिकवला तोच विधानसभेत शिकवू! 

वर्ध्याच्या सेवाग्राम येथे आठ आणि नऊ जुलै या दोन दिवसात भारत जोडोचे संमेलन झाले. या संमेलनात सुमारे 20 राज्यातून 250 प्रतिनिधी सामील झाले होते. लोकसभा निवडणूक तर झाली मात्र आता पुढे काय? यावर या संमेलनात मंथन करण्यात आले. संविधान वाचविण्यासाठी भाजपला जो धडा लोकसभा निवडणुकीत शिकवला गेला तोच कायम रहावा, यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची ठाम भूमिका या संमेलनात घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीत भाजपला थांबविण्यात यश आले, याचा अनुभव वर्ध्याच्या लोकसभेत देखील आला आहे. त्याच प्रमाणे पुढे देखील या विजयी रथ अशीच घोडदौड करणार असल्याचा विश्वास भारत जोडो अभियानचे मार्गदर्शक तुषार गांधी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलाय. 

महायुतीकडे 200 तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार

महाराष्ट्र विधानपरिषदची निवडणूक (Vidhan Parishad Election) 12 जुलैला पार पडणार आहे. त्यामुळे आता सर्वच पक्षांनी खबरदारीचा उपाय म्हणून आमदारांच्या बैठका घेणे. तसेच आमदारांना होटेलमध्ये ठेवणं सुरू केल्याचं पाहिला मिळतं आहे. सध्या महायुतीकडे एकूण 200 आमदार आहेत तर महाविकास आघाडीकडे 65 आमदार आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला स्वबळावर आपले उमेदवार निवडूण आणायचे असतील तर अजुन 4 मतांची गरज आहे तर ठाकरे गटाला आपला उमेदवार निवडून आणायचा असल्यास 8 मतांची गरज आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

2024-07-10T06:37:22Z dg43tfdfdgfd