लाईफस्टाईल

Trending:


NHM Wardha Recruitment 2024: योग शिक्षकांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! जाणून घ्या पात्रता निकष, 'असा' करा अर्ज

NHM Wardha Vacancy 2024: महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानात योग शिक्षक किंवा योग शिक्षिका या पदाच्या चार जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १६ जुलै २०२४ सुरू झाली आहे. यासाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २४ जुलै आहे. इच्छुक उमेदवारांना यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज भरावा लागणार आहे. या नोकरीसाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता आणि कागदपत्रांविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ.


Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीय निवासस्थानी गळती

Vijay Wadettiwar Home leakage : वडेट्टीवारांच्या शासकीयनिवासस्थानी गळती विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या शासकीय निवासस्थानाला गळती काही महिन्यांपूर्वीच या निवासस्थानावर लाखो रुपये खर्च केले होते


Nashik Majha Impact : नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं

नाशिक : नाशिकमधील (Nashik News) डेंग्यूच्या (Dengue ) प्रादुर्भावावरुन काँग्रेस पक्ष आणि ठाकरे गट आक्रमक झाला आहे. महापालिका इमारतीच्या गच्चीवर डासाची उत्पत्ती स्थळे असल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. त्यानंतर आज काँगेस पदाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्ताना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट दिली. तर काँग्रेसपाठोपाठ ठाकरे गटाचे पदाधिकारी देखील मनपा आयुक्त अशोक करंजकर यांच्या भेटीसाठी पोहोचले. ताबडतोब डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्याची मागणी पदाधिकाऱ्यांनी केली. नाशिक शहरात जागोजागी डेंग्यूचे डास, अळ्या दिसत असून घराघरात डेंग्यूचे रुग्ण आढळत आहेत. डेंग्यूचा उद्रेक रोखण्यात अपयशी ठरलेल्या नाशिक महापालिकाने नागरिकां जबाबदार धरत दंडाची रक्कम दुपटीने वाढवली आहे. नागरिकांना दंड आकारणी करणाऱ्या मनपा प्रशासनाची परिस्थिती लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वतः मात्र कोरडे पाषाण अशी झाली आहे.महापालिका मुख्यालयाच्या इमारतीबरच पाण्याचे डबके आणि त्यात डासांच्या अळी एबीपी माझाच्या कॅमेरात कैद झाल्या आहेत. यानंतर राजकीय पक्षाच्या नेत्यांनी मनपाचा धावा करत आयुक्तांना धारेवर धरले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी डेंग्यू डासांची प्रतिकृतीच मनपा आयुक्तना भेट दिली. तर ठाकरे गटाचे खासदार राजभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मनपा प्रशासनाला अल्टीमेटम देत आंदोलनाचा इशारा दिलाय.


Neral Gram Panchayat: नेरळ ग्रामपंचायतीत भूकंप! सरपंचांवर आरोप करत सदस्यांनी दिले राजीनामे, जिल्ह्यात खळबळ

Neral gram panchayat sarpanch accused of corruption: नेरळ ग्रापपंचायतीतील उपसरपंचांसह सर्व सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. राजीनामा दिलेल्या सर्वांनी सरपंच उषा पारधी यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे.


Marathwada Drought : मराठवाड्यातली धरणं कोरडी ! पावसाळ्यातही टँकरवर तहान

जुलै महिना संपत आला तरी मराठवाड्यातील धरणं तळालाच जायकवाडीसह,येलदरी आणि लोअर दुधनाच्या पाणी साठ्यात वाढ नाही पावसाळ्याचे दोन महिने संपत आले तरीसुद्धा मराठवाड्यात म्हणावा तसा पाऊस न झाल्याने छोटे आणि मोठे प्रकल्प अजूनही तळालाच आहेत जायकवाडी सह लोअर दुधना,येलदरी आणि मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमधील प्रकल्पांमध्ये अजुनही समाधानकारक पाणी साठा झालेला नाही त्यामुळे येत्या काळात मराठवाड्यातील सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची परिस्थिती बिकट होऊ शकते.आता यंदाच्या पावसाळयाचे 73 दिवस शिल्लक आहेत याच दिवसांत पाऊस चांगला पडून हे प्रकल्प भरणार का असा प्रश्न निर्माण झालाय जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातही केवळ 5.60% एवढाच पाणी साठा असलेल्या परभणीच्या लोअर दुधना प्रकल्पातून मराठवाड्यातील पाणी साठ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज क्षिरसागर यांनी...


Salt Water Lakes: खाऱ्या पाण्याच्या सरोवरांचे मोल

Salt Water Lakes: जगभरातील बहुतांश खाऱ्या पाण्याची सरोवरे आक्रसत आहेत, त्यांच्या पाण्याची गुणवत्ता खालावत आहे. त्यामुळे प्रादेशिक जलस्रोतांच्या शाश्वततेसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.


Uddhav Thackeray : विधानसभेला रसद मिळणार, उद्धव ठाकरे गटात आनंदी आनंद, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक अगदी तीन महिन्यांवर आली आहे. विधानसभेच्या तोंडावरच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मोठा दिलासा मिळालेला असून पक्षनिधी स्वीकारण्यास त्यांना निवडणूक आयोगाने परवानगी दिलेली आहे.


Samruddhi Expressway : विधानसभेआधी समृद्धीचा शेवटचा टप्पा खुला होणार , सप्टेंबर अखेरीस काम पूर्ण होणार

मुंबई : मुंबई आणि आसपासच्या परिसरात राहणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा (Samruddhi Expressway) शेवटचा टप्पा विधानसभा निवडणुकीआधी सुरू करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात समृद्धीचं काम पूर्ण होणार आहे. इगतपुरी ते आमणे हा 76 किलोमीटरचा टप्पा 98 टक्के पूर्ण झाल्याची माहिती MSRDCचे एमडी अनिलकुमार गायकवाड यांनी दिली. सध्या नागपूरहून मुंबईला येताना इगतपुरीला एक्स्प्रेसवे संपतो, आणि तिथून मुंबई-नाशिक महामार्ग...


जयंत पाटलांच्या पराभवामुळे उरणचा पेच

जयंत पाटील यांच्या पराभवानंतर शेकाप आणि मविआ यांच्यातील बिघडलेल्या समीकरणांचा महायुतीला फायदा होऊ शकतो


TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70

TOP 70 News | सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट TOP 70 ABP Majha केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी होणार बैठक. भाजप कोअर कमिटीची आज आणि उद्या मुंबईत मॅरेथॉन बैठक, आगामी विधानसभा निवडणुकीत किती जागा लढवायच्या याबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती. विधानसभा निवडणुकीसाठी आजपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली बैठकांचं सत्र, मंत्री, नेते, उपनेते, शहर आणि जिल्हाप्रमुख अशा साठ जणांची आज बैठक, अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता. शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर, कार्यकर्त्यांची घेणार बैठक. शरद पवारांच्या आज विविध बैठका, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा. ठाकरे गटाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात ४५ दिवस निष्ठा यात्रा काढण्यात येणार, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज कुडाळमधील माणगावात निष्ठा यात्रेची सुरुवात होणार.


MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, गट-ब अन् गट-क च्या पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्रातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी केला आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीतील सर्व शासकीय कार्यालयातील गट ब अराजपत्रित व गट क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत. या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणणार, यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून...


करीअर मंत्र

आपल्या मुलीचे आयसीएससीचे मार्क पाहता हा अभ्यासक्रम ती उत्तम पद्धतीत पार पाडेल याची खात्री बाळगावी. मात्र कॉलेज नसल्यामुळे दैनंदिन अभ्यासात ठरावीक वाचनाची शिस्त व लेखनाचा सराव गरजेचा राहतो.


Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर आजपासून 2 दिवस ब्लॉक, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग हा दोन दिवस दिवसातून चार तास बंद राहणार आहे. मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसापासून सुरू आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्गावर आज आणि उद्या असा दोन दिवस ब्लॉक घेण्यात येणार आहे.


Vikram Misri: अनुभवी मुत्सदी

Vikram Misri: ​​साठ वर्षांचे विक्रम मिस्री १९८९चे आयएफएस बॅचचे अधिकारी. त्यांचा जन्म श्रीनगरचा. ग्वाल्हेरमध्ये त्यांनी शालेय शिक्षण घेतले, पुढे दिल्ली विद्यापीठातून पदवी आणि जमशेदपूरमधून एमबीए पूर्ण केले.


Chanakya Niti : अशा महिलेशी संबंध ठेवल्याने उद्ध्वस्त होतं पुरुषांचं आयुष्य

आचार्य चाणक्य यांनी राजकीय, आर्थिक, वैयक्तिक असे अनेक धडे दिलेत. अगदी कुणासोबत राहावं आणि कुणासोबत नाही हेसुद्धा त्यांनी सांगितलं आहे. त्याच एका महिलेचा समावेश आहे. या महिलेच्या बिलकुल जवळ जाऊ नका, असा सल्ला आचार्य चाणक्य यांनी दिला आहे. बऱ्याचदा महिलांनी पुरुषांची फसवणूक केल्याची प्रकरणं तुम्हाला माहिती असतील. काही महिला पैशांसाठी पुरुषांशी जवळीक साधतात. त्यांना लुटून जातात. पण एक अशी महिला जिच्या जवळ गेलात तर पुरुष आयुष्य गमावून बसतात, असं चाणक्य म्हणाले. ।।अगम्यागमनादायुर्यश: पुण्यानि क्षीयन्ते।। चाणक्यनीतीतील या श्लोकात आचार्य यांनी त्या महिलेचा उल्लेख केला आहे. या श्लोकात सांगितल्यानुसार वेश्यासारख्या महिलेच्या सहवासात राहिल्याने यश, पुण्य आणि आयुष्य नष्ट होतं. सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संंबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करतं असं नाही. आचार्य चाणक्य यांचे विचार आचरणात आणावे की नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)


Zero Hour Maharashtra Assembly Election : MVA vs Mahayuti ? जागावाटपावरुन कुणामध्ये जास्त मतभेद?

नमस्कार मी, विशाल पाटील... झीरो अवरमध्ये आपलं स्वागत.. लोकसभेच्या निकालांचं विश्लेषण पूर्ण होण्याआधीच.. राज्यात विधानसभांना वेग आलाय.. कारण, अवघ्या तीन महिन्यांवर महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आलीय.. आणि त्यामुळेच राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षांनी आपआपल्या पद्धतीनं कामाला सुरुवात केलीय... भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरद पवार, काँग्रेस पक्षासह जवळपास प्रत्येक राजकीय पक्षानं चाचपणी सुरु केलीय.. आणि राजकीय बैठकांनी जोर धरलाय.. भाजपच्या कोअर कमिटीची आज बैठक आहे.. आणि उद्या महाराष्ट्र प्रभाऱ्यांच्या उपस्थितीत पुन्हा भाजपच्या नेत्यांची बैठक असेल...तिकडे आजच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडलीये.. तर आज सकाळपासून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या पक्षांच्या बैठकांचा धडाकाच लावलाय.. ज्याची सुरुवात पिंपरीमधून झालीये... महायुतीच्या बैठकांचं विश्लेषण करणार आहोतच.. त्याचसोबत आपण महाविकास आघाडीमधील बैठकांचं सत्रही सांगतो.. जिथं शरद पवारांनी कालपासूनच अजित पवारांसोबतच्यांना पुन्हा पक्षात घ्यायला सुरुवात केलीये.. तिथं काँग्रेसनं लोकसभेच्या यशाची विधानसभेत पुनरावृत्ती करण्यासाठी दिल्लीत विषेश बैठकांचं आयोजन केलंय.. तर उद्धव ठाकरेंनी गेल्या आठवड्यापासूनच पदाधिकाऱ्यांसोबत बैठका सुरु केल्यात.. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महायुती असो की महाविकास आघाडी.. दोन्ही आघाड्यांमधील प्रत्येक पक्षाच्या बैठकीत... विधानसभेच्या जागांवरुन दावेदारी सुरु झाल्याचंही समोर येतंय.. प्रत्येक पक्ष आमूक एक आकडा सांगतोय.. त्यावरुनही संघर्ष होवू शकतो का? की आकड्यांच्या चर्चा फक्त कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यापुरत्याच आहेत.. या सगळ्याची चर्चा करणार आहोतच.. मात्र, सुरुवातीला आजचा पहिला प्रश्न... त्यासाठी जावूयात पोल सेंटरला... बैठकाच्या चर्चेची सुरुवात करुयात भाजपच्या बैठकीनं... महाराष्ट्रात लोकसभेला सर्वाधिक फटका भाजपला बसलाय.. तोच फटका विधानसभेत बसू नये म्हणून पार्टी विथ डिफरन्स म्हणवणाऱ्या भाजपनं हालचाली वाढवल्यात.. उद्या पक्षाचे महाराष्ट्र प्रभारी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत अत्यंत महत्वाची बैठक पार पडणार आहे.. त्याआधीच आज राज्यातील नेत्यांची बैठक पार पडली.. सलग दोन दिवस चालवणाऱ्या याच मॅरोथॉन बैठकांमध्ये महाराष्ट्र भाजपचे साठ पेक्षा जास्त पदाधिकारी असणार आहेत.. त्यात मंत्री, नेते, उपनेत, शहर आणि जिल्हाप्रमुख अशांचा समावेश असेल.. आणि याच बैठकांमधून विधानसभेचं विचारमंथन केलं जाईल...भाजपच्या मित्रपक्षांकडून विधानसभांच्या जागांवर दावेदारी सुरु झालीये.. त्यामुळे भाजपच्या याच बैठकांकडे सगळ्याचं लक्ष लागलंय.... विधानसभा निवडणुकीची रणनीती आखण्यासाठी भाजपची बैठक होत असताना, शिवसेनेचीही वर्षा बंगल्यावर बैठक पार पडली.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती.. या बैठकीला मंत्री, नेते, आमदार, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, प्रवक्ते उपस्थित होते.. या बैठकीत शिवसेनेकडून विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी सुरू झालीय.. त्यासाठी १०० निरीक्षक आणि तेवढेच प्रभारीसुद्धा नेमण्यात आलेत.. प्रत्येक निरीक्षक आणि प्रभारी त्यांच्यावर जबाबदारी दिलेल्या एकाच मतदारसंघासाठी काम करणार आहेत.. त्याचबरोबर आज घडीला भाजप आणि राष्ट्रवादीकडे असलेल्या जागांवर लक्ष द्यायचंही नाही.. याशिवाय बाकी जागांचा विचार करावा...तिथेच लक्ष केंद्रीत करून निवडणुकीची तयारी करणार आहेत.. असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत.. इतकंच नाही तर शिंदेकडून मुंबईत सतरा जागा लढवण्याचा विचार आहे.. सरकारी योजना सर्व मतदारसंघात पोहोचवा... सदस्य नोंदणीवर भर द्या... शिवसेना युवासेना महिला आघाडी पदावर नेमणूक करा.. असे आदेश आजच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले... तसंच पक्षांतर्गत वाद, नाराजी तसंच स्थानिक राजकारणाबाबतही माहिती घेण्यात आली... विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाजप-शिवसेनेच्या आढावा बैठका, सभा, विशेष मोहीम घेणे सुरू असताना.. महायुतीतला आणखी एक पक्ष राष्ट्रवादीनेही कंबर कसलीय.. लोकसभेत अवघ्या ६ जागा लढलेल्या अजितदादाच्या गटाने, पुन्हा एकदा विधानसभेच्या ८० जागा लढणार असल्याचं जाहीर केलंय.. केवळ एवढंच नव्हे तर कॅबिनेट मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांनी, राष्ट्रवादी विदर्भातल्या २० जागा लढवण्याचा विचार करत असल्याचंही सांगितलंय.. राष्ट्रवादीने ८० जागांची घोषणा करण्याची ही पहिली वेळ नाही.. याआधीही अनिल पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल यांनीही.. राष्ट्रवादी ८० ते ९० जागा लढणार असल्याचं वक्तव्य केलं होतं... अजित पवारांनीदेखील पक्षाच्या बैठकीत बोलताना हीच री ओढली होती.. त्यामुळे लोकसभेत महायुतीकडून सर्वात कमी जागा लढणाऱ्या राष्ट्रवादीला, विधानसभेत तरी मागणी केलेल्या जागा वाट्याला येतात का?... लोकसभेच्या निकालांनंतर संघाकडून वारंवार, राष्ट्रवादीशी युतीवरून भाजपला मिळालेल्या कानपिचक्यांनंतर... महायुतीत राष्ट्रवादीचा जागावाटपात योग्य सन्मान राखला जाणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणारय.. दरम्यान धर्मराव बाबा अत्राम यांनी जागावाटपाबाबत नेमका काय दावा केला ते पाहूया...


बॉर्डरवर पहारा देत होते BSF चे जवान, अचानक झाल्या मोठ्या हालचाली; तेवढ्यात...

मुंबई : सीमा सुरक्षा दलाने भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेवर एक यशस्वी मोहीम राबवली. गुप्तचर खात्यानं दिलेल्या माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली. त्यात एका संशयिताला अटक करून सहा कोटी रुपयांचं सोनं बीएसएफनं जप्त केलं आहे. भारत-बांगलादेश सीमेवर एक मोठी घडामोड घडणार असल्याची माहिती दक्षिण बंगालच्या सीमेअंतर्गत येणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या 32 व्या बटालियनला गुप्तचर विभागाकडून माहिती मिळाली. ही माहिती मिळताच हलदरपारा सीमा चौकीवर असलेले जवान...


Shiv Sena Meeting on Assembly Election : विधानसभेसाठी शिवसेनेने कंबर कसली, 'वर्षा'वर बैठक

विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय.. शिंदेंच्या शिवसेनेनंही आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेतली.. विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं केलीय.. त्यासाठी १०० विधानसभा निरीक्षक आणि प्रभारीही नेमण्यात आले आहेत.. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत सीएम यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनाच्या बैठकीला सुरुवात, विधानसभेसाठी किती जागा मागायच्या यावर देखील चर्चा होणार शिवसेनेच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यानी घेतलेले निर्णय विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले, त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले गेले, हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करणार, एकच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आणि निवडणुकीची तयारी करणार, मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश सरकारी योजना सर्व मतदारसंघात प्रसारित करा. सदस्यनोंदणीवर भर द्या. शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा.


Olympic 2024: पॅरिसचे ६५वर्षीय महापौर ऑलिम्पिक पूर्वी का उतरले नदीत? पाहा VIDEO

Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ ला सुरूवात होण्यापूर्वी पॅरिसच्या महापौर सेन नदीत उतरल्या, पण यामागचं नेमकं काय आहे कारण, जाणून घ्या.


Breaking News Live Updates: स्पाइसजेटच्या महिला कर्मचाऱ्याने CISF जवानाला मारली थप्पड

Maharashtra Breaking News Today: महाराष्ट्रामध्ये आजचा दिवस विधानसभेच्या अधिवेशनामुळे गाजण्याची शक्यता आहे. याचप्रमाणे देशभरातील वेगवेगळ्या घडामोडींसहीत परदेशातील घडामोडींवरही या ब्लॉगच्या माध्यमातून आपलं लक्ष राहणार आहे. जाणून घ्या क्षणोक्षणाच्या अपडेट्स...


Cave On Moon: चंद्रावरील संशोधनाचे द्वार

Cave On Moon: ही गुहा म्हणजे लाव्हाच्या नलिका म्हणजे नैसर्गिक बोगदे. लाव्हाचे प्रवाह या पृष्ठभागाखाली असतात. या गुहा मागील ५० वर्षे गूढ होत्या. परंतु, आता ‘नासा’च्या लुनार रीकॉनेसन्स ऑर्बिटरने दिलेल्या डेटाने हे सिद्ध केले आहे.


Donald Trump Attack : चुकलेला नेम, पलटलेले फासे

Donald Trump Attack : डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकीचे सारे चित्रच पालटून गेले आहे. त्याविषयी...


Abu Azmi Full PC : मशीद तोडली...आमचं रक्त खवळतंय; विशाळगड प्रकरणावर आझमी आक्रमक

धानसभा स्वबळावर लढण्याचा हा संकेत आहे आमचा आम्ही प्रयत्न करू आघाडीत राहण्याचा On विशाळगड कुठे अधिकृत बांधकाम होत आहेत तर ते सरकारची लक्ष ठेवण्याची जबाबदारी जेव्हा बनलं तेव्हा सरकार प्रशासन कुठे होतं कट्टर पंथी जाऊन तिकडे तोडण्याचा प्रयत्न करतात प्रशासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी जाऊन तिकडे तोडक कारवाई करावी मशिदी तोडल्या जात आहेत तर महाराष्ट्राची लाज देशात जात आहे आमचं रक्त खवळत आहे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजनेला आमचा सपोर्ट आहे मात्र आमचे तीर्थक्षेत्र तोडले जात आहेत त्यांना तुरुंगात टाका सर्व धर्माच्या लोकांना सहभागी करून ही तीर्थक्षेत्र योजना लागू करावी फक्त एका धर्मासाठी नको मुसलमान या देशात राहत नाही का ते टॅक्स भरत नाहीत का? एका समाजाला उपेक्षित केलं जात आहे सर्वांसोबत सर्वांचा विकास व्हायला हवा आमची मागणी आहे


Aanvi Kamdar Death : जीवघेणा रील फॅक्टर, अन्वी कामदारचा मृत्यू Special Report

सध्या सोशल मीडिया हा आपल्या जगण्याचा जणू काही अविभाज्य भाग बनलाय. आणि अनेक इन्फ्लुएन्सरसाठी हाच सोशल मीडिया हे कमावण्याचं साधनही आहे. मात्र रील बनवण्याच्या नादात सोशल मीडियावर इन्फ्लुएन्सर असणाऱ्या एका तरूणीचा जीव गेलाय... थेट तीनशे फूट खोल दरीत कोसळल्यानं तिचं आयुष्यच संपलंय... रीलस्टार अन्वी कामदार कोण होती? (Who Is Aanvi Kamdar) स्क्रीनवर दिसणाऱ्या या मुलीचा चेहरा तुम्ही अनेकदा रील्स स्क्रोल करताना पाहिला असेल. हीचं नावय अन्वी कामदार. ती 27 वर्षांची होती. अन्वी डिजिटल क्रीएटर म्हणून ओळखली जायची, मात्र पेशाने ती CA होती. इन्स्टाग्रावर तिचे 2 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. the glocal journal नावाने तिचं इन्स्टाग्रावर अकाउंट आहे. याच अकाउंटवर ती ट्रॅव्हल आणि लाईफस्टाईलसंदर्भात व्हिडीओ पोस्ट करायची. हळूहळू अन्वी नावारुपाला येत होती. देशात परदेशात फिरुन वेगवेगळे व्हिडीओ ती आपल्या अकाउंटवर पोस्ट करत होती. पावसळ्याचा आनंद लुटण्यासाठी नुकतीच ती माणगावच्या कुंभे धबधब्यावर आपल्या 6 ते 7 मित्रांसह गेली होती आणि तिथेच तिला मृत्यूने कवेत घेतलं.


Supreme Court Order: अधिकारांची लक्ष्मणरेषा

Supreme Court Order: ​​बिहार सरकारने सन २०१५ मध्ये तांती/तंतवा समाजाला अतिमागास (ईबीसी) यादीतून बाहेर काढून पान/सावासी यांच्या जोडीने अनुसूचित जातींच्या यादीत अधिसूचना काढून समाविष्ट केले होते.


Nomophobia: नोमोफोबिया म्हणजे नेमकं काय? व्यक्तीला 'या' गोष्टीची वाटू लागते भीती

Nomophobia: मोबाईल फोनचा जास्त वापर करणे हा देखील एक आजार मानला जातो. आज आम्ही तुम्हाला नोबोफोबियाबद्दल सांगणार आहोत.


Central Railway Timetable : ऑगस्टपासून मध्य रेल्वेचं नवं टाईमटेबल, प्रवाशांना दिलासा, रोज १० दादर लोकल

Mumbai Local New Timetable : मध्य रेल्वेच्या उपनगरी मार्गावरील गाड्यांचे नवीन वेळापत्रक ऑगस्टपासून लागू होणार असून, मात्र नवीन वेळापत्रकात कोणत्याही नव्या लोकल फेऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही.


Maharashtra Superfast : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर : 18 July 2024 : ABP Majha

दिड हजारात काय होतंय?, लाडक्या बहिणींनाही १० हजार रूपये द्या, खासदार संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांना टोला सरकारने १५०० रुपयांत महिलांची बोळवण केली, मतदानासाठी 1500 रुपये देत आहात का? यशोमती ठाकूूर यांचा सवाल उपस्थित करत टीका. वाघनखांचं स्वागत मुंबईपासून साताऱ्यापर्यंत करायला हवं होतं, सरकारनं भाड्याने वाघनखं आणली, ती वाघनखं मिळवलेली नाहीत. वाघनखांवरुन जयंत पाटलांची प्रतिक्रिया, वाघनखं शिवरायांची नाहीत, काही इतिहासकारांचा दावा, वाघनखांबाबात जाणकरांचं मत लक्षात घेणं गरजेचं, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचं विधान. विरोधी पक्षाचे नेते म्हणजे इतिहासकार नाही, त्यांचं पोट दुखणं स्वाभाविक, वडेट्टिवारांनी केलेल्या टिकेवरुन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांचं प्रत्युत्तर. छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श घोटाळ्यात फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांची जिल्हा उपनिबंधक सहकारी कार्यालयात धडक, आतापर्यंत प्रशासनाने काय केलं माजी खासदार इम्तियाज जलील यांचा अधिकाऱ्य़ांना सवाल. बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत मनोज जरांगेंची भेट, दोघांमध्ये बऱ्याच वेळ चर्चा, २० जुलैपासून जरांगेंचा आमरण उपोषणाचा इशारा. डेंग्यूच्या प्रश्नावर काँगेस आणि ठाकरे गट आक्रमक, नाशिकमध्ये मनपा आयुक्तना काँगेस पदाधिकाऱ्यांना डेंग्यू डासाची प्रतिकृती भेट. नाशिक महापालिकेने छतावरील डासांचं उत्पत्ती स्थळ हटवलं, एबीपी माझाच्या बातमीनंतर महापालिकेला जाग, काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून साथ रोगांवर नियंत्रण आणण्याचे निवेदन.