बातम्या

Trending:


भूगोलाचा इतिहास : ‘त्या’ भाकिताने बदलला जगाचा इतिहास

पॅरिसही जिंकून ते जर्मनीच्या दिशेने सरकू लागले. अशा प्रकारे नॉर्मंडीची चढाई हे अंतिम विजयाचे पहिले पाऊल ठरले.


Odissa Accident : ओडिशामध्ये बोट उलटून एकीचा मृत्यू

Odissa Accident : ओडिशामध्ये बोट उलटून एकीचा मृत्यू ओडिशात बोट उलटून एकाचा मृत्यू, आतापर्यंत 48 लोकांना वाचवण्यात यश, तर अजूनही बेपत्ता असलेल्या 7 जणांचा शोध सुरु.


Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा दावा

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांबद्दल मोठा दावा आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रिपदासाठी तयार करतो आणि मी स्वतः दिल्लीच्या राजकारणात जातो असं देवेंद्र फडणवीस मला म्हणाले होते, असा दावा उद्धव ठाकरेंनी केला आहे.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय. अमित शाह भाजपचे अध्यक्ष झाल्यापासून भाजपचा सूर बदलला, असंही उद्धव म्हणाले.


NCERT local language syllabus: मातृभाषेत घेता येणार पूर्व प्राथमिक शिक्षण... NCERT कडून ५४ स्थानिक भाषेतील अभ्यासक्रम जाहीर

NCERT local language syllabus: २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेल्या नव्या शैक्षणिक धोरणाद्वारे शिक्षण प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील असे अनेक नवीन बदल करण्यात आले. याच अंतर्गत करण्यात आलेला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा बदल म्हणजे प्रादेशिक किंवा मातृभाषेतील शिक्षणाला मिळालेले महत्त्व. हेच विचारात घेऊन 'एनसीईआरटी'द्वारे देशभरातील एकूण ५४ स्थानिक भाषांमध्ये अभ्यासक्रम तयार करून पब्लिश करण्यात आले आहेत. त्याविषयी अधिक माहिती...


Rohit Pawar On Ajit Pawar: भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही, भाजपची चाल; रोहित पवारांची अजित पवारांवर बोचरी टीका

पुणे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर काका-पुतण्यांमध्ये वादावादी आणि टीका टीपण्णी सुरुच असल्याचं चित्र आहे. अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांवर हल्लाबोल करताना दिसत आहे. त्यातच रोहित पवारांनी अजित पवारांवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपनं अजित पवारांना लोकल नेता केलं, त्यांनी बारामतीत अडकून राहावं ही भाजपची चाल असल्याची बोचरी टीका रोहित पवारांनी अजित पवारांवर केली आहे. भाजपनं अजित पवारांना लोकल नेता बनवलं, शरद पवारांच्या नेतृत्वात काम करायचे...


Devendra Fadnavis: वर्धात उरलीसुरली काँग्रेस शरद पवारांनी संपवली; देवेंद्र फडणवीसांनी डागली तोफ

Devendra Fadnavis On Sharad Pawar : वर्ध्याची भूमी ही स्वातंत्र्याची भूमी आहे. खऱ्याअर्थाने या ठिकाणी भारताचा झेंडा लागला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. महात्मा गांधी यांची देखील ही पुण्यवान भूमी आहे. याच ठिकाणी महात्मा गांधींनी सांगितलं होतं की, देशाला स्वातंत्र्य मिळाला आहे. देशात आता काँग्रेसची (Congress) गरज नसून तिला विसर्जित केले पाहिजे. मात्र, त्यावेळी काँग्रेसवाल्यांनी गांधीजींची गोष्ट ऐकली नाही. मात्र, गांधीजींची गोष्ट वर्धेकरांनी ऐकली...


ABP Majha Headlines : 1 PM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 1 PM :20 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी तयार करून मी दिल्लीत जाणार, देवेंद्र फडणवीसांनी मला आश्वासन दिलं होेतं, इंग्रजी वृत्तपत्राच्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा विशाल पाटलांचा डीएनए वसंतदादा पाटलांचा आहे, त्यांचा आणि माझा उत्तम संवाद, संजय राऊत यांचं वक्तव्य, पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील असे राऊतांचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी नांदेडमध्ये दाखल, नांदेडची सभा झाल्यावर परभणीत प्रचार करणार पंतप्रधान मोदी सांगली आणि सोलापूरमध्ये ३० एप्रिल रोजी सभा घेणार, माढा आणि धाराशिव मतदारसंघांमध्ये देखील महायुतीला फायदा होणार शरद पवारांचा विखे पाटलांवर जोरदार निशाणा...निलेश लंकेंना उमेदवारी देऊ नका, विखेंना निलेश लंकेंची भीती..


धुरंधर नेत्याच्या अंतरंगात

राष्ट्रपती भवनाचा शेकडो एकरांचा परिसर, असंख्य दालने, प्रचंड आकाराचे उद्यान हा कॅनव्हास आणि दुसरीकडे रोज १८ तास काम करणारे प्रणवदा, हे गणित कसे जमणार याची चिंता त्यांच्या भगिनींना होती.


तुरूतुरू

‘तुरूतुरू’ हा शब्द तिच्या चालण्याचे चपखल वर्णन करणारा. खरा शब्द तुरतुर. विस्तारित शब्दरत्नाकरमध्ये याचा अर्थ येतो लवकर, पाय जमिनीला विशेष न टेकता, वरवर.


शिवाजीराव जोंधळे यांचं निधन

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रातील शिक्षणसम्राट म्हणून ख्याती असलेले कै.स.ह.जोंधळे शिक्षण समूहाचे शिवाजीराव जोंधळे यांचे शुक्रवारी (दि.१९) दिर्घ आजाराने निधन झाले. गेल्या काही महिन्यांपासून एका दीर्घ आजाराशी ते झुंज देत होते. मुंबईत ग्लोबल हॉस्पिटलमध्ये आज (शुक्रवारी) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. उद्या सकाळी १० वाजता डोंबिवली येथे त्यांच्या शिवनेरी बंगल्यावर अंतिम दर्शन करिता त्यांचे पार्थिव ठेवले …


Pune Phoenix Mall Fire: पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये भीषण आग, मॉलमध्ये अनेकजण अडकल्याची भीती

Pune fire: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील फिनिक्स मॉलमध्ये आग लागली आहे. आग लागल्याची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.


Brahmos Missile : 'या' शेजाऱ्यानं वाढवलं चीनचं टेन्शन! करारानुसार भारतानं सुपूर्द केलं ब्राह्मोस मिसाइल

Brahmos Missile Deal : भारताने ब्रह्मोस क्षेपणास्त्राची पहिली खेप फिलिपाइन्सला दिली आहे. तब्बल ३७.५ दशलक्ष अमेरिकी डॉलर्सचा करार भारताने केला आहे.


Lok Sabha Election 2024 : विदर्भाच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसची पीछेहाट का झाली?

[author title=”प्रमोद चंचूवार” image=”http://”][/author] विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादल्यानंतर देशभर त्यांच्याविरोधात जनक्षोभ उसळला असताना 1977 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत विदर्भातील बहुसंख्य जागांवर काँग्रेसच विजयी झाली होती. वसंतराव साठे, वसंतराव नाईक, गेव्ह आवारी यांच्यासारखे दिग्गज तेव्हा काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेवर निवडून गेले होते. (Lok Sabha Election 2024) काँग्रेसला …


आली ती घटिका!

हा हा म्हणता दिवस जात राहिले, प्रचाराच्या तोफा धडाडत राहिल्या आणि पहिल्या टप्प्यातील मतदान पारसुद्धा पडले. आता दुसरा, तिसरा ते सातवा टप्पा संपेपर्यंत मतदान होत राहील. त्यानंतर उत्सुकता असेल ती 2 जून रोजी लागणार्‍या निकालाची. घरोघरी जाऊन प्रचार करणे प्रचंड उन्हाळ्यात जवळपास अशक्य असते. पूर्वी कोपर्‍याकोपर्‍यावर छोट्या-मोठ्या सभा घ्यायचे, तेही आजकाल बंद पडले आहे. जो …


Nagpur News : नागपूरमध्ये भाजप-काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा; काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या टेबलवरचं मशीन उचलून आपटलं

Lok Sabha Election 2024 Nagpur : नागपुरात काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्ये वाद झाल्याची घटना घडली. नागपुरातील (Nagpur) जरीपटका आणि नारा रोड या दोन भागांमध्ये दुपारी 12 आणि 1 वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राजवळ लावलेल्या त्यांच्या टेबलवरून मतदारांना मतदान केंद्रात जाण्यापूर्वी मदत म्हणून मतदार यादी क्रमांक, खोली क्रमांक कळवण्यासाठी जी छोटी कागदी स्लिप दिली. त्या...


पुन्हा ईव्हीएम एके ईव्हीएम!

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत सुरू असणारा गदारोळ किंवा कज्जेदलाली नवी नाही. मात्र, त्यातही राजकीय पक्षांच्या भूमिकेत सातत्य नाही. पराभव होऊ लागला की सगळ्याच पक्षांचा ईव्हीएमवरचा विश्वास उडू लागतो...


जबाबदारीची भावना रुजावी

‘सर्वांत मोठी लोकशाही’ असे आपल्या देशाबाबत आपण म्हणत असताना या मतदानात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. सुशिक्षित वर्ग मतदानाबाबत बराचसा उदासीन असतो, असे लक्षात येते. ही स्थिती बदलायला हवी, ही मानसिकता बदलायला हवी.


अनपेक्षित संकटांसाठीची तयारी

[author title=”डॉ. धनंजय त्रिपाठी विश्लेषक” image=”http://”][/author] आजच्या काळात सुरक्षेचा मुद्दा हा केवळ सीमा सुरक्षा या पारंपरिक विचारांपुरताच मर्यादित नसून, आता त्यात अनेक पैलू जोडले गेले आहेत. उदा. आपल्या देशातील आर्थिक प्रणालीवर सायबर हल्ला झाला तर दोन ते तीन दिवस अर्थव्यवस्था विस्कळीत राहू शकते किंवा शेअर बाजारात डिजिटल घुसखोरी केली गेली, तर बाजार ठप्प पडेल. याशिवाय …


Narendra Modi Nanded Full Speech : जशी अमेठी सोडली, तसं राहुल गांधींना वायनाड सोडावं लागेल- मोदी

Narendra Modi Nanded Full Speech : जशी अमेठी सोडली, तसं राहुल गांधींना वायनाड सोडावं लागेल- मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज परभणीत महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ सभा घेणार आहेत.शहरातील लक्ष्मी नगरी या परिसरामध्ये ही सभा होणार असून सभेची तयारी पूर्ण झालेली आहे भव्य दिव्य व्यासपीठ,तीन हेलिपॅड मोठी आसन व्यवस्था अशी सर्वच तयारी पूर्ण झालेली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती असणार आहे याच सभेचा आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी..


विखेंसाठी थोरातांना पहाटे झोपेतून उठविले होते, शरद पवारांनी सांगितला त्या लोकसभेचा किस्सा

Nilesh Lanke : या लोकांबद्दल काय सांगायचं, जे लोक अनेक पक्ष बदलून बसलेत. कधी शिवसेनेत होते, नंतर काँग्रेसमध्ये आले विरोधी पक्षनेता झाले, विरोधी पक्षनेते पद उपभोगून नंतर भाजपमध्ये गेले आणि आता मंत्री म्हणून त्या ठिकाणी बसलेत आणि ते आज टीकाटिपणी करत असतात, अशा शब्दात शरद पवार यांनी विखेंना लक्ष्य केले.


Sharad Pawar Full PC :भाजपचा 400 पारचा नारा चुकीचा; मविआला 50 टक्के पेक्षा जास्त जागा मिळेल-शरद पवार

Sharad Pawar Full PC :भाजपचा 400 पारचा नारा चुकीचा; मविआला 50 टक्के पेक्षा जास्त जागा मिळेल-शरद पवार भाजपचा 400 पारचा नारा मला चुकीचा वाटतो... उन्हाच्या तीव्रतेमुळे मतांची टक्केवारी कमी होत आहे... 10 वर्षात शरद पवारांनी काय केलं असं भाजपवाले विचारतात, 10 वर्षात सत्तेत मी नाही तर भाजप सत्तेत होते... पक्ष बदलावरून शरद पवारांची विखेंवर टीका... मविआला 50 टक्के पेक्षा जास्त जागा मिळेल... शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास... नगरची निवडणूक मविआ विरुद्ध महायुती अशी नसल्याचे चित्र रंगवले जात आहे यावर शरद पवारांचा विखेंवर जोरदार निशाणा... दुसऱ्याचे नाव घेऊन स्वतःचे महत्व वाढवणे काही शहाणपणाचे नाही सध्या जातीय मुद्दे तीव्र होत असल्याबाबत पवारांना विचारले असता दोन समाजात कटुता वाढू नये असं मला वाटत म्हणून मी जातीच्या मुद्द्यांवर जास्त बोलत नाही..


Trimbakeshwar Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई

Trimbakeshwar Nashik : त्र्यंबकेश्वरमध्ये अन्न व औषध प्रशासनाची कारवाई उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाच्या पथकांकडून हॉटेल्स तसेच व्यावसायिकांची सध्या तपासणी केली जात असून त्र्यंबकेश्वरमध्ये महादेव मंदिराबाहेर कलाकंद तसेच बर्फीच्या नावाखाली विकला जाणारा भेसळयुक्त मावा सदृश्य अन्न पदार्थ अन्न औषध प्रशासनाने जप्त करत प्रसाद विक्रेत्यांना दणका दिलाय. मे. भोलेनाथ स्विट्समधून ३७ हजार ४४० रुपयांचा ७८ किलो कुंदा आणि श्री नित्यानंद पेढा सेंटरमधून सहा हजार ६०० रुपयांचा २२ किलोचा माल असा एकूण ५४ हजार ४४० रुपयांचा भेसळयुक्त प्रसाद जप्त करण्यात येऊन तो घंटागाडीमध्ये टाकून नष्ट करण्यात आलाय. तपासणीसाठी या अन्न पदार्थांचे नुमने अन्न विश्लेषकास पाठवण्यात आले असून अहवाल प्राप्त होताच पुढील करवाई केली जाणार आहे.


Mumbai Police On Alert: 'लॉरेन्स बिश्नोईचा माणूस मुंबईत काहीतरी मोठं करणार' अज्ञात व्यक्तिचा Mumbai Police ना फोन, चौकशी सुरु

Mumbai Crime: मुंबई पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीने फोन करुन धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीतील माणसं लवकरच मुंबईत येऊन मोठी घटना घडवणार असल्याचा धमकीचा फोन मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आला होता. त्यानंतर नियंत्रण कक्षाकडून स्थानिक पोलिसांशी संपर्क साधण्यात आला. या फोननंतर मुंबई पोलिस हाय अलर्ट मोडवर आले आहेत. हे प्रकरण शनिवारचे असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या मुंबई पोलिस फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तिचा शोध...


NABARD Recruitment 2024: NABARD कडून पदवीधरांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर...१ लाखांपर्यंत मिळणार वेतन.. लगेचच अर्ज करा!

NABARD Recruitment 2024: नाबार्ड किंवा NABARD (National Bank for Agriculture and Rural Development) कडून काही दिवसांपूर्वीच भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. बँकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर, नाबार्डने तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. यासाठीचे पात्रता, वयोमर्यादा, वेतन, अर्ज प्रक्रिया इत्यादी संबंधित जाणून घेण्यासाठी खालील माहिती काळजीपूर्वक वाचा.