मुंबई, 25 मे : सिनेमात किंवा काही खऱ्या आयुष्यातील केसेसमध्ये तुम्ही अनेकदा लोकांना नार्को टेस्ट बोलताना ऐकलं असणार. ही टेस्ट काहीतर डेंजर आहे असं आपण मनात माणून आहे. पण नक्की ही नार्को टेस्ट म्हणजे आहे तरी काय? किंवा या टेस्टमध्ये माणसाला काय केलं जातं? यामुळे वेदना होतात का? असे असंख्य प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. चला मग या टेस्टबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
नार्को टेस्टमध्ये ट्रुथ ड्रग नावाचे सायकोऍक्टिव्ह ड्रग गुन्हेगाराला किंवा एखाद्या व्यक्तीला दिले जाते. हे सोडियम पेंटोथॉलचे इंजेक्शन आहे. या औषधाचा परिणाम होताच, व्यक्ती अशा अवस्थेला पोहोचते ज्यात ती व्यक्ती पूर्णपणे बेशुद्ध होत नाही आणि पूर्णपणे शुद्धतही राहत नाही. त्यामुळे कोणाकडूनही काही सत्य उगळायचं असेल तर ही टेस्ट केली जाते.
रेफ्रिजरेटर ओपन करताच सहज उपलब्ध होणाऱ्या बर्फाचा इतिहास जाणून 'गार' व्हाल
ही चाचणी गुन्हेगार किंवा आरोपी व्यक्तीकडून सत्य काढण्यासाठी केली जाते. ही चाचणी फॉरेन्सिक तज्ञ, तपास अधिकारी, डॉक्टर आणि मानसशास्त्रज्ञ इत्यादींच्या उपस्थितीत केली जाते.
येथे नमूद करणे आवश्यक आहे की, नार्को टेस्टमध्ये गुन्हेगार/आरोपी प्रत्येक वेळी सत्य सांगतो आणि केस सॉल्व होते असे नाही. अनेक वेळा गुन्हेगार/आरोपी अधिक हुशार असतो आणि तपासात चकमा ही देतो.
कोणत्याही गुन्हेगार/आरोपीची नार्को चाचणी करण्यापूर्वी शारीरिक तपासणी केली जाते, ज्यामध्ये ती व्यक्ती या चाचणीसाठी योग्य आहे की नाही हे तपासले जाते. जर व्यक्ती; रुग्ण आजारी, वृद्ध किंवा शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कमकुवत असल्यास ही चाचणी केली जात नाही.
2023-05-25T14:51:37Z dg43tfdfdgfd