निवडणूक

Trending:


Rajkiya Shole on Raj Thackeray | मनपा निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्रित नाष्टा करणार का?

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) सर्वेसर्वा आणि अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याकडे भेटीसाठी दाखल झाले आहे. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची ही पहिलीच भेट आहे. मुख्यमंत्री सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट ॲंड गाईड हाॅलमधील शिवाजी पार्कमध्ये परीक्षा पे चर्चा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कार्यक्रमाला उपस्थितीत राहणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला आले आहेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांमध्ये गेल्या 20 मिनिटांपासून चर्चा सुरू आहे. परिणामी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने या दोन दिग्गज नेत्यांच्या अचानक भेटीमुळे अनेक चर्चेला उधाण आले आहे. राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा होणे स्वाभाविक आहे- प्रसाद लाड. दरम्यान, या भेटीनंतर राजकीय वर्तुळातून आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहे. यावर बोलतांना भाजप नेते प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी आपली प्रतिक्रिया देत ही भेट मैत्रीपूर्ण भेट असल्याची माहिती दिली आहे. राजकीय नेते भेटल्यावर राजकीय चर्चा स्वाभाविक होणारच, यात दुमत नाही,असेही प्रसाद लाड म्हणाले. राज ठाकरेंनी शिवाजी पार्कमध्ये एक कॅफे उघडलाय- संजय राऊत राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे एक कॅफे उघडला होता एवढेच मला माहिती आहे. तिथे काही लोक सातत्याने चहापाण्यासाठी जात असतात आणि तो सर्वासाठी खुला आहे. किंबहुना राजकारणातली ही चांगली गोष्ट असून असे चहापान होत असतात. चांगला कॅफे असला तर लोक जात येत असतात त्यांना चांगला नजारा बघायला मिळतो, बसायला उत्तम जागा मिळते, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवरून संजय राऊत यांनी भाष्य करत ही टीका केली आहे.


Thackeray Brothers : इथे फडणवीस-राज भेट, तर सदाशिव पेठेत ठाकरे बंधू एकत्र येण्याचं आवाहन, बाळासाहेबांच्या शिलेदाराची बॅनरबाजी

Raj Thackeray Uddhav Thackeray Reunion : एकीकडे मुंबईमध्ये ठाकरे-फडणवीस यांची भेट झाल्यानंतर पुण्यात मात्र दोन ठाकरे बंधूंनी एकत्र यावे यासाठी जुन्या शिवसैनिकांनी बॅनरबाजी केली आहे


Parli Mahadev Munde Case Breaking: महादेव मुंडे प्रकरणात हालचाली वाढल्या? Walmik Karad

A businessman from Parli, Beed, was brutally murdered on October 21, 2023, in front of the Tehsil office. A case has been registered in this case at Parli City Police Station. Even after 15 months, the accused have not been arrested yet. Also, the family has not been informed about the identity of the accused. After News 18 Lokmat showed the news, the investigation was handed over to a senior officer. However, since the family did not get information about what was going on in this investigation.. The Munde family will meet the Superintendent of Police and sit on a hunger strike. This information was given by Dnyaneshwari Munde.बीडच्या परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची तहसील कार्यालयासमोर 21 ऑक्टोबर 2023 रोजी निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती.. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून.15 महिने होवूनही अद्यापही आरोपींना अटक करण्यात आली नाही. तसेच आरोपी कोण याची माहिती कुटुंबाला देण्यात आलेली नाही. न्यूज 18 लोकमत बातमी दाखवल्यानंतर यात तपास वरिष्ठ अधिकाऱ्याकडे देण्यात आला होता. मात्र या तपासामध्ये काय सुरू आहे याची माहिती कुटुंबाला न मिळाल्याने.. मुंडे कुटुंब पोलीस अधीक्षक यांचे भेट घेऊन उपोषणा बसणार आहे. अशी माहिती ज्ञानेश्वरी मुंडे यांनी दिली.#mahadevmunde #dhananjaymunde #walmikkarad #news18lokmat sikaNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Marathi News Headlines | 10 PM News | News18 Lokmat | Marathi News | 10 Feb 2025 | Manoj Jarange

Marathi News Headlines | 10 PM News | News18 Lokmat | Marathi News | 10 Feb 2025 | Manoj Jarange#devendrafadnavis #eknathshinde #ajitpawar #mahayuti #shku #beedsarpanchcaseNews18 Lokmat is one of the leading YouTube News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.We cover interesting stories from across the world as well.Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.Download our News18 Mobile App - https://onelink.to/desc-youtube


Gadchiroli Crime | ७ दुचाकी चोरणारा देसाईगंज पोलिसांच्या ताब्यात

गडचिरोली : वेगवेगळ्या ठिकाणांहून ७ दुचाकी चोरणाऱ्यास देसाईगंज पोलिसांनी जेरबंद केले आहे. समीर राजरतन चहांदे (वय ३६, रा. रुई, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ३ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. ६ फेब्रुवारीला मोटारसायकल चोरीसंबंधी देसाईगंज पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली...


Honey bee Attack: सिंहगडावर मधमाश्यांच्या हल्ल्यात 20 जखमी

खडकवासला: रविवार (दि. 9) सुटीचा आनंद साजरा करण्यासाठी सिंहगडावर आलेल्या पर्यटकांवर भल्यामोठ्या आग्या मोहोळाच्या मधमाश्यांनी तुफान हल्ला चढविला. त्यात वीसहून अधिक पर्यटक जखमी झाले. सैरावैरा पळणाऱ्या पर्यटकांवर हल्ला करून चावा घेणार्‍या मधमाश्यांचा धोका पाहून वन विभागाने गडावर जाण्यास पर्यटकांना प्रतिबंध केला. सिंहगड वन विभागाचे वन परिमंडल अधिकारी स...


ॲमेझॉनचे कामगार काम बंद करतात तेव्हा…

हमाल पंचायतीच्या वतीने ॲमेझॉनच्या पुणे आणि मुंबईतील गोदामांसमोर आंदोलन करण्यात आले.


राजकीय भेटीगाठींनी तर्कवितर्क! मुख्यमंत्री फडणवीस राज ठाकरेंच्या भेटीला; ठाकरे गटाचे नेतेही मुख्यमंत्र्यांकडे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.


Mumbai-Pune Expressway News : पुण्याला जाताना कळंबोली सर्कलवर मोठा बदल, पनवेल एग्झिट ११ महिने बंद, कारण काय?

Mumbai-Pune Expressway News : महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळ कळंबोली जंक्शनची सुधारणा करणार आहे. त्यामुळे कळंबोली सर्कल येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील पनवेल एग्झिट सहा महिने बंद ठेवला जाणार आहे. नागरिकांनी या कालावधीत पर्यायी मार्गांचा वापर करावा.


Ranveer Allahbadia Statment | रणबीर अलाहबादियाचा आधी विकृत कारनामा, मग माफीनामा Special Report

ज्यांना इन्फ्लुएन्सर म्हणून लोक डोक्यावर घेतात, त्यापैकी काहींच्या डोक्यात किती चिखल भरलेला असू शकतो, याची प्रचिती आज सर्वांना आली. आपल्या पॉडकास्टमुळे लोकप्रिय झालेला यूट्यूबर रणबीर अलाहबादिया एका कार्यक्रमात इतकं अश्लिल बरळला की देशभरात संतापाची लाट उसळली. विनोदाच्या नावाखाली सुरु असलेल्या विकृतीचा मुद्दा यानिमित्तानं पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. पाहूया, याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. परस्त्रीला मातेसमान मानण्याचा शिवछत्रपतींचा वारसा सांगणारा महाराष्ट्र… जिजाऊंपासून सिंधुताईंपर्यंत मातृत्वाच्या थोरवीचा इतिहास जपणारा महाराष्ट्र.. हा महाराष्ट्र एका यूट्यूबरच्या वाह्यात आणि बाष्कळ वक्तव्यानं चांगलाच संतापलाय. रणबीर अलाहबादिया नावाचा तथाकथित प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला यूट्यूबर त्याच्या एका वक्तव्यानं टीका, संताप आणि निषेधाच्या गाळात रुतला गेलाय. निमित्त ठरलं इंडियाज गॉट लेटेंट नावाच्या एका कार्यक्रमाचं… या कार्यक्रमात सहभागी झालेल्या एका स्पर्धकाला रणबीरनं एक प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचा तपशील इतका आक्षेपार्ह की त्याचा उल्लेख करणंही लज्जास्पद वाटावं.. रणबीरनं विचारलेला हा प्रश्न बघताबघता व्हायरल झाला आणि सर्व स्तरातून याचा निषेध व्हायला सुरुवात झाली. कॉमेडीच्या नावाखाली सुरु असणारे हे विकृत कार्यक्रम खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले. विकृत वक्तव्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य यांच्यातला फरकही त्यांनी समजावून सांगितला. ((प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. मात्र त्या अभिव्यक्तीलाही मर्यादा आहेत. दुसऱ्याच्या स्वातंत्र्यावर अतिक्रमण होत असेल, तर ते योग्य नाही. अश्लिलतेबाबतही काही नियम आहेत, मर्यादा आहेत. त्याचं उल्लंघन झालं असेल तर कारवाई होईल.)) महाराष्ट्रातल्या सुजाण नागरिकांना हा प्रकार संतापजनक वाटलाच.. मात्र याच रणबीरचे फॉलोअर्स असणाऱ्या लाखो प्रेक्षकांच्याही हा प्रकार डोक्यात गेला. वेगवेगळ्या क्षेत्रातील सेलेब्रिटींच्या पॉडकास्टमधून मिळवलेली लोकप्रियता एका विकृत वक्तव्यामुळे कशी मातीमोल ठरू शकते, हे यानिमित्तानं दिसून आलं. रणबीरच्या तब्बल २० लाख फॉलोअर्सनी त्याला काही मिनिटांत अनफॉलो करून टाकलं. पंतप्रधान मोदींच्या हस्ते गौरवण्यात आलेला रणवीर हा कोट्यवधी भारतीयांच्या शिव्याशापांचा धनी ठरला. त्यानंतर रणबीरनंही आपल्याला उपरती झाल्याचा दावा करत बिनशर्थ माफीनामा सादर केला. महाराष्ट्राला विनोदाचं वावडं कधीच नव्हतं. शेकडो वर्षांच्या विनोदी साहित्याची, नाटकांची, सिनेमांची आणि पुस्तकांची पारायणं करत महाराष्ट्रातल्या अनेक पिढ्या मोठ्या झाल्या. मात्र विनोदाच्या नावाखाली चालणारी विकृती ठेचण्याचं कामही महाराष्ट्रानं वेळोवेळी केलंय.या वक्तव्यावर रणबीरनं तर माफी मागितलीय.. मात्र केवळ माफीवर हे प्रकरण संपणार की या विकृत चुकीची शिक्षा त्याला मिळणार, हे लवकरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा.


Somnath Suryawanshi Case | सुरेश धस यांचा दुटप्पीपणा, विरोधकांचा हल्लाबोल Special Report

दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च काढण्यात आला लाँग मार्च नाशिक येथे आला असताना त्या ठिकाणी परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजप आमदार सुरेश धस अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या संदर्भात आश्वासन दिले आणि काही पोलिसांवर कारवाई केली यानंतर हा लॉन्ग मार्ग स्थगित करण्यात आला त्याठिकाणी सुरेश धस यांनी केलेल्या पोलिसांना माफ करण्याच्या वक्तव्यामुळे आता राजकारण चांगलेच तापले आहे पाहूयात एक खास रिपोर्ट…. बरोबर दोन महिन्यांपूर्वीच म्हणजे १० डिसेंबरला परभणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान शिल्पाची विटंबना झाली यानंतर ११ डिसेंबर रोजी परभणी बंदचा आवाहन करण्यात आलं याच बंद दरम्यान काही समाजकंटकांनी जोरदार हिंसा केली पोलिसांनी कारवाई करत अनेकांना अटक केली याच कारवाईदरम्यान न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा 15 डिसेंबर रोजी मृत्यू झाला 16 डिसेंबर रोजी सोमनाथ सूर्यवंशी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले सोमनाथ सूर्यवंशी यांच्या अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर संध्याकाळी याच आंदोलनाचे नेते विजय वाकोडे यांचाही हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला दोन कुटुंबावर आघात झाला प्रकरण देशपातळीवर पोचले विविध ठिकाणी आंदोलन झाली.दोन्ही कुटुंबांना न्याय काही मिळाला नाही. BYTE:- विजयाबाई सूर्यवंशी सोमनाथची आई BYTE:- प्रेमानंद सूर्यवंशी सोमनाथचा भाऊ परभणीत अनेक दिवस धरणे आंदोलन करूनही न्याय मिळत नसल्यामुळे परभणीतील आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी बैठक घेऊन लॉंग मार्च काढण्याचा निर्णय घेतला 17 जानेवारी रोजी परभणीहून हा लॉन्ग मार्च निघाला परभणी जालना संभाजीनगर आणि नाशिक इथपर्यंत 22 दिवसांचा प्रवास करून लॉन्ग मार्च पोहोचला लॉंग मार्च नाशिकला पोहोचल्यानंतर परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर भाजप आमदार सुरेश धस तसेच अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे हे तिथे पोहोचले त्यांनी आंदोलकांशी चर्चा केली एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलिस अमालदारांना निलंबित करण्यात आले तसेच इतर 14 मागण्या संदर्भातही आश्वासित करण्यात आले यानंतर हा लॉंग मार्क स्थगित करण्यात आला यावेळी बोलताना सुरेश धस यांनी पोलिसांना मोठ्या मनाने माफ करण्याबाबत वक्तव्य केले आणि याच वक्तव्यामुळे आता राज्याच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा वादंग निर्माण केलाय.. सुरेश धस यांची ती व्हिडीओ क्लिप वडेट्टीवार बाईट राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ काँग्रेसचे नेते विजय वडेंटीवार सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया,rpi सचिन खरात गटाचे सचिन खरात,आंबेडकरी नेते राहुल प्रधान,पॅंथर दिपक केदार यांच्यासह सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनीही सुरेश धस यांच्यावर जोरदार हल्ला केलाय तसेच लॉन्ग मार्च नेतृत्व करणारे आशिष वाकोडे यांनीही यावरून सुरेश धस यांचा निषेध केलाय आम्ही एक महिन्याचा अल्टिमेटम दिला असून जर एक महिन्यात आमच्या उर्वरित मागण्या मान्य नाही केल्या तर आम्ही पुन्हा एकदा लॉंग मार्च नाशिक ते मुंबई काढू असा इशारा त्यांनी दिलाय आशिष वाकोडे यांचा बाईट BYTE:- जितेंद्र आव्हाड नेते राष्ट्रवादी शरद पवार BYTE:- छगन भुजबळ नेते राष्ट्रवादी अजित पवार BYTE:- अंजली दमानिया सामाजिक कार्यकर्त्या BYTE:- सचिन खरात नेते RPI सचिन खरात गट या प्रकरणात आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई #१ पोलीस निरीक्षक १ पोलीस उपनिरीक्षक ३ अंमलदार निलंबित एका महिला पोलिसांची मुख्यालयात बदली, #संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी सुरु #प्रथम न्यायदंडाधिकारी तेलंगावकर यांच्याकडून चौकशी सुरु आहे. #सोमनाथच्या कुटुंबियांना १० लाख तर वाकोडेच्या कुटुंबाला ५ लाखांची मदत(दोन्ही कुटुंबीयांनी नाकारली आहे ) एकूणच परभणीतील संविधान शिल्पाची विटंबना त्यानंतर उसळलेली दंगल पोलिसांची कारवाई या सर्व प्रकारानंतर देशपातळीवरील नेते राज्य पातळीवरील विरोधी पक्षाचे सोबतच सत्ताधारी पक्षाचे नेते आले आश्वासन मिळाली मात्र अद्यापही सोमनाथ सूर्यवंशी आणि विजय वाकोडे यांचे कुटुंबीय न्यायापासून वंचित आहे त्या दिवशी पोलिसांवर कारवाई केव्हा होणार तसेच या कुटुंबांचे पुनर्वसन कसं करणार हे प्रश्न मात्र अद्यापही अनुपरीत आहेत नेते मात्र केवळ आरो प्रत्यारोप करण्यात व्यस्त असल्यानेच आता सोमनाथ सूर्यवंशी असो विजय वाकोडे यांच्या कुटुंबीयांना न्याय केव्हा मिळणार हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे


Beed Sarpanch Death : संतोष देशमुख हत्येदिवशीचा CCTV; स्कॉर्पियो सोडून सहा आरोपी पळाले!

बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात एक नवीन सीसीटीव्ही समोर आला आहे. ज्या दिवशी संतोष देशमुखांची हत्या झाली होती त्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबर रोजी या प्रकरणातील सहा आरोपी गाडी सोडून पळून जात असल्याचं सीसीटीव्हीमधून समोर आलं आहे. हा सीसीटीव्ही वाशी परिसरातील पारा चौकातील संध्याकाळी 7 वाजताचा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी हत्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील वाशी या ठिकाणी पोहोचले. त्यानंतर त्यांनी पारा चौकात गाडी सोडली आणि पळून गेले. आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेसह सहाजण पळून जाताना दिसत आहेत. चार तासात आरोपींनी काय-काय केलं? सरपंच संतोष देशमुखांची हत्या केल्यानंतर हे सहा आरोपी धाराशिवपासून जवळपास 70 ते 80 किमी अंतरावर असलेल्या वाशीमध्ये पोहोचले. हत्येमध्ये वापरण्यात आलेली काळी स्कॉर्पिओ घेऊन हे आरोपी वाशीमध्ये पोहोचले. पण पारा चौक या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी गाडी त्याच ठिकाणी सोडली आणि पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. संतोष देशमुखांचे अपहरण 9 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता होतं. त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांची हत्या होते आणि संध्याकाळी सात वाजता हे आरोपी वाशीमधून पळताना दिसत आहेत. या चार तासांच्या काळात नेमकं काय घडलं आणि आरोपी वाशीपर्यंत कसे पोहोचले याचा तपास पोलिस करत आहेत. वाशीपर्यंत हे सहा आरोपी एकत्रच होते. त्यानंतर ते वेगवेगळ्या ठिकाणी पळून गेल्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणातील दोन आरोपींना पुण्यातून अटक करण्यात आली आहे. कृष्णा आंधळे अद्याप फरार संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्या आरोपींपैकी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा दोन महिन्यांपासून फरार आहे. कृष्णा आंधळेचा घातपात झाला असावा अशी शक्यता काही जणांनी वर्तवली आहे. पोलिस अद्याप त्याचा शोध घेत असून त्याला अटक झाल्यास या प्रकरणाचे अंतिम सत्य सर्वांसमोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


Delhi Election Results 2025: दिल्लीचा उलटफेर

Delhi Election Results 2025: भाजपला २७ वर्षांनी मिळालेली दिल्लीची सत्ता, ‘आप’ नावाच्या देशातील वेगळ्या राजकीय प्रयोगाचा पराभव आणि या पक्षासह विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीचे भवितव्य, अशा अनेक दृष्टीने दिल्लीच्या विधानसभेचे निकाल महत्त्वाचे ठरतात.


Pune News | पुण्यातून धक्कादायक बातमी; 55 ठिकाणचं पाणी पिण्यास अयोग्य

Pune news Water Contaminated Not Suitable For Drinking After Test


Google Map ने दिला 'धोका'! शेतात नेऊन सोडलं, नंतर नको तेच घडलं

लखनऊ : रस्ता माहिती नसेल तर अनेक जण गुगल मॅपची मदत घेतात. पण हा गुगल मॅप तुम्हाला कधीही धोका देऊ शकतो. नुकतीच अशी एक घटना घडली आहे. एका तरुणाने कार चालवताना गुगल मॅपची मदत घेतली. पण गुगल मॅपवर विश्वास ठेवणं त्याला चांगलंच महागात पडलं. गुगल मॅपने नको त्याच रस्त्यावर नेऊन सोडलं आणि त्यानंतर नको तेच घडलं.उत्तर प्रदेशच्या सहारनपूरमधील हे प्रकरण. मेरठमध्ये राहणारा फिरोज आणि त्याचा मित्र नौशाद 5 फेब्रुवारीला शामलाला जात होता. रोहाना टोलनाक्यावर त्याचा...


काँग्रेसची घसरण सुरूच!

सुरेश पवार नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्या वेळेला राजधानी दिल्लीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे आणि सलग तिसर्‍यांदा काँग्रेसच्या हाती भोपळा आला आहे. कर्नाटकसारखी एक-दोन राज्ये वगळता देशभरात काँग्रेस पक्षाकडे महत्त्वाचे राज्य नाही आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजप आणि राज्यातील प्रादेशिक पक्षांनी आपले वर्चस्व...


Raigad News | पन्नास हजार धारकरी राजधानी रायगडकडे रवाना

महाड-नाते : इलियास ढोकले श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने प्रत्येक वर्षी होणार्‍या गडकोट मोहीम गेल्या दोन दिवसांपासून पोलादपूर व महाड परिसरात असून सोमवारी दुपारी ऐतिहासिक खर्डी गावामध्ये या धारकरी मावळ्यांना महाप्रसाद देण्यात येणार आहे. त्यानंतर सोमवार (दि.10) सायंकाळी उशिरा हे धारकरी पाचाड नेवाळेवाडी येथे मुक्कामासाठी जातील अशी माहिती प्रति...


ST Bus depot: एसटी महामंडळाचा चेहरामोहरा बदलणार, एअरपोर्ट सारखे बसपोर्ट उपलब्ध करणार

Maharashtra ST Bus Service: एसटी बस ही सर्वसामान्यांची जीवनवाहिनी आहे. याच एसटीचा चेहरामोहरा बदलला जाणार आहे. अगदी एअरपोर्टप्रमाणे बस डेपो तयार केले जाणार आहेत. जाणून घ्या सविस्तर....


हातीव येथे आढळला मृत बिबट्या

साडवली : देवरूख नजीकच्या हातीव येथे मृत बिबट्या आढळून आल्याची घटना रविवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे. या बिबट्याचा उपासमारीने मृत्यू झाला असावा, असा अंदाज वन विभागाने वर्तवला आहे. याबाबत वन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, हातीव फणस थांबा येथे मृत बिबट्या असल्याची वन विभागाला मिळाल्यावर रत्नागिरीचे परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश...


30 इंजिनियर, 300 कामगार, 50 डंपर, 10 JCB, 3 क्रेन आणि... दिल्ली ते JNPT रेल्वे मार्गाचे काम रॉकेटच्या स्पीडने

कल्याणमध्ये दिल्ली ते JNPT रेल्वे मार्गाचे काम रॉकेटच्या स्पीडने पूर्ण करण्यात आले. 30 इंजिनियर, 300 कामगार, तीन मोबाईल क्रेन, दहा जेसीबी आणि पन्नास डंपर अहोरात्र पुल बंधण्यासाठी मेहनत घेत होते.


Ladki Bahin Yojana : ‘लाडकी’ आता नावडती!

Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढण्यासाठी मध्य प्रदेशच्या धर्तीवर तीन चाकांच्या महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी मते मिळवण्यासाठी घाईघाईत लाडकी बहीण योजना आणली खरी; मात्र हीच योजना सरकारसाठी आता आर्थिकदृष्ट्या अडचणीची ठरू लागली आहे.


अग्रलेख : गणंग गेला आणि…

पक्षाची इभ्रत, आपला मान हा एखाद्या प्रांतातील- तोही सीमावर्ती- नागरिकांच्या मूलभूत हक्कांपेक्षा अधिक महत्त्वाचा असावा?


ED Recruitment 2025: ईडीमध्ये थेट भरती; लेखी परीक्षेशिवाय नोकरीची संधी, 70000 रुपये पगार मिळणार

ED Recruitment: नोकरीच्या शोधात असलेल्या तरुण-तरुणींसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, अंमलबजावणी संचालनालय किंवा सक्तवसुली संचालनालय (Enforcement Directorate) मध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.


Tanaji Sawant PC on Son Kidnapping| घरात वाद, चार्टर प्लेन, मुलगा कुठं गेला? तानाजी सावंत म्हणाले..

पुणे : राज्याचे माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे, ऋषिराज सावंत यांचे अपहरण झालं नसल्याचं समोर आलं आहे. खुद्द तानाजी सावंत यांनीच ही माहिती दिली. ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो मित्रासोबत आहे. पण तो नेमकं कुठे आहे याची माहिती नसल्याचं तानाजी सावंत म्हणाले. तो चार्टर फ्लाईटने बाहेर गेला असल्याची माहिती ड्रायव्हरने दिली असंही तानाजी सावंत यांनी सांगितलं. माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाचे अपहरण झाल्याच्या बातम्या प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. त्यावेळी तानाजी सावंत हे पुणे पोलिस आयुक्तालयात दाखल झाले. पोलिसांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ऋषिराज सावंत याचे अपहरण झाले नसून तो मित्रासोबत बाहेर गेल्याची माहिती त्यांनी दिली. काय म्हणाले तानाजी सावंत? तानाजी सावंत म्हणाले की, "ऋषिराज सावंत बेपत्ता नाही, तो त्याच्या मित्रासोबत आहे. पण नेमकं कुठे आहे याची माहिती नाही. तो कुठेही जाणार असेल तर तो सांगतो. मात्र इथे त्याने त्याची गाडी वापरली नाही. तो दुसऱ्या गाडीतून गेला. त्यामुळे मी कॉन्शस झालो. अचानक तो एअरपोर्टवर कसा गेला म्हणून मी सीपी साहेबांना फोन केला. पण आता कळलं तो चार्टरने बाहेर गेला आहे. तशी माहिती त्याच्या ड्रायव्हरने दिली. यासंदर्भात आम्ही अधिकची माहिती घेत आहोत." अपहरण झाल्याचा निनावी फोन तानाजी सावंत यांच्या मुलाचे पुणे विमानतळ परिसरातून अपहरण झाल्याचा एक निनावी फोन पुणे पोलिस कंट्रोल रुमला आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. ऋषिकेश सावंत यांचा स्विफ्ट गाडीतून चौघांनी अपहरण केल्याच्या बातम्या समोर आल्या. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या कात्रजमधील निवासस्थानी जाऊन तपास सुरू केला. या आधी ऋषिकेश सावंत यांना खंडणीसाठी कुणाचा कॉल आला होता का याची माहिती पोलिसांनी घेतली.


बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये दहशत

वेल्हे : खडकवासला धरण खोर्‍यातील अगळंबे व बहुली (ता. हवेली) परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला आहे. गेल्या दोन आठवड्यांत या भागात एका कुत्र्यासह तीन बैल व तीन गायी अशी जनावरे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहेत. त्यामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे. कडकडीत उन्हाळा सुरू झाल्याने जंगलातील पाणीसाठे कोरडे पडू लागले आहेत. त्यामुळे शेतकर्‍य...


MHADA Lottery: स्वस्तात फ्लॅट खरेदीची पुन्हा संधी; म्हाडाकडून घरांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहीर, वाचा कुठे अन् किती घरे

MHADA Lottery 2025: म्हाडाच्या अंतर्गत अत्प दरात सदनिका उपलब्ध करुन देण्यात येत असतात. लॉटरीच्या माध्यमातून या सदनिकांची विक्री करण्यात येत असते. आता म्हाडाच्या नाशिक मंडळाकडून लॉटरी जाहीर करण्यात आली आहे.


Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : फडणवीस सकाळीच 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरेंसोबत अर्धा तास चर्चा, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Devendra Fadnavis Meet Raj Thackeray : खरं तर भाजप आणि मनसे यांच्या विचारधारा सारख्या असल्या, तरी निवडणुकांच्या निमित्ताने दोघांमधील जवळीक कमी-जास्त होताना दिसते.


Nagar Crime : म्हैसगावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह

राहुरी : तालुक्याच्या पश्चिमेकडील आग्रेवाडी (म्हैसगाव) हद्दीमध्ये मुळा नदीच्या पाण्यात अनोळखी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शनिवारी (8) रोजी रात्री पाण्यात तरंगणार्‍या मृतदेहाबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तो ताब्यात घेतला आहे. पोलिसांनी मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान, राहुरी हद्दीत अनोळखी मृतदेह सापडण्याची मालिका सुरूच आहे. गेल...


Weather Update: देशातील तापलेल्या सर्वाधिक शहरांच्या यादीत पुणे शहर; पारा 35 अंशांवर

पुणे: यंदा शहरात थंडी जाणवलीच नाही. त्यामुळे फेब्रुवारीतच शहर उन्हाच्या झळांनी तापले आहे. गत 48 तासांत शहराचे तापमान सरासरी 35 ते 37 अंशांवर गेल्याने पुणे देशातील सर्वाधिक तापलेल्या शहरांच्या यादीत गेले आहे. यंदा देशातील तापलेल्या शहरांत पुणे शहराचे नाव सर्वांत पुढे आहे. राज्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यातच पारा 35 ते 37 अंशांवर गेला आहे. यात ...


52 लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान कार्ड तयार नाही

पुणे: जिल्ह्यातील 52 लाख लाभार्थ्यांचे आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेची ई-कार्ड तयार नाहीत. हे कार्ड काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेऊन 25 दिवसांत ती पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व ‘महात्मा जोतिराव फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना राज्यात एकत्रित स्वर...


How to Link Aadhaar Card with Ration Card : आधार कार्ड रेशन कार्डाशी कसं लिंक करायचं? जाणून घ्या सोप्या टिप्स

आपल्या नागरिकत्वाचा पुरावा म्हणून आधार कार्ड हे महत्तवाचं दस्तावेज आहे. रेशन कार्डशी ते कसं लिंक करता येतं? जाणून घ्या सोप्या शब्दांत


संजीवराजेंवरील आयकरची तपासणी अखेर संपली

फलटण : सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या गोविंद डेअरीवर आयकर विभागाची बुधवारपासून सुरू असलेली तपासणी रविवारी सायंकाळी सात वाजता संपली. तर फलटण निवासस्थानी सुरू असलेले तपासणीचे कामही रात्री उशिरा संपले. तब्बल पाच दिवस आयकर विभागाकडून सुरू असलेली तपासणी अखेर संपली. पाचव्या दिवशीही संजीवराजे यांच्या समर्थकांनी निवासस्...