ZAVERI BAZAAR FIRE INCIDENT : मुंबईच्या झवेरी बाजारातील इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

Fire Incident In Zaveri Bazaar Mumbai : मुंबईतील अत्यंत वर्दळीचा भाग असलेल्या झवेरी बाजार परिसरात मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. चायना बाजार या पाचमजली इमारतीला आग लागली असून त्यात कोणतीही जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलीस दाखल झाले आहे. त्यानंतर आता आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती आहे. आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू असून इमारतीतील ६० लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याची माहिती आहे. जवळपास १२ अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न जारी आहे. याशिवाय पाचमजली इमारतीत भीषण आग लागल्याची माहिती समजताच झवेरी बाजार परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील झवेरी बाजार परिसरातील चायना बाजार या पाचमजली इमारतीला मध्यरात्री दीड ते दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. इमारतीत आग नेमकी कशामुळे लागली, याचं कारण समजू शकलेलं नाही. परंतु शॉर्टसर्किटमुळेच आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आगीची घटना समजताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे. अद्यापही आगीवर संपूर्ण नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलेलं नसून परिसरात कूलिंगचं काम हाती घेण्यात आलं आहे. याशिवाय इमारतीतील ५० ते ६० लोकांना वेळीच बाहेर काढण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

विदर्भात विजेच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहणार; हवामान खात्याकडून पुढील तीन दिवसांची माहिती

मध्यरात्री दोन वाजेपासून चायना बाजार या इमारतीतील आग विझवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी क्रेनचाही वापर करण्यात येत आहे. इमारतीतील भीषण आगीमुळे पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील छताचा काही भाग आणि जिन्यांचा काही कोसळला आहे. त्यामुळं आता या घटनेत कोणतीही जीवीतहानी झालेली नसली तर संपत्तीचं मात्र मोठं नुकसान झालेलं आहे. चायना बाजार परिसरातील इमारतीतील आग विझवण्यासाठी स्थानिकांकडूनही प्रयत्न केले जात आहे. याशिवाय घटनास्थळी जमावाने मोठी गर्दी केली आहे.

एकट्या आईचा मुलावर अधिकार नाही, कोर्टानं धवनच्या पत्नीला झापलं; मुलाला भारतात घेऊन येण्याचे आदेश

2023-06-09T01:42:39Z dg43tfdfdgfd