नगर : 7 लाख पळविणारे दोन चोरटे जेरबंद

श्रीरामपूर /संगमनेर शहर (नगर ): पुढारी वृत्तसेवा : शेतकर्‍याच्या मोटारसायकलच्या डिक्कीतून 7 लाख रूपयांची रोकड घेऊन पळणार्‍या तिघांपैकी दोन अट्टल चोरट्यांच्या संगमनेर शहर पोलिस पथकाने पाठलाग करुन मुस्क्या आवळल्या. संगमनेर मार्केट यार्ड परिसरात हा थरार घडला. पोलिसांनी दोन चोरट्यांकडून 6.70लाख रूपये हस्तगत केले. दरम्यान, तिसरा चोरटा 30 हजार रूपये घेवून पोलिसांच्या हातावर तुरी देत पळाला.

संगमनेर तालुक्यातील सुकेवाडी येथील रहिवासी पांडुरंग यशवंत शेटे दुचाकीच्या डिक्कीतून 7 लाख रूपयांची रोकड काढत होते. दरम्यान, अत्रुकुमार अबदेश यादव, अमनकुमार जगनमोहन यादव (दोघे रा. नयाटोला जोराब गंज, ता. कोढा जि. कटीहार (बिहार) व आणखीन एक अशा तिघांनी शेटे यांच्याकडून 7 लाख रुपये रकमेची पिशवी बळजबरीने ओढून दुचाकीवरुन धूम ठोकणार, तेव्हड्यात शेटे ओरडल्याने नागरिकांसह पोलिसांनी पाठलाग करुन पळणार्‍या दोन चोरट्यांच्या मुस्क्या आवळत गजाआड केले. त्यांच्याकडून 6.70 लाखाची रोकड हस्तगत केली, परंतु 30 हजार रुपये घेऊन तिसरा पळाला.

याप्रकरणी पांडुरंग शेटे यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी तिघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास पो. नि. भगवान मथुरे व पो. उ. नि. विठ्ठल पवार करीत आहेत. पोलिसांनी मुस्क्या आवळलेल्या चोरट्यांनी किती ठिकाणी गुन्हे केले, याची उकल सुरु आहे.

हे ही वाचा :

Ashadhi Wari 2023 : पालखी सोहळ्यासाठी पुणे जिल्ह्यात वाहतुकीत बदल

पर्यटकांसाठी महत्त्वाची बातमी ! सांदण दरी पावसाळ्यात राहणार बंद !

The post नगर : 7 लाख पळविणारे दोन चोरटे जेरबंद appeared first on पुढारी.

2023-06-09T07:37:21Z dg43tfdfdgfd