Trending:


Dombivali MIDC Blast: धक्कादायक ! डोंबिवली स्फोटात पत्नीचा मृत्यू, अंगठी आणि मंगळसूत्रावरुन नवऱ्याला पटली मृतदेहाची ओळख

Dombivali MIDC Blast: डोंबिवली एमआयडीसीमधल्या एका केमिकल कंपनीत गुरुवारी बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये जळून 11 जणांचा मृत्य झाला. तसेच 60 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. स्फोटातील एका महिलेच्या मृतदेहाची ओळख तिच्या नवऱ्याने अंगठी आणि मंगळसूत्र बघून केली आहे. नेमकी ही महिला कोण आहे, ते जाणून घेऊयात.


गो..गो..गोवा...आता विमानातून; छत्रपती संभाजीनगरहून लवकरच फ्लाइट, असे असेल वेळापत्रक

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधून आता उपराजधानी नागपूर; तसेच गोवा जोडले जाणार आहे. ‘इंडिगो’तर्फे दोन जुलैपासून या दोन ठिकाणी शहरवासीयांना विमानसेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.


Turmeric Price Hike : हळदीच्या बियाण्याचा भाव 8 हजार 400 रुपये क्विंटलवर

Turmeric Price Hike : हळदीच्या बियाण्याचा भाव 8 हजार 400 रुपये क्विंटलवर हळदीला सोन्याचे दिवस आल्याने यंदा हळदीच्या बियाणे दरात दुप्पटीहून वाढ झाली आहे. मागील वर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हळदीचे लागवड कमी झाल्याने हळदीचे उत्पादन कमी झाले. त्यामुळे हळदीच्या बियाणे दरात वाढ झालीय.आता सांगली बाजारात आंध्र प्रदेशमधील सेलमहून हळदीचे बियाणे विक्रीसाठी उपलब्ध झाले असून गेल्या वर्षी ३ हजार ५०० रूपये असलेला दर यंदा ८ हजार ४०० रूपये क्विंंटलवर पोहचला आहे. अक्षयतृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची धामधूम सुरू होते. यंदा अक्षय तृतीया झाल्यानंतर हळद लागवडीची तयारी सुरू झाली असली तरी उन्हाळी पावसाचे प्रमाण कमी आहे. हळदीला यंदा क्विंटलला सरासरी १७ हजार ५०० रूपयांचा दर मिळाला असून यंदा दराचा विक्रम नोंदवत हळदीने ७५ हजार दराचा कळसही गाठला होता. यामुळे यंदा हळद लागवड वाढण्याची शक्यता गृहित धरून हळदीचे सुमारे २०० ते २५० टन बियाणे सेलमहून मागविण्यात आले आहे. गेल्या वर्षी हळद बियाणाचा दर तीन हजार ते साडेतीन हजार रूपये क्विंटल होता. यंदा मात्र, हळदीचे बियाणेच अल्प प्रमाणात उपलब्ध आहे.


Kirit Somaiya On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते, किरीट सोमय्यांची टीका

मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयावर मुस्ताक खान या माफियाच्या ५० लोकांनी हल्ला केला असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. तसेच उद्धव ठाकरे हे माफिया गँगचे नेते आहेत, असेही सोमय्या म्हणाले. हे व्हिडिओ देखील पाहा Uddhav Thackeray on Lok Sabha : इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदासाठी अनेक चेहरे ABP Majha नकली शिवसेनेच्या (Shiv Sena) टीकेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) पत्रकार मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघला (RSS) संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही,असे घणाघात उद्धव ठाकरेंनी केला आहे. आज मुंबईत इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मल्लिकार्जुन खर्गे, उद्धव ठाकरे, शरद पवार, असे इंडिया आघाडीचे बडे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. उद्धव ठाकरे म्हणाले, तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. अजूनही नवाज शरीफ यांच्या केकची चव मोदींना आठवत असेल मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांना अजूनही पाकिस्तानची आठवण येत असेल. पाकिस्तानचा झेंडा मी कधी येथे फडकलेला पाहिला नाही. पाकव्याप्त काश्मिर अजून आलेला नाही. यांना कशाचे काही पडले नाही. तोडा फोडा राज्य करा असा यांचं चालू आहे. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील. आरएसएसवर बॅन भाजप आणेल. 100 =वर्ष पूर्ण होताय हे वर्ष धोक्याचं आहे असा दिसतंय. ते उद्या उठून आरएसएसला नकली बोलतील . संघाला तुम्ही नष्ट करायला निघालेत : उद्धव ठाकरे जे पी नड्डा म्हणाले होते एकाच पक्ष देशात राहील. म्हणजे आता हे संघाला सुद्धा नष्ट करायला निघाले आहेत . नड्डा म्हणतात भाजप स्वयंपूर्ण झालाय म्हणजे ज्यांनी राजकीय जन्म दिलाय त्या संघाला तुम्ही नष्ट करायला निघाले आहेत, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.


पुणे Porsche अपघाताची जबाबदारी घेण्यासाठी ड्रायव्हरला ऑफर, 2 दिवस डांबूनही ठेवलं

वैभव सोनवणे, पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत अल्पवयीन मुलाच्या आजोबांना अटक केलीय. ड्रायव्हरचं अपहरण करून त्याला डांबून ठेवल्याचा आरोप त्यांच्यावर असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस तपासात अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी ड्रायव्हरला तू कार चालवत होतास असं पोलिसांना खोटं सांगायला सांगितलं होतं असं समोर आलंय. आता याच प्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना अटक केली आहे.अपघात...


Bhagavad Gita : आता शाळेत शिकवली जाणार भगवद्गीता; अभ्यासक्रमात होणार समाविष्ट, आता मुलांना मनाचे श्लोक देखील होणार तोंडपाठ

Bhagavad Gita In School : राज्य सरकारने इयत्ता तिसरी ते बारावीच्या शालेय अभ्यासक्रमात श्रीमद भगवद्गीतेचा (Bhagavad Gita) समावेश करण्याचा विचार केला आहे. आता लवकरच राज्य मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना भाषा विषयात मनाचे श्लोक आणि भगवद्गीतेचा बारावा अध्याय पाठ करावा लागणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, 'एससीईआरटी'ने राज्याचा शालेय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. मुलांना आपल्या देशातील...


शहरबात: पैशाचा पाऊस

एप्रिल महिन्याच्या मध्यापासून उन्हाचा तडाखा वाढला असून गेल्या अनेक वर्षांमध्ये अनुभवला नाही असा उन्हाळा यंदा उत्तर कोकणाच्या भागात नागरिकांना चटके देत आहे.


Vishal Agarwal Judicial Remand News : Pune car Accident : विशाल अगरवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Vishal Agarwal Judicial Remand News : Pune car Accident : विशाल अगरवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी. पुणे : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला (Pune Porsche Car Accident) आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी देण्यात यावी अशी मागणी केली होती, पण न्यायालयाने ती फेटाळली आणि 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे आता विशाल अग्रवालच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. सोमवारी जामिनासाठी अर्ज केला जाणार आहे अशी माहिती आरोपीच्या वकिलांनी दिली आहे. विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन भरधाव वेगाने गाडी चालवली आणि त्यामुळे दोघांचा जीव गेल्याची घटना घडली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी विशाल अग्रवालवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली होती. आता न्यायालयाने विशाल अग्रवालला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील विशाल अग्रवालसोबत सर्वच सहा आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता विशाल अग्रवाल हे उच्च न्यायालयात जाऊ शकतात आणि जामीनासाठी अर्ज करू शकतात.


Hanuman Chalisa: काय आहे हनुमान चालीसा? जाणून घ्या महत्त्व आणि नियम

Hanuman Chalisa Niyam: कलयुगात प्रभू श्रीराम भक्त हनुमान हे चिरंजीवी आहेत. हनुमानाला मंगळवार आणि शनिवार समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची विशेष पूजा केली जाते. पूजेदरम्यान विविध स्तोत्र तसेच हनुमान चालीसाचा पाठ केला जातो. शास्त्रानुसार, हनुमानाला प्रसन्न करण्यासाठी हनुमान चालीसा सर्वात प्रभावी आहे. हनुमान चालिसाच्या पठणाने भक्तांवर हनुमानाची कृपा होत जीवनातील सर्व संकट दूर होतात. मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसाचे अवर्जुन पठण केले पाहिजे.


Sindhudurg Boat Capsizes: सिंधुदुर्गात बर्फ घेऊन जाणारी बोट उलटली; दोघांचा मृत्यू, दोन जण बेपत्ता

Sindhudurg fishing Boat Capsizes: सिंधुदुर्गात मच्छिमारांना लागणारा बर्फ घेऊन जाणारी बोट उलटल्याने दोघांचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण अजूनही बेपत्ता आहेत.


सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा संशोधकांना सापडला स्रोत

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राचा स्रोत शोधला आहे. विशेष म्हणजे तो ज्याठिकाणी आहे असे यापूर्वी वाटत होते, तिथे तो नाही! हा शोध गुंतागुंतीच्या कॉम्प्युटर सिम्युलेशन्सच्या सहाय्याने लावण्यात आला आहे. त्यावरून असे दिसून आले की, सूर्याच्या पृष्ठभागावरील सर्वात बाहेरच्या स्तरांमध्ये असणार्‍या प्लाझ्मामधील अस्थिर स्थितीमध्ये हा स्रोत दडलेला आहे. यापूर्वी संशोधकांना वाटत होते की तो सूर्यामध्ये …


CUET UG 24 May Postponed : आज होणारी सीयूईटी युजी परीक्षा पुढे ढकलली; आता २९ मे'ला होणार परीक्षा

CUET UG May 2024 Exam Postponed : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) १५ मे ते २४ मे 2024 दरम्यान देशातील ३७९ शहरे आणि परदेशातील २६ शहरांसह विविध परीक्षा केंद्रांवर CUET (UG) 2024 परीक्षेचे आयोजित करत आहे. मात्र, सीयूईटीची आज होणारी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जाणून घ्या याबद्दलची सविस्तर माहिती.


Lok Sabha Election 2024 Phase 6 Voting: देशासाठी निर्णयाक वेळ, भरघोस मतदान करा, जयशंकर यांचं आवाहन

2024 Lok Sabha Election Phase 6 Voting Live: दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पार पडतोय लोकसभा निवडणुकीचा सहावा टप्पा


Maharashtra Weather News : देशावर घोंगावतंय चक्रीवादळ; महाराष्ट्रात मात्र उन्हाचा तडाखा कायम, मान्सूनची काय खबरबात?

Maharashtra Weather News : हवामान बदलांचा तडाखा महाराष्ट्राला बसत असून, सध्याच्या घडीला राज्यावर अवकाळीसोबतच उष्णतेच्या लाटेचं संकटही पाहायला मिळत आहे.


Chanakya Niti : बायकोची अशी गोष्ट ज्यामुळे आगीशिवायच 'जळतो' नवरा

महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या चाणक्यनीतीत अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे व्यक्ती आगीशिवायच जळतो. यामध्ये त्यांनी पत्नीचाही उल्लेख केला आहे. कान्तावियोग: स्वजनापमान: ऋणस्य शेष: कुनृपस्य सेवा। दरिद्रभावो विषमा सभा च विनाग्निनैते प्रदहन्ति कायम्।। याचा अर्थ पत्नीपासून वेगळं होणं, आपल्या बंधूभावांपासून अपमानित होणं, कर्ज चढणं, दुष्ट किंवा वाईट मालकाची सेवा कराणं, निर्धन राहणं, दुष्ट लोक आणि स्वार्थी समाजात राहणं या गोष्टी अशा आहेत ज्या सतत आगीशिवाय शरीर जळवतात. कुग्रामवासः कुलहीन सेवा कुभोजन क्रोधमुखी च भार्या। पुत्रश्च मूर्खो विधवा च कन्या विनाग्निमेते प्रदहन्ति कायम्॥ याचा अर्थ दुष्ट गाव म्हणजे चुकीच्या व्यक्तींसोबत राहणं, कुलहीनांची सेवा करणं, कुभोजन म्हणजे खराब अन्न, रागिष्ट बायको, मूर्ख मुलगा आणि विधवा मुलगी या व्यक्ती आगीशिवायच जाळतात. या दोन्ही श्लोकांचं सार म्हणजे या अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे व्यक्ती आतल्या आत जळते. या गोष्टींमुळे व्यक्तीला सर्वात जास्त वेदना होता, सर्वात जास्त दुःख होतं. (सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी संबंध नाही. न्यूज18मराठी याचं समर्थन करत नाही.)


VIDEO | धंगेकरांचे पोलीस आयुक्तांवर गंभीर आरोप

ravindra dhangekar on pune accident news


रूममध्ये मुलासोबत जान्हवी, वडिलांनी CCTV मध्ये पाहिलं

रूममध्ये मुलासोबत जान्हवी, वडिलांनी CCTV मध्ये पाहिलं


Water Scarcity : भटकंती... पिण्याच्या पाण्यासाठी

नाशिक : हरसूल रस्त्यावर देवरगाव या आदिवासी गावाच्या अगदी जवळ धरण असूनही आदिवासी महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी चकाकणाऱ्या डांबरी रस्त्यांवरून डोक्यावर एकावर एक हंडे ठेवून भा उन्हात पाणी शोधत भटकंती करावी लागत आहे. एकीकडे समर कॅम्प मध्ये शाळकरी मुलांनी उन्हाळी शिबीर गजबजलेली दिसून येत आहे. तर दुसरीकडे उन्हाळी पाण्यासाठी भटकंती असे विदारक चित्र समोर येत आहे. …


ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 25 May 2024 : Maharashtra News

ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 10 AM : 25 May 2024 : Maharashtra News निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५८ जागांवर मतदान सुरू, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि गांधी कुटुंबीयांनी बजावला हक्क, सकाळी ९ वाजेपर्यंत १०.८२ टक्के मतदान परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, भाजप उमेदवार बांसुरी स्वराज यांनी सकाळी सात वाजताच केलं मतदान, कपिल देव आणि गौतम गंभीर यांनीही बजावला हक्क मुंबई पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीसाठी ठाकरे गटाकडून अनिल परब आणि ज.मो.अभ्यंकर यांना उमेदवारी, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब काँग्रेस पक्ष देशविरोधी, राजकारणात येऊ पाहणारी एक संपूर्ण पिढी त्यांनी संपवली, एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात कंगना रनौतची टीका पुण्यापाठोपाठ नागपुरात मद्यधुंद कारचालकानं तिघांना उडवलं... ३ महिन्याच्या बाळाची प्रकृती गंभीर...कारचालकासह दोघे पोलिसांच्या ताब्यात. पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र अगरवाल यांना अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवल्याचा आणि धमकावल्याचा आरोप


Pune Crime : हनुमान टेकडीवरील फेरफटका जीवाशी बेतला, चाकूचा धाक दाखवून तरुणीला लुटलं

Pune Crime : हनुमान टेकडीवर फिरायला गेलेल्या तरुणीला चाकूचा धाक दाखवून सोनसाखळी व तीन अंगठ्या असा मुद्देमाल चोरण्यात आला आहे. पोलिस ठाण्यात तक्रार केली असता त्यावरून दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


रशियाची अर्थव्यवस्था तेजीतच

या वर्षअखेरीस अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होईल, तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा लोकशाहीविरोधी माणूस विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. चीनच्या राष्ट्राध्यक्षपदी शी जिनपिंग यांनी जवळपास तहहयात वर्णी लावून घेतली आहे. जिनपिंग यांना लोकशाहीशी काहीच देणेघेणे नसून, विरोध करणारे पक्षातील नेते असोत वा सामाजिक कार्यकर्ते, त्यांना त्यांनी नेस्तनाबूत केले आहे. पाचव्यांदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनल्यानंतर व्लादिमीर पुतीन यांनी …


निकालविलंबाचा भुर्दंड

मुंबई विद्यापीठाकरिता असे गोंधळ काही नवे नाहीत. कित्येकदा विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्त्यांसाठी किंवा उच्च शिक्षणासाठी अर्ज करायचे असतात, परंतु परीक्षांचे निकालच लागत नाहीत. खासकरून विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये असे प्रकार अनेकदा घडतात.


Pravara River: प्रवरा नदीत पुन्हा 2 तरुणांचा बुडून मृत्यू, 3 दिवसात 8 बळी

Pravara River : नगर जिल्ह्यातील प्रवरा नदी पात्रीतील मृत्यू तांडव सुरुच आहे. SDRF च्या जवानांसह 4 जणांच्या मृत्यूची घटनी ताजी असताना शुक्रवारी पुन्हा या नदीत बुडून 2 तरुणांचा मृत्यू झाला आहे. संगमनेरच्या गंगामाई घाट परिसरात ही घटना घडली. या दोन तरुणांच्या मृत्यूसह गेल्या 3 दिवसात प्रवरा नदीत बुडून एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे.


दिल्लीतील लढत ठरवणार विधानसभेची दिशा

देशात लोकसभा निवडणुकीचे शेवटचे दोन टप्पे बाकी आहेत. राजधानी दिल्लीत सर्व सातही मतदार संघांसाठी सहाव्या टप्प्यात मतदान होत आहे. राजधानीत भाजप विरुद्ध काँग्रेस आणि आम आदमी पक्ष अशी थेट लढत होत आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. यात भाजपचे मनोज तिवारी वगळता दोन्ही बाजूंनी उमेदवारी देताना नव्या चेहर्‍यांवर …


Maharashtra Drought : Ajit Pawar VS Devendra Fadnavis यांचे दुष्काळावरुन आरोप प्रत्यारोप

महाराष्ट्राच्या डोक्यावर दुष्काळाचे ढग जमा झालेयत. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना दुष्काळाचे प्रचंड चटके सहव करावे लागताय. उसणवाऱ्या करून, कर्जकज्जे काढून पोटच्या पोराप्रमाणे जपलेल्या बागांनी शेतकऱ्यांच्या डोळ्यांदेखत माना टाकल्या आहेत. तर गावागावांमधील रस्त्यांवर बाया-बाप्ये, कच्चे-बच्चे डोक्यावर हंडा घेऊन पाण्यासाठी धावताना दिसतायत. गावात टँकर आला रे आला की ग्रामस्थांची त्याच्याभोवती मुरंकड पडतीय. तर ज्याच्या भरवशावर गावांची तहान अवलंबून आहे, त्या धरणांचा तळ आता उघडा पडलाय. कधीकाळी पाण्याने ओसंडून वाहणाऱ्या या जलाशयांमध्ये आता फक्त दिसतायत खडक आणि चिखल... राज्यातील १९ जिल्ह्यात तीव्र दुष्काळ आहे. जवळपास ७३ टक्के महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत आहे. मात्र राज्य सरकारचं तिकडं लक्षच नाही. आम्ही या प्रश्नाकडं सरकारचं लक्ष वेधत आहोत. तरीही सरकार जागं झालं नाही, तर इतर मार्ग आहेत, असा इशारा शरद पवार यांनी आज दिला. तर विरोधक नकारात्मक मानसिकेत गेला असून, राज्य सरकार दुष्काळाबात गंभीरपणे पाहत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणालेत.