DMRL DRDO RECRUITMENT 2024 : डीआरडीओ अंतर्गत विविध पदांवर भरती; आयटीआय पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

DMRL DRDO Vacancy 2024 : डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन अंतर्गत डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबोरेटरी (DMRL) ने अनेक रिक्त पदांसाठी जागा जाहीर केल्या आहेत. डीएमआरएलने शिकाऊ पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. याभरती अंतर्गत, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, वेल्डर, संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट यासह विविध ट्रेडमधील उमेदवार या जागांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवार अधिकृत वेबसाइट apprenticeshipindia.org वर जाऊन फॉर्म भरू शकतात. भरतीशी संबंधित सर्व महत्त्वाचे तपशील येथे पहा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख :

DMRL DRDO अप्रेंटिस २०२४ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३१ मे २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. संस्थेने ऑनलाइन अर्जाचे तपशीलवार वेळापत्रक त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले आहे. अर्ज करण्यापूर्वी तुम्ही येथे सर्व तपशील तपासू शकता.

भरती मोहिमेद्वारे, DMRL DRDO द्वारे विविध ट्रेडमधील एकूण १२७ अप्रेंटिस पदांवर भरती केली जाणार आहे.

  • फिटर - २० पदे
  • टर्नर - ०८ पदे
  • मशिनिस्ट - १६ पदे
  • वेल्डर - ०४ पदे
  • इलेक्ट्रिशियन - १२ पदे
  • इलेक्ट्रॉनिक्स - ०४ पदे
  • संगणक ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट - ६० पदे
  • सुतार - ०२ पदे
  • बुक बाइंडर - ०१ पद

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

DMRL DRDO भरती अंतर्गत शिकाऊ पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अधिसूचनेनुसार, फक्त नियमित उमेदवार ज्यांनी NCVT आणि SCVT मधून ITI पात्रता परीक्षा उत्तीर्ण केली आहे तेच या रिक्त पदासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत.

ऑनलाइन अर्ज कसा करावा :

अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्र उमेदवार येथे दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात.

  • आता मुख्यपृष्ठावरील DMRL DRDO रिक्रूटमेंट 2024 लिंकवर क्लिक करा.
  • यानंतर विचारलेले सर्व आवश्यक तपशील प्रविष्ट करा.
  • आता अर्जाचा फॉर्म पूर्णपणे तपासा आणि नंतर सबमिट करा.
  • सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • आता फॉर्म डाउनलोड करा आणि पुढील वापरासाठी त्याची प्रिंटआउट घ्या.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-05-03T09:53:23Z dg43tfdfdgfd