MADC RECRUITMENT 2024: विमानतळावर प्रमुख सिक्युरिटी ऑफिसर पदासाठी भरती, दरमहा मिळणार ९० हजार रुपये पगार

MADC Mumbai Bharti 2024 : MADC मुंबई येथे चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणजेच सीनियर मॅनेजर सिक्युरिटी या पदासाठी भरती सुरू आहे. वय वर्ष 50 आणि त्याहून कमी वयाचे कोणते उमेदवारी या पदासाठी अर्ज करू शकतात. या पदावर रुजू झाल्यानंतर दरमहिना त्या उमेदवाराला ९०,००० पगार देण्यात येईल. या भरती विषयी आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांविषयी आणि पात्रतेच्या निकषांविषयी जाणून घेऊ.

MADC Mumbai Vacancy 2024: MADC म्हणजेच महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड, मुंबई तर्फे मुंबईत रिक्त पदांसाठी भरती जाहीर केली आहे. चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणजेच सीनियर मॅनेजर सिक्युरिटी या पदासाठी ही भरती सुरू आहे. वय वर्ष ५० आणि त्याहून कमी वयाच्या कोणताही इच्छुक उमेदवार चीफ सिक्युरिटी ऑफिसर या पदासाठी अर्ज दाखल करू शकतो. या पदावर रुजू झाल्यास त्या उमेदवाराला दरमहिना ९०,०००/- इतके वेतन मिळेल.

MADC Job Criteria: पात्रतेचे निकष-

  • कोणत्याही नामांकित विद्यापीठातून पदवीचे शिक्षण घेतलेले असणे आवश्यक.
  • उमेदवाराकडे बेसिक AVSEC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
  • AVSEC मध्ये उच्च पदावर कार्यरत असण्याचा किमान पाच ते सात वर्षांचा अनुभव असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.
  • मराठी भाषेचे ज्ञान असणारे उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल.

चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणजे सीनियर मॅनेजर सेक्युरिटी या पदासाठी अर्ज करण्यासाठी ऑफलाइन पद्धतीचा वापर उमेदवारांना करावा लागेल. इच्छुक उमेदवारांनी त्यांचे अर्ज दिनांक ३१ जुलै २०२४ पर्यंत खालील पत्त्यावर जमा करणे गरजेचे आहे. ठरवून दिलेल्या शेवटच्या तारखेनंतर भरलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

अर्ज आणि कागदपत्रे जमा करण्यासाठीचा पत्ता: उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र-1, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई 400005.

MADC Important Documents: अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे-

  • PAN कार्ड
  • आधार कार्ड
  • दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिका
  • पदवी प्रमाणपत्र
  • पदव्युत्तर शिक्षण घेतले असल्यास त्याचे प्रमाणपत्र
  • अनुभवाचे प्रमाणपत्र

जमा केलेल्या अर्जावरून तसेच रेझ्यूमेवरून पुढे निवडक उमेदवारांची निवड केली जाईल. पुढच्या फेरी त्या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेण्यात येईल. या गुणांवरून पुढे कर्मचाऱ्याची नेमणूक करण्यात येईल. नोकरीचे ठिकाण शिर्डी विमानतळ असेल. तसेच या पदावर होणारी नेमणूक ही कंत्राटी तत्त्वावर असेल.

चीफ सिक्युरिटी ऑफिसर म्हणजेच सीनियर मॅनेजर सिक्युरिटी या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी सुरू असलेल्या या भरतीत सहभागी होण्याकरिता इच्छुक उमेदवारांना त्यांचे अर्ज ऑफलाइन पद्धतीने भरावे लागतील. उमेदवारांना हे अर्ज महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेडच्या https://www.madcindia.org/ या अधिकृत संकेतस्थळावर मिळतील. या संकेतस्थळावर गेल्यावर तुमच्यासमोर सगळ्यात आधी होमपेज उघडले जाईल. त्यातील करिअर या शिक्षण मध्ये गेल्यावर तुम्हाला या भरतीबद्दल आणि अर्जाबद्दल एकूणच माहिती मिळेल. भरती संदर्भातील अधिक माहिती मिळवण्यासाठी https://www.madcindia.org/pdfs/career/madc-career-32.pdf हे नोटिफिकेशन पहा.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-26T09:29:46Z dg43tfdfdgfd