NABARD RECRUITMENT 2024: NABARD कडून पदवीधरांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर...१ लाखांपर्यंत मिळणार वेतन.. लगेचच अर्ज करा!

NABARD Recruitment 2024: नाबार्ड किंवा NABARD (National Bank for Agriculture and Rural Development) ही कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असणारी एक राष्ट्रीय बँक आहे. कृषी, लघु उद्योग, कुटीर ग्रामोद्योग, हस्तकला आणि इतर संलग्न उद्योगांच्या विकासासाठी लोकांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने ही बँक स्थापन केली गेली आहे. 'नाबार्ड'कडून काही दिवसांपूर्वीच भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. संशोधन अधिकारी पदासाठी ही भरती होणार आहे. बँकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर, नाबार्डने तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. इच्छुक उमेदवार या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या अर्जासाठीची अंतिम तारीख ३० एप्रिल २०२४ आहे.

• नाबार्डसाठीची ही भरती खालील गोष्टींच्या आधारे केली जाईल:

- लेखी क्षमता चाचणी (Eligibility test)

- डेटा विश्लेषण (Data Analysis)

- व्हिज्युअलायझेशन असेसमेंट (Visualization Assessment)

- पॉवर-पॉइंट प्रेझेंटेशन (Power point presentation)

- मुलाखत (Interview)

• भरतीसाठी उमेदवाराची पात्रता काय असावी? (NABARD Eligibility criteria)

संशोधन अधिकारी पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलेले असावे.

• वयोमर्यादा आणि वेतन (Age limit and salary for NABARD Recruitment):

नाबर्डसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३१ मार्च २०२४ रोजी ४५ वर्षांपेक्षा जास्त नसावे. शासकीय नियमाप्रमाणे, राखीव प्रवर्गातील (Reserved category) अर्जदारांना वयात सवलत दिली जाणार आहे. संशोधन अधिकारी पदावर भरती झाल्यास उमेदवारास दरमहा १,००,०००/- रुपये वेतन असेल.

• या भरतीसंबंधीच्या अधिक माहितीसाठी नाबार्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या: nabard.org (NABARD Official website)

- भरतीच्या बातमीची PDF वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-20T10:06:09Z dg43tfdfdgfd