UPSC CSE 2023 : यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस २०२३ मार्क्स जाहीर झाले, टॉपर आदित्यला मिळाले एवढे मार्क्स

UPSC 2023 Topper Aditya Marks : भारतीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC ने १६ एप्रिल रोजी नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२३ चे अंतिम निकाल जाहीर केले होते. त्याचवेळी, आयोगाने सर्व यशस्वी उमेदवारांचे तपशीलवार गुण आज म्हणजेच १९ एप्रिल रोजी प्रसिद्ध केले आहेत. UPSC CSE परीक्षेला बसलेले उमेदवार https://upsconline.nic.in/ या अधिकृत वेबसाइटवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

टॉपर आदित्य श्रीवास्तवला मिळाले एवढे गुण :

या वर्षी एकूण १ हजार १६ उमेदवारांची अंतिम निवड करण्यात आली आहे. आदित्य श्रीवास्तव, अनिमेश प्रधान, डोनुरु अनन्या रेड्डी हे अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर आहेत. आज जाहीर झालेल्या यादीनुसार, आदित्य श्रीवास्तव याने लेखी परीक्षेत ८९९ गुण आणि व्यक्तिमत्व चाचणीत २०० गुण मिळवून पहिला क्रमांक पटकावला असून, त्याला एकूण १०९९ गुण मिळाले आहेत. यावेळी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्यांमध्ये ३२ गुणांचा फरक आहे.

द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाऱ्याला उमेदवारांच्या गुणात २ मार्क्सचा फरक :

अनिमेश प्रधानला लेखी परीक्षेत ८९२ आणि व्यक्तिमत्व चाचणीत १७५ गुण (एकूण १०६७) मिळाले. तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराने लेखी परीक्षेत ८७५ गुण आणि मुलाखतीत १९० गुण मिळवले, ज्यामुळे त्या उमेदवाराचे एकूण १०६५ गन मिळाले आहेत.

UPSC CSE 2023 चे Top 10 रँकधारक :

AIR 1 : आदित्य श्रीवास्तव

AIR 2 : अनिमेष प्रधान

AIR 3 : डोनुरु अनन्या रेड्डी

AIR 4 : पीके सिद्धार्थ रामकुमार

AIR 5 : रुहानी

AIR 6 : सृष्टी दाबस

AIR 7 : अनमोल राठोड

AIR 8 : आशिष कुमार

AIR 9 : नौशीन

AIR 10 : ऐश्वर्यम प्रजापती

UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षेची व्यक्तिमत्व चाचणी यावर्षी जानेवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आली होती. आयोगाने भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलीस सेवा आणि केंद्रीय सेवा, गट 'अ' आणि गट 'ब' मध्ये नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली आहे.

UPSC ने तात्पुरते ३५५ यशस्वी उमेदवारांची उमेदवारी कायम ठेवली आहे. एकूण १,०१६ यशस्वी उमेदवारांपैकी ३४७ सामान्य श्रेणीतील, ११५ EWS श्रेणीतील, ३०३ उमेदवार OBC श्रेणीतील आणि १६५ आणि ८६ उमेदवार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे आहेत.

५ लाखांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती :

नागरी सेवा परीक्षेसाठी अर्ज केलेल्या एकूण १० लाख १६ हजार ८५० उमेदवारांपैकी ५ लाख ९२ हजार १४१ उमेदवारांनी परीक्षेला हजेरी लावली. यापैकी, १४ हजार ६२४ उमेदवार UPSC CSE मुख्य (लेखी) परीक्षेसाठी पात्र ठरले आणि एकूण २ हजार ८५५ उमेदवार परीक्षेच्या मुलाखत आणि व्यक्तिमत्व चाचणीसाठी पात्र ठरले आणि शेवटी १ हजार १६ उमेदवारांची शिफारस करण्यात आली.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-04-19T12:05:15Z dg43tfdfdgfd