SUCCESSION 2.0: वारसाहक्कावरून RUPERT MURDOCH कोर्टाच्या दारी, ‘मीडिया किंग’चा उत्तराधिकारी कोण? कुटुंबात रस्सीखेच

मुंबई : जगातील सर्वात मोठ्या मीडिया साम्राज्यांपैकी एक मरडॉक कुटुंबात संपत्ती आणि वारसाहक्कावरून कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात ही माहिती समोर आली ज्यामध्ये सीलबंद न्यायालयाच्या कागदपत्रांचा हवाला देण्यात आला. नुकतेच बोहल्यावर चढलेले ९३ वर्षीय रुपर्ट मरडॉक यांच्यानंतर संपत्तीचे काय होणार याबाब्तर जाणून घेण्याची अनेकांमध्ये उत्सुकता होती.

रुपर्ट मरडॉक लेफ्ट विचारसरणीचे एक शक्तिशाली माध्यम सम्राट असून गेल्या अनेक वर्षांपासून फॉक्स कॉर्पोरेशन आणि न्यूज कॉर्पोरेशनचे नेतृत्व केले. न्यूज कॉर्पोरेशन ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ आणि ‘न्यूयॉर्क पोस्ट’ प्रकाशित करते. फोर्ब्सच्या अंदाजानुसार, त्यांचे कौटुंबिक साम्राज्य १९.५ अब्ज डॉलर्स इतके असून HBO ची हिट मालिका 'Succession' ची कहाणी मरडॉक यांच्या कुटुंबातील भांडणातून प्रेरित असल्याचे मानले जाते.

कोण बनणार रुपर्ट मरडॉक यांचा वारस

वारसाहक्काच्या केंद्रस्थानी मरडॉक फॅमिली ट्रस्ट आहे ज्यामध्ये फॉक्स कॉर्प आणि न्यूज कॉर्प या दोन्हीमध्ये मोठे मतदान शेअर्स आहेत. रूपर्ट मरडॉक यांची चार मोठी मुले - लचलान, जेम्स, एलिझाबेथ आणि प्रुडेन्स - ट्रस्टमध्ये समान चार मते सामायिक करतात पण, ‘द टाईम्स’च्या अहवालानुसार गेल्या वर्षीच्या अखेरीस रूपर्ट मरडॉक यांनी अपरिवर्तनीय कौटुंबिक ट्रस्टमध्ये सुधारणा करण्यासाठी याचिका दाखल केली जिथे त्यांना आपला मोठा मुलगा आणि वारस लचलान यांना विशेष जबाबदाऱ्या द्यायच्या होत्या. लचलान आणि वडिलांचे गेल्या अनेक वर्षांपासून खूप जवळचे नाते असून गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फॉक्स कॉर्प आणि न्यूज कॉर्पच्या अध्यक्षपदाच्या सूत्रे देण्यात आली.

रुपर्ट मरडॉक यांना कशाची चिंतान्यायालयाच्या कागदपत्रांचा हवाला देऊन ‘द टाईम्स’ने अहवालात म्हटले की मरडॉक यांना चिंता होती की त्यांची इतर तीन मुले लचलान आणि वडिलांपेक्षा राजकीयदृष्ट्या उदारमतवादी आहेत जे कंपन्यांच्या संपादकीय भूमिकेवर प्रभाव पाडू शकतात. द टाइम्सने म्हटले की, एकट्या लचलानला नियंत्रण देऊन कंपन्यांचे मूल्याचे रक्षण करत असल्याचा युक्तिवाद मरडॉक यांनी केला ज्याचा फायदा त्यांच्या सर्व वारसांना होईल. ट्रस्ट फक्त त्या बदलांना परवानगी देतो जे सद्भावनेने आणि सर्व वारसांच्या फायद्यासाठी केले जातात.

वारसाहक्कावरून भाऊ-बहिणीत वाद

दरम्यान, अब्जाधीश कुटुंबातील वाद तशी नवी गोष्ट नाही. ‘Succession’ मधील लोगन रॉयच्या पात्राच्या उत्तराधिकारी निवडण्याच्या स्पर्धेत भावंडांना एकमेकांच्या विरोधात उभे करण्याची रुपर्टची सवय असल्याचे मानले जाते. या शोला अनेक एमी पुरस्कार मिळाले असून त्याचा शेवटचा हंगाम गेल्या वर्षी आला ज्यामध्ये रुपर्ट यांनी आपल्या कंपन्यांच्या अध्यक्षपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला तेव्हा राजकीय विश्वात खळबळ उडाली होती कारण २०२४ राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू होती आणि मरडॉक यांचा रिपब्लिकन पक्षात बराच दबदबा आहे.

अशाच अधिक बातम्या वाचण्यासाठी भेट द्या महाराष्ट्र टाइम्सला. ताज्या बातम्या, शहर, देश, अर्थ, क्रीडा, भविष्य आणि लाइफस्टाईल संदर्भातील सर्व बातम्यांचे अपडेट्स मिळवा. व्हिडिओ पाहण्यासाठी मराठी TimesXP ला भेट द्या.

2024-07-26T06:34:08Z dg43tfdfdgfd