MAHARASHTRA BREAKING NEWS LIVE : धनगर आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय; अजित पवार गट नाराज? म्हणाले, “आम्हाला विश्वासात घ्यायला हवं होतं”

Mumbai Maharashtra Live News Updates, 16 September 2024 : “महाराष्ट्राच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात होईल. साधारणः दोन टप्प्यात होणाऱ्या या निवडणुकीसाठी आचारसंहिता दसऱ्यानंतर लागू होईल”, असे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दिले. निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक पुढे ढकलल्यानंतर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष व जनतेलाही अशीच अपेक्षा होती. त्यामुळे पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने मोर्चेबांधणी चालू केली आहे. सर्व पक्षांचे नेते राज्यभर फिरत आहेत, दौऱे, मेळावे, प्रचारसभा, बैठका चालू आहेत. राज्यातील या सर्व घडामोडींवर आपलं लक्ष असेल. त्याचबरोबर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा देण्याची घोषणा करत पुन्हा एकदा धक्कातंत्र अवलंबल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशाच्या राजधानीत घडणाऱ्या घडामोडींचा व देशभरात घडणाऱ्या राजकीय घडामोडींचा आढावा आपण या लाईव्ह न्यूज ब्लॉगद्वारे घेणार आहोत.

2024-09-16T05:18:30Z dg43tfdfdgfd