MAHARASHTRA NEWS LIVE : अमरावतीत अमित शाहांच्या सभेआधी राजकारण तापलं; बच्चू कडू रॅली काढणार

Marathi News Live Update : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी महायुतीच्या आणि महाविकास आघाडीच्या प्रचारसभा सुरु आहे. आज अमरावती लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा पार पडणार आहे. तर अमरावतीमधील सायन्स कोर मैदानावरुन प्रहारचे नेते बच्चू कडू आणि रवी राणा, नवनीत राणा यांच्यात वाद सुरु आहे. याबरोबरच महायुतीचा नाशिकच्या जागेचा तिढा अद्याप सुटत नसल्याचे चित्र आहे. छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभेतून माघार घेतली असली तर राष्ट्रवादीने या जागेचा दावा सोडला नसल्याचे छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. यासह राज्यातील इतर अनेक घडामोडी वाचण्यासाठी हे पेज सतत रिफ्रेश करा.

2024-04-24T05:45:23Z dg43tfdfdgfd