MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा – इतिहास प्रश्न विश्लेषण

रोहिणी शह

अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा सामान्य अध्ययनामधील इतिहास घटकाच्या तयारीबाबत या लेखापासून चर्चा करण्यात येत आहे. या लेखामध्ये या घटकावर अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा आणि गट ब सेवा पूर्व परीक्षेमध्ये मागील वर्षांत विचारण्यात आलेल्या प्रश्नांचे विश्लेषण व त्या आधारे तयारी करताना लक्षात घ्यावयाचे मुद्दे पाहू.

● प्रश्न १. वसाहतवादाचे भारतीयांच्या जीवनावर झालेल्या परिणामा संबंधीत खालील विचार/विधान कोणी मांडले ?

अ. हिंदुस्थानची लक्ष्मी दर्यापार जाऊ लागली.

ब. आर्थिक नि:सारणामुळे जगातील सर्वात समृद्ध भारत देशास दरिद्री बनवले आहे.

क. भारताचे आर्थिक शोषण हे खंडणीसारखे आहे.

ड. हाती तलवार धरून आपल्या व्यापाराची व्यवस्था लावण्याची वेळ आली आहे.

पर्यायी उत्तरे :

● प्रश्न २. प्रार्थना समाजाबाबत पुढीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

अ. दादोबा तर्खडकर, डॉ. आत्माराम पांडुरंग, वामन आबाजी मोडक, भाऊ महाजन, इत्यादींनी ३१ मार्च १८६७ रोजी मुंबई येथे प्रार्थना समाजाची स्थापना केली.

हेही वाचा >>> Upsc ची तयारी: अर्थव्यवस्था : भारतातील बेरोजगारीचे अंत:प्रवाह

ब. प्रार्थना समाजामार्फत ‘सुबोध पत्रिका’ सुरू केली.

क. प्रार्थना समाजाच्या माध्यमातून ना. म. जोशी यांनी मजुरांची स्थिती सुधारण्यासाठी ‘सोशल सव्हींस लीग’ची स्थापना केली.

ड. प्रार्थना समाजाने मुंबई, सोलापूर, कोल्हापूर येथे महाविद्यालयांची स्थापना केली.

(१) अ आणि ब फक्त

(२) ब आणि क फक्त

(३) अ, ब आणि क फक्त

(४) ब, क आणि ड फक्त

● प्रश्न ३. क्रांतीकारक सेनापती बापट यांनी खालीलपैकी कोणत्या चळवळी/आंदोलना मध्ये भाग घेतला होता ?

अ. गोवा मुक्ती संग्राम

ब. हैदराबाद मुक्ती संग्राम

क. संयुक्त महाराष्ट्र चळवळ

ड. महाराष्ट्र – म्हैसूर-सीमा आंदोलन

(१) अ आणि ब फक्त

(२) अ, ब आणि क फक्त

(३) ब, क आणि ड फक्त

(४) वरील सर्व बरोबर

● प्रश्न ४. इ. स. १९१९ मध्ये ब्रिटिश, सरकारने घटनात्मक सुधारणा दिल्या कारण

अ. क्रांतिकारकांच्या चळवळी मधून भारतीयांच्यात असंतोष वाढला

ब. काँग्रेस व मुस्लीम लीग यांच्यातील युती

क. जहाल व मवाळ यांच्यातील युती

ड. पहिल्या महायुद्धाने निर्माण केलेली राजकीय परिस्थिती

(१) अ आणि ब फक्त

(२) ब आणि क फक्त

(३) ब, क आणि ड फक्त (४) वरील सर्व बरोबर

● प्रश्न ५. गोपाळ गणेश आगरकरांशी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे संबंधित होती?

( a) केसरी व मराठा

( b) व-हाड समाचार

( c) सुधारक

( d) स्वराज्य

वरीलपैकी कोणते विधान / विधाने बरोबर आहे/त?

(१) ( a) आणि ( c) फक्त

(२) (a), ( b) आणि ( c) फक्त

(३) ( b) आणि ( d) फक्त

(४) (b), ( c) आणि ( d) फक्त

मागील वर्षांच्या प्रश्न पत्रिकांच्या विश्लेषणातून पुढील मुद्दे लक्षात घ्यावे लागतील.

मागील पाच वर्षांत या घटकावरील प्रश्न हे बहुतांशपणे बहुविधानी आणी थोड्या अधिक काठिण्यपातळीचे आहेत. त्यामुळे तयारी करताना विश्लेषणात्मक ॲप्रोच ठेवून अभ्यास करावा लागेल.

अभ्यासक्रमामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासात महाराष्ट्राच्या इतिहासाचा स्पष्ट व स्वतंत्र उल्लेख आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील घडामोडींवर भर देऊन प्रश्न विचारण्यात येतात.

त्यामध्ये १८५७च्या उठावापासूनच्या स्वातंत्र्य चळवळी आणि त्या काळातील काँग्रेससह सर्व राजकीय पक्ष, संघटना, क्रांतिकारी चळवळी यांचा विचार करण्यात आलेला दिसतो. आधुनिक काळातील स्वातंत्र्य चळवळी व्यतिरिक्त देशातील समाज सुधारणा, सामाजिक संस्था संघटना, आर्थिक प्रगती तसेच घटनात्मक प्रगती (विविध कायदे) यांबाबतही प्रश्न समाविष्ट आहेत. समाजसुधारक आणि राजकीय व्यक्तिमत्वे यांवर बहुविधानी प्रश्न विचारलेले दिसतात. या विश्लेषणाच्या आधारावर या घटकाची तयारी कशा प्रकारे करावी याबाबत पुढील लेखांमध्ये पाहू.

2024-04-19T09:33:16Z dg43tfdfdgfd