NRCG PUNE RECRUITMENT 2024 : पुण्यातील ‘या’ संस्थेत नोकरीची संधी; मिळणार ‘इतक्या’ हजारांचे वेतन

NRCG Pune recruitment 2024 : नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पुणे येथे सध्या SRF, YP (ll) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या पदांसाठी नेमक्या किती जागा रिक्त आहेत ते जाणून घ्या. तसेच, या नोकरीचा अर्ज करण्यासाठी पात्रता निकष, शैक्षणिक पात्रता आणि अंतिम तारीख काय आहे याची इच्छुक उमेदवारांनी माहिती पाहा.

NRCG Pune recruitment 2024 : पद आणि पदसंख्या

नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्सच्या SRF या पदासाठी एकूण २ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्सच्या YP (ll) पदासाठी एकूण २ रिक्त पदांवर भरती करण्यात येणार आहे.

अशा एकूण ४ रिक्त पदांवर नोकरीसाठी भरती करण्यात येणार आहे.

NRCG Pune recruitment 2024 : शैक्षणिक पात्रता

SRF या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे बायोइन्फॉरमॅटिक्स / बायोटेक्नॉलॉजी / आण्विक जीवशास्त्र या क्षेत्रात बॅचलर आणि एम.एस्सी. अशी पदवी असणे आवश्यक आहे.

तसेच, दोन वर्षांच्या अनुभवासह कृषी हवामानशास्त्र/ फलोत्पादन/ सूक्ष्मजीवशास्त्र/ मृदा विज्ञान/ वनस्पती पॅथॉलॉजी मध्ये M. Sc. पदवी असावी.

YP (ll) या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे कृषी अभियांत्रिकी बी. टेक किंवा कृषी हवामानशास्त्र / फलोत्पादन / मृदा विज्ञान / वनस्पती शरीरक्रियाविज्ञान यामध्ये M. Sc. पदवी असावी.

तसेच (कृषी) कीटकशास्त्र किंवा कृषी कीटकशास्त्र या क्षेत्रात M. Sc. पदवी असावी.

हेही वाचा : IIM Mumbai recruitment 2024 : मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये नोकरीची संधी! माहिती पाहा

NRCG Pune recruitment 2024 : वेतन

SRF या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर, उमेदवारास ३१ हजार ते ४२ हजार इतके वेतन देण्यात येणार आहे.

YP (ll) या पदावर उमेदवाराची निवड झाल्यानंतर, उमेदवारास ४२,०००/- रुपये इतके वेतन देण्यात येणार आहे.

NRCG Pune recruitment 2024 – नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स अधिकृत वेबसाईट लिंक –https://nrcgrapes.icar.gov.in/

NRCG Pune recruitment 2024 – अधिसूचना –https://nrcgrapes.icar.gov.in/announcements/Advertisement%20-%2004%20Post%20(SRF%20&%20YP-II)%20NS,%20AU,%20DY(123).pdf

NRCG Pune recruitment 2024 : अर्ज आणि अर्ज प्रक्रिया

वरील पदांसाठी उमेदवारास नोकरीचा अर्ज करायचा असल्यास उमेदवारांनी तो ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

यासाठी उमेदवारांनी खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा –

अर्ज पाठविण्याचा पत्ता – संचालक, ICAR- नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्स, पी.बी. क्र.-३, मांजरी फार्म पोस्ट, सोलापूर रोड, पुणे- ४१२३०७

नोकरीचा अर्ज पाठवताना उमेदवारांनी संपूर्ण अधिसूचना नीट वाचून घ्यावी.

अर्जामध्ये उमेदवाराने त्याची संपूर्ण आणि अचूक माहिती देणे आवश्यक आहे.

उमेदवारांनी नोकरीचा अर्ज अंतिम तारखेआधी पाठवावा.

अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख ही ९ मे २०२४ अशी आहे.

वरील नोकरीसंबंधी इच्छुक उमेदवारांना अधिक माहिती हवी असल्यास नॅशनल रिसर्च सेंटर फॉर ग्रेप्सच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी. अथवा नोकरीची अधिसूचना वाचावी. वेबसाईट आणि अधिसूचना वर नमूद केली आहे.

2024-05-03T16:37:48Z dg43tfdfdgfd