PARALYMPICS 2024 : मोबाईल बाळगणे पडले महागात! इटालियन खेळाडूला पॅरालिम्पिकमध्ये गमवावे लागले कांस्यपदक

Paralympics 2024 Giacomo Perini lost bronze medal because he accidentally carried mobile : मोबाईल जास्त वापरण्याच्या सवयीमुळे अनेक लोकांना नुकसान झालेले तुम्ही ऐकले असेल. पण आता पॅरालिम्पिक स्पर्धेत एका खेळाडूला मोबाईलमुळे जिंकलेले पदक गमवावे लागले आहे. नौकानयन स्पर्धेदरम्यान बोटीवर मोबाईल फोन ठेवल्याबद्दल दोषी आढळल्याने इटालियन रोअर जियाकोमो पेरिनी पॅरिस पॅरालिम्पिकमधून अपात्र ठरला आहे. यानंतर त्याला पॅरालिम्पिकमध्ये जिंकलेले कांस्यपदकही गमवावे लागले. त्याच्याकडून हे पदक काढून घेत चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या ऑस्ट्रेलियाच्या एरिक हॉरीला देण्यात आले. तत्पूर्वी ब्रिटनच्या बेंजामिन प्रिचार्डने सुवर्ण आणि युक्रेनच्या रोमन पॉलियान्स्कीने रौप्यपदक जिंकले.

जियाकोमो पेरिनीला अपात्र ठरवण्यात आले –

२८ वर्षीय पेरिनी PR1 पुरुषांच्या एकल स्कल्सच्या अंतिम फेरीत तिसरे स्थानावर राहिला, ज्यामध्ये पायाचा वापर न करणारे खेळाडू स्पर्धा करू शकतात. आसन निश्चित असल्यामुळे त्यांना हात आणि खांद्याच्या सहाय्याने नौकानयन करावे लागते. या स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्यानंतर जियाकोमो पेरिनीचा आनंदा फार काळ टिकला नाही. कारण सामन्यादरम्यान त्याच्या बॅगमध्ये मोबाईल आढळून आला, ज्यामुळे जागतिक रोईंगने नंतर त्याला अपात्र ठरवले. परंतु, जियाकोमोने सांगितले की ही एक चूक होती पण त्याने कधीही संवाद साधण्यासाठी याचा वापर केला नाही.

जियाकोमो पेरिनी म्हणाला चुकून घडले –

जागतिक रोइंगने आपल्या निवेदनात म्हटले की, “PR1 पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील इटालियन खेळाडूने नियम २८ आणि उपनियम, परिशिष्ट R2 चे उल्लंघन करून शर्यतीदरम्यान संप्रेषण उपकरणाचा वापर केल्याचे आढळून आले.” इटालियन खेळाडूने सांगितले की ही एक चूक होती. तो आपला फोन बोटीवर एका छोट्या पिशवीत विसरला होता, ज्यामध्ये पाण्याची बाटली देखील होती. त्यामुळे तो निवेदनातील शब्दांशी असहमत होता. आपण नियमांचे उल्लंघन केले नसल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा – ENG vs SL : ऑली पोपने शतक झळकावत केला मोठा पराक्रम! जगातील कोणत्याच फलंदाजाला न जमलेली केली कामगिरी

तो पुढे म्हणाला, त्यांना माझ्याकडे पहिल्यांदा मोबाईल सापडला नाही. कारण मी बोटीवर या अगोदर कधीही मोबाईल फोन वापरला नाही. त्यामुळे मी फोन ज्युरींना दिला आहे. जेणेकरून ते पाहू शकतील की शेवटचा कॉल काल रात्री मानसशास्त्रज्ञांसोबत झाला होता. नियम असे म्हणत नाहीत की तुम्ही फोन आणू शकत नाही, पण तुम्ही संवाद साधू शकत नाही.

हेही वाचा – Manav Suthar : दुलीप ट्रॉफीमध्ये ७ विकेट्स आणि ७ मेडन ओव्हर्स टाकणारा…कोण आहे मानव सुथार? जाणून घ्या

नियम सांगतात की बोटीच्या बाहेरील कोणतेही इलेक्ट्रिक वस्ती किंवा इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरून आपल्या पथकाशी कोणताही संवाद साधू शकत नाही. इटालियन रोइंग फेडरेशनने अपील केले, जे कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्टने ताबडतोब नाकारले आणि नंतर सांगितले की ते निर्णयावर दुसरे अपील तयार करण्यासाठी जागतिक रोइंग कार्यकारी मंडळाशी संपर्क साधतील.

2024-09-07T14:59:55Z dg43tfdfdgfd