UPSC RECRUITMENT 2024: यूपीएससी अंतर्गत ‘या’ ५०६ पदांसाठी भरती; अर्ज करण्यासाठी उरलेत काही दिवस

UPSC Recruitment 2024: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगानं (UPSC) नवीन भरतीसाठी upsc.gov.in वर अधिसूचना जारी केली आहे. या भरती अंतर्गत असिस्टंट कमांडंट पदाच्या विविध पदांसाठी एकूण ५०६ रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवार यूपीएससी CAPF २०२४ upsconline.nic.in या अधिकृत वेबसाइटद्वारे अर्ज करू शकतात. अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १४ मे असणार आहे. भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, पदसंख्या, वयोमर्यदा, अर्ज फी, शैक्षणिक पात्रता याविषयी या लेखातून अधिक जाणून घेऊ.

रिक्त पदे आणि पदसंख्या –

केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात (CAPF) ५०६ असिस्टंट कमांडंटच्या बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF) – १८६ , केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) – १२०, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) – १०० रिक्त, इंडो तिबेटन बॉर्डर पोलिस (ITBP) – ५८, सशस्त्र सीमा बल (SSB) साठी ४२ रिक्त पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे.

हेही वाचा…CBI Bharti 2024 : सल्लागार पदासाठी सीबीआयमध्ये पदभरती; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख

अर्ज कसा कराल?

पुरुष आणि महिला दोन्ही उमेदवार सहाय्यक कमांडंट पदासाठी अर्ज करण्यासाठी पात्र आहेत. upsconline.nic.in वर ऑनलाइन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी नवीन उमेदवारांनी वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा वापर करून वन-टाइम रजिस्ट्रेशन (OTR) प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. ओटीआर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ते अर्ज प्रक्रिया भरण्यासाठी पुढे जाऊ शकतात.

तसेच ज्या उमेदवारांनी यापूर्वी UPSC CAPF साठी अर्ज केला असेल किंवा इतर कोणत्याही परीक्षेसाठी OTR पूर्ण केला आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. कारण UPSC वेबसाइटवरील OTR ची वैधता लाइफटाइम असणार आहे. त्यामुळे उमेदवार त्यांच्या रजिस्ट्रेशनची माहिती देऊन अर्ज भरू शकतात.

वयोमर्यादा – अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ वर्षे असावे.

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.

अर्ज फी – अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी २०० रुपये असणार आहेत. महिला, एससी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी खाली जोडलेली अधिसूचना वाचून घ्यावी.

लिंक – https://upsc.gov.in/sites/default/files/CAPF_AC_Exam_2024_ExamNotif_Eng_24042024.pdf

सर्व अधिसूचना नीट वाचून, मगच उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करावा.

2024-04-25T13:20:50Z dg43tfdfdgfd