बातम्या

Trending:


‘भय’भूती : भयाच्या अनंत मिती!

भयाच्या कितीतरी मिती आहेत. प्रत्येकालाच वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर ही भीती नक्की भेटते, अनंत रूपांत. कधी आपली सत्त्वपरीक्षा पाहणारी, तर कधी अंतर्जाणिवांचा कस पाहणारी.


BJP-Shivsena Rada Mulund : भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा! ABP Majha

मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेच्या यांच्या कार्यालयात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्ते यांचा जोरदार राडा झाला. कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ पैसेवाटप सुरू होतं असा आरोप ठाकरे गटाने केला. आक्रमक झालेल्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसमोर त्याचवेळी भाजप कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमा झाले. त्यावरून दोन्ही कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी, धक्काबुक्की झाली. पोलीसांनी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान कोटेचा यांच्या कार्यालयात जाऊन उपमुख्यमंत्री फडणवीसांनीही घटनेचा आढावा घेतला. हे ही वाचा मराठीला अभिजात दर्जा, सैन्य घुसवून ओवैसीसारख्यांचे अड्डे उद्ध्वस्त करा, राज ठाकरेंच्या 7 बेधडक मागण्या! Mahayuti Rally Shivaji Park Mumbai Raj Thackeray : शिवाजी पार्कमधील महायुतीच्या सभेत राज ठाकरे यांनी बेधडक भाषण केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केले. त्याशिवाय त्यांनी केलेल्या कामाचा पाढा वाचला. राज ठाकरे यांनी मोदी पुन्हा सत्तेत येतील असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत राज ठाकरे यांनी 'आपण आहात म्हणून राम मंदिर होऊ शकलं', असे म्हटले. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सहा बेधडक मागण्या केल्या आहेत. पुढच्या पाच वर्षांसाठी मोदीजींसमोर उभा आहे. महाराष्ट्राच्या खूप आपेक्षा आहेत. त्यातील काही गोष्टी सांगत आहे, असे राज ठाकरे म्हणाले.


Supreme court on election commission: मतदान आकडेवारीवर तातडीने सुनावणी, सर्वोच्च न्यायालयाची सहमती

Supreme court on election commission: स्वयंसेवी संस्थेने आपल्या सन २०१९ च्या जनहित याचिकेत अर्ज दाखल करून निवडणूक आयोगाला सर्व मतदान केंद्रांच्या ‘फॉर्म १७ -सी’ भाग-१च्या स्कॅन केलेल्या प्रती मतदानानंतर अपलोड करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली होती.


Baba Vanga Prediction : बाबा वेंगा यांचं हवामानाबाबत भाकीत काय सांगतं? खरंच येत्या काळात उष्णतेमुळे...

Baba Vanga Prediction : बाबा बांगा यांनी हवामानाबाबत भाकीत केलं असून येत्या काळात उष्णतेमुळे काय परिणाम होणार याबद्दल सांगितलंय.


अखेरच्या टप्प्यात भुजबळांची मनधरणी करण्याचे सर्व स्तरातून प्रयत्न

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी छगन भुजबळ नाराज असल्याचे सांगितल्यानंतर भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांनी तत्काळ भुजबळ फार्म गाठत छगन भुजबळ यांची भेट घेत तब्बल दोन तास बंद दाराआड चर्चा केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अखेरच्या दिवसापर्यंत भुजबळांची मनधरणी करण्याचे भाजपचे प्रयत्न सुरू आहेत. लोकसभेच्या मतदानाचा …


Raj Thackeray Speech : मोदींसमोर तोफ धडाडली, राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे

Raj Thackeray Speech : येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडका लावण्यात आला. शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची देखील उपस्थित होती. कारण मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पुणे, कोकण, कल्याण-डोंबिवली आणि आता मुंबई अशा महत्त्वाच्या...


पुन्हा मुलींची बाजी!

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन अर्थात सीबीएसईचा निकाल यंदाही उत्साहवर्धक राहिला आहे. या निकालाच्या डेटाचे विश्लेषण करण्याबरोबरच त्याच्या सामाजिक पैलूंचीही चर्चा होणे स्वाभाविक आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या ट्रेंडनुसार यंदाही दहावी आणि बारावीच्या परीक्षेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. विद्यार्थ्यांचे यशाचे प्रमाणही चांगले असले, तरी मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. बारावी परीक्षेच्या निकालात एकूण …


Devendra Fadnavis on Ajit Pawar : सिंचन घोटाळ्याचे आरोप खरे, पण अजित पवार दोषी नाहीत- फडणवीस

सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य आहे, पण अजित पवार दोषी नाहीत, असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, अशी स्पष्टोक्ती देखील फडणवीसांनी दिली. हेही पाहा सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : सिंचन घोटाळ्यात देवेंद्र फडणवीस यांना जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे, जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल ज्येष्ठ काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. कथित 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात फडणवीस यांनी एका मुलाखतीमध्ये बोलताना म्हणाले की, अजित पवार हे त्या खात्याचे प्रमुख असल्यामुळे त्यांच्यावर आम्ही आरोप केले. त्यांना जबाबदार धरणे साहजिकच होते. तपास यंत्रणांनी सर्व काही तपासले. परंतु कोणत्याही आरोपपत्रात, यंत्रणांनी अजित पवारांवर थेट भूमिका असल्याचं म्हटलेलं नाही. आपल्याला यंत्रणा आणि त्यांच्या तपासाला सामोरे जावे लागते, असे म्हणाले होते. शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? फडणवीस यांनी मांडलेल्या भूमिकेनंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी खोचक शब्दात विचारणा केली आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांना मंत्री करण्यापासून ते सोबत घेण्यापर्यंत भाजपचा मोठा विरोध होता. सिंचन घोटाळा, बँक घोटाळा हे पंतप्रधानांनी सांगितलं. एवढे आरोप असलेल्या अजित पवारांना यापुढे सोबत घेऊ नका असंही त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना हा जावई शोध कधी लागला हे स्पष्ट केलं पाहिजे. जर त्यांना हा शोध लागला तर त्यांनी पंतप्रधानांना का सांगितलं नाही? असा खोचक सवाल त्यांनी केला. ते म्हणाले की, पंतप्रधान यांनी केलेला आरोप ग्राह्य धरायचा की देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले ते ग्राह्य धरायचं? मी मुख्यमंत्री असताना त्यांच्याच विभागाने मला ही माहिती दिली होती. त्यांनी सांगितले की, मनसेकडून आज मुंबईत पंतप्रधानांची सभा बोलावली आहे. त्यामुळे किमान आज त्यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच आश्वासन दिलं पाहिजे. आम्ही ही लढाई सुरु केली होती, असेही त्यांनी सांगितले.


Ghatkopar Hoarding Collapse : मुंबईत होर्डिंग उभारणीचे नियम काय सांगतात? Special Report

घाटकोपर येथे महाकाय होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आणि त्यानंतर मुंबईतील होर्डिंगची चर्चा सुरू झाली. मुळात होर्डिंगसंदर्भात काय नियम आहेत. मुंबईत किती होर्डिंग्ज आहेत तसेच यामागचे अर्थकारण कसं आहे याचाच आढावा घेणारा एबीपी माझाचा रिपोर्ट... हे देखील पाहा Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा 4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला. पुढे नितेश कराळे मास्तर म्हणाले की, "मोदींनी आपला उमेदवारी अर्ज भरताना 3 कोटी रूपये संपत्ती असल्याचं सांगितलं. 3 कोटी रुपयांचे कोणी फकीर असतो का?" असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. पुढे कराळे मास्तर यांनी देशातील हायवेवरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, "01 किलोमीटर रस्ता बांधण्यासाठी 18 कोटी खर्च येतो तर मोदींना त्यासाठी 251 कोटी खर्च केले" असा लेखाजोखा देखील त्यांनी यावेळी मांडला.


Loksabha election 2024 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

CM Eknath Shinde Serious Allegation On Uddhav Thackeray


Buddha Purnima 2024: बुद्ध पौर्णिमेला जुळून येताय शिवयोगासह हे 4 संयोग, जाणून घ्या महत्त्व

Buddha Purnima 2024: पंचांगानुसार, प्रत्येक महिन्यात पौर्णिमा तिथी येते. प्रत्येक पौर्णिमेचे महत्त्व वेगळे असून यात बुद्ध पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गौतम बुद्धांची पूजा केली जाते. मान्यतेनुसार बुद्ध हे श्री हरी विष्णूंचे अवतार आहे. त्यामुळे या दिवशी श्री हरी विष्णू आणि सत्यनारायण पूजा देखील केली जाते. पंचांगानुसार, यंदा 23 मे रोजी वैशाख पौर्णिमा म्हणजेच बुद्ध पौर्णिमा आहे.


Pm Modi Vs Uddhav Thackeray : नकली शिवसेनेवरून उद्धव ठाकरे, नरेंद्र मोदी यांच्यात आरोप-प्रत्यारोप

मुंबईतल्या महायुती आणि इंडिया आघाडीच्या सभेतून एकमेकांवर सडकून टीका करण्यात आली. तर असली नकली शिवसेनेवरुन नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमध्ये पुन्हा एकदा वार-प्रतिवार रंगला. तर शरद पवार यांनीही नकली शिवसेनेच्या टीकेवरुन मोदींना टोला लगावलाय. तर उद्धव ठाकरेंनी देखील सडकून टीका केली "बाळासाहेबांची घराणेशाही चालत नाही, पण गद्दाराच्या कार्ट्याला उमेदवारी देता. ज्या प्रमोद महाजनांनी भाजप वाढवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, त्यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली. पूनम तुमच्या पक्षात असली तरी प्रमोद महाजन आणि माझे भावासारखे संबंध होते", असे ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले. मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेही उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, एकीकडे आपण जमलो आहेत. दुसऱ्या बाजूला गद्दार आणि भाडोत्री जमले आहेत. सगळे बेअकली आणि नकली आहेत. 4 जूनपर्यंत पंतप्रधान बोलायला उभे राहिले आहेत. कारण 4 जूननंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. ज्याप्रमाणे मोदींनी नोटबंदी जाहीर केली. त्याप्रमाणे 4 जून ला संपूर्ण देश डिमोदीनेशन करणार आहे. तुमची मुंबईत पंतप्रधान म्हणून शेवटी सभा आहे.


Central Railway | मध्य रेल्वेवर 15 दिवसांचा ब्लॉक; काही ट्रेन रद्द

Central Railway block 15 days reason and time table changes


Navi Mumbai Work From Home Scam: महिलेने ४ दिवसांत गमावले ५४ लाख; फसवणूक करणाऱ्यांचा प्लॅन वाचून व्हाल चकित

झालं असं की, नवी मुंबईतील ऐरोली येथे स्थायिक असणारी एक ३७ वर्षीय गर्भवती महिला आपल्या प्रसुती रजेवर असताना घरबसल्या अतिरिक्त कमाईसाठी काम शोधत होती. अन् मग...


ABP Majha Headlines : 07.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

नकली शिवसेनेनं बाळासाहेबांना दगा दिला आणि शिवसैनिकांचा विश्वासघात केला, शिवाजी पार्कमधल्या सभेतून पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल. चार जूननंतर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, फक्त मोदीच राहतील, उद्धव ठाकरेंची टीका, मोदींनी उद्धव ठाकरेंना संपवून दाखवावं, ठाकरेंचा घणाघात. राज ठाकरेंच्या भर मंचावर पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे सात मागण्या, जे सत्तेत येणारच नाहीत त्यांच्यावर का बोलता म्हणत इंडिया आघाडीला टोला. भटकती आत्माच्या टीकेवरुन शरद पवारांची पुन्हा मोदींवर टीका, हा आत्मा तुम्हाला सत्तेतून खाली खेचल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, पवारांचा हल्लाबोल. ४ जूनला मोदी पुन्हा सत्तेत आले तर ठाकरे, पवार तुरुंगात जाणार, बीकेसीतील सभेतून अरविंद केजरीवाल यांचा घणाघआात, मोदींची रशियाच्या पुतीनशी तुलना सिंचन घोटाळ्याचे आरोप सत्य ,पण अजित पवार दोषी नाहीत, देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य, खात्याचे मंत्री म्हणून जबाबदार मात्र अजितदादांविरुद्ध पुरावा नाही, फडणवीसांची स्पष्टोक्ती मुलुंडमध्ये भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळ राडा... पैसे वाटप केल्याचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून आरोप... भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक, नाशिकमधील भेटीनंतर गिरीश महाजनांचं वक्तव्य, तर महायुतीत येण्यासाठी अनेक जण रांगेत, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज अमेठी दौऱ्यावर, स्मृती इराणींसाठी रोड शोमध्ये सहभागी होणार ((अमित शाहांचा आज अमेठीत रोड शो))


Rakhi Sawant Health Updates : रुग्णालयात दाखल झाल्यानंतर राखी सावंतने स्वत: दिली हेल्थ अपडेट, म्हणाली गर्भाशयात गाठ आता...

Rakhi Sawant Health Updates : राखी सावंत (Rakhi Sawant) गेल्या दोन दिवसांपासून रुग्णालयात आहे. छातीत तीव्र वेदना होत असल्याच्या तक्रारीनंतर मंगळवारी सायंकाळी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. ड्रामा क्वीन अचानक रुग्णालयात दाखल झाल्याने चाहत्यांना धक्का बसला. अनेकांनी ती पुन्हा एकदा काहीतरी नौटंकी करत असावी असा कयास बांधला. मात्र, तिचा पूर्व पती रितेशने तिची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले. आता राखीने स्वतःच्या तब्येतीबद्दल अपडेट दिली आहे. राखीला...


Pune Mumbai Expressway: प्रवाशांनो लक्ष द्या, आज आणि उद्या पुणे-मुंबई एक्सप्रेसवे या कालावधीसाठी बंद राहणार

Pune Mumbai Expressway Close Update: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेसवे आज (शनिवार) आणि उद्या (रविवार) काही काळासाठी बंद राहणार आहे. या एक्सप्रेसवेवरील पुणे वाहिनीवर गॅन्ट्रीच्या तांत्रिक तपासणी आणि दुरुस्तीचे काम राज्य रस्ते विकास महामंडळाकडून करण्यात येणार आहे. त्यामुळे हा मार्ग बंद असेल. याचा फटका वाहनचालकांना बसणार आहे.


आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केले संघ मालकाचे पैसेवसूल…

कमी पैश्यांत अव्वल दर्ज्याची कामगिरी केली या खेळाडूंनी…


RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत आजपासून अर्ज करा; शिक्षण विभागाची माहिती

Right To Education Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने उद्या शुक्रवारी १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.


Cyber Crime : व्यावसायिकाला तब्बल एक कोटीचा गंडा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे प्रलोभन दाखवत सायबर चोरट्यांनी एका व्यावसायिकाला एक कोटी 20 लाखांचा आर्थिक गंडा घातला आहे. व्यावसायिकाने आपले पैसे सायबर चोरट्यांच्या हवाली तर केलेच; शिवाय बहिणीचे देखील पैसे दिले. याप्रकरणी भवानी पेठेतील 55 वर्षीय व्यावसायिकाने शिवाजीनगरमधील सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान …


Chhagan Bhujbal Full PC: तुमच्याकडचे अनेक लोक आमच्याकडे येण्यास इच्छुक, भुजबळांचा जयंत पाटलांना टोला

Girish Mahajan नाशिक : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा रंगली. या पार्श्वभूमीवर भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी छगन भुजबळ यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भुजबळांच्या भेटीनंतर गिरीश महाजनांनी माध्यमांशी संवाद साधला. गिरीश महाजन म्हणाले की, आता कुठली नाराजी आहे. मोदींच्या सभेत भुजबळांनी जोरदार भाषण केलं. त्यांच्या भाषणाचे सर्वांनी कौतुक केले. मोदीजींनी कशासाठी पंतप्रधान करायचे आहे. हे त्यांनी सांगितले. त्यामुळे भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा निरर्थक असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. तटकरेंची चिंता देशमुखांनी करू नये सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली, असा दावा अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी केला. जे सोडून गेले त्यांना परत घेणार नाही, असेही त्यांनी म्हटले. यावर गिरीश महाजन म्हणाले की, अनिल देशमुख तरी तिथे स्थिरस्थावर आहेत का? तुम्ही तिकडे राहा नाहीतर अजून काही वेगळे विचार तुमच्या मनात


Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त

Shivaji Park Security Tightened : पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईत भव्य सभा; पोलिसांचा चोख बंदोबस्त पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेच्या निमित्ताने संपूर्ण शिवाजी पार्क कापडाच्या माध्यमातून झाकण्यात आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शिवाजी पार्कच्या चारही बाजूला पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव पोलीस दल शीघ्र कृती दल तसेच दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलेला आहे. या मैदानाच्या चारी बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळासाहेब ठाकरे यांचे मोठे कट आउट देखील लावण्यात आलेले आहेत. आजच्या सभेच्या निमित्ताने पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवाजी पार्क परिसरात येणार आहेत त्यामुळे आजच्या त्यांच्या भाषणाकडे सर्वांचं लक्ष लागला आहे यासोबतच राज ठाकरे काय भूमिका मांडतायेत हे देखील महत्त्वाचं राहणार आहे. मैदानाचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधींनी


CM Eknath Shinde | 'उद्धव ठाकरेंनी आनंद दिघेंनाही त्रास दिला', झी 24 तासच्या मुलाखतीत गौप्यस्फोट

CM Eknath Shinde Allegation Of Uddhav Thackeray Not Good With Anand Dighe


Parbhani : गोविंदपूर येेथे महिलेचा विनयभंग

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा : पूर्णा तालूक्यातील गोविंदपूर येथील एका विवाहितेच्या पतीच्या मोबाईलवर मित्रासोबत काढलेले फोटो व अश्लील भाषेत मेसेज पाठवून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. अनिल विठ्ठलराव उखळतकर (रा.बरबडी) असे संशयिताचे नाव आहे. फिर्यादी विवाहित महिलेस तू माझ्यासोबत लग्न कर नाहीतर तुझे मित्रासोबत काढलेले फोटो व्हायरल करतो. असे म्हणत तीन ते चार वर्षापासुन सतत …


मतदान केंद्राध्यक्ष म्हणून काम करताना…

निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याचे जिकिरीचे काम टाळण्यासाठी काही महाभाग कसोशीने प्रयत्नशील असतात. या प्रक्रियेतून सुटका करून घेण्याचा मोह मला कधीच झाला नाही...


Adi Shankaracharya 2024 : महान आदि शंकराचार्यांनी प्रेरित 10 बाळांची नावे

आदि शंकराचार्य ज्यांना जगतगुरु शंकराचार्य म्हणूनही ओळखले जाते. हिंदूंना संघटित करण्यात त्यांनी मोठे योगदान दिले होते. आदि शंकराचार्य यांचीदरवर्षी त्यांच्या भक्तांद्वारे वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी जयंती साजरी केली जाते. आदि शंकराचार्यांची 1236 वी जयंती रविवार, 12 मे 2024 रोजी साजरी झाली. या निमित्ताने त्यांच्या नावावरुन मुलांची खास नावे.


Kanhaiya Kumar : कन्हैया कुमार यांच्या रॅलीत घुसून तरुणाने मारली कानाखाली, VIDEO

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू आहे. पाचव्या टप्प्यात आता मतदान होणार आहे. दिल्लीमध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैयाकुमार हे प्रचार करत होते. यावेळी गर्दीमध्ये घुसून आलेल्या 2 तरुणाने कन्हैयाकुमार यांच्या श्रीमुखात भडकावली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. दोन्ही तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी नवी दिल्लीमध्ये नंदननगरी परिसरामध्ये काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार प्रचार करत होते. आपल्या...


Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्या

Maharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.