66 वर्षांच्या अवलियाची प्रेरणादायी कहाणी, बीएस्सी, बीएड, LLB, एमए आणि आता...

आदित्य आनंद, प्रतिनिधी

गोड्डा : असं म्हणतात की, शिक्षणाची आणि शिकण्याची आवड कधीही संपत नाही. ही म्हण एका व्यक्तीने खरी करुन दाखवली आहे. निवृत्त झालेल्या एका 66 वर्षांच्या व्यक्तीची शिक्षणाची ओढ आजही कायम आहे. शिक्षकाची नोकरीवरुन 6 वर्षांपूर्वी निवृत्त झाल्यानंतर आजही ते शिक्षण घेत आहेत. बीएस्सी, बीएड, एलएलबी, पत्रकारिता आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण घेतलेल्या या व्यक्तीच्या अनोख्या प्रवासाची कहाणी आपण आज जाणून घेणार आहोत.

सतीश झा असे या व्यक्तीचे नाव आहे. ते झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी तीन महिन्यांपूर्वी अयोध्येतील इस्कॉन येथून श्रीमद्भागवतमध्ये 1 वर्षाच्या डिप्लोमा कोर्ससाठी प्रवेश घेतला आहे. तसेच ते यासाठी नियमित रुपाने ऑनलाइन क्लासही करतात. लोकल18 च्या टीमने त्यांच्याशी विशेष संवाद साधला.

यावेळी लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जेव्हापासून त्यांनी अभ्यास सुरू केला आहे, तेव्हापासून त्यांनी आतापर्यंत एकदाही ब्रेक घेतला नाही. त्यांनी 1972 मध्ये महागामाच्या जयनारायण उच्च विद्यालयातून दहावीचे शिक्षण घेतले. यानंतर दुमका येथील एसपी कॉलेजमधून विज्ञान शाखेत बारावीचे शिक्षण घेतले. तसेच त्यानंतर बायोलॉजी विषयात पदवीचे म्हणजे बीएस्सीचे शिक्षण घेतले.

आश्चर्यम…महिलेचं वय 20, एकाच वेळी दिला 5 मुलींना जन्म, अनेकांना विश्वासच बसेना!

दुकानही सुरू केले -

पदवीच्या शिक्षणानंतर त्यांनी स्टेशनरीचे दुकान सुरू केले. काही दिवस व्यवसायाचा अनुभवही त्यांनी घेतला. यानंतर त्यांननी 1980 मध्ये दिल्ली विद्यापीठातून पत्रकारितेमध्ये डिप्लोमा कोर्सही पूर्ण केला. यानंतर ते आकाशवाणी भागलपुर येथे रूजू झाले. आकाशवाणीमध्ये काम करत असताना त्यांनी लॉ कॉलेज भागलपुर येथून एलएलबीचे शिक्षण घेतले. त्यानंतर पाटणा येथून वकील म्हणून नोंदणी केल्यानंतर 1989 ते 1994 या काळात गोड्डा येथील दिवाणी न्यायालयात वकील म्हणून कार्य केले.

लोकल18 शी बोलताना ते पुढे म्हणाले की, 1994 मध्ये त्यांना सरकारी शिक्षकाची नोकरी मिळाली. या दरम्यान, त्यांनी बीएड कॉलेज देवघर येथून B.ED चीही डिग्री घेतली. मग दिव्यांग मुलांच्या कौशल्य विकासासाठी फाऊंडेशन कौर्स केला. नोकरी करत असतानाच त्यांनी इग्नू येथून हिंदी विषयात एमए केले. यानंतर 2008 मध्ये ते हरिद्वार येथे गेले. याठिकाणी त्यांनी बाबा रामदेव यांच्या सानिध्यात योग प्रशिक्षकाची डिग्री घेतली. दरम्यान, जानेवरी 2018 मध्ये ते शिक्षक पदावरुन निवृत्त झाले.

मूलबाळ होत नसल्याने पत्नीला सोडलं, दुसरं लग्न करताच पहिलीला आला राग, घडलं भयानक

नोकरी केल्यावर गीतेची डिग्री -

नोकरीवरुन निवृत्त झाल्यानंतरही सतीश झा यांची शिक्षणाची भूक कमी झालेली नाही. त्यांनी अयोध्येतील इस्कॉन इथून गीता विषयात 3 वर्षांची डिग्री मिळवली. तसेच ते श्रीमद्भागवतमध्ये डिप्लोमाचे शिक्षण घेत आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या अभ्यासोबतच ते महागामा कस्तुरबा निवासी शाळेत मुलांना जीवशास्त्र शिकवतात. तसेच रिकाम्या वेळेत 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी विषय शिकवतात. अभ्यासाव्यतिरिक्त वेळ मिळाल्यावर ते पूजापाठ करतात. तसेच कुंडलीही बनवतात, अशी माहिती त्यांनी दिली.

2024-05-07T04:31:11Z dg43tfdfdgfd