BEED NEWS : वृद्धास महिलेने केली लोखंडी गजाने मारहाण

गौतम बचुटे ### SEO Slug

केज (बीड) : आमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार का केली ? असे म्हणून एका महिलेने ७३ वर्षाच्या वृद्धाला लोखंडी गजाने मारहाण करून दुखापत केली आहे. दि. २५ जुलै रोजी सायंकाळी ५:०० वा. सुमारास लक्ष्मण मस्के वय ७३ वर्ष हे त्यांच्या केज येथील कोकिसपीर येथे त्यांच्या घरासमोर असताना त्यांना मारहाण झाली. त्यांच्या गल्लीत राहत असलेली मंगल शेरे ही महिला आली आणि त्यांना म्हणाली आमच्यावर पोलीस स्टेशनला केस का केलीस? असे म्हणून तिने लक्ष्मण मस्के यांना शिवीगाळ करीत लोखंडी गजाने मारहाण केली.

मारहाणीत लक्ष्मण मस्के यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली आहे. यावेळी भांडण सोडवायला आलेला त्यांचा मुलगा हनुमंत मस्के याला पण त्या महिलेने धक्काबुक्की आणि शिवीगाळ करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत. लक्ष्मण मस्के यांच्या तक्रारीवरून मंगल शेरे हिच्या विरुद्ध केज पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४१५/२०२४ भा. न्या. सं. ३५२, ३५१(३) ३५१(२), ११८(१), ११५ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस जमादार रुक्मीन पाचपिंडे या तपास करीत आहेत.

2024-07-27T05:25:52Z dg43tfdfdgfd