BUDDHA PURNIMA 2024 DATE: वैशाखमध्ये कधी आहे बुद्ध पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Buddha Purnima 2024 Date And Time: हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. याच दिवशी बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पोर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे. चला जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेची तिथी आणि महत्त्व.

बुद्ध पौर्णिमा तिथी आणि मुहूर्त

पंचांगानुसार, यंदा बुद्ध पौर्णिमा गुरुवार, 23 मे 2024 रोजी आहे. या दिवशी गौतम बुद्धांची 2586 वी जयंती साजरी केली जाईल. पंचांगानुसार, पौर्णिमा तिथी 22 मे 2024 रोजी संध्याकाळी 06 वाजून 47 मिनिटांनी सुरू होईल. तर 23 मार्च 2024 रोजी सायंकाळी 07 वाजून 22 मिनिटांनी समाप्त होईल.

बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व

धार्मिक मान्यतेनुसार, वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. ही पौर्णिमा सर्व पौर्णिमेमध्ये श्रेष्ठ मानली जाते. मान्यतेनुसार, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी विष्णूंची पूजा आणि दान करण्याची परंपरा आहे. मान्यतेनुसार, असे केल्याने जीवनातील सर्व दुःखे दूर होतात आणि पापांपासून मुक्ती मिळते.

बुद्ध पौर्णिमा काय करावे आणि काय करू नये

या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करावी. या दिवशी शक्य असल्यास व्रत करा. रात्री चंद्रदेवाची पूजा करा. या दिवशी मंदिरात जाऊन विष्णूच्या मूर्तीसमोर दिवा लावत विधीवत पूजा करावी. या दिवशी गंगा स्नानाला महत्त्व आहे, त्यामुळे शक्य असल्यास गंगा स्नान करा. गंगा स्नान शक्य नसल्यास इतर कोणत्याही पवित्र नदीत स्नान करा, असे केल्याने पापांपासून मुक्ती मिळते. तसेच पाण्याने भरलेले मातीचे भांडे आणि विविध प्रकारचे पदार्थ ब्राह्मणांना दान करावेत. या दिवशी तामसिक अन्नाचे सेवन करू नये.

(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. यासाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे आवश्यक आहे.)

2024-05-04T18:20:41Z dg43tfdfdgfd