बातम्या

Trending:


एमबीए – एमएमएस सीईटी परीक्षेचा निकाल जाहीर

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ९ ते ११ मार्च या कालावधीत महाराष्ट्र राज्य आणि अन्य राज्यातील विविध १७८ केंद्रांवर ही परीक्षा घेतली होती.


Mentally Strong Students : परीक्षेच्या निकालानंतर ही असे राहा मानसिक दृष्ट्या मजबूत,त्यासाठी काही खास टिप्स!

Mentally Strong Students : मानसिकदृष्ट्या मजबूत विद्यार्थी कोणत्याही स्थितीला घाबरण्याऐवजी त्यांच्या ध्येयावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करतात.यामुळे त्यांचे लक्ष विचलित होत नाही .


Loksabha election 2024 | राऊतांचे शाब्दिक ताशेरे, आठवलेंच्या मार्मिक कविता... ऐका हो ऐका

Loksabha Election 2024 funny videos Aika Ho Aika


Indian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात? रेल्वे Horn च्या आवाजाचे अर्थ जाणून घ्या

Indian Railway : संकटसमयी ट्रेनचा हॉर्न कसा वाजवतात?


Man Locked Wifes Private Parts : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या गुप्तांगाला कुलूप लावलं, पुण्यातील धक्कादायक प्रकार!

Pune Shocking News: पुण्यातील वाकड परिसरात चारित्र्याच्या संशयावरून एका व्यक्तीने पत्नीच्या गुप्तांगावर कुलूप लावले.


ABP Majha Headlines : 12 PM : 18 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

संघला संपवायला देखील भाजप मागेपुढे पाहणार नाही, उद्धव ठाकरेंचा घणाघात, नकली शिवसेनेच्या टीकेला उत्तर देताना हल्लाबोल बुलडोझर चालवणार नाही तर राम मंदिराचं उर्वरित काम पूर्ण करू, मोदींच्या टीकेला उत्तर देतान ठाकरेंचा पलटवार, तर सर्वधर्मीय स्थळांचं संरक्षण ही आमची भूमिका, पवारांचं वक्तव्य सत्ता आल्यास देशात सरसकट एकच जीएसटी, इंडिया आघाडीच्या पत्रकार परिषदेत खरगेंची घोषणा, प्रचारात मोदी जनतेला भडकवत असल्याचा आरोप भाजपला एकेकाळी संघाची गरज लागायची, पण आता आम्हीच आमचा पक्ष चालवतो, भाजपचे अध्यक्ष नड्डा यांचं मोठं वक्तव्य((संघाबद्दल नड्डा यांचं मोठं वक्तव्य)) मुंबईतल्या भाजपाच्या प्रचारासाठी राज ठाकरेंकडून बैठका, आशिष शेलारांच्या साथीनं घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरात शाखाभेटी मुंबईतील मोदींच्या रोड शोसाठी मुंबई महानगरपालिकेकडून तीन कोटी ५६ लाखांचा निधी खर्च, संजय राऊतांचा आरोप, मोदींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी((रोड शोसाठी बीएमसीवर ३.५६ कोटींचा बोजा?)) भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांचा मोठा दावा, रोड शोदरम्यान मोदींच्या कटआऊटवर पुष्पवृष्टी महामुंबईसह नाशिक, धुळ्यातल्या प्रचारासाठी अखेरचा दिवस, सर्वच पक्षांच्या सभा आणि रॅलींचा धुरळा((आज थंडावणार प्रचाराच्या तोफा)) संभाजीनगर गर्भलिंग निदान प्रकरणी आयुर्वेदिक डॉक्टर रोशन ढाकरेला अटक, रॅकेटमध्येे १५ ते २० एजंट्सचा सहभाग असल्याचं तपासात समोर((डॉक्टरच घ्यायचा अर्भकांचा जीव)) नागपूरह विदर्भाला दोन दिवस पावसाचा येलो अलर्ट, हवामान खात्यानं वर्तवली वादळी पावसाची शक्यता((विदर्भावर पुन्हा अवकाळीचं सावट))


Maharashtra Board Result 2024: दहावी आणि बारावीचा निकालाबाबत मोठी बातमी, अपडेट जाणून घ्या

Maharashtra HSC and SSC Result 2024 : महाराष्ट्रातील दहावी, बारावीच्या निकालाबाबत सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. निकाल कधी लागणार आणि कुठे ते पाहा.


Mumbai Tempreture: मुंबईत उकाड्यापासून दिलासा नाही; सोमवारी ३३ ते ३५ अंशादरम्यान तापमानाचा अंदाज

Mumbai Tempreture: सोमवारी मुंबईतील मतदानाच्या दिवशी ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान असू शकेल. सध्या मुंबईत येणारा प्रचंड उकाड्याचा आणि उष्ण हवेचा अनुभव सोमवारी कायम असेल असाही अंदाज आहे.


India GDP Growth: अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची बातमी, UN ने आर्थिक विकासदराचा अंदाज बदलला

UN on India Economic Growth: भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ पाहून जगभरातील रेटिंग एजन्सी चकित झाल्या आहेत. जगभरातील अर्थव्यवस्था आर्थिक आघाडीवर संघर्ष करत असताना भारतीय इकॉनॉमी मात्र सुस्साट वेगाने अग्रेसर आहे. अलीकडेच IMF आणि जागतिक बँकेने भारताच्या वाढीबाबत सकारात्मक रेटिंग दिले तर आता भारताचा वेग आम्ही विचार केला होता त्यापेक्षा अधिक वेगवान असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.


Air Force Recruitment 2024: भारतीय वायुसेनेत नोकरी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

Air Force Recruitment 2024 Eligibility: भारतीय वायुसेनेत एअरमेन गट व्हाय वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी रिक्त जागा आहेत.


Raj Thackeray Meets Harshvardhan Patil : राज ठाकरे हर्षवर्धन पाटलांच्या भेटीला; पुण्यातील निवासस्थानी घेतली भेट

Raj Thackeray Meets Harshvardhan Patil : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची पुण्यातील निवासस्थानी भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली.


Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक

Vibhav Kumar Arrest News : केजरीवाल यांचे पीए विभव कुमार यांना अटक दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून विभव कुमार यांना अटक केली आहे. त्यांना दिल्लीतील सिविल लाइन्स पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. विभव कुमार यांचं म्हणणं आहे की, त्यांना माध्यमांमधून एफआयआरबाबत माहिती मिळाली. तसेच, विभव कुमार यांनीही ईमेल मार्फत दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. विभव कुमार यांनी दिल्ली पोलिसांना त्यांनी केलेल्या तक्रारीचीही दखल घ्यावी, असं आवाहनही केलं आहे. तसेच, त्यांना कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचंही विभव कुमार यांचं म्हणणं आहे. स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांचं म्हणणं आहे की, जेव्हा त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासोबत विभव कुमार यांनी गैरवर्तन केलं आणि त्यांच्यासोबत मारहाणही करण्यात आली होती. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनंतर एम्समध्ये स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आलं आहे की, स्वाती डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा आहेत. स्वातीनं डोकेदुखी आणि मान ताठ असण्याचीही तक्रार केली आहे.


Pune Crime News : महादेव अॅपमधून कोट्यावधींची उलाढाल; पोलिसांची धडक कारवाई, 45 लॅपटॉप, 89 मोबाइल जप्त

पुणे : पुणे ग्रामीण पोलिसांनी नारायणगावातील (Pune Crime news) एका तीन इमारतीवर छापेमारी केली आहे. ‘महादेव बेटिंग ॲप’संबंधी केलेल्या कारवाईत पोलिसांच्या हाती मोठं धबाड लागलं आहे. तब्बल 62 लाख 74 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या ऑनलाईन जुगारांच्या आर्थिक व्यवहार आणि पैसा वळवण्यासाठी 452 बँक खात्यांचा वापर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. या अॅपच्या माध्यमातून कोट्यावधींची उलाढाल झाल्याची माहित आहे. महादेव सट्टेबाजी अॅपच्या...


VIDEO | लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील प्रचार आज थांबणार

Fifth Phase Of Lok Sabha Election Campaign To End Today


छत्तीसगडमधील तरुणीवर कोल्हापुरात अत्याचार

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून छत्तीसगडमधील तरुणीला फूस लावून कोल्हापुरात आणून अत्याचार केल्याचे शुक्रवारी उघड झाले. संबंधित तरुणीने शिरोलीतील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना माहिती दिली. त्यानंतर सायंकाळी संबंधित तरुणीला घेऊन कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुखांचे कार्यालय गाठले. तरुणीच्या तक्रारीवरून माजीद खान या तरुणाविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. त्याच्या शोधासाठी पथके रवाना झाली. दरम्यान, लव्ह जिहादचा संशय व्यक्त करत …


Arvind Kejriwal speech Bhiwandi : मत नव्हे भीक मागायला आलोय, पवारांसमोर केजरीवालांचं भाषण

Arvind Kejriwal, Bhiwandi Meeting :"विरोधी पक्षांच्या नेत्यांना अटक केले. काँग्रेस पार्टीचे बँक अकाऊंट फ्रिज केले. शिवसेना चोरली, राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले, असं करुन निवडणूक लढणार आहात? मोदीजी तुम्ही भित्रे आहात", असं म्हणत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला. भिवंडीत इंडिया आघाडीची सभा पार पडली. यावेळी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारही उपस्थित होते. इंडिया आघाडीची मुंबईतील बीकेसीच्या मैदानावर सभा पार पडणार आहे. तत्पूर्वी केजरीवालांनी भिवंडीतील सभेलाही हजेरी लावली आहे. अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीतील लोकांना मोफत उपचार करुन दिले. मात्र, मला शुगर आहे, जेलमध्ये मला 15 दिवस गोळ्या घेऊ दिल्या नाहीत. मला रोज चार वेळेस इंजक्शन लागते. मी तुरुंगात असताना मला इंजक्शन देखील घेऊ देत नव्हते. मला जेलमध्ये टाकून दिल्लीतील लोकांना मोफत मिळणारी वीज बंद करु इच्छित आहेत. पुतीनने विरोधी पक्षांच्या नेत्यांना जेलमध्ये टाकले किंवा मारुन टाकले. पाकिस्तान आणि बांगलादेशमध्येही तशीच अवस्था आहे. मोदीजी भारतातही तसंच करु इच्छित आहेत. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) म्हणाले, मी दिल्लीवरुन आलोय. मी तुमच्यासमोर देशाला वाचवण्याची भीक मागतोय. काही दिवसांपूर्वी माझी तुरुंगातून सुटका झाली. मी सुप्रीम कोर्टाचे आभार मानतो, त्यांनी माझी सुटका केली. मला वाटत नव्हते, की माझी एवढ्या लवकर सुटका होईल. मी ठरवलंय, 21 दिवस झोपणार नाही. 24 तास संपूर्ण देशात फिरुन लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करणार आहे.


RTE Admission : आरटीई प्रवेश प्रक्रियेत आजपासून अर्ज करा; शिक्षण विभागाची माहिती

Right To Education Admission : शिक्षणहक्क कायद्यांतर्गत (आरटीई) खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला पुन्हा नव्याने उद्या शुक्रवारी १७ मे पासून सुरुवात होणार आहे. त्यामुळे यापूर्वी, प्रवेशासाठी अर्ज केलेल्या पालकांसोबतच आरटीईतून प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या पालकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.


पक्ष्यांचे जीवनमान बदलतेय!

भारतीय वन सर्वेक्षण विभागाच्या माहितीनुसार मे महिन्यामध्ये जंगलांत आगी लागण्याच्या 342 घटना देशभरात घडल्या. याचा फटका पक्ष्यांना बसला आहे. याचे कारण मार्च ते जून हा काळ पक्ष्यांचा प्रजननाचा काळ असतो. गेल्या काही वर्षांत वाढत्या तापमानामुळे पक्ष्यांचे जीवनमान बदलत आहे. खासकरून उत्तरेकडील थंड देशातून उष्णकटिबंधीय प्रदेशात येणार्‍या प्रवासी पक्ष्यांना तापमानवाढीची झळ बसली आहे. याचे कारण प्रवासी …


Global Extinction Species Day Special | ’डोडो’ पक्षी आता उरला फक्त चित्रात!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हिंदी महासागरात सापडणारा डोडो पक्षी सुमारे 400 वर्षांपूर्वी नामशेष झाला. त्यावर आपण काहीच उपाय न केल्याने आता तो फक्त चित्रात दिसतो. मानवी हस्तक्षेपामुळे जगभरातील 1500 पेक्षा जास्त प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. जगात 27 ते 50 टक्के पशू, पक्षी आणि विविध प्राण्यांच्या जाती लुप्त होत असल्याची चिंता यानिमित्ताने तज्ज्ञांनी व्यक्त …


Shantigiri Maharaj Statment : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा पाठिंबा, शांतिगिरी महाराजांचा दावा

नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी मोठं वक्तव्य केलं आहे. भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनाचा आम्हाला पाठिंबा असल्याचं मोठं वक्तव्य शांतिगिरी महाराजांनी केलं आहे. शांतिगिरी महाराज यांनी नाशिक लोकसभेसाठी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. शांतीगिरी महाराजांकडून (Shantigiri Maharaj) नाशिकमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन केले जात आहे. शांतीगिरी महाराज प्रचारासाठी दररोज नवनवीन फंडे शोधत आहे. आज प्रचाराचा अखेरचा दिवस असून शांतिगिरी महाराजांनी आज भव्य प्रचार रॅली काढली आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना मोठा दावा केला. नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराज यांच्याकडून शक्ती प्रदर्शन केले आहे. नाशिकच्या गंगा घाटावरून शांतीगिरी महाराजांच्या रॅलीला सुरुवात झाली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार रॅली आयोजित करण्यात आली आहे. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीने नाशिक लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत तिरंगी लढत होणार आहे.


Malad Woman Found Dead: मालाडमध्ये राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत सापडला महिलेचा मृतदेह

89-Yr-Old Woman Killed In Malad: मुंबईच्या मालाडमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.


मतदानाआधीच बोटाला शाई, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

,


आयपीएलमध्ये या खेळाडूंनी केले संघ मालकाचे पैसेवसूल…

कमी पैश्यांत अव्वल दर्ज्याची कामगिरी केली या खेळाडूंनी…


Mumbai Goa Highway Traffic Jam: सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर ट्रॅफिक जाम; वाहनांच्या अनेक किमी लांबच लांब रांगा

Mumbai GoaHighway Traffic Jam : सलग सुट्ट्यांमुळे मुंबई-गोवा मार्गावर आज सकाळ पासूंन वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळत आहे. या मार्गावर वाहनांच्या अनेक किमी रांगा लागल्या आहेत.


Imtiyaz Jaleel On Navneet Rana : इम्तियाज जलील संतापले, नवनीत राणांवर जळजळीत टीका

नवनीत राणांच्या ओवेसी चॅलेंजवरून आता इम्तियाज जलील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.


Devendra Fadnavis : Uddhav Thackeray यांच्या भाषणातून हिंदू शब्द गायब झाला, फडणवीसांचा घणाघात

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : मुंबईत सोमवारी (दि.16) वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. यामध्ये पाऊस सुरु असतानाच घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून सोमवारी मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या पोलीस मैदानावरील पेट्रोल पंपावर 250 टन वजनाचे होर्डिंग वादळामुळे कोसळलं. या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झालाय. दरम्यान, होर्डिंग कोसळल्यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. दरम्यान घाटकोपरच्या या होर्डिंग दुर्घटनेवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, ज्या दिवशी होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला. त्यादिवशी मी ठरवलं होतं की, या होर्डिंगचा मालक कोणत्याही बिळात लपला असला तरी शोधून काढेन. आज आम्ही त्याचा मालक शोधून काढलाय. त्यांचा पर्दाफाश झालेला आहे. सर्व बेकायदेशीर परवानग्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने दिलेल्या आहेत. बंधू-भगिनींनो 140/120 चे होर्डिंग होतं. कोणतेही नियम नाही. कोणत्याही परवानग्या नाहीत. थेट तुम्ही लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता. त्याला तुम्ही सर्व मान्यता देता. आज खऱ्या अर्थाने हा अपघात नाही. एकप्रकारे या लोकांचा खून झालाय. तो त्यावेळेसच्या सरकारच्या आशीर्वादाने झालाय. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल मी तुम्हाला शब्द देतो, कोणत्याही परिस्थितीत हे जे 16 लोक गेलेत. यांचं जीवन वाया जाऊ देणार नाही. अपघात म्हणून मी त्याला सुटू देणार नाही. आम्ही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आम्ही सिद्ध करु. त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल. लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल. आम्हाला वाटत नाही, असंही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी म्हटलं आहे.


छत्तीसगडच्या सुकमात चकमक, एक नक्षली ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात शनिवारी सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत एक नक्षलवादी ठार झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. सुरक्षा दलाचे एक पथक नक्षलविरोधी ऑपरेशन राबवत असताना तोलनई आणि टेटराई गावांदरम्यानच्या जंगलातील टेकडीवर ही चकमक झाली. या भागात नक्षली असल्याच्या गुप्त माहितीच्या आधारे शुक्रवारी रात्री ही कारवाई सुरू करण्यात आली होती. या दरम्यान नक्षली …


Amol Kolhe: मी रेल्वेची वाट बघत थांबलो होतो, मोदी है तो...; अमोल कोल्हेंचा मोदींना उपरोधिक टोला

Dhule Amol Kolhe News: खासदार डॉ. कोल्हे पुढे म्हणाले, की अनेक ठिकाणी पंतप्रधानांकडे बघून मतदान करा असे सांगितले जात आहे. पण सोयरीक जुळवताना बापाच्या कर्तृत्वाकडे नव्हे, तर मुलाकडे बघावं लागतं.