Trending:


Uddhav Thackeray Exclusive : पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईत शेवटची सभा असेल, शिंदे भाजपमध्ये विलीन होतील : उद्धव ठाकरे

मुंबई: भाजप हा संपलेला पक्ष आहे, त्यांना स्वतःची पोरं होत नाहीत किंवा नकली संतानही होत नाही, त्यामुळेच त्यांना इतर पक्ष फोडावे लागतात अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदी झोपले नसल्याने त्यांच्या मेंदूला क्षीण आला असून पंतप्रधान म्हणून मोदींची मुंबईतील शेवटची सभा असेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. 4 जूननंतर शिंदे भाजपमध्ये विलीन होतील असंही ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी 'एबीपी माझा'शी खास संवाद साधताना भाजपवर टीका केली....


Sharad Pawar Dhule Sabha: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या भाषणावेळी स्टॅजवरील होर्डिंग पडले

Sharad Pawar Dhule Sabha: लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर व्हायला आता काहीच दिवस बाकी आहे. 20 मे रोजी पाचव्या टप्प्यातील मतदान, 25 मे रोजी सहाव्या टप्प्यातील मतदान आणि 1 जून रोजी सातव्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. 4 जून रोजी लोकसभा निवडणुकांचे निकाल हे जाहीर होणार आहेत. यावेळी महायुती आणि मविआच्या प्रचार सभाही जोरात होताना दिसत आहेत.


Chardham Yatra 2024: Reel आणि फोटो काढला तर थेट जेलमध्ये, पोलिसांची करडी नजर

केदारनाथ : आजकाल कुठेही गेलं तरी फोटो, व्हिडीओ किंवा रिल्स बनवणं म्हणजे आपल्या जीवनातला अविभाज्य भाग झाला आहे. कोरोनानंतर चारधाम यात्र सुरू झाली तेव्हा केदारनाथ मंदिरासमोर अनेक रिल्स तयार करण्यात आले होते. काहींनी केदारनाथ मंदिरासमोर प्रपोज करण्याचे रिल्स टाकले होते त्यामुळे भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली होती.बऱ्याचदा काळ वेळ याचं भान न ठेवता रिल्स आणि फोटो काढले जातात. याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर केदारनाथ आणि चारधाम यात्रेत संस्थेनं...


Maharashtra SSC Result 2024: दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट; ‘या’ आठवड्यात कधी लागणार निकाल जाणून घ्या

Maharashtra Board 10th Result 2024 Date: आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातेय. दरम्यान याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.


घाटकोपर दुर्घटनेचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग

गुन्हे शाखेने या प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश प्रभूदास भिंडे (५१) याला उदयपूर येथून अटक केली होती. आता या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा करणार आहे.


मुंबई ते मांडवा जलवाहतुक २६ मे पासून बंद होणार

मुंबई ते मांडवा दरम्यान चालणारी जलवाहतुक सेवा २६ मे पासून बंद होणार आहे. पावासाळ्याच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.


चाबहारची बहार!

इराणचे राष्ट्राध्यक्ष सय्यद मोहंमद खातमी यांनी 2003 मध्ये केलेला भारत दौरा हा भारत-इराण संबंधांना ऐतिहासिक कलाटणी देणारा ठरला. त्यावेळी उभय देशांत विविध क्षेत्रांतील करार झाले; परंतु त्यात सर्वात महत्त्वाचा होता, तो चाबहार बंदरविषयक करार. मात्र त्यानंतरच्या काळात भारत अमेरिकेच्या अधिक जवळ गेला, तर इराण व अमेरिकेतील वैमनस्य वाढत गेले. त्यामुळे चाबहार बंदराच्या विकासाची प्रक्रिया मंदावली. …


Marathwada Water Crisis: मराठवाड्यात भीषण 'पाणीबाणी', तहानलेल्या गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा

Marathwada Water Crisis: सध्या हिंगोलीसह मराठवाड्यातील तब्बल एक हजार ६४८ गाव व वाड्यामध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर झाला असून, या गावांना एक हजार ७५८ टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. मराठवाडा आणि पाणीटंचाई असे गेल्या काही वर्षांपासून समीकरण झाले आहे.


RTE admission 2024: आरटीई प्रवेशाचा मार्ग मोकळा, 17 मेपासून भरता येणार ऑनलाइन अर्ज

RTE admission 2024: राईट टू एज्यूकेशन कायद्यामध्ये सरकारकडून बदल करण्यात आला होता. या कायद्याअंतर्गत प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांना त्यांच्या घरापासून एक किलोमीटर परिसरातील सरकारी किंवा सरकारी अनुदानीत शाळांमध्ये प्रवेश देण्याच निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली. न्यायालयाच्या स्थगितीनंतर नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आली होती.


तपास यंत्रणांना धडा

मात्र, ही बातमी येण्याआधीच सन २०२१ मध्ये भारतीय तपास यंत्रणांनी ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून पैसा मिळत असल्याचा ठपका ठेवला होता. तेव्हा आणि नंतर न्यायालयातही पुरकायस्थ हे सातत्याने ‘न्यूजक्लिक’ला चीनकडून एक छदामही मिळालेला नाही,’ अशी भूमिका सातत्याने मांडत आहेत.


Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता

Monsoon 2024 Updates : केरळमध्ये 31 मे रोजी मान्सून दाखल होणार, सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता दरवर्षी 1 जूनला केरळात दाखल होणारा नैऋत्य मोसमी मान्सून यंदा 31 मे रोजीच केरळात दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शेतकऱयांसाठी ही आनंदवार्ता असून उकाडय़ापासूनही लवकरच सुटका होणार आहे. गेल्या वर्षी नैऋत्य मोसमी मान्सून 4 जूनला केरळात दाखल होईल असा अंदाज होता. प्रत्यक्षात मान्सून 8 जूनला दाखल झाला होता. मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 2022 मध्ये 29 मे 2021 मध्ये 3 जून 2020 मध्ये 1 जून तर 2019 मध्ये 8 जून रोजी मान्सून केरळात दाखल झाला होता.


Zero Hour Ghatkopar Hoarding Case : घाटकोपर होर्डिंग प्रकरणात मुख्य आरोपी भावेश भिंडे गजाआड

मुंबई : घाटकोपरमधील दुर्घटना (Ghatkopar Hording Collapsed) घडल्यानंतर याप्रकरणातील आरोपी भावेश भिंडे बेपत्ता आहे. भावेश भिंडेच्या मागावर मुंबई पोलिसांची 7 पथकं आहे. वेगवेगळ्या भागात भिंडेचा पोलिसांकडून शोध सुरु असून भिंडे राज्याबाहेर पळाल्याचा संशय आहे. भिंडेचे शेवटचे लोकेशन लोणावळ्यात आढळले. त्यानुसार मुंबई पोलीसांची टीम तिथे पोहचली. मात्र त्यापूर्वीच भिंडे पसार झाला होता. घाटकोपर दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भावेश भिंडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. अटकेच्या भीतीने भिंडेने पळ काढला आहे. भिंडेच्या मागावर असलेल्या मुंबई पोलिसांना त्याचे शेवटचे लोकेशन लोणावळा येथे असल्याचे समजले. पोलिसांचे पथक लोणावळ्यात पोहचण्यापूर्वीच त्याने मोबाईल बंद केला. त्यानंतर त्याचा कोणताही थांगपत्ता लागलेला नाही.


Gondia Crime News: मुख्याध्यापक आणि शिक्षकाच्या वादाने घेतला लिपिकाचा बळी, गोंदियातील घटना

Gondia Crime News: शिक्षक आणि मुख्याध्यापकाचं भांडण सोडवणं लिपिकाच्या जीवावर बेतले आहे. दोघांच्या भांडणात पडणे किंवा ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणे किती धोकादायक असू शकते याचा प्रत्यय गोंदियातील या घटनेतून आला आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या लिपिकाचा मृत्यू झाल्याची ही घटना गोंदियातील देवरी तालुक्यात असलेल्या सिद्धार्थ विद्यालय तथा महाविद्यालयात घडली आहे.


Central Railway Special Blocks: मध्य रेल्वेचा 15 दिवसांचा विशेष ब्लॉक; अनेक गाड्यांच्या वेळापत्रकात बदल अन् लोकल सेवेवरही परिणाम

Mumbai Train Special Block from May 17 to June 2: मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, मध्य रेल्वेने विशेष रात्रकालीन ब्लॉक जाहीर केला आहे. हा विशेष ब्लॉक 17 मे ते 2 जून असा 15 दिवस सुरू असणार आहे. जाणून घ्या या ब्लॉकमुळे कोणत्या रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत आणि कोणत्या ट्रेनच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.


ABP Majha Headlines : 07 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 07 AM : 17 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार.. भाजपकडून सभेचा टीझर जारी आज मुंबईतील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा.. शरद पवार, उद्धव ठाकरे, मल्लिकार्जुन खरगेंसह अरविंद केजरीवालही उपस्थित राहणार ४ जूननंतर देश 'डिमोदीनेशन' होणार, तर दोन वर्षांनंतर मोदीच निवृत्त होणार , एबीपी माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल ३० वर्षात भाजपमध्ये विलीन झालो नाही तर आता काँग्रेसमध्ये कसं विलीन होणार, विलीनीकरणाच्या चर्चांवरुन उद्धव ठाकरेंचा मोदींवर पलटवार भाजपसोबत न जाण्याची अट राऊतांनी अमान्य केल्यानं चर्चा फिस्कटली, प्रकाश आंबेडकरांचा 'माझा'वर गौप्यस्फोट, तर भाजपसोबत चर्चेची दारं बंद करणार नाही.. राऊतांची भूमिका... आंबेडकरांचा मोठा दावा मुंबईतील शिवाजी पार्क परिसरातील महायुतीचे अनधिकृत बॅनर हटवले, नरेंद्र मोदींच्या अनधिकृत बॅनरवर निवडणूक आयोगाची कारवाई. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही, मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला मोदींचा आत्मविश्वास ढासळल्यानं धर्माच्या आधारे टीका करतात ,.,, शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा.. घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला बेड्या, राजस्थानातल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांकडून अटक. मुंबई, पुणे, नागपूरमधील होर्डिंग्जचा एबीपी माझाकडून रिअॅलिटी चेक.. होर्डिंग्जचं कोट्यवधी रुपयांचं अर्थकारण समोर राज्यात मान्सूनपूर्व पावसाचा जोर..ठाणे, नवी मुंबईत पावसाची हजेरी.. तर जव्हार, मोखाडाला वादळी वाऱ्यासह पावसानं झोडपलं


‘महाराष्ट्र केसरी’ला मिळेना ‘कर्नाटक केसरी’ची जोड

बेळगाव : बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग सांस्कृतिकदृष्ट्या महाराष्ट्राशी जोडला गेला असून सीमाभागातील मल्लांना महाराष्ट्र केसरी किताबाबद्दल आकर्षण आणि आदर आहे. बेळगाव जिल्ह्यात दरवर्षी 40 हून अधिक जंगी आखाडे भरतात. मात्र सर्वच मोठ्या आखाड्यात प्रथम क्रमांकाची कुस्ती महाराष्ट्र केसरी पैलवान विरुध्द उत्तर भारतातील मल्लांशी असते. महाराष्ट्र केसरी वि. कर्नाटक केसरी अशी जोड होण्यासाठी 30 वर्षांपासून प्रतीक्षा आहे. …


ध्रुवीय प्रकाशाचा झगमगाट

ध्रुवीय प्रकाश (Aurora) हा उत्तर आणि दक्षिण ध्रुवाजवळील प्रदेशातल्या आकाशात दिसणारा एक नैसर्गिक चमत्कार आहे.


Narayan Rane Full Speech Mumbai : उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री, येताना कोरोना घेऊन आले

Narayan Rane Full Speech Mumbai : उद्धव ठाकरे पांढऱ्या पायाचा मुख्यमंत्री, येताना कोरोना घेऊन आले, असा हल्लाबोल भाजपचे लोकसभेचे उमेदवार नितेश राणे यांनी केला. शिवसेना उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये महायुतीची सभा पार पडली. त्यात नारायण राणे यांंनी उद्धव ठाकरेंवर टोला लगावला. पुढे ते म्हणाले की, "मोदींच्या 400 पार मध्ये राहुल शेवाळे असलेच पाहिजे, त्यांना निवडून द्या" असं आवाहन राणे यांनी केलं आहे. हे व्हिडिओ देखील पाहा Karale Master Full Speech Manmad : 4 तारखेला अजित पवारांचं घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा 4 तारखेला अजित पवारांची घड्याळ 10 वाजून 10 मिनीटांनी बंद पाडा, असे आवाहन नितेश कराळे मास्तर यांनी केलं आहे. मनमाडमध्ये त्यांची काल जाहीर सभा पार पाडली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.


Loksabha Election | मोदी जातीधर्मात अंतर वाढवतात; शरद पवारांचा घणाघात

Loksabha Election Sharad Pawar Criticize PM Modi For Politics On Religion


भारतीय राजांनी प्रेरित मुलांची 10 नावे

प्राचीन भारतीय राज्यकर्त्यांच्या शौर्याने आणि अभिजाततेने प्रेरित दहा नावे येथे आहेत, प्रत्येकाचा समृद्ध इतिहास आणि शक्तिशाली अर्थ आहे.


Food Poisoning: प्रसादातून 90 जणांना विषबाधा, वाचा कुठे घडलीये घटना

Food Poisoning: नांदेड जिल्ह्यातील एका मंदिरात आयोजित कार्यक्रमात महाप्रसाद खाल्ल्यानंतर अन्नातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात किमान 90 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. भाविकांनी आंबील आणि खीर खाल्ल्याची घटना नायगाव येथे घडली. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे.


Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंचा 4 जूनपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय : ABP Majha

मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगेंनी ४ जूनपासून पुन्हा उपोषण करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र जरांगेंची तब्येत ठीक नसून त्यांनी उपोषण करु नये असा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. दरम्यान मनोज जरांगेंनी मराठा बांधवांना रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा आदेश द्यावा, आम्ही त्यांच्या पाठिशी आहोत, अशी भूमिका अहमदनगरमधील मराठा कार्यकर्त्यांनी घेतलीय. त्यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी सुनील भोंगळ यांनी